नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिंन्सेस अगदी ,अगदी ! Happy
**********************************************
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा Happy
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

मायबोलीवर सदस्य झाल्याशिवाय लिहीता येत नाही (मला वाटत अपवाद तो दिवाळी अंकावरच्या प्रतिक्रीया). जे लोक इथे सदस्यत्व न घेता फक्त वाचनमात्र येत असतील त्यांना काही सुचनांसाठी किंवा इतर कारणांसाठी अ‍ॅडमिनला काही लिहायचे असेल तर तशी काही सोय नाहीये. इतर बर्‍याचशा साईटवर असते तसे कुठेतरी Contact Us/संपर्क साधा इथे पण ठेवता यायला हरकत नाही.

सध्या फाईल ब्राऊजर मध्ये मी अपलोड केलेल्या सर्व फाईल्स ची यादी दिसते. ही यादी नावाने सॉर्ट करता येईल का ? सध्या ही यादी रँडम सॉर्टेड दिसते आहे.
तसेच ज्या फ्रेम मध्ये ही यादी दिसते, ती फ्रेम उंचीसाठी फ्लेक्झिबल करता येईल का ? सध्या मी जर फाईल ब्राऊजर ची विंडो मोठी केली तर फक्त फाईल अपलोड करण्याचा भाग मोठा होतो.

माणसाची कल्पना मला आवडली. मी दहा लेख/ललितं/प्रकाशचित्रं/कविता/कथा केलेल्या आहेत, पण मला माहीत आहे की या आठवड्यात मी फक्त तीनच टाकू शकतो. तर माझ्यादृष्टीने त्यातल्या सर्वोत्तम तीन कलाकृतींच्या निवडीकरता माझ्या सगळ्या लेखनाचं मूल्यांकन माझ्यासाठीच बंधनकारक होईल (असं वाटतंय. )

अनुमोदन जीडी आणि माणसाला....थोडा दर्जा सुधारायला मदत होईल लोक जेवढ चांगल्यात चांगल आहे तेवढच इथे देतील कदाचित Uhoh

माझा पण मोदक जीडी, माणूस आणि श्यामली ला.

त्यामुळे गुलमोहरावरचं सगळं लिखाण निवांत वाचता तरी येईल.

~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

माणुस यांची कल्पना आवडली ! हे लिमीट हवेच !!

माझीही एक सजेशन आहे !
नविन होतो तेंव्हा मायबोलीवर वाचताना, मी टीआरपी पाहून ठरवायचो कि, चांगले काय आहे ते ! पण
हे उशीरा लक्षात आले कि बर्‍याचवेळा सुमार लेखन असल्याने तिथे झालेल्या टीका व प्रक्षोभक चर्चा यामूळे टीआरपी वाढलेला असतो ! त्यावर नियंत्रणासाठी हे केले जाउ शकते...

(युट्युबवर जशी सोय आहे त्याप्रमाणे) साहित्याला 'स्टार''रेड फ्लॅग' करण्याची सोय असावी !

'स्टार' - आवडलेले,उत्कृष्ट,दर्जेदार साहित्य

'रेड फ्लॅग' -प्रक्षोभक,मुल्यहीन साहीत्य

तसेच प्रत्येक प्रतिसादाला ही सोय असावी '=' , ' x'

'=' - अनुमोदन,अभ्यासपूर्ण प्रतिसाद.

'x' - प्रक्षोभक,आक्षेपाहार्य,नापसंत प्रतिसाद.

तसेच 'रेड फ्लॅग्स' 'x' यांची ठरावीक मर्यादा* उल्लंघन झाल्यास नंतर ते 'साहीत्य' अथवा 'प्रतिसाद' आपोआप स्पॅम केले जातील !

*ठरावीक मर्यादेसाठी साठी काही नियमांवली बनवणे आवश्यक आहे.

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

माझाही मोठ्ठा मोदक, तोही खव्याचा.
पण 'आठवड्याला एकच एंट्री टाका' याचा अर्थ 'दर आठवड्याला एक एंट्री टाकाच' असा घेतला गेला नाही म्हणजे मिळवली. Happy
................................
आज फिर जीनेकी तमन्ना है .....

