Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद अॅडमिन विपु मधे काहि
धन्यवाद अॅडमिन
विपु मधे काहि मेसेज असल्यास तो "माझे सदस्यत्व" च्या खालच्या बाजुला दाखवल्यास लॉगिन केल्यावर लगेच काहि विपु आहेत का ते कळेल
तसेच आपल्या लेखनावर काहि प्रतिक्रिया आल्यास खालच्या बाजुला दाखवल्यास त्यापण लॉगिन केल्यावर लगेच दिसतिल
म्हणजे अस :
नवीन लेखन करा
माझे सदस्यत्व
संदेश्/प्रतिक्रिया
- २ नविन विपू
- ३ नविन प्रतिक्रिया
सावलीला माझे ही अनुमोदन
सावलीला माझे ही अनुमोदन
"माझे सदस्यत्व" मध्ये गेल्यानंतर "पाऊलखुणा" या विभागात २ सेक्शन्स् आहेत.
१) लेखन
२) प्रतिक्रिया
या दोघांवरही क्लिक केले असता दिसणारी लीस्ट सेम फॉरमॅट मध्ये दाखवा ना. "प्रतिक्रिया" ची लीस्ट जशी दिसते तशीच "लेखन" ची लीस्ट नाही दिसत. "लेखन" वर क्लिक केले असता प्रत्येक आयटम चा थोडा भाग दिसतो. त्यापेक्षा "नवीन लेखन" मध्ये जसे नवीन प्रतिक्रिया दर्शवणारी लीस्ट दिसते तसे दाखवले तर छान होईल.
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू करण्यात आलेला आहे. शुल्क, नावनोंदणी इ.च्या माहितीसाठी खालील लिंक पहा...
http://www.maayboli.com/node/16976
"फक्त लेखन" हा टॅब गायब झाला
"फक्त लेखन" हा टॅब गायब झाला आहे व्यक्तिरेखा मधून
गुलमोहर वर क्लिक केल की ७२
गुलमोहर वर क्लिक केल की ७२ तासातले नविन लेखन दिसते त्यात सगळे विभाग म्हणजे
कथा, कविता , कादंबरी ,काहीच्या काही कविता, चित्रकला, प्रकाशचित्र, बालकविता,बालसाहित्य,मराठी गझल इ.
दिसते. पण यात केवळ ७२ तासामधलेच लिखाण दिसते. एखाद्याच विभागतले त्यापुर्विचे किन्वा सगळे बघायचे असेल तर काय करायचे? म्हणजे सगळ्या बालकविता बघायच्या असतिल तर कुठे बघायच्या?
म्हणजे सगळ्या बालकविता
म्हणजे सगळ्या बालकविता बघायच्या असतिल तर कुठे बघायच्या? >>>
सावली हे या धाग्यात का टाकलंयस????? मदतपुस्तिकेत जाऊन टाक ना. अॅडमिन टीम पैकी करेल कुणीतरी री.
धन्स निंबुडा, अग आधि मला
धन्स निंबुडा,
अग आधि मला वाट्ल की हा नविन बदल म्हणुन सुचवावा. मग लिहिता लिहिता त्याचा प्रश्नच झाला, न जाणो आधिच हि सोय असेल असा विचार करुन. मी मदतपुस्तिकेमध्ये टाकला हा प्रश्न आता.
मी तिथे विचारल आणि नंद्या ने
मी तिथे विचारल आणि नंद्या ने उत्त्र पन दिल.
पन जे मी म्हण्तेय तशि सोय नाहिये.
बदल :
मुळात लिहिताना जर लेखक विभाग निवड्तो (ड्रॉप डाउन मेनु), तर वाचकाला पण विभाग निवडुन त्या विभागातले सगळे लिखाण का बघता येत नाहि? / कसे बघता येईल?
म्हणजे लेखन वर क्लिक केल्या वर खाली सगळे विभाग दिसतिल (७२ तासा सारखेच) पण यात आत्ता पर्यंतचे सगळे लिखाण दिसेल.
उदा: बालकविता मधे काहि कविता आहेत. पण ७२ तासापुर्वी आलेल्या कविता बघण्यासाठि सोपी सोय नाहिये. ७२ तासात त्या विभागात काहिच आल नसेल तर काहिच दिसत नाहि. (नंद्या ने साण्गितल्या प्रमाणे टॅग वापरला तरि नुसती लिस्ट येत नाहि समरि वैगेरे पण येत. परत ते टॅग वापरण सोप नाहि.. )
कोणाला सगले नविन लेखन बघायचे असल्यास ते नविन लेखन वर क्लिक करतील. तिथे हि विभाग्वार बघण्याची सोय आणि वेळे नुसार बघण्याची सोय हवी (सॉर्टींग) / आधिच आहे क?
