मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

>>> हुप्पाहुय्या | 29 October, 2014 - 00:19 नवीन

बेफिकीरांच्या होस्टाईल पोस्टी राग

नक्की आहात कुठले तुम्ही? >>
तुमचे वय काय हे मला माहीत नाही. >> कुठलेही का असेनात, किती का वयाचे असेनात एक पालक म्हणून विषयावर बोलायला निदान ते क्वालिफाईड तरी आहेत.
<<<

अ‍ॅबसोल्यूटली हुप्पाहुय्या!

Happy

हुप्पाहुय्या, या बाफावरच्या चर्चेत कुठेही भाग घेतला नसताना मध्येच तोंड घालतेय म्हणून माफ करा, पण वर तुम्ही फार बेक्कार पोस्ट लिहिलंत.

>>>रीयाविषयी ही शंका घेउ नका ती जर का संवेदनशील नसत्या तर या इथे त्यांनी मद्त मागितली असती का?. <<<
मी हे ज्यांना उद्देशुन लिहिले आहे .तिथपर्यंत प्रकाश पडला आहे.
बेफिकीर जी तुम्ही मात्र हे स्वताला लावुन घेतले असेल तर ठिक आहे .आता तुम्ही शब्दात पकडलं आहेच तर सांगते . रीया यांनी कोणतीही (शब्दशः )मद्त मागितली नाही .पण मी प्रामाणिक मद्त करतेय . जी काही लोक करतात ,काही नाही. माबो वर मद्त न मागता कोणिही आपणहुन मद्त करायची नाही असा रुल आहे का ? रीया यांना माझी मद्त हवी का नाही ते त्याच ठरवतील. तुम्ही मात्र माझ्या तुमच्यासाठी नसलेल्या वाक्याचा उल्लेख करुन एकतर माझ्या पोस्टिचं महत्व वाढवताय Happy किंवा मला त्या बदद्दल लिहायला लावुन मजा बघताय .ते मला नक्कीच कळत नाहीये.
एखाद्याने आपला प्रॉब्लेम सांगितल्यावर तो(विचार करुन )गंभीरपणे घेउन त्यास मद्त करणे मी इथल्याच जुन्याजाणत्या लोकांकडुन शिकलेय.तुम्ही सुद्धा तुमचा जर कुठ्ला प्रॉब्लेम येथे (माबोवर्)शेयर केला तर मी तुम्ही मद्त न मागताही मद्त करेन. Happy .

हुप्पाहुय्या, माझा फ्रेंड असामी म्हणतो आमलेट कसं असावं ह्यावर बोलण्याकरता अंडं द्यायची गरज नाही तसच मुलांविषयी बोलताना स्वतः पालक असण्याची काही गरज नाही. विचारांमध्ये कॉमन सेन्स असला तरी पुष्कळ होतं. पालक झाले म्हणून त्यांना मुलांविषयी बोलायची फार अक्कल असंही नसतं हे पण आपण जाणताच.

बेफि, तुम्हाला काय झालय फिल्मी स्टाईल पोस्टी वगैरे उडवायला? एरवी ह्यापेक्षा कित्येक साध्या विषयांवर तुम्ही तुम्ही रात्र रात्र, इंच इंच लढवता आणि तेही कुठलच दु:ख वगैरे न करता. येवढ्या पाचकळ पोस्टीला काय ते येवढं महत्व?

निषेध मान्य आहे, आणि झाली चूक कबूलही आहे त्याबद्दल मनापासून दिलगिरीही व्यक्त केलेली आहे आणि पुन्हा करीत आहे.
ईतरांचे वाभाडे काढतांना बेफिकिरांनी भान ठेवायला हवे होते.
मायबोलीवर येणार्‍या कुणाचीही कुठल्याही प्रकारची कुवत काढण्याचा अधिकार त्यांना, मला आणि ईतरांनाही कोणी दिलेला नाही. कुणाच्या बोलण्याने ज्या तीव्रतेचा जो मानसिक त्रास आपल्याला होतो तसाच तो ईतरांनाही होत असेल ह्याचा विचार लिहिण्यापूर्वी असू द्यावा.

आज रांगोळी पुसतीय ती मुलगी, उद्या घरात पेटते बोळे टाकेल. ह्या विकृत मनोवृत्तीला काही अंत नसतो.

