मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुप्पाहुय्या तुमचं समर्थन पटत नाहीये. कुठ्ल्याही context मध्ये असली तरी तुमची ही मानसिकता चूकच.पब्लिक फोरमवर बोलण्याचं तुमचं क्वालिफिकेशन शून्य आहे हे आता सगळ्यांच्या लक्षात आलंच आहे.

इथे हुप्पाहुय्या माफी मागतायत, तर ती स्वीकारून मूव्ह ओन व्हायच्या ऐवजी soft टार्गेट आहे म्हणून bashing. तिकडे त्या मुलीची आई अरेरावी करतेय तर तिला फटके न देता त्या मुलीला डायरेक्ट फटके. अजब आहे.

तुमच्या घरासमोरची रांगोळी हि तुमची प्रॉपर्टी आहे..
>>>>
बरेचदा तुम्ही घरासमोर ज्या जागेत रांगोळी काढतात ती तुमची प्रॉपर्टी नसून कॉमन प्लेस असते. Wink
हे रिया यांच्या पर्टिक्युलर केस बद्दल नसून जनरल होते.

ग्रो अप पिपल..... तुम्ही लिहलेल्या सगळ्या पोश्ट्स परत एकदा वाचुन बघा. एखाद्या मानसोपचार तज्ञाला वाचायला द्या.

आणि खरेच जर कुणी लिहलेय असे केले तर इथे लिहा मग मी मानतो कि तुमच्यात ते गटस खरच आहेत. लोक गाय मारली म्हणुन वासरु मारणारे बघितले आहेत, इथे तर वासराला हाकलले म्हणुन गाय मारायची तयारी सुरु आहे.

तुम्ही कधी लहानपणी खोड्या केल्यात कि नाही / तुम्हाला करु दिलेल्त कि नाही याची दाट शंका येतेय.

खरच अवघडै....

अतिअवांतरः आपला कायदा ही खुन के बदले खुन किंवा परप्स्पर रस्त्यावर शिक्षा याला मान्यता देत नाही ( सज्ञान लोकांच्या बाबतीत). तुम्ही मात्र जज, वकिल, पोलिस, आणि शिक्षा स्वहस्ते देणारे होताहात.

रिया आता निष्ठेने २ महिने घालणारच आहेस रांगोळी तर छोट्या/सोप्या रांगोळ्या असा ब्लोग सुरु कर. रोज मी काढलेली आणि 'तिने' विस्कटलेली अशी दोन चित्रे अपलोड कर. (अगदी ५ मिनिटे लागतात बघ मोबाईल अपलोडला) धिस इज युअर चान्स टू बी अ सेलिब्रिटी. लोकांना नक्की आवडेल असा ब्लोग. जमल्यास लोकल आरजे, लोकल टीव्ही स्टेशन सगळ्यांना दे लिंक. त्या व्रात्य चिंगीला फुटेज खायचं आहे पण शेवटी तुला अटेन्शन मिळाल (ते पण चांगल) बघून आपसूक सुधारते बघ.

मानसोपचार तज्ञाला >>>>>> हे हास्यास्पद आहे. MBBS अशी पदवी घेतलेले औषध लिहून देणारे खरे खुरे डॉक्टर वेगळे आणि काही जमत नाही म्हणुन MA सायकॉलोजी झालेले २५-३५ वर्षाचे बिनकामाचे काउंसीलर वेगळे.

हल्ली तर सायकॅट्री मधे ( म्हणजे खर्‍याखुर्‍या डॉक्टरकीत ) काउंसलिंग वगैरेला थारा नाही.

१० महिन्याच्या बाळाला एखाद्या मोठ्या मुलानी ढकलावं अशी वेळच आई वडिलांनी येऊ देता कामा नये. ती जबाबदारी आई-वडिलांची असते. >>>>> धन्यवाद ह्या सल्ल्या बद्दल,

जर तुम्हाला माहितीच नाही ही मुलगी/ किवां कोणतेही मुल असं वागतेय आणी ती तुमच्या घरी तुमच्या स्वत:च्या घरी तुमच्या स्वत:च्या मुलाबरोबर खेळायला आलेय तर तुम्ही कांय कराल ?

तिचे आई वडील समोरच होते, काही गोष्टी आपल्याला कळायच्या आत घडून जातात नाईलाज असतो. आपण समोर असलो तरी आपले मुल पडतेच, लागतच ना ?

