नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुनी, आता तसेच होते आहे. Happy
हे नंतरचे व्हॅलिडेशन टाळण्यासाठीच तर मी ती सूचना केली आहे.

एकच लेख दोनदा कानोकानीवर टाकता येत नाही. Happy अर्थात जर दुवा समान असेल तर.

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

कानोकानी वेगळी साईट असल्यामुळे मिलिंदने दिलेली सूचना प्रत्यक्षात आणणे अवघड आहे. कारण लिंक सध्या फक्त मायबोलीवरून देता येत असली तरी नजिकच्या भविष्याकाळात कुठल्याही वेबसाइट्/ब्लॉगवरून देता येईल. त्या सगळ्या वेबसाईट आपोआप बदलणे तांत्रिकदृष्ट्या शक्य असले तरी मायबोलीच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे Validation लिंक देताना करावे लागते.

मराठी कालगनने नुसार महीना व साल वर कुठेतरी ठळक अक्षरात दिसेल अश्या जागी लिहीता येईल का?

पुर्वी गुलमोहरामुळे कळायचे कोणता महीना चालु आहे ते.

मला एक सुधारणा सुचवायची आहे. मायबोली वापरताना मला एक अडचण जाणवली,
मी ज्या धाग्यांवर प्रतिसाद दिला आहे, त्यावरचे प्रतिसाद पाहण्यासाठी पुन्हा
- त्या group च्या पानावर किंवा
- मायबोलीवर नविन या पानावर किंवा
- गृपमध्ये नवीन वर (जर मी त्या गृपमध्ये असेन)
जाउन तो धागा शोधावा लागतो.
असे काही करता येइल का की, मी प्रतिसाद दिलेले धागे मला वगळे दिसु शकतील?
आपल्याला कळलं का मला काय म्हणायच आहे ते?

'माझ्यासाठी नवीन' या पानावर काय असते? मला त्यात आणि गृपमध्ये नवीन पानात काही फरक वाटत नाही?!!

तुमच्या सदस्यत्वाच्या पानावर 'पाऊलखुणा' असा एक विभाग आहे. त्यात तुम्हाला तुम्ही प्रतिसाद दिलेली पाने दिसतात.

सॅम, तुम्ही 'पाऊलखुणा' वर जाऊन तुम्ही प्रतिसाद दिलेले धागे वेगळे पाहू शकता.

आपली नावं मराठीत नाही का करता येणार का ?

----------------------------------
हे जीवन सुंदर आहे....

>'माझ्यासाठी नवीन' या पानावर काय असते? मला त्यात आणि 'गृपमध्ये नवीन' पानात काही फरक वाटत नाही?!!

सुरुवातीला दोन्ही पानावर सारखाच मजकूर असतो (तुमच्या मायबोलीच्या शेवटच्या भेटीपासून नवीन असलेले लेखन). पण जसे जसे तुम्ही ते वाचत जाल तसे "माझ्यासाठी नवीन" ही यादी लहान होत जाते. थोडक्यात तुम्ही अजून जो मजकूर वाचला नाही तोच त्या यादीत दाखवला जातो. थोडक्यात काय वाचले आणि काय नाही याचा मागोवा ठेवता यावा या साठी ती सोय आहे. गुलमोहरमधल्या लेखनाचा अजून त्यात मागोवा ठेवता येत नाही.

आपली नावं मराठीत नाही का करता येणार का?
प्रयत्न चालू आहे. तांत्रिक कारणामूळे जुन्या हितगुजवरचं स्थलांतर पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नाही.

>>> ग्रूप च्या सदस्यत्वामध्ये थोडी granularity वाढवता येणार नाही का ?

<<< मिलिंदाची ही सूचना आवडली. याचा अवश्य विचार व्हावा. त्याशिवाय माझी अजून एक सूचना -

"अजून वाचायचंय"च्या यादीमधे ज्याप्रमाणे फक्त "नवीन" पोस्ट आलेल्याच ग्रूप्समधील प्रकार दाखवले जातात, तसे "नवीन लेखन"च्या यादीमधेही का नाही? तसे कृपया करावे जेणेकरुन तिथे दिसणारी यादी लांबच्या लांब न दिसता फक्त जे वाचले नाही तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिल.

ग्रूपच्या सदस्यत्वाची Granularity हळूहळू वाढवतो आहोत. आधी एकदम छोटा ग्रूप असला तर त्यात सभासद फारसे नसतील म्हणून तसे धोरण केले आहे.

