Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54
आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.
तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
.
.
मला एक कळत
मला एक कळत नाही. कि पांढर्या शाईचा एवढा काय तो आग्रह आहे.
पांढर्या शाईत लिहीण्यापेक्षा , लिहूच नका ना !
______________________________________________
- प्रकाश
प्रकाश,
प्रकाश, तुला मुद्दाच कळलेला नाहीये.. कळेल
मुद्दा पांढरी शाई असण्याचा नाहीये तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग फीचर्स देण्याचा आहे.
बरं बरं
बरं बरं कळलं ! मला वाटले कि पांढरी शाई हाच एक मुद्दा आहे.
टेक्स्ट फॉर्मॅटिंग फीचर्स मुळे रंगीबेरंगी लिखाण करता येईल.
म्हणजे प्रेम कविता गुलाबी रंगात... निसर्ग कविता हिरव्या रंगांत्...क्रांतीबद्दलची कविता लाल्/केशरी रंगामधे...वगैरे वगैरे असेच का? आणि प्रतिक्रिया सगळ्या पांढर्या रंगात आल्यातर ?
जोक्स अपार्ट.....पण या सुविधेमुळे मला नाही वाटत कि काही फारसा फरक पडेल . आता आहे तेच छान आहे कि !
शुध्दलेखन करण्यासाठी मात्र काही करता आले तर त्याचा सर्वांना फायदा होइल असे वाटते.जी सुवीधा आता काही संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
______________________________________________
प्रकाश
त्याचं काय
त्याचं काय आहे काळे सरकार, पूर्वी ऐतिहासिक नाटकातली पात्रे स्वगत म्हणत असत. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे ते सांगत असत . या स्वगताची गम्मत म्हनजे ते शेवटच्या लायनीतल्या लोकाना स्वच्छ ऐकू जाई पण रंगमंचा वरील शेजारच्या पात्राला ऐकू जात नसे. म्हणजे तसे सगळ्यानी समजायचे. तसे इथले पांढर्या शाईचे आहे. जे मनात आहे ते पांढर्या शाईत खरडायचे आणि पुन्हा आपण त्या गावचे नाही असा शहाजोगपणाचा आवही आणायचा. मग सगळेच वाकून वाकून त्या पांढर्या शाईत काय आणि कोणाला लिहिले आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतात. काही ज्येष्ठ मंडळी ही पांढरी शाई वापरण्यात आघाडीवर असत. आता ते कोण हे मागची पोष्ट्ये पाहिल्यास कोण कंठरवाने पां.शा. पाहिजे , पाहिजे ओरडतय ते पाहिल्यास कळेलच. आता ते अॅडमिन बद्दलच पान्ढर्या शाइत लिहितील असे अॅडमिनला भीती वाटत असल्याने ती शाई ते देत नाहीत असं ते सगळं आहे. हाकानाका?
***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
जुन्या
जुन्या हितगुज वरुन नविन मायबोलित परतणण्यासाठी जी लिन्क आहे ती , माझ्या सदस्यत्वाच्या पानावर घेउन जाते. त्या ऐवजी ती जर का नविन मायबोलिच्या मुख्य पानावर नेणारि असल्यास जास्त उपयुक्त होइल असे वाटते.
तसेच जुन्या हितगुजमधिल कुठल्याहि धाग्यावरुन सरळ नविन मायबोलित परतण्यासाठी सोय करता आलि तर उत्तम.
अॅडमीन तुम्ही मायबोली उपलब्ध
अॅडमीन तुम्ही मायबोली उपलब्ध करून देऊन खुप मदत करत आहात.
खालील ऑप्शन मिळाला तर नविन लेखन वाचताना जरा मदत होईल.
जेव्हा "अजून वाचायचंय" -> "माझ्या साठी नविन " या ठिकाणी क्लिक केल्यावर जी यादी येते त्यात सर्व धागे ज्यात नविन लेखन आहे ते सर्वात वर आणता येतील का ?
मागील सोमवार पासून तर नविन पोस्ट ची मेल येणे बंद झाले आहे त्या मुळे या लिंक वरूनच नवीन पोस्ट कळतात.
किंवा फार पूर्वी जसे एका दिवसातिल , आठ दिवसातिल लिंक होती तसे दिले तर फार उत्तम.
विचारपुशीत नविन संदेश आला तर
विचारपुशीत नविन संदेश आला तर त्याचा दुवा मुखपृष्टावर खूप स्क्रोल केल्यावर दिसतोय..