नात्याभौंनी सुचवलेला बदल
नात्याभौंनी सुचवलेला बदल इथे आहे. तोच खाली उधृत करतो आहे.
>> रिक्षा फिरवण्यापेक्षा उजव्या बाजुला एक जागा दिली पाहीजे जिथे असे मेसेज पोस्ट करता येतील.
मला ही सुचवणूक आवडली. मायबोलीचे उपक्रम, मायबोलीवर अॅडमिन-टीमने केलेल्या घोषणा, यासाठी अशी जागा ठेवली पाहिजे !
विचारपूशीत आलेल्या scraps ना
विचारपूशीत आलेल्या scraps ना री करण्यासाठी प्रत्येक scrap च्या खाली प्रतिसाद म्हणून एक लिंक दिसते. त्यावर क्लिक केल्यास नवी पॉप्-अप window ओपन झाली तर छान होईल.
actually होतं काय की समजा ४ नवे scraps आलेले असतील तर एखाद्या scrap वर प्रतिसाद देऊन झाला की आपण घुसतो त्या व्यक्तीच्या विचारपूशीत! आणि मग सवयीने पेजच्या "नवीन लेखन" लिंक वर क्लिक केले जाते आणि उरलेल्या scraps ना री करायचे विसरले जाते.
असे माझ्या बाबतीत बर्याचदा झालेय. मग मी काय करते की scrap च्या प्रतिसाद लिंक वर राईट क्लिक करून "open in new window" करते. म्हणजे मग आपले विचारपूशीचे पान जैसे थे राहून सर्व scraps ना एका पाठोपाठ न विसरता री देणे शक्य होते. पण रेग्युलर क्लिक वरच by default अशी नवी पॉप्-अप window ओपन झाली तर बरे होईल असे वाटते.
चांगला मुद्दा आहे
चांगला मुद्दा आहे निंबुडा!
शिवाय प्रतिसाद लिहितांना जेव्हा Textual smileys वापरायच्या असतात त्या सुद्धा जर नविन विन्डोमध्ये बाय डिफॉल्ट उघडल्या तर फारच बरं होईल. मी बरेचदा त्या Textual smileys लिंकवर अनवधानाने क्लिक केलय आणि सगळं लेखन गमावून बसले आहे... अर्थात त्या पेजवरुन बॅकस्पेस टॅब वापरुन मागे गेले तर लिहिलेलं पुसलं न जाता तसंच राहतं हा शोध नंतर लागला...पण प्रत्येकालाच ते लक्षात येईल असं नाही म्हणता येणार.
खरेदी विभागात बर्याच गोष्टी
खरेदी विभागात बर्याच गोष्टी मिळतात. पण तिकडे मुद्दाम गेल्याशिवाय त्या दिसत नाहीत..
पानाच्या उजव्या बाजूला ( जिथे गुगलच्या जाहीराती येतात) त्याच्या खाली बरीच जागा वापरात आणता येईल.
प्रत्येकवेळी मायबोलीवर विक्रीस असलेला एकाद्या वस्तूची Random जाहीरात आली तर ती बर्याच लोकांना दिसेल.
आणि कुणाला विकत घ्यावी वाटली तर त्यावर क्लिक करून 'खरेदी विभागात' जाता येईल...
>>विचारपूशीत आलेल्या scraps
>>विचारपूशीत आलेल्या scraps ना री करण्यासाठी प्रत्येक scrap च्या खाली प्रतिसाद म्हणून एक लिंक दिसते. त्यावर क्लिक केल्यास नवी पॉप्-अप window ओपन झाली तर छान होईल.
निंबुडा - हे राईट क्लिक --> ओपन लिंक ईन न्यू विंडो वापरून आय.ई. मध्ये शक्य आहे.
किंवा cntrl+mouse click वापरून फायरफॉक्समध्ये शक्य आहे. [आय.ई. ८ मध्ये cntrl + mouse click देखील चालते]
signature kaa band keli
signature kaa band keli aahe??
