Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! मी मिसलेलं - आता
अरे वा! मी मिसलेलं - आता दिसलं.. धन्स!
.
.
admin अशात बरेच लेख्/फोटो
admin
अशात बरेच लेख्/फोटो पहयला मिळाले जे सुंदर visual प्रवास / अनुभव वर्णन म्हणता येतिल असे आहेत. उदा: को़कणसय, लडाख, ईजिप्त ( मागे कुणीतरी गुलामगिरी / अफ्रिका बद्दल लिहिलेले). ते सध्या वेगवेगळ्या धाग्यांवर आहेत. उदा: ललित, प्रकाशचित्र, भट्कंती ई. त्यासाठी वेगळी category करता येईल का? म्हणजे सापडणे सोपे जाईल. शिवाय तो एक नविन प्रकारचा साहित्य प्रकार होऊ शकेल.
इग्नोरची सुविधा देता येत
इग्नोरची सुविधा देता येत नाही, (वा देत नाही)
किमान "फ्रेण्ड्स्लिस्ट" किन्वा "जवळचे मित्र/नातलग" अशि काही सुविधा हवि असे वाटते, मला माझ्याच पोरीचा आयडी शोधायला जीवतोड मेहनत करावि लागली!
सध्या माबोवर बरेच जण एखादी
सध्या माबोवर बरेच जण एखादी लिंक देतात.. तेव्हा खूपदा आपल्याला हे पान पहाण्याची परवानगी नाही असा संदेश दिसतो...
>>>
त्याला थोबाडफोड अथवा थुत्तरफोड उत्तर असा शब्द प्रचलीत झाला आहे...
>> Admin अनंताक्षरी वर गाणी
>> Admin अनंताक्षरी वर गाणी लिहिताना मधे कडव्यातली मोकळी जागा सोडली तरी शेवटी ती गायब होते. असे का होते ?
मोकळ्या जागे ऐवजी अंडरस्कोर ____ टाकला तर तात्पुरता प्रश्न सुटू शकेल.
बाकी अड्मीन समर्थ आहेतच!
मायबोलीवर अपूर्ण लेखन
मायबोलीवर अपूर्ण लेखन साठवायचा पर्याय फक्त गुलमोहर विभागात उपलब्ध आहे. रंगीबेरंगी आणि हितगुज मधील नवीन धागे यासाठी पण हा पर्याय उपलब्ध करून देता येईल का?
रुनी, रंगीबेरंगीमध्ये तो
रुनी, रंगीबेरंगीमध्ये तो पर्याय आहे.
अरे हो की लालू .
अरे हो की लालू .
आहारशास्त्र आणि पाककृती या
आहारशास्त्र आणि पाककृती या ग्रूप संबंधीचे, 'पाककृती माहित आहे का' या बाफवरचे _मधुरा_ यांचे हे पोस्ट इथे परत टाकत आहे.
_मधुरा_ | 16 February, 2010 - 13:39
indexing चं वेगळं पान करता येईल का? वेगळा tab त्यासाठी ठेवून ? कधी कधी "search" बरोबरच "browse" करण्याची पण गरज असते. जुन्या मायबोली वरील "folders structure" मी पाकक्रूतीं (??) साठी खुप मिस करते.
Drupal चे एक रेसिपी module पण आहे. मला ते बरे वाटत आहे. ते integrate करता येईल का ?
http://drupal.org/project/recipe
मँगो कसे लिहायचे??? इथे तर
मँगो कसे लिहायचे??? इथे तर कॉपि केले आहे दुसरिकडुन
मँगो : m E M g o
मँगो : m E M g o
अनेक नव्या सुविधा दिल्या जात
अनेक नव्या सुविधा दिल्या जात आहेत त्याबद्दल धन्यवाद. जर शक्य झाले तर युजर लिस्ट कडेही प्राधान्याने बघता येईल का? पूर्वीच्या मायबोलीवरची जास्त चांगली होती. सर्च, सॉर्ट, कुठली फिल्डस बघायची आहेत अशा काही सुविधा मिळाल्या तर बरे होईल.
जसे की ट्रेकींगची आवड असलेले पुण्यातील सगळे, जे गेल्या सहा महिन्यात अॅक्टिव आहेत असे शोधता आले तर उपयोग होईल. फुल टेक्स्ट सर्च देता आला तर अधिक छान.
धन्यवाद मिलिंदा.
धन्यवाद मिलिंदा.
कोणताही आवडलेला बीबी, मूळ
कोणताही आवडलेला बीबी, मूळ मजकुर वा प्रतिक्रियान्सहित, छापुन/पीडीएफ करुन कुणाला पाठवताना मला भयानक अडचण येते!
