नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन लेखन करताना, विषय एकतर सापडत नाही की कुठला निवडावा आणि यादी पण खूप लांब आहे. जर दोन ड्रॉपडाऊन केलेत तर बरे होईल. उदा. साहित्य हा पहिला ड्रॉपडाऊन निवडला का दुसर्‍या ड्रॉपडाऊनमधे साहित्याचे प्रकार दिसतील.

शीर्षक व चित्रांच्या Alignment साठी दोन सूचना आहेतः

(१) लेखात सब-हेडींग टाकताना ते center align किंवा एका विशिष्ठ अंतरावर align करण्याची सोय असेल तर उत्तम.

(२) वरील सुचनेप्रमाणेच चित्रे टाकताना align करण्याची सोय असल्यास असे लेख वाचनीय असण्याबरोबरच प्रेक्षणीय करण्यास लेखकांना सहकार्य मिळेल. वर्तमानपत्रात जसे चित्राच्या उजवी/डावीकडे लिखाण (text) असते तसेच.

दिनेश अन बी बरोबर सहमत Happy
खरोखरच, पूर्वीचाच ड्रॉपडाऊन ट्री चा डिस्प्ले अफलातुन उपयोगी होता, तसाच केलात तरी चालेल!
मनकवड्यासही अनुमोदन.
विपुची साफसफाई अधिक झटपट करता येइल असे बघा ना, एकेक डिलीट करायला जाम वेळ लागतो, वैतागवाणे होते ते, म्हणून मी डिलीट करायच्या भानगडीतच पडत नाही!
पूर्वी, प्रत्येक पोस्ट्स्ची स्वतन्त्र लिन्क देता यायचीच, शिवाय तेवढीच पोस्ट छापता देखिल यायची. पीडीएफ करण्यासाठी याचा उपयोग होत असे. सध्या यातिल काहीच नाही.
रन्गित अक्षरे फक्त स्वप्नातच दिसतात.
ऑनलाईन ड्रॉईन्ग करणे अशक्यप्राय वाटते आहे.
कायतरी करा बुवा Happy

कुठेही लिखाण करताना अक्षररंग ची सोय द्या ना.... मनोगतावर आहे तशी सोय...............i mean to mark the text with colour.............

ही सूचना आधी कुणी केली असल्यास ही पोस्ट इग्नोर करा.......

धार्मिक बीबी वर स्तोत्रे, 'श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह' आहे त्यातील सर्व संग्रह नवीन ठीकाणी हलवून एक चांगले संग्रह स्थान उघडता येइल आणि स्तोत्रे शोधणेही जास्त सोपे होईल (जसे की पाकक्रुती).

>>रन्गित अक्षरे फक्त स्वप्नातच दिसतात
लिंब्या Lol

>>ऑनलाईन ड्रॉईन्ग करणे अशक्यप्राय
मी खूप पूर्वी, MSN मध्ये १ प्लगिन वापरायचो, त्यातून माऊस ने हवे तसे ड्रॉईंग करता यायचे, असेच प्लगिन वापरता येईल.. बादवे, काय ड्रॉईंग करणार आहेस रे?

>>एक चांगले संग्रह स्थान उघडता येइल
अनुमोदन

लॉगिन करताना Ctrl+\ चा effect होत नाही का? कारण मला explicitely त्या ड्रॉपडाऊन वर जाऊन भाषा select करावी लागते.. मेसेज्/विपु लिहताना मात्र हे ctrl+\ चालते

'कानोकानी' मधे दुव्यांचे विषयवार वर्गीकरण करावे - जसे शास्त्र, कला, साहित्य,ललित, राजकारण इ.
धन्यवाद.

प्रत्येक वेळी कोणत्याही थातूरमातूर विषय्/माहिती साठी नवा धागा उघडला जातो, यावर काही करता येईल का?
जसे, कोणीही नवा धागा उघडल्यास, आधी एका ग्रुप्/पॅनेल कडे संमत्तीसाठी जाईल, जर त्याविषयाचा आधीच धागा असेल तर त्याला/तिला तसे सांगितले जाईल...

काही वेळा माहितीसाठीही खूप नवे धागे उघडले जातात.. आणि त्याना रिप्लायपण जास्तीतजास्त २५/५०/१०० असतात.. असे विषय फक्त माहिती हवी आहे, यावर का नाही टाकत>?
उगाच् कचरा वाढत चाललाय...

लॉगिन करताना Ctrl+\ चा effect होत नाही का? कारण मला explicitely त्या ड्रॉपडाऊन वर जाऊन भाषा select करावी लागते.. मेसेज्/विपु लिहताना मात्र हे ctrl+\ चालते

मला पण same problem .......