तरी रांगोळी पुसणारी मुलगी आहे. हे विकृती असलेले मुलगे असतील तर पुढे रेप, गावगुंड पणा नक्कीच करणार.

त्यामुळे जर तुमच्यात मसल पॉवर असेल, १-२ दा सांगुन पण मुल ऐकत नसेल तर त्या मुलाच्या आणि त्याच्या बापाच्या पण कानाखाली हाणावी अगदी बहीरे झाले तरी चालतील. त्यांची ती अवस्था बघुन बाकीचे १० शहाणे होतील. अजुन जास्त मसल पॉवर असेल तर त्यांची ही विकृती पुढच्या पिढीत जावू शकणार नाही ह्याची सोय करावी.

______ /\_________ काय अचाट प्रतिसाद लिहु शकतात लोक. बापरे.

यात दुसर्‍याच्या मुलाच्या / मुलीच्या कानफाटात मारण्याची इच्छा व्यक्त केलेल्या किती लोकांच्यात हे गटस खरोखरच आहेत. आणि मुलांच्या दांडगाईवर असे कॉमेंट करणारे 'मोठ्यांच्या' दांडगाईवर नेमके काय करतात हे जाणुन घ्यायला नक्कि आवडेल. अगदी साधी उदाहरणे देतो, रस्त्यावर गाडी आडवी मारणे, पार्किंगमध्ये आडवी गाडी लावणे, गर्दीत धक्का बुक्कि करणे, इत्यादी इत्यादी. त्यांच्यावर हात उगारायचे सोडा, त्यांना त्यांची चुक दाखवुन देण्याचे तरी धाडस दाखवता का तुम्ही ?

मुलांना मारण्याची इच्छा होते कारण ते सॉफ्ट टारगेट आहेत. मोठ्यांच्या बाबतीत असे होत नाही. त्यातल्या त्यात मऊ व्यक्ती बघुन भडास काढुन होते नाहेतर मग इथे कि बोर्ड बडवुन.

बरं त्या मुलाला मारल्यावर तुमच्या मनात परत भीती आहेच कि तो तुमच्या माघारी काहितरी तुमचे नुकसान करेलच. म्हणजे तुम्हाला देखिल माहित आहे (मनातुन) कि हे करणे योग्य नाहिय.

हि फक्त आणि फक्त चिडचिड (उद्वेग्न्ता) आहे , जी इथे बाहेर येतेय. मला नाही वाटत कि वर लिहणारे ९९% लोक यातले प्रत्यक्ष आयुष्यात असला काही प्रकार करत असतील. पण जे लोक समजुतदार पणे लिहित आहेत त्यांची खिल्ली उडवण्यात मात्र कुठे कसुर ठेवत नाहित.

कुठल्याही गोष्टीची हद्द असते. त्या मुलांचा त्रास होतो , त्यांना सुधारणे गरजेचे आहे पण हेच पुढे जाउन गुंड होतील, रेप करतील असे कंक्लुजन काढणेतरी कुठे शहाणपणाचे आहे. आणि फटके देवुन त्यांना शहाणे करता येते हे कोणते लॉजिक आहे.? आणि त्यांना फटके द्यायचा अधिकार कुणी दिला तुम्हाला?
असे कुणी आहे का कि ज्याच्या गाडीवर रेघोट्या मारल्या , कुणी मारल्या हे दिसल्यावर पोलिसांत तक्रार दिली? प्रॉपर्टी डॅमेजची.

अवघडै....

अरेरे! अगदी हीन पोस्टी. वाईट वाटलं.
टोच्या, अतिरेकी पोस्टी टाकून भडक करू नका प्रसंग. एवढं काहीही आभाळ कोसळलेलं नाहीये.

मसल पॉवर वरुन एक डॉयलॉग आठवला. सत्या पिक्चरमधला. जेलमध्ये सत्या आणि भिकु म्हात्रे माराकरत असतात.
"मौका हरएक को मिलता है" .....

हुप्पाहुय्या प्रचंड निषेध. बेफिकीर यांचे वाभाडेच काढायचे होते उत्तर म्हणून तर इतर काहीही लिहीता आले असते तुम्हाला. पण हे? पुन्हा तीव्र निषेध.

