मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईने नेमके तेव्हाच आंघोळीला उठ म्हणून हाक मारल्याने .. >>>>>>> इंजिनीयर माणसाला अजुन आईने आंघोळीची आठवण करुन द्यावी लागते Happy

तुम्ही ईंजिनीरींग चे विद्यार्थी आहात पण म्हणून पार्किंगच्या जागेत आंघोळ ???>> थ्री इडिय्ट्स इफेक्ट का?

तस्मात, सगळेच बातोंके भूत नसतात. काही लाथोंके भूत ही असतात आणि अशांना लाथा घातलेल्याच चांगल्या.>>>> आमेन.

तुमच्या पालकांना हा असला धागा मिळाला असता तर तुम्ही असे निपजला नसता.>>>>>>>: नाही आवडलं रिया! एखाद्याच्या आईवडिलांपर्यंत नाही जाऊ.

गालाला चिमटा काढला म्हणून मद्रास उच्च न्यायालयाने ५०,००० चा दंड ठोठावलाय. तस्मात खिशात पैसे ठेवून वरील आचरटी सल्ले आचरणात आणा. Happy
http://www.loksatta.com/desh-videsh-news/madras-hc-fines-school-teacher-...

रिया चिमटे नको काढु बर का त्या मुलीला, आणी अच्चु गुच्चु करुन तिचे गालगुच्चे पण घेऊ नकोस.:स्मित: शक्य असेल तर सगळ्या लहान मुलाना एकत्र करुन तिच्यावर बहिष्कार टाका. अनुल्लेखाने ती सुधारली तर बरे.

ओके रश्मी Proud
मी नाही घेत हो चिमटे
तसही तिच्या आईला एवढं डोकं आणि वेळ नाहीये म्हणे की आपली मुलगी काय करते ते बघत बसावं Wink

आता बाकीच्यांनी मारू नको वगैरे सल्ले बंद करा. मी आधी ऑलरेडी मी काय करणार आहे ते सांगितलं आहे
(rashmi, this is nt fr u Happy )

बहिष्कार टाका.
>>>
हा खूप जबरी सल्ला आहे रश्मी.

दोन उदाहरणे.

१) लहानपणी बिल्डींगमधील एक मुलगा त्यांची आर्थिक स्थिती चांगली असल्याने खेळाचे बरेचसे साहित्य त्याचे असल्याने त्य घमेंडीत वावरायचा. आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकलेला चांगला आठवडाभर, ऐन मे महिन्याच्या सुट्टीत तेव्हा भिंतीला बॉल आपटत एकटाच कॅच कॅच खेळायचा.. रडवेला झाला होता .. परत आत घेतला तेव्हा पार पोपटासारखा सरळ झाला होता..

२) कॉलेजला असतानाही एक मुलगा गरजेच्या वेळी (सबमिशन वगैरे वेळी) आमच्या ग्रूपमधील मुलांच्या जागी लाळघोटेपणा करत मुलींना मदत करायला पुढे पुढे करायचा तसे एकदा सर्वानुमते त्याला बहिष्कृत करून आमच्यात डबा खायला घ्यायचे बंद केलेले. अगदी महिन्याभराठी... एवढा मोठा घोडा, पण तो ही गयावया करू लागला होता तेव्हा पुन्हा आत घेतला.

कॉलेजला असतानाही एक मुलगा गरजेच्या वेळी (सबमिशन वगैरे वेळी) आमच्या ग्रूपमधील मुलांच्या जागी लाळघोटेपणा करत मुलींना मदत करायला पुढे पुढे करायचा >> ह्या वाक्यात काहि तरी जबरदस्त घोटाळा आहे भाऊ Happy

श्वान द्वेषानंतर आता मुले द्वेषाचे डोस सुरु झाले आहेत.
अशा खोड्या करणा-या मुलांचा मानसिक विकास थोडा कमी झालेला असतो, तो करण्यासाठी प्रयत्न केले तर उत्तम .
मूळ धागा मुलांबाबत आहे असा माझा समज आहे कृपया पालकांवर जाऊ नका .
पालकांच्या लाडामुळे मुले खोड्या जास्त करतात यात काही तथ्य नाही, ब-याचदा अशा मुलांच्या पालकांनी त्यांच्यासमोर आधीच हात जोडलेले असतात. शाळेतल्या खोड्या ह्या मास्तरांनीच निपटाव्या त्यात पालकांनी मध्यस्थी करु नये. अपवादात्मक घटना सोडल्या तर मुले काही काळानंतर पुन्हा एकमेकांत मिसळतात.
जरा आपणच मुलांकडे प्रेमाने पाहिले तर खूपसे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतातच
मस्जिद तो बहुत दूर है गालिब
चलो किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए.

