Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या
माझ्या सदस्यत्वात पण गृप २दा दिसतायत.
संपादन करतांना "माझ्याविषयी" मधे हायपरलिंक कशी द्यायची?
लवकरात
लवकरात लवकर रंगीत अक्षरे, पांढरी शाई, इ. ची सोय करता येईल का? फार फार बरे होईल.
धन्यवाद.
Login Option जो
Login Option जो सध्या सगळ्यात खाली आहे तो Right Top ला आणला तर?
@gajanandesai "गृप"
@gajanandesai
"गृप" चे ग्रूप झाले त्याचा हा एक परिणाम आहे. Program मधला कुठला तरी भाग "गृप" शब्दाला शोधतोय पण त्याला तो सापडत नसणार. किड्याचा शोध चालू आहे.
अजून वर
अजून वर डाव्या कोपर्यात मुख्यपृष्ठ : गृप : आपली मायबोली असेच दिसते आहे. सगळीकडे बदलला नाहीये का हा शब्द?
एखाद्या
एखाद्या लेखा वरचे प्रतिसाद वाचताना जर पुढील प्रतिसादाच्या पानाच्या क्रमांकावर/'पुढील' लिंकवर टिचकी मारली असता, प्रतिसाद दिसण्या ऐवजी लेखा सुरुवातीपासुन दिसु लागतो. हे थोडे गैरसोईचे आहे. ह्या बाबत काही करता येईल का?
----------------------------------------
फिर वोही रात है.. फिर वोही.. रात है ख्वाब की....
अॅडमिन, पा
अॅडमिन,
पाऊलखुणांमधल्या यादीत त्या त्या पानावर नवीन संदेश आले असतील तर नावापुढे 'नवीन' अशी खूण दिसते. पण त्या 'नवीन' या शब्दावर टिचकी मारली असता थेट नवीन संदेशांचे पान न उघडता प्रतिसादांचे पहिले पान उघडतेय.
गजानन,
गजानन, मलाही काही काही पानांसाठी असे झाले... पण इतर पानांचे नवीन संदेश च दिसले..
अॅडमिन, असे काही काही पानांनाच होते का?
कुठल्याही
कुठल्याही लेखनाच्या धाग्यावर, जिथे १ पेक्षा जास्त पाने आहेत, प्रतिसाद दिला तर त्यानंतर पुन्हा १लेच पान का दिसते? शेवटचे दिसायला हवे ना? (म्हणजे as current context)
लवकरात
लवकरात लवकर रंगीत अक्षरे, पांढरी शाई, इ. ची सोय करता येईल का? फार फार बरे होईल.
धन्यवाद.
प्रत्येक
प्रत्येक पानावर ही मागणी असायलाच हवी असे ठरवले आहे का झक्की? हे म्हणजे, सरकारी कामाचे कितीही गठ्ठे असोत, आपली फाईल वर असायला हवी असे झाले
विपू सध्या
विपू सध्या सगळ्यांना दिसते. ती फक्त त्याच युजरला दिसेल असे काही करु शकता येईल का? लोक इतरांचा विपू वाचुन त्यावरुन भांडन बाफ वर करताना दिसतात. ती सोयच बंद केली तर बरे होउ शकेल. आणि बर्याच वादांवर कायमचा तोडगा निघेल.
प्रशासक,
प्रशासक, मायबोलीच्या पानावर उजव्या हाताच्या कोपर्यात जी अॅड दिसतेय त्याचे काही करता आले तर बघा हो!
ब्रिटनीचा नाहीतर पॅरीस हिल्टनचा फोटो सारखा दिसत रहातो
त्यामुळे ऑफिसमधे गैरसोयीचे वाटते मायबोली उघडणे ! एकतर आजुबाजुच्या लोकांना मराठी कळत नाही..फक्त ते फोटो दिसत राहतात.त्यांना वाटत असेल हा अश्याच काहीबाही साइटवर सारखा पडीक असतो हा !आपल्या मराठमोळ्या साइटला साजेशा जाहीराती चालतील, पण हे नको !
सुचना जरा जास्तच आगाव आहे. पण प्रामाणिक आहे.
