निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, मस्त फोटो.
बिमलीची फुले पण अशीच खोडाला येतात. त्यांचा रंगही छान किरमिजी असतो.

प्रज्ञा.... लोकप्रभातला लेख वाचण्यासारखा आहे. अंक मिळाला तर बघ. आता गुजराथमधले रस्ते चांगले झाले आहेत असे वाचले.

बी फोटो खूपच छान आहेत ... लोकप्रभातला लेख वाचनीय. दोन वर्षापूरवी टीकीट काढून काही कारणाने जाऊ शकलो नाही.. पण थोड्या प्रमाणात सफरीचा आनंद मिळाला.

दिनेशदा, मला आता बिमलीची फुले दाखवा वेळ मिळेल तेंव्हा.

ही फुले दुरुन मला इतकी खुणावत होती की एक दिवस मी ठरवले आज कार थांबवून नक्की जवळून ह्या झाडांना बघयचे. ड्रायवरला सांगितले आता तुम्ही एक तासानंतर या. मला तो एक तास पाच मिनिटासारखा वाटला Happy

इथे बघा कशी दाटीवाटीने लगडली ही फुले:

हिरवे फुल असणारे अजून एक झाडः

दुरवरुन छोटी झाडे अशी दिसतात.

बी, तूला नवल वाटेल पण बिमलीचे बहरलेले झाड मी पहिल्यांदा सिंगापूरातच ( स्पाईस गार्डन ) मधे बघितले. मलाय जेवणात त्याचा वापर होतो. प्रचंड आंबट असतात ती फळे. गोव्यात खाण्यापेक्षा पितळेची भांडी वगैरे घासायला जास्त उपयोग करतात.

साधना धन्यवाद. हेच ते गाणे. क्या याद्दाश है आपकी साधनाजी Happy

दिनेशदा, अच्छा हे मी पाहिले आहे फक्त मला नाव नव्हते माहिती Happy धन्यवाद.

अन्जू, धन्यवाद. तू पण फोटो अपलोड कर अन्जू. कॅमेरा आहे ना मोबाईलमधे?

अन्जू, नाही अन्जू असे मुळीच नाही. मी फोटो काढायला सुरवात केली तेंव्हा मलाही असेच वाटायचे. पण जर तुला फोटो आवडत असेल तर नक्कीच तुला फोटो घेताही येतील. नजर पेक्षा फोटोंची आवड असणे गरजेचे आहे. मला गाणे आवडते म्हणून मी जेंव्हा गाणे शिकायला लागलो त्यावेळी मला कळले की मीही गावू शकतो आणि विशेष म्हणाजे मला गाणे अजून जास्त एन्जॉय करता येते.

अन्जू सुरु कर फोटो घेणे. आजूबाजूला खूप काही आहे.

आणि हे बघ.. असे वाटते जणू जांभळ्या शेवंतीचय फुलांची वेणी ह्या फांदीला वेढली असावी: >>>>> बी - बहुधा ते झाड हे असावे - Cercis canadensis किंवा ईस्टर्न रेडबड ... Happy (गुगलताना सापडले ... Happy )

शशांक, तू कसे गुगल केले तेही लिहि ना. मला फक्त चित्रावरुन गुगल करणे जमत नाही.

Cercis canadensis हेच आहे ते झाड. आता आणखी माहिती मिळेल.

धन्यवाद.

बी तुला झब्बू........तुझ्या पिंक झाडासारखे सेम..(अमेरिकेतलं वसंतागमन)

हे तर दुरून खराट्याला मुरमुरे लावल्यासारखं दिसतं. अगदी खोटी वाटतात ही झाडं.

शशांक, तू कसे गुगल केले तेही लिहि ना. मला फक्त चित्रावरुन गुगल करणे जमत नाही. >>>> चित्रावरुन नाही काही गुगलले. ते पिंक -लायलॅक कलरचे फुल - खोडाला चिकटलेले - अमेरिकतले - असे वर्णन टाकायचे गुगलवर आणि इमेजेस मधे पहायचे नेमके कुठले आहे ते - एकदा-दोन्दा नाही जमले पुन्हा पुन्हा ट्राय करत रहायचे ... "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे" या उक्तिनुसार .... Happy Wink इट्स व्हेरी शिंपल ....