काय लिहिले होते आणि काय झाले नक्की?

टोच्या यांचे विचार वाचून अश्या माणसांपासून लहान मुलांना कसे वाचवता येईल अशी चिंता निर्माण झाली.

काही दिवसांपूर्वी मी एफबी वर हे पोस्ट केलं होतं ज्यावर मला वेगवेगळे रिस्पॉन्सेस मिळाले.

kids of a lady friend (who claims to be my friend) of mine pinch and hit Abhidnya age 6, for no reason. they hae hit my son even in presence of their parents. and parents only say "अग / अरे मारतेस काय त्याला?"

her son age 12 has already broken abhidnya's umbrella while abhi was playing with it and this kid tried to snatch it from abhi and since abhi did not give it to him he hit abhi with umbrella.

abhi all the time reacts in one simple manner - he tells, I can also hit you but i dont. have already told her husband and herself to keep the kids away from abhidnya, still one day abhidnya spoke to daughter, age 4 and she hit abhidnya again. every time these kids hit abhidnya he goes n complains to the kids parents.

mother scolds(??) the kids in front of us. "का केलस तू असं, असं करू नकोस. किती वेळा सांगितलय मी?" आणि वर मलाच सांगते "बघ नाग एइकत नाहीत दोघं माझं. तूच दम दे त्यांना."

have told her kids in front of her, 'in case u hit my son again he is going to hit u back n if he does not hit you i will come to your house n in front of ur parents i will slap u hard. N still if u do it again i will lodge police complain.' the lady kept quiet

त्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवशीची गोष्ट

the daughter again hit abhidnya and also held him at his throat. this time abhidnya has hit the girl back. I too have scolded the girl and told her whatever you do to my son I will do the same thing to you.

ह्या सगळ्या घटना पाहाणार्‍या सगळ्यांना मी पहिला प्रश्न विचारला होता की माझ्या मुलाने ह्या दोघांपैकी एकाचीही खोडी काढली होती का? तर सगळ्यांच एकच उत्तर, इतका शहाणा समजूतदार मुलगा आहे तुझा तू असा प्रश्न विचारूच कसा शकतेस.

ह्या परिस्थितीत मी काय करावं. त्या मुलांना समजावणं, ते असे का वागतात हे समजून घेणं हे करून झालय. ही दोन भावंड घरातही खूप मारामारी करतात. एकमेकांना बोचकारतात. एकदा आमच्या सोबत फिरायला आले होते तेव्हा पूर्ण सहा तास त्या दोन्ही मुलांचं हेच चालू होतं. त्यांना बसायला जागा कमी पडत होती म्हणून ते अभिज्ञला चिमटे काढत होते. ह्याबद्दल एकदा त्यांना रागवावं लागलं एकदा तर गाडी बाजूला उभी करून उतरा दोघं खाली. तुम्हाला इथेच सोडून जाणार असं सांगितलं तेव्हा अभिज्ञला त्रास देणं बंद केलं त्यांनी. तेव्हापासून आम्ही कानाला खडा लावला पुन्हा ह्यांना सोबत न्यायचं नाही. एकाच सोसायटीत राहात असल्याने पूर्णपणे टाळूही शकत नाही त्यांना.

टोचा यांचा प्रतिसाद मुद्दाम तेल टाकणारा असावा.
एवढे टोकाचे प्रामाणिक मत कोणाचे नसावे, नसते शक्यतो. Happy

याउपर वर घडलेला वैयक्तिक टिकेचा प्रकार खरेच फारच वैयक्तिक आणि दुर्दैवी. त्याचे कुठलेही समर्थन नाही होऊ शकत. माझ्यातर्फेही निषेध!

एकाच सोसायटीत राहात असल्याने पूर्णपणे टाळूही शकत नाही त्यांना.
>>>>>>>
माझ्यामते हे पुर्णपणे टाळू शकता. तुम्ही त्यांना आपल्या घरी यायला अडवू शकता, तसेच बाहेरही आपल्या मुलाने त्यांच्यात खेळू नये वा त्यांच्या घरी जाऊ नये असे करू शकता. याउपर त्यांच्याही पालकांना सांगू शकता की तुम्हीही आपल्या पोरांना माझ्या अभिपासून दूरच ठेवा. संदर्भादाखल असे प्रकार वारंवार घडत आहेतच.
प्रश्न इथे हा आहे की अश्या बाबतीत समोरच्या पालकांनी हे समजूतदारपणे नाही घेतले तर मोठ्यांचे रिलेशन खराब होतात. अर्थात ते जपणे यापेक्षा गरजेचे आहे का हे आपल्यालाच ठरवायचे आहे.
याउपर हे ठराविक वय आहे. ४ वर्षांनी परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता आहेच.