आम्ही अजूनही कोणात्याही लहान मुलाला त्याचे वडील हडकुळे किवां बलदंड असो मारायच्या भानगडीत पडतच नाही, मनाला पटतच नाही जर समजवायचं असेल तर आईवडिलांनाचं समजावू

तुम्ही ज्या भागात राहता त्या भागाच्या पोलिस इन्स्पेक्टरचे नाव तुम्हाला माहित आहे? नगरसेवकाचे नाव तुम्हाला माहित आहे का? कधी त्यांना भेटून तुम्ही बोलला आहात का? पोलिस स्टेशनचा नंबर तुमच्याकडे आहे का?
>>
सगळ्याची उत्तरं हो आहेत.
त्यांना भेटून तुम्ही बोलला आहात का? >>> फक्त याचे उत्तर नाही आहे कारण त्याने काय होनार आहे ते मला माहीत आहे (हे गृहितक नाही. मागिल एका अनुभवावरून बोलते. हा अनुभव लहान मुलांशी निगडीत नाही असो)

असो ! आता रांगोळी या मुद्द्याबाबत थांबूयात.
मी तरी १-२ महिने थांबायचं ठरवलंय. बघुयात काय होतंय.

स्वाती, ते गाड्यांच्य च्या फोडणार्‍या मुलाचा बंदोबस्त झाला Happy
त्या काकांनी सांगितलं म्हणुन काल येऊन सॉरी म्हणून गेला. ज्यांना ज्यांना त्याने त्रास दिलेला त्या सगळ्यांना सॉरी म्हणाला.आम्ही त्याला चॉकलेट्स दिली आणि सांगितलं की तू खुप शहाणा आणि स्टाँग मुलगा आहे. तुझ्यासारखा शक्तीमान मुलगा आपल्या सोसायटी मधे नाहीये तेंव्हा चिल्ल्या पिल्ल्यांना घाबरवण्यापेक्षा तू तुझ्या शक्तीचा वापर करून त्यांना प्रोटेक्ट कर. म्हणजे तू सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांचा लाडका होशील. मग त्याने ही स्माईल दिली आणि गेला.
फटके पडल्यावर का आलं असावं त्याला हे शहाणपण? माहीत नाही Happy
असो! सध्यातरी त्या त्रासातून मुक्तता झालीये.
आत अता हिचं काय होतंय बघूयात.

राज उपाय भारी Rofl

सीमंतिनी, ब्लॉगचं माहीत नाही पण माबोवर नक्कीच टाकेन Wink सकाळी रांगोळी काढताना तोच विचार करत होते Wink

ऋन्मेष, रांगोळी मी माझ्या घरा बाहेरच्य अ च्या पॅसेज मधे काढते. माझ्या फ्लोअर वरच्या तीन घरांनी त्या पॅसेजसाठी एक्स्ट्रॉ पैसे भरलेत. सो ती आमची पर्सनल प्रॉपर्टी आहे.

अच्छा, म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी नसेल तर वाट्टेल ती नासधूस करायला हरकत नाही?
(रीया हे तुला नाही)

दुसर्याच्या लेकराला मारहाण हा उपाय होऊ शकत नाही,त्यात आपल्यावरच बुमरँग व्हायचीच शक्यता जास्त!
त्यापेक्षा इतर उपाय वर सुचवल्याप्रमाणे करावेत... इतकं तारस्वरात ओरडावं की घाबरून थिजली पाहिजेत वांड मुलं. त्यांना धमकी द्यावी की परत असं केलस तर तुला इतकं मारीन की बस्स, मग तुझ्या आईला पण घाबरणार नाही म्हणांव. मुद्दाम जोर्रात ओरडलं की शेजारचे इतर ऐकतील ह्या भितीने तरी मुलं बुजतात.
रांगोळी पुसणे हा गुन्हा नाही पण इतर वर्णनावरून तिचा हेतू आणि प्रवॄत्ती वाईट आहे आणि याला आळा बसलाच्च्च पाहिजे, असं बर्याच जणांच्या लक्षातच येत नाहिये :हताश बाहुली:

इतकं तारस्वरात ओरडावं
>>>
हेच जमत नाही गं Sad
इतर वेळेला मारे होळीला बोंबा ठोकताना येतो तितका जोरात आवाज येतो.
जेंव्हा गरज तेंव्हा जमत नाही
पण हा सगळ्यात जालीम आणि हमखास वर्क होणारा उपाय आहे.