'पाऊलखुणा' मध्ये अजूनही थोडी
'पाऊलखुणा' मध्ये अजूनही थोडी गडबड वाटतेय. नविन लेखन एखाद्या बाफवरचे सगळे संदेश 'वाचलेले' दाखवते, पण पाऊलखुणा मात्र 'अजून वाचायचंय' दाखवतात. उदाहरणार्थ, नविन लेखनवर क्लिक केल्यावर माझ्यासाठी 'मुलुंड' बाफवर '२ संदेश वाचायचेत' असे दिसते. ते संदेश वाचून झाल्यावर पाऊलखुणा तपासल्या असत्या तिथेही 'मुलुंड' बाफवर '२ संदेश वाचायचेत' असे दिसते. प्रत्यक्षात ते संदेश वाचून झालेले असतात.
बरेच लोक विपु वाचायला विसरतात
बरेच लोक विपु वाचायला विसरतात ...
लोगिन केल्या केल्या जर डायरेक्ट विपु त जाता आले तर छान होईल असे वाटते .
>>ते संदेश वाचून झाल्यावर
>>ते संदेश वाचून झाल्यावर पाऊलखुणा तपासल्या असत्या तिथेही
याचे उत्तर वेबमास्तरांनी इथे दिले आहे. त्यातला काही भाग असा आहे:
पाऊलखुणांमुळे सर्वरवर ताण येत असल्यामुळे त्या तासातून १ वेळेला रिफ्रेश करतो आहोत.
नंद्या, ओके.
नंद्या, ओके.
प्रतिसाद लिहितांना जेव्हा
प्रतिसाद लिहितांना जेव्हा Textual smileys वापरायच्या असतात त्या सुद्धा जर नविन विन्डोमध्ये बाय डिफॉल्ट उघडल्या तर फारच बरं होईल. मी बरेचदा त्या Textual smileys लिंकवर अनवधानाने क्लिक केलय आणि सगळं लेखन गमावून बसले आहे... अर्थात त्या पेजवरुन बॅकस्पेस टॅब वापरुन मागे गेले तर लिहिलेलं पुसलं न जाता तसंच राहतं हा शोध नंतर लागला. >>>
हो सानी. मी हे आत्ताच मार्क केलं. पण त्या पेजवरुन बॅकस्पेस टॅब वापरुन मागे गेले तर लिहिलेलं सगळं पुसलं गेलं. या बाबतीत अॅडमिन काही करू शकतील का?
निंबुडा - हे राईट क्लिक --> ओपन लिंक ईन न्यू विंडो वापरून आय.ई. मध्ये शक्य आहे.
किंवा cntrl+mouse click वापरून फायरफॉक्समध्ये शक्य आहे. [आय.ई. ८ मध्ये cntrl + mouse click देखील चालते]
>>
नंद्या, तुम्ही हा जो workaround सांगितलाय मी तोच वापरतेय सध्या असं मी वरच्या पोस्टीत म्हटलेलं आहेच. पण जे लोक कंप्युटरच्या वापराला तितकेसे सरावलेले नाहीत त्यांना ही सोय उपयोगाची होईल असे वाटते. शिवाय इतरांनाही ते सोयीचे तर आहेच. सेम ब्राऊजर मध्ये पेज ओपन करण्याच्या ऐवजी नवीन विंडो ओपन करण्यासाठे code मध्ये खूप काही जास्त changes करावे लागतील असे वाटत नाही. नाही का?
>>पण त्या पेजवरुन बॅकस्पेस
>>पण त्या पेजवरुन बॅकस्पेस टॅब वापरुन मागे गेले तर लिहिलेलं सगळं पुसलं गेलं. या बाबतीत अॅडमिन काही करू शकतील का?
बॅकस्पेसने मागे गेलात, तसेच आल्ट + राईट अॅरो किंवा फॉरवर्डचे बटण दाबून पुढील पानावर आलात तर परत दिसेल लिहीलेलं.
>> सेम ब्राऊजर मध्ये पेज ओपन करण्याच्या ऐवजी नवीन विंडो ओपन करण्यासाठे
मला स्वतःला अनेक विंडोज ओपन ठेवणं सोयिस्कर वाटत नाही.
]
[मेरे सामनेवाली खिडकीमे .. किती खिडक्यांसाठी म्हणायचं?
पण जर लिंक नविन विंडोमध्ये ओपन करा अथवा नको असा ऑप्शन मिळत असेल तर हे मग प्रत्येकाला हवं तसं ठरवता येईल. हे झालं माझं मत.