याउपर वर घडलेला वैयक्तिक टिकेचा प्रकार खरेच फारच वैयक्तिक आणि दुर्दैवी. त्याचे कुठलेही समर्थन नाही होऊ शकत. माझ्यातर्फेही निषेध!>>>>

@क्रुन्मेश ( तू तुझे नाव बदल बाबा, मला काही ते लिहीता येत नाही. नाहीतर मी लिहीतोय ते चालवून घे )

हे वरील वाक्य माझ्या साठी आहे का? मी कुठलीही वैयक्तीक टीका केली नाही. केली असल्यास माफी असावी.

<<<<<टोचा यांचा प्रतिसाद मुद्दाम तेल टाकणारा असावा.>>>>>>>

मुद्दामच हार्श लिहीला होता प्रतिसाद. आणि अगदी टोकाची मते नसली तरी त्याच्या ३०% तरी आहेत माझी मते.
गेली काही वर्षे गुन्हेगारांचे हक्क, त्यांचे मन समजवून घेणे वगैरे प्रचंड वाढले आहे. ते सर्व प्रयत्न victim ला मदत करण्यासाठी केले पाहीजे. Victim ला पण वाटले पाहीजे की न्याय झाला आहे. नाहीतर चांगले वागणार्‍यांना आपण मूर्ख बनवलो गेलो आहे असे वाटायला लागते.

बरचं काही झालंय आणि हे नेहमीचं आहे त्यामुळे मी वाचलेलं नाही.
आज दुपारी मिटिंगमधे माझ्या आई बाबांनी हा मुद्दा मांडला आणि तिच्या आईला सांगितलं की तुम्ही फक्त तिला एकदा प्रेमाने आणि नाहीच ऐकलं तर जराशा धाकाने हे समजावून सांगा की ताई खुप कष्ट घेऊन रांगोळी काढते. तुला ती पुसायला एक मिनिट लागतो तेंव्हा असं नको करूस.
त्यावर त्यामुलीच्या आईने सांगितले की आमची मुलगी मुद्दाम करत नाही. रस्त्याने जाताना लागत असेल पाय (माझ्या रांगोळीची जागा आणि आमच्या पायर्‍या यांमधे किमान ४ मोठ्याल्या फरश्या एवढं अंतर आहे + रांगोळी प्रचंड कोपर्‍यात वगैरे असते + बोटाने पुसलेली रांगोळी, जिथे गोल आह्त तिथे बोटाने उमटवलेले गोल, रेषा , सहज कळते तर ते असो) आणि पुसली जात असेल रांगोळी. मी तिला काहीही बोलणार नाहीये. तुमच्या घरातल्या रांगोळ्या सांभाळत बसाव्यात इतका वेळ माझ्याकडे नाही तेंव्हा तुम्ही रांगोळी काढणं बंद करा.
आणि वरून वस्तू खाली फेकण्याबाब्त - लहान आहे ती. चुकून फेकत असेल वस्तू, तुमच्य अमुलांना सांगा बिल्डिंगभोवती खेळू नका Uhoh
मनीला मारण्याबाबत - मग तीने चोंबडेपणा कशाला करायचा? आमच्या सोनूला अशा चोंबड्या मुली अजिबात आवडत नाहीत. म्हणून मारलं तिने हिला. आणि एवढं काही ताप बिप येण्या एवढं मारलेलं नाहीये. माझी मुलगी आहे ती. तिचा हात किती लागतो ते आम्हाला माहीत आहे. उगाच खोटे नाटे आरोप करू नका माझ्या मुलीवर

असा स्टॅण्ड घेतलेला आहे.
मिटींग संपल्यावर सगळे आपल्या आपल्या घरी गेले तेंव्हा ही सोनू येऊन आमच्या घरावर थुंकून गेली Uhoh
मी तिला पकडे पर्यंत मला जिभ दाखवत पळून गेली.
आता मी तिला फटके देऊ नये हा सल्ला मला कोणीच देऊ नका प्लिज Happy
मी आता तिला २ रट्टे देणारच आहे. तिला दहशत बसायलाच हवी.
अर्थातच मला लहान बहिणीला सांभाळायचा अनुभव आहे. तिला 'इजा' होऊ नये इतकी काळजी मी घेईनच पण आपण काहीही करून सुटू शकतो हे तिच्या डोक्यातून जायला हवं.
तिच्या आईचं काय करायचं ते बघते.