काल परवा हे ट्राय करून पाहिला हवं होतं Sad
प्लॅन बी मधे ठेवते हे. सध्या प्लॅन ए वर काँसंट्रेशन Wink

कोकणस्थ , ऋन्मेष यांच्यामते पब्लिक प्रॉपर्टी वर काही करण्याचा अधिकार कोणालाही आहे.
हे वाच -
ऋन्मेऽऽष | 29 October, 2014 - 23:04

तुमच्या घरासमोरची रांगोळी हि तुमची प्रॉपर्टी आहे..
>>>>
बरेचदा तुम्ही घरासमोर ज्या जागेत रांगोळी काढतात ती तुमची प्रॉपर्टी नसून कॉमन प्लेस असते.

शेवटी फटके मारणे हाच उपाय कामी आला. >> सध्या तरी हेच दिसतंय.

रियाने जो रांगोळी पुसणार्‍या मुलीचा अनुभव सांगितला आहे, त्यात महत्वाचा मुद्दा रांगोळी पुसणारी मुलगी नसुन तिला पाठीशी घालणारी तिची आई आहे.

मी या आधीही ह्या धाग्यावर लिहीले होते की, व्रांत्य मुले हा कळीचा मुद्दा तेव्हाच बनतो जेव्हा त्याला त्याचे पालक पाठीशी घालतात. लहान मुले खोड्या करणारच पण त्यांना शिस्त लावणे हे सर्वस्वी पालकांचं कर्तव्य आहे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते जर आपल्या मुलांच्या वर्तणुकीमुळे इतरांना त्रास होत आहे हे पालकांच्या ल़क्षात आले तर त्यांनी स्वतःच्या मुलांना शिस्त लावणे त्यांच्याकडून अभिप्रेत आहे. जे पालक आपल्या मुलांमुळे इतरांना त्रास होतो आहे हे लक्षात आल्यावर सुध्दा त्यांना जर पाठीशी घालत असतील तर मुलं पुढे मोठी होऊन काय दिवे लावतील हेच लक्षात घेत नाहीत. आणि पुढे त्याचे परिणाम त्यांना आणि समाजालासुध्दा भोगावे लागतात.

रांगोळी पुसणे हा गुन्हा नाही पण इतर वर्णनावरून तिचा हेतू आणि प्रवॄत्ती वाईट आहे आणि याला आळा बसलाच्च्च पाहिजे, असं बर्याच जणांच्या लक्षातच येत नाहिये :हताश बाहुली:>>>> वही त्तो. तुम्ही लहानपणी खोड्या केल्याच नाहीत का असे म्हणणार्‍यानी त्या मार खाल्लेल्या मुलीबद्दल सहानुभुतीचे अवाक्षरही काढलेले नाही. क्या बात है! खोड्या करणारी मुलगी निष्पाप, मग त्या निष्पाप मुलीच्या हातुन मार खाल्लेली त्तिच्याच वयाची मुलगी कोण?

माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या २ च दिवस आधी आम्ही तिच्या शेजारचा रिकामा प्लॅट बघायला गेलो होतो. तिच्याकडे पण गेलो आणी त्याच वेळेस मैत्रिणीच्या पुतण्याने ( वय वर्षे ४ ) तिच्या मुलीला कडाडुन चावा घेतला, कारण काय तर त्या १ वर्षाच्या बाळाने आपले खेळणे भावाला घेऊन दिले नाही. असा गोन्धळ झाला. आम्ही समोरच होतो, लक्षही होते. पण सेकन्दाभरात त्या मुलाने तिचा हात पकडुन चावा घेतला. मग मात्र सन्तापलेल्या तिच्या सासर्‍यानी नातवाला जोरात २ फटके हाणले कारण मुलीचा हात काळा निळा झाला होता. किती लक्ष ठेवणार? आता त्या मुलाचे वय ९ आहे. पण अजूनही कधी कधी तो इतरान्शी मारामार्‍या करतो. आणी मार पण खाऊन येतो.

रिया आता २ महिन्यानी रीझल्ट बघुया.