मी आतापर्यंत कोणकोणत्या धाग्यामधे प्रतिसाद दिला आहे हे एका क्लिक मधे दिसले तर बरे होईल म्हणजे ते सगळे followup करायला सोप पडेल. 'माझे लेखन' मधे दिसल तरि चालेल.

ही सूचना आधी कुणी केली असल्यास ही पोस्ट इग्नोर करा

माझ्याबाबतीत ctrl+\ कुठल्याच परिस्थितीत चालत नाही... मेसेज लिहिताना म/E ह्या टॅबवर क्लिक करण्याची सोय आहे, पण ती log-in करतांना आणि विपु लिहिताना वापरु शकत नाही... कायम ड्रॉपडाऊन वर जाऊनच भाषा select करावी लागते... ctrl+ दाबल्याबरोबर स्क्रिन zoom होते. आणि ctrl- ने zoom out होते. माझा जर्मन कि-बोर्ड आहे. त्यामुळे हे होतंय का? असेल तर दुसरा काही शॉर्टकट आहे का? माहिती असल्यास प्लिज सांगा.

अग सानी, ctrl+\ मधे तुला ctrl+ अस का दाबाव लागत? ctrl+ नी सगळ्यांचीच स्क्रिन झुम आउट होते आणि ctrl- ने झुम इन.

ctrl+\ म्हणजे ctrl दाबुन मग \ दाबणे. करुन पहा बर पुन्हा. Happy

अच्छा! असंय का अमृता... थँक्स गं... Happy आता नुसतंच ctrl \ दाबलं... पण तरी नाही जमते बुवा मला. Sad
एकतर माझ्या कि-बोर्डवर जिथे \ आहे तिथे एकूण ३ signs आहेत. ?, ß आणि \
normal mode वर key press केली की ß दिसतं, shift key चा वापर केला की ? आणि अजून एक additional key आहे alt gr म्हणून ती press करूनच \ हे appear होतं... त्यामुळे मला ctrl + alt gr + वर mention केलेली key दाबावी लागते...केवढी कसरत...पण उपयोग काहीच नाही Sad

ह्म्म्म, हा किबोर्ड नाही माहिती. ctrl \ ने बदलता यायला हवी पण भाषा. बाकी अधीक जाणकार मदत करु शकतील. Happy

बायदवे मला त्या ctrl \ ने कधीच लिपी बदलता आली नाहीये आत्तापर्यंत..
पण मी ते फारसं वापरतच नसल्याने फरक पडत नाही..

धन्यवाद उत्तराबद्द्ल.

सानी तुम्हि computer वर भाषा बद्लायला (जर्मन ते इंग्लिश वा इंग्लिश ते जर्मन ) IME वापरता का?
असे असेल तर की बोर्ड मधे एक कोणत्या तरि बट्णाने English की बोर्ड सारखावापरता येईल.

नाही सावली! IME वापरायची गरज पडत नाही. दोन्ही भाषांचं written script एकच आहे ना. शिवाय मला आता जर्मन किबोर्डची सवय झाली आहे. उलट इंग्लिश किबोर्ड वापरायची वेळ आली तरच चुका होतात. Z आणि Y एकदम उलट्या पद्धतीने located आहेत ह्या दोन किबोर्ड्सवर Happy
बाकी, माझ्याकडूनपण धन्यवाद, अमृता, लालू आणि सावली यांना.

>> तर नवीन लेखन या विभागाचे, गद्य आणि पद्य असे दोन विभाग करता येतील का ?
दिनेशदांना अनुमोदन. माझ्या मते हितगुज गृप प्रमाणे गुलमोहरचेपण विषयांनुसार सदस्यत्व घेता आले तर बरं होइल. म्हणजे उदाहरणार्थ, मी कथा/कविता या 'गृपचा' सदस्यत्व काढुन टाकले तर 'माझ्यासाठी नवीन' मधे ललित/लेख/प्रकाशचित्रे पण दिसतील. (पण कथा/कविता दिसणार नाही)

माबो वर 'बालसाहित्य' आणी 'कुमारसाहित्य' असे विभाग टाकता येतील का? कथा मधे लहान मुलांच्या गोष्टी टाकयला विचित्र वाट्ते. पुन्हा हे विभाग असतील तर घरातली लहान मूले पण कदाचित वाचतील. वेगळा विभाग असेल मुले कोण्त्या कथा वाचतात हे बघावे लागणार नाही.

सावली,
चांगली सूचना. गुलमोहरमध्ये "बालसाहित्य" असा विभाग केला आहे. तसेच "बालकविता" हा विभाग पण काव्यधारामधून या विभागात हलवला आहे.

Pages