>"अजून वाचायचंय"च्या यादीमधे ज्याप्रमाणे फक्त "नवीन" पोस्ट आलेल्याच ग्रूप्समधील प्रकार दाखवले जातात, तसे "नवीन लेखन"च्या यादीमधेही का नाही?
कारण अजून वाचायचंय मधे फक्त तुम्ही ज्या ग्रूपचे सभासद आहात त्यातलेच नवीन लेखन दाखवले जाते. तसेच नविन लेखन मधे केले तर ज्या ग्रूपचे सभासद नाही तिथले पण सार्वजनिक लेखन तुम्हाला कधीच दिसणार नाही. तसेच नवीन लेखन जे मायबोलीचे सभासद नाहीत त्यानाही दिसते. जेंव्हा मायबोलीवर यायला अगदी थोडा वेळ असेल तेंव्हा पटकन "अजून वाचायचंय" मधे तुमच्या आवडीच्या गोष्टीत नवीन काय ते पाहता येईल. जेंव्हा जास्त वेळ असेल तेंव्हा नवीन लेखन मधे जाऊन आजुबाजुला काय चाललंय ते पाहता येईल.

मला बहुतेक नीट सांगता आलं नाही. "नवीन लेखन" मधे मी ज्या ग्रूप्स चा सभासद नाही तिथले लेखनही दाखवले जाते हे बरोबर आहे. पण तिथे जर मला नवीन काही वाचण्यासारखे असेल तरच दाखवावे असे मला म्हणायचे होते. उदा. खालील चित्र पहावे:a.jpg

इथे मी "सोलापूर" आणि "बंगळुरु" या ग्रूप्सचा सभासद नसूनही तिथले नवीन लेखन मला दिसते हे बरोबर, पण एकदा तिथले सगळे नवीन वाचून झाले की ते परत या यादीत दिसू नये. (हे करता येणे शक्य आहे असे वाटतेय कारण माझ्या सदस्यत्व नसलेल्या ग्रूप्समधे देखील माझ्यासाठी किती नवीन पोस्ट्स आहेत हे सध्या दाखवले जाते.)

युरेका!!
खरचं की... मझ्या लक्षातच आलं नव्हत!! धन्यवाद गजानन, मिलिंद आणि अ‍ॅडमिन...

@Chafa
>कारण माझ्या सदस्यत्व नसलेल्या ग्रूप्समधे देखील माझ्यासाठी किती नवीन पोस्ट्स आहेत हे सध्या दाखवले जाते.
असे नाहीये. तुम्हाला दिसणारे ते नवीन संदेश कुठल्याही ग्रूपमधले नाहीत. ते गुलमोहर विभागातले म्हणजे ग्रूपबाहेरचे आहेत.
दुसरे असे की ज्या ग्रूपमधे सार्वजनिक संदेश आहेत तेच असे दिसू शकतात. जे ग्रूपपुरते मर्यादित आहेत ते दिसू शकत नाहीत.

ग्रूप च्या सदस्यत्वामध्ये थोडी granularity वाढवता येणार नाही का ? >> अनुमोदन.

'माझ्यासाठी नविन' या विभागात 'Mark All As Read' अशी व्यवश्या देता येइल का? सध्या ग्रुपच्या सदस्यत्वामध्ये granularity नसल्याने बरेच अवाचनीय (माझ्यासाठी) बाफ यादीत दिसत रहातात.

तसेच 'Bookmarking' ची व्यवस्था करता येईल का? काही पोस्ट वाचनीय असतात पण वेळेअभावी वाचता न आल्यास नंतर विसर पडतो आणी त्यावर प्रतिक्रिया येणं बंद झाले की त्या पोस्ट्स गुप्त होतात (अथवा फार खाली जातात).

>कारण माझ्या सदस्यत्व नसलेल्या ग्रूप्समधे देखील माझ्यासाठी किती नवीन पोस्ट्स आहेत हे सध्या दाखवले जाते.
असे नाहीये. तुम्हाला दिसणारे ते नवीन संदेश कुठल्याही ग्रूपमधले नाहीत. ते गुलमोहर विभागातले म्हणजे ग्रूपबाहेरचे आहेत.

>>>>> मला हे कळले नाही अ‍ॅडमिन. Sad मला (मी सदस्य नसलेल्या) ग्रूप्स मधलेही संदेश दिसतात नवीन लेखन मधे (फक्त गुलमोहोर नाही), आणि तिथे मी किती वाचले नाहीयेत तो आकडाही कळतो. त्यामुळे एकही नवीन संदेश नसेल तर तो ग्रूप दाखवूच नये तिथे.

चाफा, मला असं वाटतं , नवीन लेखन हा भाग सदस्य आणि पाहुणे यांना सामायिक असल्याने तेथे सर्वात ताजी पोस्ट्स वरती अशा उतरत्या भाजणीने सर्व बीबींची यादी दिसते. आता एखाद्या बीबीवर तू जरी सर्व पोस्ट्स वाचले असतील तरी केवळ तो बीबी ताजा आहे म्हणून तो तेथे दिसतो. बहुधा सदस्य आणि पाहुणे यांच्यामध्ये ते फिल्टर केलेलं नाहीये.