प्रकाश
मायबोलीवर
मायबोलीवर शब्दांच्या मध्ये हलन्त अक्षर लिहिता येत नाही.
उदा., खडान्खडा हा शब्द. इथे हलन्त न लिहिताच येत नाही.
तसंच, मायबोलीवर परवलीचा शब्द बदलणं अतिशय सोपं आहे. आपला अस्तित्वात असलेला परवलीचा शब्द लिहावा लागत नाही. त्यामुळे जर मला एखाद्याच्या account मध्ये प्रवेश मिळाला, तर सहज परवलीचा शब्द बदलता येतो.
हे करणं अधिक सोपं आहे कारण मायबोलीची खिडकी बंद केल्यावर अनेक तासांनीदेखील accountमधून आपोआप logoff केले जात नाही. वीज गेली, किंवा चुकून logoff केले नाही, तर माझ्यानंतर मायबोली वापरणारा सरळ माझ्या accountमध्ये प्रवेश करू शकतो.
Sahi यांनी
Sahi यांनी "पाककृती" विभागात दिलेली सूचना खालीलप्रमाणे त्यांच्याच शब्दात :
"The 'Search box' location on the page is not ideal; the user has to scroll all the way in the bottom first to see/notice it and then use it. If the user is logged in, it is the last thing displayed on the screen .It should be available at the top .. may be if you make it more visible by putting right next to 'Kanokani' that way people will not miss it and you will not get 'Can't find it ' sort questions
वेळ कमी होता म्हणुन इन्ग्लिशमधे लिहिले आहे त्याबद्ल माफी असावी"
- मदत समिती
लवकरात
लवकरात लवकर रंगीत अक्षरे, पांढरी शाई, इ. ची सोय करता येईल का? फार फार बरे होईल.
धन्यवाद.
हे करणं
हे करणं अधिक सोपं आहे कारण मायबोलीची खिडकी बंद केल्यावर अनेक तासांनीदेखील accountमधून आपोआप logoff केले जात नाही
हो.मलाही हे त्रासदायक वाटते.
~~~~~~~~~~~~~~~~~~
अच्छा था मन का अवसन्न रहना
भीतर्-भीतर जलना, किसीसे न कहना
पर अब बहुत ठुकरा लिए पराई गलियों के अनजान रोडे
कि बहुत दिन हो गये घरको छोडे|
विचारपूस
विचारपूस मधे फोटो डकवायची सोय आहे का?? मधे मी एकदा प्रयत्न केला होता पण जमले नव्हते मला.
धन्यवाद
चिन्मय,
चिन्मय, खरे आहे. मीही बराच प्रयत्न केला होता शब्दामध्ये हलंत अक्षर काढण्याचा पण जमले नाही. त्याची गरजही भासणार नाही असे मला वाटले होते. 'खडान्खडा' हा शब्दप्रयोग ('सर्व काही' या अर्थाने वापरायचा आहे असे गृहीत धरतोय) 'खडा न् खडा' असा मध्ये मोकळ्या जागा सोडून लिहिणेच शुद्धलेखनाच्या दृष्टीने बरोबर ना?
उड्डाण विश
उड्डाण
विश्वासाचे
mAHODAY,
NAMASKAR,
ADMIN,AAVITAA,LALIT ashi sarv paane veg vegli karun jar Soochi madhe deun,soochitunach tyayaa paanavar jaataa ale tar barach vel vachel,
Admin madhe admin chi veg vegli paane kartaa yetil.
ani yaa vilendrikarnaamule shodh sopa hoil.
sadhyaa manovanchi panavar jane thod vel khaoo kaam aahe,
ashaa aahe aapan bindu tipun ghyaal sadbhaavanansah
s.e.m.
ं
>>हे करणं
>>हे करणं अधिक सोपं आहे कारण मायबोलीची खिडकी बंद केल्यावर अनेक तासांनीदेखील accountमधून आपोआप logoff केले जात नाही
>>
असे होते कारण, बहुतेक session maintain केला जातोय जो ठराविक वेळेनंतर time out होत नाहिये.
web page history delete केली की पुन्हा परवलीचा शब्द विचारला जात असावा....
