Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माय बोली
माय बोली वर काही आधारगट स्थापन करणे शक्य आहे का? जसे एकट्या पालकान्चा गट, मधुमेही/ ह्रिदयविकारग्रस्त लोकान्चा गट, घरी छोटी मुले किन्वा म्हातारे आइबाप ठेवून कामाला जाणार्यान्चा गट. कोणत्याही emergency मधे आपण अड्कलो जसे मुम्बैचा पाउस, तर आपण आपल्या आधारगटातील लोकाशी बोलून घरी सम्पर्क करू शकतो. औषधे, मदत, ग्रुह्पाठ या बाबतीत माहीती शेअर करू शकू. आपण कुठे परदेशात अड्कल्यास मदत मागु शकतो.
मायबोलीवर
मायबोलीवर रंगित अक्षरे, पांढरी अक्षरे, strike thru या सोयई कधी होणार?

विविध forum वर
विविध forum वर असते तसे search option कधि मिळनार?
सध्या खुप गैरसोय होते.
गौतम मायबो
गौतम
मायबोलीच्या प्रत्येक पानावर सगळ्यात खाली आहे सर्च ऑप्शन. त्यात मायबोली पर्याय निवडला तर मायबोलीवरचे सर्च करता येते.
धन्यवाद
धन्यवाद रुनि, मी जास्ती explore केले नसल्याने दिसले नाही. आता सर्च अतिशय सोपा झाला आहे
नवीन बदल
वीज जाते
वीज जाते त्या वेळी झालेलं लिखाण जतन करण्याची सोय करता येईल का?
*********************
My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.
हजर
हजर सभासदांची नावे मायबोलीवर का दिसत नाहीत?
तसे न दाखवण्यामागे काही खास कारण आहे काय?
मायबोलीची
मायबोलीची पांढरी background, काळी करता येईलही कदाचित पण ते फार कष्टदायक ठरेल. ब्लॉगवरही ते फार सोईच नाही ठरत. [असं आपलं माझं मत बाकी तज्ञ लोकांनी सुचवाव.]
*********************
My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.
मामी,
मामी, कुलदीप, लिहिताना खाली ऑप्शन येतात- 'अप्रकाशित लेखन' टॅब सीलेक्ट करून, तुम्ही लिखाण केलेले सेव्ह करू शकता.
-------------------------
God knows! (I hope..)
नविन
नविन लेखनासंदर्भात प्रशास़कांना विचारपुशीत विनंती केली होती. त्याचे उत्तर त्यांनी न दिल्यामुळे इथे लिहीत आहे.
नविन लेखन करताना टीप लिहीणेबाबत.
पूर्वी लेखन करताना त्या त्या विभागामधे वरती स्वच्छ लिहीलेले असायचे की येथे फक्त स्वःताच्या कलाकृती, लेखन इ. सादर करावे. नविन माबोवर 'नविन लेखन' करताना अशी काहीच सुचना नसल्याने नविन माबोकरांचा गोंधळ होतो व ते दुसर्याच्या कलाकृती बेलाशकपणे टाकतात. त्यावर गदारोळ पण होतो. काही लोक मुद्दाम हे करतात पण काहींना खरच याची कल्पना नसते त्यांना हे कळावे व पहील्याच अनुभवात चटके मिळु नये ही अपेक्षा आहे.
ही विनंती योग्य वाटल्यास योग्य कारवाई करुन सुधारणा करावी.
कांदापोहे,
कांदापोहे,
चांगली सूचना. कशी करता येईल ते पहातो.
आता तुम्ही
आता तुम्ही नवीन सुविधांच्या मागे जोमाने लागणारच आहात तर काही सजेशन्स..
१. स्वतःचा प्रतिसाद डिलिटण्याची सोय असावी. (मागाहून मी असे म्हणलोच नाही असे म्हणण्याकरीता नाही पण एखाद्यावेळेला डिलिटण्याची गरज असतेच.)