तो पूर्वीसारखा सदस्यत्वाच्या दुव्यांमधे आणता येइल का ?
मायबोलीवर एखाद्या स्वरचित
मायबोलीवर एखाद्या स्वरचित चालीचे/गाण्याचे इतरांना श्रवण करता यावे म्हणून विजेट चढवता नाही का येणार?
आधीच तशी सोय असल्यास...ती कशी व कुठे आहे..ह्याबद्दल मार्गदर्शन कराल का?
मायबोलीच्या प्रत्येक पानावर
मायबोलीच्या प्रत्येक पानावर मायबोलीच्या लोगो खाली जशी नविन लेखन वगैरेसाठी लिंक आहे तशीच पानाच्या तळाशी देता आल्यास पुन्हा वर पर्यंत जाण्याचा त्रास वाचेल.
हे आधि इतरांनी सांगितले
हे आधि इतरांनी सांगितले असावे, पण ...
त्या उजवीकडील व्हिडिओ अॅड्स बंद करता आल्या तर बरे होईल. मायबोलीला त्यातुन उत्पादन होत असणार, पण बँडविड्थचा मात्र ... आणि तो आवाज ...
आवाज करणार्या व्हिडीओ अॅडस
आवाज करणार्या व्हिडीओ अॅडस कशा बंद करता येतील यावर प्रयत्न चालू आहेत.
१. सगळ्याना सारख्या त्याच जाहिराती दिसतील असे नाही. तुम्ही कुठून नेटवर येत आहेत त्याप्रमाणेही काही जाहिराती बदलत आहेत.
२. दिसल्या तरी काही जणांना त्या आपोआप आवाज सुरु होऊन दिसत आहेत तर काही जणाना आवाज बंद करून (अगदी एकच जाहिरात असली तरी)
अशा जाहिराती अगदी नकोशा असतात याची कल्पना आहे आणि केवळ मायबोलीला उत्पन्न मिळते म्हणून त्या सुरु ठेवलेल्या नाहीत तर त्या शोधून काढून थांबवणे सोपे नाही म्हणून वेळ लागतो आहे.
गेल्या एक-दोन दिवसात फक्त
गेल्या एक-दोन दिवसात फक्त चित्र (अॅड्स) दिसताहेत
धन्यवाद
कृपया ही जहीरात लवकर बंद
कृपया ही जहीरात लवकर बंद करायची व्यवस्था करावी
>>गेल्या एक-दोन दिवसात फक्त
>>गेल्या एक-दोन दिवसात फक्त चित्र (अॅड्स) दिसताहेत
ही तुझी पुण्याई ! माझ्या कर्मफलानुसार मला 'म्युसिनेक्स' औषधाच्या जाहिराती दिस्तात आणि ऐकू येतात. (हिरवा शेंबूडगोळा बडबडतो.). तसंच हातात काही खायला घेऊन बसलं की नेमकं संडास साफ करणार्या केमिक्स्लची जाहिरात येते. आणि हातातलं खावसं वाटत नाही. (अशा रितीनं वजन कमी करण्याचा मार्ग चांगला आहे. :P)
मलाही पुन्हा विडीओ अॅड्स
मलाही पुन्हा विडीओ अॅड्स दिसतात.
पाउलखुणा ची लिंक वरतीच मिळेल
पाउलखुणा ची लिंक वरतीच मिळेल क? सध्या खुपच आत जावे लागते (माझे सदस्यत्व -> पाउलखुणा...)
पाउलखुणा वरच असले म्हणजे स्वत: केलेले लिखाण लगेचच हुडकून काढायला येईल.
मायबोलीचा
मायबोलीचा झेन्डा
http://72.78.249.124/esakal/20091121/5283574695749486709.htm
एखादा धागा ज्या(व्यक्ति)ने
एखादा धागा ज्या(व्यक्ति)ने सुरु केला आहे त्याचे नाव 'नवीन लेखन' इ. ठिकाणी दिसते. त्याबरोबरच शेवटचा संदेश ज्याचा असेल त्याचे पण दिसु शकेल असे करता येईल का?
बुकमार्क सारखी काही सुविधा
बुकमार्क सारखी काही सुविधा आहे का? एखादा धागा मार्क करुन ठेवता येतो का? नसल्यास अशी सुविधा देता येइल का?