आजकाल
आजकाल मायबोलीवर अत्यंत गंभीरतेने अनेक विद्वान लोक निरनिराळ्या चर्चा करतात. त्यामधे बरेचदा काही लोक व्यत्तय आणतात. ('झ' ने सुरु होणारे, दोन अक्षरी नाव, ज्यांचे आहे ते लोक, जास्तकरून) तर चर्चेच्या सुरुवातीलाच 'ही चर्चा गंभीर आहे' असे लिहावे. त्याउप्पर जर कुणि चेष्टा केली तर सरळ त्या आय डी ला फक्त मर्यादित प्रवेश द्यावा, फक्त वाचायला परवानगी, लिहायला नाही असे.
वरील सोय केल्यास पुष्कळ जास्त लोक चर्चेत भाग घेतील, जे सध्या घेत नाहीत.
शिवाय या चर्चांमधून पुढे काय झाले, कुठला मुद्दा बहुमताने मान्य झाला, याबद्दल काही कळत नाही. हेहि एक कारण.
तेंव्हा चर्चेच्या शेवटी निष्पन्न काय झाले, कोणता मुद्दा बहुमताने मान्य झाला, किती लोकांनी चर्चेत भाग घेतला, हेहि प्रसिद्ध करावे. जसे सर्वोत्तम कविता. म्हणजे या चर्चा जास्त चांगल्या होतील. कधी कधी खरेच कळत नाही की लोक खरेच असे म्हणत आहेत की काही गंमत करताहेत, मग त्याला तसेच उत्तर दिले जाते, नि चर्चा बिघडते.
झक्की
झक्की
:D zakki
चिन्मय... खड
चिन्मय...
खडा न् खडा.. khaDaa n.h khaDaa
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
मायबोलीवर
मायबोलीवरील नवीन लिखाणाचे विषयानुरुप विभाजन करून मग त्या त्या भागाला नवीन हा टॅग दिला गेला तर फार बरे होईल . काहीवेळा २- ३ दिवसांनंतर जर मायबोलीवर आले आणि नवीन लिखाण वाचायचे असेल तर फार पाने पुढे मागे करावे लागते . काही वेळा निरर्थक प्रकाशचित्रांमुळे महत्वाचे विषय बर्याच मागच्या पानांवर जातात . जुन्या मायबोलीप्रमाणे काही सोय करता येणार नाही का , ज्यामुळे मुख्यपानावरच सर्व विभागानुसार नवीन लिखाण कुठे कुठे झाले आहे , हे दिसेल .
एक
एक विनंती
शुद्धलेखना साठी काहि करता येईल का? म्हणजे लिहिलेला शब्द अशुद्ध लिहिला असेल तर त्या शब्दा खाली लाल रेघ आलीतर (काहिस MS Word प्रमाणे) लिहिणार्याला कळेल शब्दात काहितरी चुक आहे आणी उकार, वेलांटी वै. बदलुन शब्द शुद्ध लिहिता येईल .... मी खुपच अशुद्ध लिहिते मला सुधारणेची खुप गरज आहे म्हणुन हि मदत हवि आहे... ईतर मा. बो. करांना हि याचा लाभ होईल, अशुध्द लेखन वाचताना होणारा त्रास वाचेल :).... Please ह्या बाबत काहि करता आल तर बघा Please ... आभार
Textual smileys
Textual smileys साठीची help, प्रतिसाद द्यायच्या box वर नाही का देता येणार? आणि ती window, '?' ह्या चिन्हावर टिचकी मारल्यावर जशी window उघडते तशी उघडता येईल का?
प्रतिसाद टाइप करुन जर smileys च्या help साठी गेलं तर इकडचा प्रतिसाद गायब होऊन जातो!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
नवीन
नवीन आलेल्या लोकांना गुलमोहर वर केवळ स्वतःचेच साहीत्य टाका अशी सूचना आपोआप त्यांच्या विपु/ मेलबॉक्स मधे पडेल असं काहीतरी करा हो प्लीज. आणि जे दुसर्याचं टाकतील त्यांना तात्पुरतं का होईना बॅन करता येईल का?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
नवीन
नवीन साहित्य लिहिताना ते वाचविता येत नाही. मधेच वीज गेली तर सर्व परत लिहावे लागते.
Pages