२. सध्याफक्त सदस्यसूची मधे आयडी सर्च करण्याची सुविधा आहे. पण एकुणातच किवर्ड सर्च असावा जो कोणे एकेकाळी होता.
३. आत्ता सगळंच नवीन लेखन एकत्र दिसतं. नवीन लेखन मधेच वेगवेगळे विभाग दिसावेत ज्यात त्या त्या विभागातली सूची असावी. आणि पूर्वीप्रमाणे लास्ट ३ आणी ७ दिवस असेही दिसावे.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
माझेही
माझेही काही सजेशन..
काही वेळेस बोल्ड किंवा ईटॅलिक टॅग युजरकडून चुकुन ओपनच रहातो. तो क्लोज केला नाही तर सगळे लिखाण बोल्ड किंवा ईटॅलिक होऊन जाते. त्याने त्रास होतो वाचताना. जुणे जाणते माबोकर असतील तर लगेच लक्षात येतं पण जर सगळेच नवीन असतील तर काहीच कळत नाही. तर हे टॅग्स आपोआप क्लोज होतील ह्याकडे लक्ष देण्यात यावे.
-------------------------
अंधेरा मांगने आया उजाले की भिख हमसे,
अपना घर ना जलाते तो क्या करते हम.
छ्या,
छ्या, पूर्वीसारखी नाव आणि अर्धी ओळ दिसण्याची सोय कराच बुवा ... म्हणजे खरा पारदर्शी कट्टा होइल
लिहिताना
लिहिताना खाली ऑप्शन येतात- 'अप्रकाशित लेखन' टॅब सीलेक्ट करून>>
पूनम/ प्रशासक,
अगं पण एखाद वेळेस अचानक वीज गेली तर काय करायच? एमएस वर्डमध्ये कसं केलेल लिखाण जतन करता येत इन फॅक्ट ते आपो आप होत आणि पुढील वेळेस विचारत आपल्याला की काय कुठलं लिखाण सेव्ह करायचय?
आल का लक्षात मला काय म्हणायचय ते?
*********************
My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.
१.
१. वेळोवेळी ’अप्रकाशित लेखन’मध्ये सेव्ह करायचं. अचानक वीज गेली, तर काहीच भाग जाईल. (अनाहूत- पीसीला यूपीएस लावून घे, बरं असतं.)
२. बरहात लिही ऑफलाईन. वर्डप्रमाणे बरहात सेव्ह होईल बहुधा.
३. वर्ड आणि मायबोली यात फरक आहे. मायबोलीच्या सुविधा वर्डमध्ये आहेत का? (मग नायबोलीकडून वर्डच्या सुविधांची अपेक्षा कशाला? -हे माझं वैयक्तिक मत.)
अर्थात, हे सर्व माझ्या अल्पमतीनुसार. प्रशासक/ इतर माहितगार योग्य ती भर टाकतील, मी ह्याप्रमाणे करते, म्हणून सांगितले. मला तरी फारसा त्रास झालेला नाही 'अप्रकाशित'मध्ये सेव्ह करताना.
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
धन्स पूनम.
धन्स पूनम.
१)’अप्रकाशित लेखन’मध्ये सेव्ह करायचं>> ते मी करतोच!
पण शिकेन नक्कीच
२)पीसीला यूपीएस लावून घेईन पण त्याला वेळ लागेल!
३)बरहात लिही ऑफलाईन>> बरहाच्या नोटपॅडमध्ये बरेच शब्द असे आहेत की जे मी नाही लिहू शकत अजून!
४)मला ही नाही होत फारसा त्रास 'अप्रकाशित'मध्ये सेव्ह करताना
***
वैयक्तिक मतं:
१)मायबोलीच्या सुविधा वर्डमध्ये आहेत का?>> नाहीत कारण मायबोली ही साईट आहे आणि वर्ड हे एक ऑफीस पॅकेज!