मी दोन्ही प्रकारे, म्हण्जे सर्वच पान अथवा मजकुर निवडून छापायचा आदेश देऊन बघितला. पण उजवी कडची उभी खिडकी एक त्रितियान्श जागा कायमच खाते. त्यामुळे अक्षर अतिशय बारीक छापले जाते.
जुन्या मायबोलीमधे एक बटनाने, मूळ मजकुर वा ती ती प्रतिक्रियेची पोस्ट स्वतन्त्र छापुन घेता यायची. अर्थात तेव्हाही आख्खा बीबी छापण्याची सुविधा नव्हतीच, तरी निदान जे छापले जायचे त्यातिल अक्षरान्चा आकार मोठा यायचा.
आता मोठा आकार हवाच असेल, तर मजकुर निवडून तो वर्ड मधे चिकटवुन, आकार मोठा वगैरे उठाठेवी करुन छापता येते, पण त्यात वेळ खूप जातो. शिवाय "टेबल फॉरम्याटिन्ग" देखिल आले तर ते काढताना वैताग येतो. फोटो येतिलच याची खात्री नसते!
तेव्हा नविन मायबोलीमधे १) आख्खा बीबी २) मूळ लेखकाचा मजकुर ३) निवडक वा सर्व प्रतिक्रिया असे छापण्याची पर्यायाने पीडीएफ बनविण्याची सुविधा देता येईल का?
धन्यवाद वेबमास्तर.
धन्यवाद वेबमास्तर.
आत्ता "गोकाक चा धबधबा"
आत्ता "गोकाक चा धबधबा" वाचताना, परत एकदा अशा गोष्टींसाठी नविन category असावी असे वाटले. मी या आगोदर ही विनंती केली तेंव्हा कोणिच दखल घेतली नाही
. म्हणून परत एकदा तीच पोस्ट देत आहे. काही तांत्रिक / ईतर गोष्टींमुळे शक्य नसल्यास तसे सांगावे.
admin
अशात बरेच लेख्/फोटो पहयला मिळाले जे सुंदर visual प्रवास / अनुभव वर्णन म्हणता येतिल असे आहेत. उदा: को़कणसय, लडाख, ईजिप्त ( मागे कुणीतरी गुलामगिरी / अफ्रिका बद्दल लिहिलेले). ते सध्या वेगवेगळ्या धाग्यांवर आहेत. उदा: ललित, प्रकाशचित्र, भट्कंती ई. त्यासाठी वेगळी category करता येईल का? म्हणजे सापडणे सोपे जाईल. शिवाय तो एक नविन प्रकारचा साहित्य प्रकार होऊ शकेल.
_मधुरा_ इथे हितगुज विभागात
_मधुरा_
इथे हितगुज विभागात भटकंतीमध्ये आधीच "प्रवासाचे अनुभव" आणि "माझे दुर्गभ्रमण" हे ग्रूप आहे. लोक त्यात धागे काढून हे सगळे लिहू शकतात.
पण लोक तसं करत नाहित ना!.
पण लोक तसं करत नाहित ना!. कोणिही कुठ्ल्याही पोस्ट ना "टॅग" करू शकतं का? म्हणजे कदाचित टॅग नुसार browse करणे सोप्पे जाईल.
जेव्हा आपण खालचे प्रतिसाद
जेव्हा आपण खालचे प्रतिसाद वाचत असतो आणि पुढच्या पानावरच्या प्रतिसादांकरता क्लिक करतो (२,३, ४ वगैरे), तेव्हा पेज रिफ्रेश होतं आणि फोकस पुढच्या प्रतिसादांवर न जाता मुळच्या लेखावर जातो - आणि मग प्रतिसाद वाचण्याकरता पूर्ण खालपर्यंत स्क्रोल करावं लागतं..
ह्या ऐवजी जर प्रतिसादाच्या पेजिनेशनचा वापर केला असेल तर डायरेक्ट प्रतिसादांवर फोकस नेता आला तर सोपं पडेल.
मी समजा एक ईमेज [rotfl.gif]
मी समजा एक ईमेज [rotfl.gif] खाजगी जागेत अपलोड केली आहे. तर ती ईमेज :rotfl.gif: असे देऊन पोस्टमध्ये वापरता येईल का? सध्या पूर्णपत्ता द्यावा लागतो, img src टॅग वापरून.
अरे ते "पाऊलखूणा" कुठे गायब
अरे ते "पाऊलखूणा" कुठे गायब झाल?