मी एखाद्या ग्रूपाची सदस्य
मी एखाद्या ग्रूपाची सदस्य नसेन, आणि चुकून त्या ग्रूपाच्या धाग्यात गेले, तर फक्त 'हे पान पहायची परवानगी नाही' असे येते. 'हे पान' नक्की कुठलं आहे, हे कळलं तर बरं पडेल, म्हणजे त्या ग्रूपाचं सदस्यत्व घ्यायचं की नाही ते ठरवता येऊ शकेल.
वरती विचारलेली 'बुकमार्क' ची
वरती विचारलेली 'बुकमार्क' ची सोय मलापण फार सोयीची वाटते... आत्ता 'माझे आवडते १०' आहे तसचं पण त्याला १० चं बंधन नाही असं काहितरी?!
अॅडमिन, याची विशेष गरज नाही,
अॅडमिन,
याची विशेष गरज नाही, पण एक सुविधा वाढवता येऊ शकेल.
सध्या "संपूर्ण मायबोलीवरचं नवीन लेखन" या पानावर तिसरा स्तंभ 'लेखक' असा आहे.
तर त्या त्या लेखकाच्या नावावर टिचकी मारून त्याच्या व्यक्तिरेखेवर जायची सोय करता येईल का?
@आर्फी अशी सोय आधी होती पण ती
@आर्फी
अशी सोय आधी होती पण ती नुकतीच मुद्दाम काढून टाकली आहे(त्याने सर्वरवरचा थोडा ताण कमी झाला)
लेखकाच्या नावावर टिचकी मारून त्याच्या व्यक्तिरेखेवर जायची सोय मायबोलीवर अनेक पानावर आहे. लेखन वाचताना सगळ्यात वर लेखकाच्या नावावरून जाता येते. मदतपुस्तिकेतून मायबोलीकरांचे नाव शोधून जाता येते. प्रतिक्रियांवरच्या वाचकाच्या नावावरून जाता येते.
नवीन लेखन या पानाचा सगळ्या महत्वाचा उद्देश नवीन लेखन काय आहे ते सांगणे. लेखकाच्या नव्याने लेखन केलेल्या पानाला नुसती भेट ही न देता जर आपण नुसती व्यक्तीरेखाच पाहत असू, तर एका दृष्टीने तो त्याच्यावर्/तिच्यावर अन्याय नाही का ?
हम्म्म... बरोबर आहे.
हम्म्म... बरोबर आहे.
मला एखालाच धागा follow करता
मला एखालाच धागा follow करता येइल का?
सध्या एखादा गॄप follow करता येतो पण त्यातल्या एखाद्या हव्या असलेल्या धाग्याबरोबर बाकी बरेच नको असलेले धागेपण येतात... 'माझ्यासाठी नवीन' बरोबरच, 'मी follow करत असलेले धागे' असं वेगळं दिसलं तर खुप मदत होइल..
... ह्यात आणि 'बुकमार्क' मधे मला साम्य वाटतय?!!
सध्या माबोवर बरेच जण एखादी
सध्या माबोवर बरेच जण एखादी लिंक देतात.. तेव्हा खूपदा आपल्याला हे पान पहाण्याची परवानगी नाही असा संदेश दिसतो... कारण त्या विशिष्ट ग्रुप चे आपण सदस्य नसतो..
पण ते पान कुठल्या ग्रूप चे आहे ते समजतच नाही.. मग परत लिंक देणार्याला ग्रुप चे नाव विचारावे लागते..
त्याऐवजी, त्याचवेळी ते पान कोणत्या ग्रुप मधे आहे ते संदेशा मधे सांगता येइल का ?
लेखकाच्या नावावर टिचकी मारली
लेखकाच्या नावावर टिचकी मारली की त्याचे सर्व लिखाण (पाऊलखुणा नव्हेत) एकत्र दिसण्याची सोय होऊ शकते का? लेखकाचे लिखाण म्हणजे - त्याने सुरु केलेले लिखाणाचे धागे/गप्पांचं पान/ गुलमोहोर मधील लिखाण.
नानबा, लेखकाच्या नावावर टिचकी
नानबा,
लेखकाच्या नावावर टिचकी मारून पाऊलखुणामध्ये गेल्यावर २ विभाग दिसतील. एकात लेखकाचे फक्त लेखन दिसते (सुरु केलेले लिखाणाचे धागे/गप्पांचं पान/ गुलमोहोर मधील लिखाण) तर दुसर्या यादीत सभासदाने केलेले लेखन + प्रतिसाद दिलेले धागे दिसतात.
Pages