आमच्या गाडीचं नुकसान करणार्‍या त्या नालायक मुलाने सोसायटीतल्या एका काकांच्या घराची काच मुद्दाम दगड मारून फोडली. त्याच्या दुर्दैवाने तो हे करत असताना रंगेहाथ पकडला गेला आणि त्या काकांनी भर सोसायटीत त्याला चांगलंच चोपून काढलं. हे सगळं होत असताना त्याच्या आईने मधे न पडता नुकसान भरपायीची तयारी दाखवली. पण त्या काकांनी पैसे घेतले नाहीत. त्या मुलाला धडा शिकवणं एवढंच त्यांचा उद्देश होता.
आता त्या मुलाला काकांचा चांगलाच धाक बसलाय. गपचूप खाली मान घालून येतो आणि जातो.
आता बघुयात पुढे काय होतंय. पण त्याला याची गरजच होती. त्याची आई सांगत होती की त्याचे वडील अंगकाठीने बारीक आहेत. त्यांन हा आवरत नाही. एकदिवशी या मुलाने आईवरही हात उचलला होता Uhoh त्यामुळे जे झालं ते बरचं झालं असं त्याच्या घरच्यांचं पण मत आहे.

तस्मात, सगळेच बातोंके भूत नसतात. काही लाथोंके भूत ही असतात आणि अशांना लाथा घातलेल्याच चांगल्या.

वर इब्लिस यांनी जे उदाहरण दिले आहे, ८-९ वीतील हिरो-हिरोइन , ट्राफिक सिग्नल पोलिस मामा वगैरे त्यामध्ये पोलिसमामा ज्या पद्धतीने वागले त्याला आपला फुल सपोर्ट आहे. काहीही न बोलता ४-५ खाड- खांड मुस्काटात. जे लोक कोवळ वय, मानवाधिकार वगैरे विचार करतात त्यांनी पोलिसांवरचा ताण, या कार्ट्यांनी पुढे एखादा मोठा अपघात केला असता तर? तसेच त्यांचे जबाबदार पालक असल्या विषयावर आधी विचार करावा.
.
मुलं व्हायोलंट/अँटीसोशल होतात, ठीकेय. त्यांना व्हायोलन्स/अँटीसोशल अ‍ॅक्शन्स करू द्या. त्यांचं काउन्सेलिंग करू या आपण.

तुम्हालाही कधीतरी व्हायोलंट होऊन अशा मुलांच्या कानाखाली काढावीशी वाटते. बिन्धास्त काढा कानाखाली. मग आपण तुमचंही काउन्सेलिंग करू. स्मित +१

बेफिकीर यांचे वाभाडेच काढायचे होते उत्तर म्हणून तर इतर काहीही लिहीता आले असते तुम्हाला. पण हे? पुन्हा तीव्र निषेध. +१

बेफिकीर यांना या धाग्यावर लिहायची गरज आहे की नाही ते माहीत नाही पण हुप्पाहुय्या तुम्ही नक्कीच हा बीबी फॉलो करा.
तुमच्या पालकांना हा असला धागा मिळाला असता तर तुम्ही असे निपजला नसता.
किमान तुमची मुलं तुमच्यासारखी होऊ नयेत म्हणून तुम्ही इथल्या टिप्स फॉलो कराच हं!

बेफिकीर यांचे वाभाडेच काढायचे होते उत्तर म्हणून तर इतर काहीही लिहीता आले असते तुम्हाला. पण हे? पुन्हा तीव्र निषेध. +१>>>>>>>>>>>>>>

अरे असे काय लिहीले आणि कोणी लिहीले? मी तर बेफींबद्दल काय कोणालाच काही लिहीले नाही.

Pages