विशेष महत्त्वाची नक्कीच
विशेष महत्त्वाची नक्कीच नाहीये सुचना पण: - गुलमोहर मधे लेखनप्रकारांची यादी आहे, ती एकाच रांगेत आहे. दोन रांगा केल्या तर "विनोदी लेखन" वगैरे यादीमधे शेवटी असलेले प्रकार बघायला स्क्रोल करावे लागणार नाही.
नानबा यांचा पेजिनेशन वाला मुद्दा महत्त्वाचा वाटतो मलाही...
एक असंच सुचले, हल्लीचे गोंधळ
एक असंच सुचले, हल्लीचे गोंधळ पाहून. नवीन गप्पांचे पान याच्या पुढे कंसात 'वाहते पान' असे लिहीले तर पटकन कळू शकेल की ते पान वाहते आहे. बहुधा बर्याच नवीन्/जुन्या लोकांचा कदाचित गोंधळ होतोय त्यामुळे.
लिंबूटिंबू : पाउलखुणा काही
लिंबूटिंबू : पाउलखुणा काही दिवस बंद राहतील
फेसबुक वर लाईक्/अनलाईक अशी
फेसबुक वर लाईक्/अनलाईक अशी टिचकी मारुन प्रतिसाद द्यायची सोय आहे. तसे इथे करता येईल का? म्हण्जे प्रतिसाद द्यायला जास्त वेळ जाणार नाही. अन वेळ नाही म्हणुन प्रतिसाद द्यायचे राहुन गेले असे होणार नाही?
- गेल्या काही महिन्यात फेसबुकावर गेल्याचे परिणाम!
स्माईलीजचे प्रकार वाढवता
स्माईलीजचे प्रकार वाढवता येतील काय? उदा. टाळ्या वाजवणारे,ठेंगा दाखवणारे-थम्ब्स अप/डाऊन इ.इ.
देणं कमी पडतं.तसेच काही एंट्रीज इतक्या बकवास असतात की फक्त
किंवा
ने भागत नाही.
सध्या उपलब्ध असलेल्या स्माईलीज भावना व्यक्त करायला अपुर्या पडतात.एखादी प्रतिक्रिया किंवा लेख इतका उत्तम असतो की नुसता
आगाऊला अनुमोदन. त्यातुन आम्हा
आगाऊला अनुमोदन.
त्यातुन आम्हा काही दहाबारा वर्षान्पूर्वी याहूवर च्याट करणार्या जुन्या लोकांस तर स्मायलिजची कमतरता/तुटवडा भयानकरित्या जाणवतो, का बरे ही काटकसर?
"नवीन लेखन" या दुव्यावर टिचकी
"नवीन लेखन" या दुव्यावर टिचकी मारल्यास "संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेख" दिसते. त्या मध्ये लेखकांची नावे ही दुव्याच्या स्वरुपात दिलास बरे होईल. म्हणजे त्या लेखकाचे लेखन शोधणे सोपे जाईल. अशी सोय असणारी दुसरी एखादी यंत्रणा already माबो वर चालू असल्यास किंवा ही सूचना already कुणी केली असल्यास ignore मारा. (मला एखाद्याच्या किंवा एखादीच्या विपुत जायचे असल्यास मी त्या व्यक्तीने एखाद्या बाफ वर प्रतिसाद दिलेला असल्यास तिथे दिसणार्या त्या व्यक्तीच्या आयडी च्या दुव्यावर टिचकी मारून मग विपुत जाते. यासाठी अन्य काही सोपा उपाय आहे का?)
मी सर्वप्रथम कबूल करतो कि
मी सर्वप्रथम कबूल करतो कि कवितांच्या बाबतीत मी ढ आहे. मला कुठली म्हणजे कुठलीच कविता कळत नाही. हा माझ्या (नसलेल्या) बुद्धीमत्तेचा दोष आहे. सगळे कबूल.
पण तरीही मला मायबोलीवरचे लेखन वाचायला मनापासून आवडते. पण खूपदा काय होते की नवीन लेखन वर टिचकी मारल्यास, पानेच्या पाने कविता विभागाची असतात. त्यामधेच मला हवे असलेले म्हणजे वाचायचे असलेले लेखन असते, ते शोधायला त्रास होतो.
माझे सदस्यत्व हा पर्याय आहेच, पण त्याशिवायही उत्तम लेखन इथे होत असते ते वाचायचे राहून जाते.
तर नवीन लेखन या विभागाचे, गद्य आणि पद्य असे दोन विभाग करता येतील का ?
परत एकदा, माझा कवितांवर राग नाही, कविता लिहिणार्यांवरही नाही. त्यांना लेखनस्वातंत्र्य असावे या मताचा मी आहे. पण मलाही निवडस्वातंत्र्य असावे, असे वाटते.
कुणी सहमत आहे का ?
Pages