मानुषीताई, मस्त.
खराट्याला मुरमुरे लावल्यासारखं >> हे वाचून खूप हसायला आल Happy सही उपमा दिली.

शशांक, धन्यवाद. मस्त आहे तुझ्या आयडीया.

गाणे बघा हो पडद्यावर... मग याददाश्त का राज पर्दाफाश हो जायेगा.. स्मित >> "साधना" रॉक्स ... Happy

बी. एकुणातच धमाल चालु केलीएत. बहुदा 'बी'ला पुढच्या भागचे मनोगत लिहायची घाई झालीये.
बरय पण. आपल्याला काय? आपली तर मज्जा आहे त्यामुळे काय म्हणता निगकर्स? Wink

सुप्र निगकर्स
काल रात्री डिस्कव्हरीवर..........."रिव्हील्डः रन ऑफ कच्छ" चा १ ला भाग पाहिला. डोळ्याचे (आणि मनाचेही पारणे असते का? तर तेही) फिटले. अप्रतीम डायरेक्शन, रिसर्च वर्क, कॅमेरा, नॅरेशन...............इ.इ.
सगळ्यांनी आवर्जून बघा. आता फक्त सोमवारीच असतो की रोज ९ ते १० हे माहिती नाही.
अगदी......... हा भाग कसा निर्माण झाला असावा ती भौगोलिक आणि आर्किऑलॉजिकल माहिती, तिथले सीझन्स, पशु पक्षी जीवन, आणि अर्थातच मानवी जीवन, कला संस्कृती, तिथली मिठागरे, मीठ बनवण्याची प्रोसेस........ काहीही सोडलं नाही. माझे शब्द अपुरे पडताहेत.
पावसाळ्यात फ्लेमिन्गोज, पेलीकन्स आणि इतर असंख्य पक्षी येतात. त्यातल्या गुलाबी फ्लेमिन्गोजचं वर्णन आणि जे काही दाखवलं.............अहाहा! हे गुलाबी फ्लेमिन्गोज अक्षरशः गुलाबी असतात. लांबून एकच गुलाबी पट्टा आकाशातून जमिनीवर उतरतोयसं वाटतं. त्यात गंमत म्हणजे जे फ्लेमिन्गो छान खातात पितात ते हलूहळू जास्ती जास्ती गुलाबी होत जातात. आणि जे आजारी असतात, किंवा जे व्यवस्थित खात नाहीत ते गुलाबी होत नाही. ते असे भुरकट आणि रिकेटी वाटतात.
तिथली घरं इतकी मस्त रंगीत दाखवली आहेत. भरतकाम करणार्‍या बायका !
आता जगात एकच कुटुंब असं आहे की जे एक विशिष्ठ प्रकारचं फॅब्रिक पेन्टिन्ग करतात. तो माणूस नैसर्गिक रंग बनवतो आणि त्याचा चिकट गोळा आपल्या तळहातावर ठेवतो. त्याचा लांब धागा निघतो दुसर्‍या हातावर कापड ठवलेले आणि त्या कापडावर सुंदर पानाफुलांचं डिझाइन तो या लांबत जाणार्‍या चिकट रंगाच्या धाग्याने करत जातो.
आपण च्युइन्ग गम कसं लांबवू शकतो तसं. आणि पद्धत साधारण मेंदी काढतो तशी. या माणसाची एक फॅब्रिक कलाकृतीची फ्रेम आत्ता आपले "नमो" तिकडे अमेरिकेत गेले होते...तिथे त्यांनी ओबामांना भेट दिली.
एक एन्जीओ आहे ती या सर्व कलाकारांजे/कलेला जीवित ठेवण्याच्या मागे आहे. या संस्थेच्या गोराडिया म्हणून बाई आहेत त्यांचीही मुलाखत मधे मधे दाखवत होते.
या संस्थेत माझ्या मैत्रिणीची मुलगी (फॅब्रिक डिझायनर) काम करते. ती भूजला रहाते. आत्ता मैत्रिण पण भूजला तिच्याबरोबर राहून आली.
या संस्थेचं नाव आठवलं की सांगते. नेटवर त्यांच्याबद्दल खूप काही आहे.
अजून खूप काही लिहायचंय..........पण साधना, शशांक शांकली अन्जू वर्षू ....कुणी पाहिला असेल तर लिहा याबद्दल.
दिनेशच्या अंगोल्यात हे दिसत नसणार! आणि साधना जरबेराला नक्की बघायला सांग. ती पण छान लिहू शकेल.
याची पुढेमागे डीव्हीडी निघाली तर नक्की घेणार.