मग नायबोलीकडून वर्डच्या सुविधांची अपेक्षा कशाला? -हे माझं वैयक्तिक मत.)>> ह्म्म्म्म अपेक्षा का?
[आपण अपेक्षा कुणाकडून ठेवतो? जे आपले असतात निदान तसं वाटतं त्यांच्याकडूनच ना?
ठीक आहे नाही करत अपेक्षा. मला वाटलं होत की ही जर का सोय झाली तर ते सर्वांनाच सोयिस्कर ठरेल आणि म्हणून विचारल होतं]
2)After all change is the only thing which is constant isn't it? When we say that maayboli also changed in recent years for its own good I thought of changing or at least suggesting to the administrators that can we have some facilities like this? I'm not expecting this will happen overnight. The real question is can we expect?
*********************
My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.
<<३. आत्ता
<<३. आत्ता सगळंच नवीन लेखन एकत्र दिसतं. नवीन लेखन मधेच वेगवेगळे विभाग दिसावेत ज्यात त्या त्या विभागातली सूची असावी. आणि पूर्वीप्रमाणे लास्ट ३ आणी ७ दिवस असेही दिसावे.>>
१०० टक्के अनुमोदन. विशेषतः कविता हा एक विभाग, नि प्रकाशचित्रे हा आणखी एक विभाग करावा. म्हणजे माझ्यासारख्या अरसिकाला त्याला फटाक्कन टांग मारून जिथे टिंगल, टवाळी चालली असेल तिथे लवकर जाता येईल!!

<<< नवीन बदल
<<<
नवीन बदल म्हणून मायबोलीची पांढरी background, काळी करता येईल आणि अक्षर पांढरी. डोळ्यांना पण हा बदल सुखावह असेल आणि वीज सुद्धा वाचवली जाईल.
>>>
नमस्कार nshelke,
काळ्या पार्श्वभूमीवर पांढरी अक्षरे वाचणे हे अनेक संशोधकांच्या व तज्ज्ञांच्या मते डोळ्यांना अधिक त्रासदायक ठरते. यासंदर्भात केल्या गेलेल्या अभ्यासातून व प्रातिनिधिक प्रयोगांमधून मिळालेल्या माहितीनुसार हा सर्वसाधारणपणे मान्य असलेला निष्कर्ष आहे. गडद पार्श्वभूमीवर हलक्या रंगाचे लेखन वाचल्याने बहुसंख्य वाचकांना "halation" चा (अक्षरांचे चमकणे, अथवा अक्षराच्या आकृतीबाहेर जाऊन प्रकाश पसरणे) त्रास होतो.
तसेच, काळ्या पार्श्वभूमीमुळे (लक्षणीय प्रमाणात) वीज अथवा ऊर्जा वाचवली जाते याबद्द्लही शास्त्रज्ञांमध्ये दुमत आहे.
सस्नेह,
मदत समिती
मस, माझ्या
मस,
माझ्या प्रश्नाला उत्तर मिळेल काय?
*********************
My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.
रॉबिनहूडल
रॉबिनहूडला अनुमोदन
मग नेमक सान्ग की, मलाही तेच हवय!
पूर्वीसारखे बीबी->आयडी व त्यान्च्या लेटेस्ट पोस्ट मधील काही भाग असे दिसावे, म्हणजे "विशिष्ट आयडीला" फॉलो करणे देखिल सोप्पे जाते!
हेच हवय ना हुडा तुला?
तो टेबल फॉरम्याट नकोसा वाटतो, नुस्ते नविन किती पोस्ट तेवढेच कळते!