स्टार आणि रेडफ्लॅग ठीक आहे, पण आपोआप स्पॅमिंगची कल्पना नाही पटली.
वाचकवर्ग तेवढा सूज्ञ नाहीये का?

वाचकवर्ग तेवढा सूज्ञ नाहीये का?>>> मला वाटतेय या प्रश्नातच उत्तर आहे !

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

माणसाच्या कल्पनेला माझाही मोदक..
तसेच प्रकाश म्हणतो त्या प्रकारे रेटींगची कल्पना पण चांगली आहे..
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

>>त्या प्रकारे रेटींगची कल्पना पण चांगली आहे>>>>

ग्रुपीझम होऊ नये अशी रेटींगची प्रणाली वापरा...

माणसाची लिमिटची कल्पना चांगली आहे. Happy

--------------
नंदिनी
--------------

खरच थोडा का होईइना उपयोग होईल, सध्या काय होतय ना की ८०% साहित्य वाचण्याजोगं वाटत नाही. अन एवढ्या गर्दीमुळे जे २०% चांगलं आहे ते दिसतच नाही.
जर माणसाने लिहिल्याप्रमाणे मर्यादा घालता आली तर चांगल्या साहित्याचं प्रमाण आपोआप वाढेल ( कमी मुल्याचे साहित्य जास्त न आल्यामुळे)..

प्रत्येक प्रतिसादानंतर किंवा एखाद्या परिशीष्टानंतर एकदम पानाच्या सुरवातीस जाण्याचा टॅब असावा म्हणजे पानाच्या शेवटापर्यंत जाणे गरजेचे राहाणार नाही.

नोटपॅड ओर तत्सम एडिटर मध्ये आधी लिहले आणि माबो वर पेस्ट केले तर मराठीत का नाही दिसत?

हे डायनॅमिक स्क्रीप्ट असणार म्हणून.
तसं करायचं असेल तर http://www.maayboli.com/jslib/html/dvedt.html हे सध्यापुरते तरी आहे.

झक्कास मिलिंदा...धन्यवाद Happy

माणसाची कल्पना चांगली आहे.
=======================
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शीळ वाजवतो.....

ऑर्कुटसारखे,इथेही माझी इथल्या सभासदान्पैकीची फ्रेण्डलिस्ट बनवता येईल का?

अ‍ॅडमिन,

आपलं सर्च इंजिन अगदी ताजे पोस्ट्स दाखवत नाही का ? मी आता मायबोलीची शोध व्यवस्था वापरुन 'भरीत' या शब्दासाठी शोधलं तर मला जे रीझल्ट्स आले त्यात जुन्या मायबोलीचे बरेच दुवे आहेत (चित्रात दाखवल्याप्रमाणे, तसं फारसं दिसत नाहीये चित्रात), पण नवीन मायबोलीवर या दोन कृती आहेत (चित्रात दाखवलेल्या) त्या मात्र दिसल्या नाहीत.

कृपया बघाल का ?
results.jpgactual1.jpg

सभासदाच्या खाजगी जागेत चित्रे साठवुन ठेवण्याची सुविधा आहे
या सुविधे मधे, विषयावार फोल्डर्स करायची सोय करता येईल का?
बरेच सारे फोटो अपलोड केल्यानन्तर पुन्हा एखाद्या फोटोची लिन्क द्यायची असल्यास सर्व फोटो स्क्रोल करुन बघत बसावे लागते, ज्यात बराच वेळ जातो! तेच जर युजरला, त्याच्या आवडनिवडीप्रमाणे, तिथे विषयावार गट करता आले, तर फोटो शोधणे, अपलोड वा डिलिट करणे सोपे होईल

इग्नोरची सुविधा येणार होती, तिचे काय झाले? Happy

<<अर्थ 'दर आठवड्याला एक एंट्री टाकाच' >>
आमच्या बाग राज्य बातमी फलकावर तर दररोज एकदा तरी लिहीलेच पाहिजे असा नियम आहे!