१. मराठी/इंग्लिश जे बटण इथे या लिहायच्या एडीर्टरच्या वर आहे ते मला मराठीमधुन इंग्लिशम्शे जाताना वापरता येते पण इंग्लिशमधुन मराठीमधे जातना वापरता येत नाही. त्यासाठी वरचा मराठी/इंग्लिशचा ड्रॉपडाउन आहे तोच वापरावा लागतो, Ctrl + \ ने बदलता येत नाही. (मी लिनक्स आणि मॅक वापरते बहुदा ब्राउजर फायरफॉक्स ३+ असतो) त्यासाठी http://marathiblogs.net/ वर जशी रेडिओबटणाची एक खिडकी आपल्या स्क्रोलबरोबर खालीवर होते तसे काही करता येईल का?

२. मला अजुन एक प्रॉब्लेम येतो ज्यामुळे मला प्रॉब्लेम १ च्या उत्तराची जास्त गरज आहे, मी जेव्हा मॅक वापरते तेव्हा मायबोली सोडुन इतर कोणात्याही विंडोमधे गेले (जसे जिमेल चॅट, एडिअम चॅट, ब्लॉग वगैरे) आणि परत मायबोलीवर एडिट विंडोमधे लिहायला आले की फाँट मराठीतून इंग्लिश होतो. आणि मग त्या वरच्या सगळ्या कसरती कराव्या लागतात. या बाबतीत काही करता येईल का?

हो रे मिलिंदा. मला तसे फिल्टर करावे हेच सुचवायचे होते. Happy

कराडकर,
२. इथे मॅक चा नक्की संबंध नाहीये. कारण मला अगदी हाच प्रॉब्लेम येतो. फक्त माझ्याकडे एकदा इंग्लिश झाले की मराठी करता येत नाही. पोस्ट परत नव्याने लिहावे लागते Sad

अ‍ॅडमिन ?

milindaa,
हाच प्रोब्लेम मलाही हमखास येतो. Firefox वापरता का तुम्ही?
आणि पोस्ट परत लिहायची गरज नाही. रीफ्रेश (F5) केल्यावर पुन्हा मराठीत लिहिता येतं. आणि आधी लिहिलेलं तसंच राहातं. (माझ्याइथे तरी. करून पाहा.)

पान वाहतं असलं एखादं, तरी त्यावर किती प्रतिसाद ठेवायचे हे ते पान सुरू करणारा ठरवू शकेल का? आत्ता एकतर ३० प्रतिसादांनंतर पहिले सर्व प्रतिसाद वाहून जातात, नाहीतर दर २० प्रतिसादांनंतर नवीन पान (प्रतिसादांसाठी) सुरू होते..
मी एखादं गप्पांचं पान सुरू केलं आणि त्यावर मला ६० प्रतिसाद ठेवायचे असतील, तर मी तसे करू शकेन का? - हे 'सारेगमप आजचा आवाज' या पानाच्या अनुषंगाने. त्यामध्ये ३०च प्रतिसाद अपुरे वाटतात, आणि सगळीच्या सगळी पाने ठेवायची गरज आहे, असेही वाटत नाही. मधला उपाय आहे का काही? Happy
-----------------------------------
Its all in your mind!

हो, मी फायरफॉक्स वापरतो. कदाचित हा त्यातला प्रॉब्लेम असू शकेल.
आता रीफ्रेश करुन बघेन पुढच्या वेळी. धन्यवाद.

एखाद्या ग्रुप मधे सामील झाल्यावर काही त्या ग्रुपचे सदस्यत्व रद्द कसे करता येईल?

नोटपॅड ओर तत्सम एडिटर मध्ये लिहले आणि माबो वर पेस्ट केले तर मराठीत का नाही दिसत?

ज्या ग्रूपचे सदस्यत्व नको आहे त्या ग्रूपमध्ये (किंवा त्यातल्या कोणत्याही पानावर) गेल्यावर उजव्या बाजूला वरच्या कोपर्‍यात 'माझे या गृपमधले सदस्यत्व' असा दुवा दिसतो. त्यावर टिचकी मारून येणार्‍या पानावर 'Leave this group' असा पर्याय दिसेल.

आज मायबोली फारच हळू चालतेय. तुमच्यापैकी कोणाला तसा अनुभव येतोय का?

नवीन मायबोली: असे सुधारता येईल>>>>>>>>>>>>>

सध्या अनावर झालेल्या लोकांना आवरा.... बाकी सुधारणा नाही केल्यात तरी चालतील Happy

-प्रिन्सेस...

Pages