अच्छा, म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी नसेल तर वाट्टेल ती नासधूस करायला हरकत नाही?
>>>>>
कोकणस्थ, हो असे बोलू शकतो.
उद्या तुम्ही चौपाटीवर किल्ला बनवाल मग कोणी मुलाने येऊन तिथे नासधूस केली तर त्याच्याशी भांडायला जाल, कसे चालेल हे..
किंबहुना चौपाटीवर तुम्ही कोणाच्या परवानगीने लोकांची येण्याजाण्याची जागा अडवून किल्ला बनवला याचे उत्तर तुम्हालाच आधी द्यावे लागेल.
बाकी कायद्याचे जाणकार यावर प्रकाश टाकतील.

महान. चौपाटी आणि सोसायटीत घराबाहेर पडल्यावर लगेच समोरची जागा एकच? चौपाटीवरचा वाळूचा किल्ला आणि घराबाहेरची रांगोळी एकच? ही तूलना? ______________/\______________ .

हे ठीक आहे पण जी घरातीलच मुले घरातल्या पणत्या फोडतात आणि कुटतात आणि रांगोळि पुसतात त्याचे आईबाबा काही बोलत नाहित आपन बोलले तर घरातले वातावरण बिघडु शकते अशावेळेस काय करावे रुन्मेश?

उद्या तुम्ही चौपाटीवर किल्ला बनवाल मग कोणी मुलाने येऊन तिथे नासधूस केली तर त्याच्याशी भांडायला जाल, कसे चालेल हे..<< चूक. ती पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस होत नाही.

आधी स्वतःपुरत्या तरी कन्सेप्ट क्लीअर करून घ्या, मग सल्ले द्या.

उद्या तुम्ही चौपाटीवर किल्ला बनवाल मग कोणी मुलाने येऊन तिथे नासधूस केली तर त्याच्याशी भांडायला जाल, कसे चालेल हे..<< चूक. ती पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस होत नाही.
आधी स्वतःपुरत्या तरी कन्सेप्ट क्लीअर करून घ्या, मग सल्ले द्या.
>>>>>>>>>>>

मी माझ्या सल्ल्याखाली कायद्याच्या जाणकारांनी प्रकाश टाका असे म्हटले आहेच. कारण मी ईंजिनीरींगचा विद्यार्थी आहे Happy

असो, ती पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस होत नाही म्हणजे? असे मी कुठे म्हणालो पब्लिक प्रॉपर्टीची नासधूस? तुम्ही त्या मुलाशी आपण बनवलेला किल्ला का तोडलास याचा जाब विचारायला जाणे यात पब्लिक प्रॉपर्टी कुठे आली? उलट पब्लिक प्रॉपर्टीवर अतिक्रमण करून आपण किल्ला बनवला आहे म्हणून आपण फॉल्टमध्ये याल.

चौपाटीवर बनवला जाणारा वाळूचा किल्ला हे अतीक्रमण यात मोडते ही नवीन माहिती मिळाली.
>>>>>>
तो कोणी आपल्या इच्छे वा परवानगीविरुद्ध मोडू नये असा आपण दावा करत असाल तर नक्कीच ते अतिक्रमण ठरत असावे. Happy

हे खरंच अती आहे. काहीही झालं तरी ते अतिक्रमण ठरू शकत नाही. फार फार तर अथॉरिटिज म्हणतील आपापसात सोडवा.

मी केदार, यात कसले अभिनंदन, नाक्यावर जाऊन ए ईंजिनीअर हाक माराल तर पन्नास मुंडकी मागे वळतील.. असो Happy

कोकणस्थ, अहो ते उदाहरण आहे, होते, त्यातील मुद्दा समजून घ्यायचा असतो. मूळ मुद्दा हा होता की आपण जर पब्लिक प्लेस मध्ये किंवा कॉमन पॅसेजमध्ये रांगोळी काढत असू तर तेवढा ओरडा करता येणार नाही जेवढे कोणी तुम्ही तुमच्या स्वताच्या खाजगी जागेत काढलेली रांगोळी पुसल्यास करू शकता. खास करून जसे एखादी जागा पार्किंग साठी राखीव असते तशी ती जागा आंघोळीसाठी राखीव नसताना.

खास करून जसे एखादी जागा पार्किंग साठी राखीव असते तशी ती जागा आंघोळीसाठी राखीव नसताना.>>>> पार्किंगच्या जागेत आंघोळ:अओ:

ऋन्मेष, महाकठिण आहे:P Proud Proud

Pages