सुप्रभात!!!!

मानुषी खूप छान माहिती दिलीस. हा भाग तूनळीवर शोधून बघेन नक्की.

इथे पहाटे ६ वाजता हजारो साळूंक्या आकाशातून उडतात. त्यांचा तो समूह इतका मोठा असतो की आकाशाचा एक मोठा पट दिसतच नाही. मस्त गिरक्या घेत घेत दुर दुर कुठे तरी विरुन जातात आकाशात.

मी आज व्हर्जीनीयातील स्नो-फॉल दाखवत आहे. चार पाच महिने असेच वातावरण असते. रात्री बर्फ कोसळताना खिडकीतून पाहिले की आपण परिकथेत आहोत असे वाटते. ती शांतता इतकी स्पशून जाणारी असते!!!! बर्फाची निळसर झाक असलेला रंग, झाडावर साचलेले थर, उन्हामुळे ओघळतून पडलेले बर्फाचे खडे, रस्त्यावरून चालतना आपल्या चपला बुटांचे उमटलेले ठसे, मधेच झाडीतून टोकावून चिव चिव करणारे पक्षी.. सगळे दृष्य खूप छान असते.

बर्फातून वाट काढताना माझे काही कलीग्सः

आणि बर्फ पडून गेल्यानंटर जर आकाशा निरभ्र होऊन उन्हा पडले असेल तर.. खूपच बोचरी थंडी पडते. एक इनिट बाहेर चाललो की हातपाय गारठून जातात. पण चार पाच मिनिटे चाललो की मग काही वाटत नाही...

बी Happy

मर्ढेकरांचे स्नरण झाल्यावाचून रहावत नाही...

प्रत्येक टेबलावर असे केक तायार झाले आहेत...

पहाट अगदी झळाळून उठली आहे...

अजून किती दिवस ही झाडे वसंताची वाट बघतील...

मानुषी, नक्की पाहते गं.

बी, खुप सुंदर फोटो. मला पडणारे बर्फ पाहायची खुप इच्छा आहे.. Happy

ते शिशिरऋतुच्या एम्बॉस झाल्यासारखे कसे काय आले?

बी, तुम्ही टाकलेले ते झाडांचे जे दोन फोटो आहेत ना, ती झाडं चक्क मेटलची वाटताहेत!! आणि नंतरचे बर्फाचे फोटो बघूनच गारठायला झालं.
आज पेपरला बातमी आहे - 'नगर गारठले' म्हणून...
मानुषी, तू म्हणतेयस ते भाग मला बघितल्यासारखे वाटताहेत. पुसटसे आठवतेय, पण तू जे फॅब्रिक पेंटिंग बद्दल लिहिलंयस ते नाही आठवतेय. कदाचित फ्लेमिंगोज आणि मिठागरांवर दुसरा एखादा प्रोग्रॅम मला आठवत असावा.

"शिशिरऋतुच्या": साधना मी फक्त बोटानी अक्षरे गिरवली बाकी काहीच नाही केले.

शांकली हो ती झाडे मेटलची आहे. खरी नाहीत. पण खूप सुंदर निर्मिती आहे ती.

Pages