नवीन
नवीन लेखनामधे katha, kavita, prakash chitra etc. असं grouping तारखे नुसार करता येइल...मला वाटतं सथ्या फक्त तारीख आणि वेळेनुसार दिसत आहे. त्यामुळे latest entry कळते पण title दूर पळतात आहे..
recipes section (group)
recipes section (group) requires more categorization, its information overload at present stage
please check this link for categorization example
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103383.html
(though you have explained 100 times, i'll never understand why we have groups and not user friendly forums)
कुलदीप सूच
कुलदीप
सूचना चांगली आहे. मायबोली हे एक संकेतस्थळ असल्याने वर्ड (जे तुमच्या संगणकावर installed असतं) सारख्या सर्व सुविधा शक्य होतीलच असं नाही. वर पूनमने सुचवल्याप्रमाणे बरहा कींवा इतर सुविधा वापरून तुमच्या संगणकावर लेखन साठवून ठेवता येईल. तसेच फायरफॉक्स सारखे न्याहाळक (browser) बंद करताना असलेले लेखन साठवीण्याची सुविधा देतात.
कल्पतरू,
नवीन लेखानाऐवजी जर तुम्ही गुलमोहर या दुव्यावर गेलात तर तिथे विभागवार लेखनाचे दुवे आहेत.
माणूस, तुम्
माणूस,
तुम्ही पाककला विभागात विषयवार यादी पाहिली आहेत का?
जुन्या मायबोलीवरील वर्गीकरण तेव्हाच्या दृष्टीने चांगले असले तरी त्यात थोड्या त्रुटी होत्या. पाककृती फक्त एका विभागात टाकली जाऊ शकत होती. नेमकी कुठे शोधायची हा प्रश्न पडत असे. आता वरील विषयवार यादीत पाहिलेत तर एकच पाककृती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे शोधू शकता.
उदाहरणार्थ भरलेली कोंबडी ही पाककृती खालील तिनही विभागात सापडू शकते.
आहार - मांसाहारी
प्रादेशीक - कोल्हापुरी
प्रकार - चिकनचे प्रकार
उदाहरणार्
उदाहरणार्थ भरलेली कोंबडी ही पाककृती खालील तिनही विभागात सापडू
>>>
च्यायला, तुम्हाला उदाहरणही काय भारी सुचलेय..
***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
धन्स
धन्स अॅडमीन
*********************
My true love hath my heart and I have his,
By just exchange one for another given:
I hold his dear, and mine he cannot miss
There never was a better bargain driven
My true love hath my heart and I have his.
अॅडमिन,
अॅडमिन, या धाग्याचे उपधागे तयार करुन अनुत्तरीत सूचना / सल्ले तेथे टाकता येतील का म्हणजे ते ट्रॅक करणे सोपे जाईल. जसे की
१. झक्कींची पांढर्या शाईची मागणी
२. गुलमोहोरात (किंवा एकूणच ग्रूप मध्ये) अजून ग्रॅन्युलॅरिटी , ज्यायोगे मला एखाद्या ग्रूप मधला एकच धागा निवडता येईल
३. सदस्य नावांचे देवनागरीकरण (यासाठी अगोदरच नवीन धागा उघडला आहे, फक्त उदा. दाखल सांगितलं)
धन्यवाद !
विषयावार
विषयावार यादी आहे हे मला माहीत नव्हते... आता वर्षभरापासुन नविन मायबोली वापरतोय पण अजुनही कधीच लक्षात आले नाही.
still तिथे पोचायला पाच clicks कराव्या लागतात
१. मायबोली
२. हितगुज
३. हितगुज विषयानुसार
४. आहारशास्त्र आणि पाककृती
५. विषयावार यादी
हे चुकीचे नाही का वाटत.
अजुन एक सुचना द्याविशी वाटतेय, new4me_all पाना मधे विषयानुसार row chaa background color बदलता येईल का? म्हणजे अमुक एक धागा वाचुन हा कोणता प्रकार आहे हे identify करण्याऐवजी cell chya color code वरुन लगेच लक्षात येईल ही कविता आहे, का गोष्ट का न्युज का कोणत्यातरी गावाची बडबड.
Pages