कारे बाबा तुम्ही कवि नि लेखकांवर घसरलात? नि लाल झेंडा कोण दाखवणार?

मला वाटते संदीप खरे (जे माझ्या मते सध्याचे लोकप्रिय कवि आहेत) ते म्हणाले होते, कविता चांगली नाही, समजली नाही असे म्हणू नका. समजेस्तवर पुनः पुनः वाचा! Happy

तर 'वाचा' असा नियम नाहीये. तेंव्हा 'कविता, ललित, प्रकाशचित्रे,' असे काही दिसले की सरळ त्याकडे कानाडोळा करावा! काही असेल चांगले तर कुणितरी लिहीलच, 'हे वाचले का?'

LT/ मिलिंदा,

आता सभासदाच्या खाजगी जागेत सभासदाना हवं त्या प्रमाणे sorting करता येईल. यामुळे प्रकाशचित्र शोधणे सोपे होईल.

अनेक धन्यवाद अ‍ॅडमिन ! यामुळे नक्कीच खूप मदत होईल चित्र शोधताना.

तेथे दिलेल्या ड्रॉप बॉक्स मध्ये .jpg हा पर्याय कशासाठी आहे ? म्हणजे जर त्याचा उद्देश .jpg, .bmp इ. दाखवणे असेल तर तसे सगळे पर्याय लागतील, अन्यथा, आता बाकीचे पर्याय आहेत (चित्रे, न-चित्रे आणि सगळे) हे पुरे होतील असं वाटतं.

अ‍ॅडमिन, व्वा, नाव, आकार तसेच तारखेनुसार देखिल बघता येते आहे! छानच Happy
धन्यवाद
यातच अजुन विचारायचे आहे ते असे
१. तारीख नोन्दली जाते आहे ती अपलोड केल्या दिवसाची कि फाईल निर्माण केल्याची? जर अपलोड केल्या दिवसाची तारीख नोन्दली जात असेल तर अधिक सोपे होईल.
२. आजवर बरीच चित्रे अपलोड केली, ती करताना वरील प्रमाणे शोधसुविधा नसल्याने, फाईलच्या नावाची काळजी केली नव्हती! पण आता असे वाटते की जर फाईल अपलोड करतानाच, सुयोग्य नाव ठेवुन अपलोड केले असते जसे की "स्पर्धा-२००८-१.जेपीजी", "स्पर्धा-२००८-२.जेपीजी" तर शोधणे अधिक सोपे गेले असत! असो. तर याच अनुषन्गाने असे काही शक्य आहे का युजरला, की चित्र अपलोड केल्यावर फाईलनेम बदलता येईल? हे मुद्दामहून विचारतो कारण हार्डडिस्क किन्वा मूळ स्त्रोतातील फाईलचे नाव बदलणे दरवेळेसच शक्य होईल असे नाही! पण या साईटच्या सन्दर्भात मात्र वेगळे नाव हवे असल्यास जर ते अपलोड केल्यावर बदलणे शक्य झाले, किन्वा अपलोड करता करताच नविन नावाने अपलोड करण्याची सुविधा होऊ शकली तर दुधात साखर पडल्याप्रमाणे होईल.
३. अपलोड केलेले चित्र "लिन्क देऊन" मायबोलीवरच कुठेतरी वापरले असेल, तर ते कळू शकेल का? म्हणजे अनावश्यक फाईल्स डिलीट करताना नेमक्या न वापरलेल्या/वापरात नसलेल्या फाईल्सच डिलीट करता येतिल. बर्‍याच सन्ख्येने फाईल्स अपलोड केल्यावर या बाबीचा मागोवा ठेवणे युजरला अवघड जाऊ शकते.
(मी जरा जास्तच अपेक्षा ठेवतो, नाही?) Happy

बर, ते इग्नोरच्या सुविधेचे काय? Proud

लिंबू, ती तारीख आपण फाईल अपलोड केल्याची (म्हणजेच मायबोलीच्या सर्व्हर वर ती फाईल निर्माण केल्याची ) आहे.

मिलिन्दा, म्हणजे मग तो प्रश्नच मिटला! Happy धन्यवाद

Pages