बहिष्कराने काहीही फरक पडणार नाही फार तर मुलांमध्ये दोन गट तयार होतील . आणि त्याच्यात वाद चालू होतील.

पालकांच्या लाडामुळे मुले खोड्या जास्त करतात यात काही तथ्य नाही, ब-याचदा अशा मुलांच्या पालकांनी त्यांच्यासमोर आधीच हात जोडलेले असतात>>>>> किरणकुमार पालकानी लाड जरुर करावेत, पण चूक झाली असेल तर पाठिशी अजीबात घालु नये असे आमचे म्हणणे आहे.

शाळेतल्या खोड्या ह्या मास्तरांनीच निपटाव्या त्यात पालकांनी मध्यस्थी करु नये. अपवादात्मक घटना सोडल्या तर मुले काही काळानंतर पुन्हा एकमेकांत मिसळतात.>>>>>> हे पटले.

असामी, नंदिनी, काय घोटाळा आहे ? Uhoh
मित्रांपेक्षा जास्त भाव तो मुलींना द्यायचा यात का घोटाळा आहे?
आणि कॉलेजला असताना डबे आपण नेत नाही असे म्हणायचे आहे का? इथे सर्व कॉलेज कँटीनमध्ये खाणारे आहेत का? Uhoh

>>मित्रांपेक्षा जास्त भाव तो मुलींना द्यायचा यात का घोटाळा आहे?>> Uhoh
च्च! त्या वयात मुलगी पटवण्यासाठी भारतात मुलं सबमिशनला मदत वगैरे प्रकार करतात. ते स्वाभाविकही असते. इतर मित्र उलट फिल्डिंग लावायला मदत करतात. चिडचिड नाही करत. मुलगा मित्राच्या पुढे पुढे कशाला करेल? म्हणजे तसे असले तरी इतक्या उघडपणे नाही केले जात. Happy
अजुन एक म्हणजे कॉलेजला डबा घेऊन येणे हे सामान्य आहे पण डबा खायला ग्रूपमधे न घेणे वगैरे अगदी मिडलस्कूल टाइप पोरकट वाटले.

आमच्या ग्रूपमधील मुलांच्या जागी लाळघोटेपणा करत मुलींना मदत करायला पुढे पुढे करायचा>>>>>:फिदी: हे पूर्ण वाक्यच भारी आहे. लावा अर्थ त्याचा.

मला अजूनही नाही समजले त्या वाक्यात काय गैर आहे. किंवा आम्ही जे वागलो त्यात गैर काय आहे.

मुलींबद्दल आकर्षण असणे, त्यांना फॉलो करणे, आवडलेल्या मुलीला पटवायचे प्रयत्न करणे हे सारे मलाही लागू होते आणि मी सुद्धा यात मित्रांची मदत घेतली आहे. पण हे वेगळे झाले.

ऐन सबमिशनच्या वेळी मित्राची मदत करायचे सोडून एखाद्या भलत्याच मुलीला ती फक्त मुलगी आहे म्हणून लाळघोटेपणा करत मदत करायला जाणे आमच्या मते चूकच होते. म्हणून त्याला धडा शिकवायला त्याच्यावर बहिष्कार टाकला.

बाकी ज्यांना हि शिक्षा फुसकी वाटत असेल त्यांना एवढेच म्हणू इच्छितो की त्यांनी एकत्र धमाल करत डबा खाण्याचा अनुभव कॉलेज जीवनात कधी घेतलाच नसेल... कधीतरी या अनुभवावर नक्की एखादा लेख पाडेन च Happy

कधीतरी या अनुभवावर नक्की एखादा लेख पाडेन च >>>>>>> Lol
असामी ला हाणा! काय च्यामारी चाव्या मारतोय? ते लेख ल्हित सुटले ना राव? Proud

असामी ला हाणा! काय च्यामारी चाव्या मारतोय? <<< बुवा, असा एकदम टोकाचा उपाय नको! आधी समजावून बघा. ऐकेल तो. Proud

Pages