नंद्या, 1 तास झाला तरी तसंच
नंद्या, 1 तास झाला तरी तसंच दिसतंय रे मला तरी
मंजू, दोन तासांनी बघ.
मंजू, दोन तासांनी बघ.
मायबोली या संकेतस्थळाची
मायबोली या संकेतस्थळाची Mozilla Firefox browser शी compatibility नाही का? कारण माझ्याकडे Mozilla Firefox आहे तर log in window खुप खाली दिसते..पुर्ण पान scroll करावे लागते...Mozilla Firefox वापरणे सोईचे आहे त्यामुळे बरेच लोक आता Mozilla Firefox वापरतात...
कोणत्याही संकेतस्थळाची कोणत्याही browser शी compatibility असणे गरजेचे असते...
मायुरी माझ्य्या मते सर्वच
मायुरी माझ्य्या मते सर्वच ब्राऊझर्सवर ती लॉगिन विंडो खाली येते. स्क्रॉल करून जावेच लागते.
बाकी मोझिलावर काही अडचणी आलेल्या नाहीत, त्यामुळे कंपॅटीबल आहे मायबोली असे मला वाटते.
कंपॅटीबल आहे मायबोली असे मला
कंपॅटीबल आहे मायबोली असे मला वाटते.>>> ठिक आहे...पाहू पुढे काय होते आहे ते...
>>कंपॅटीबल आहे मायबोली हो मी
>>कंपॅटीबल आहे मायबोली
हो
मी दोन्ही वापरतो, IE आणि आग लागलेला कोल्हा.. दोन्हीकडे चालते नीट आणि थोडे स्क्रोल करावे लागते.. screen resolution कमी करून स्क्रोल जात असावा, चेक करावे लागेल
मन-कवडा.... मी screen
मन-कवडा....
मी screen resolution कमी नाही करत . नेहमी असते तेच ठेवते....
मी नेहेमी माबो फायरफॉक्स वरच
मी नेहेमी माबो फायरफॉक्स वरच बघते. मला तरि काहि प्रॉब्लेम येत नाहि.
मॅकवर आणि आयफोन मध्ये सफारीवर पण माबोला काहि प्रॉब्लेम येत नाहि. ते हि मी नेहेमी बघते.
एखादे लिखाण सार्वजनिक आहे की
एखादे लिखाण सार्वजनिक आहे की नाही ते कळण्यासाठी एखादा फ्लॅग टाका ना. उदा. मी केलेले एखादे लिखाण समजा आधी सार्वजनिक नाहीये आणि आता मला ते सार्वजनिक करायचे आहे, तर ते केल्यानंतर जेव्हा नवीन लेखन मध्ये जाऊन आपण बघतो तर ते सार्वजनिक झालेय की नाही काहीच पत्ता लागत नाही.
तसेच "नवीन लेखन" मध्ये दिसणार्या लिखाणांच्या लेखकांची नावे लिंक च्या स्वरुपात दिलीत तर बरे होईल. पाऊलखुणां मध्ये तसे आहे बहुतेक.
मी आधिच वर लिहिलय पण त्यावर
मी आधिच वर लिहिलय पण त्यावर काहि रिप्लाय नाहिये, किंवा ते क्लिअर नाहिये.. कदचित तुम्हि बिझि असाल तरि परत एकदा लिहिते.
लिहिताना आपण विभाग निवड्तो (ड्रॉप डाउन मेनु) व त्या विभागात लेख/ कविता लिहितो.
तर वाचकाला पण विभाग निवडुन त्या विभागातले सगळे लिखाण बघता यावे.
सध्या "गुलमोहर" वर क्लिक केल्या वर ७२ तासामधल्या लेखनाचे विभाग दिसतात. पण त्या पुर्विचे काहि वाचायचे असेल तर त्याचा विभाग कुठेच दिसत नाहि.
तर कॄपया वाचतानापण असे विभाग निवडायची, आणि त्या त्या विभागातले सगळे लिखाण वाचण्याची सोय द्यावी.
विभाग जे ७२ तासात लिखाण नसल्यास दिसत नाहित.
# कादंबरी
# काहीच्या काही कविता
# प्रकाशचित्र
# बालकविता
# बालसाहित्य
# मराठी गझल
# मागोवा
# ललित
# लेख
# विडंबन
# विनोदी लेखन
Pages