मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच बातोंके भूत नसतात. काही लाथोंके भूत ही असतात आणि अशांना लाथा घातलेल्याच चांगल्या>>>

@रीया +१११११११११११११११

फक्त जरा जपून, त्या मुलीचे आई वडील पण गुन्हेगारी वृत्तीचे असणार.
त्या मुला पासुन तर फार सावध रहा. आत्ता लहान आहे, पण ५-६ वर्षात ९० कीलोचा गुंड होईल.

तुमची कनेक्शन असतील जिथे पाहीजे तिथे तर मग विचार करु नका, चांगले चोपुन काढा. आई वडलांना जास्त चोप.

आता जगाच्या अंता पर्यंत जाऊन आपण इतरांच्या मुलांना धोपटणं कसं योग्य आहे ते सांगणं आलच.
ते वर पाटीलांनी लिहिलय तेच खरय, मुलं सॉफ्ट टारगेट असतात. ह्या वर दिलेल्या सो कॉल्ड दांडग्या मुलाचा बाप टग्या (आयडी नाही) असता तर तुमच्या त्या दीडशहाण्या काकांची काय हिंमत झाली असती त्या पोराला हात लावायची?
ते बडी मछली छोटी मछली को खा जाती है हाच रुल चालतो भारतात. सध्य परिस्थितीत ज्याचं वर्चस्व आहे तो लगेच हाथ धुवून घेतो.

हुप्पाहुय्या यानी काय लिहीले देव जाणे.

पण रिया तू म्हणतेस ते खरे आहे, काही वेळेस लातोके बुत बातोसे नही मानते. तरी एकदा तिचा ( त्या लहान मुलीचा) फालतुपणा तिच्या नकळत मोबाईलमध्ये शुट करुन ठेव ( तुला वेळ असल्यास जमत असेल तरच) कारण काही लोक बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा कॅटेगरीमधले असतात. हे लोक कधीच सुधरत नाहीत.

मनीला मारण्याबाबत - मग तीने चोंबडेपणा कशाला करायचा? आमच्या सोनूला अशा चोंबड्या मुली अजिबात आवडत नाहीत. म्हणून मारलं तिने हिला. आणि एवढं काही ताप बिप येण्या एवढं मारलेलं नाहीये. माझी मुलगी आहे ती. तिचा हात किती लागतो ते आम्हाला माहीत आहे. उगाच खोटे नाटे आरोप करू नका माझ्या मुलीवर

असा स्टॅण्ड घेतलेला आहे.>>>>> असे असेल तर ती माता धन्य आहे. मोठेपणी ही मुलगी तशीच राहिली तर कठीन आहे. कारण बुमरॅन्ग उलटायला वेळ लागत नाही. आईला पश्चाताप करण्याची वेळ येईल हे नक्की.

इतर अडल्ट्स विषयी नसली तरी मुलांकरता कंपॅशन असायला काय हरकत आहे? आपली मुलं असं वागत नाहीत किंवा आपण असं वागणारी मुलं कधीच पाहिली नसतील म्हणून लगेच ह्या मुलांवर इतकं हार्श व्हायची काय गरज आहे?
आणि राग आला तरी इतरांच्या मुलांना आपण शिस्त लावायला बघणं हे आपलं कामच नाहीये हेच सरवात आधी लक्षात घ्यायला पाहिजे. बस्के नी आधीच हे लिहिलय वाटतं.
स्वतःला त्या मुलांच्या, त्यांच्या आई वडिलांच्या जागी टाकून बघायला काय हरकत आहे? कोणाच्या जीवाला काही धोका पोहोचत नसेल तर मुलांनी केलेल्या खोड्या इतक्या सिरियसली घ्यायची काय गरज आहे?
आम्ही लहान असताना क्रिकेट खेळायचो आमच्या बिल्डींग मध्ये तेव्हा असेच काही अति शहाणे लोकं होते. त्यांच्या गॅरीत वगैरे बॉल गेला की तो बॉल विळीवर कापून वगैरे टाकायचे! काय मेंटलपणा होता!

लक्ष्मी पुजनानिमित्त मी दारासमोर रांगोळीत लक्ष्मी काढलेली. ती काढायला मला ४ तास लागले अरेरे
२ तासात येऊन पहाते तर रांगोळी पुसलेली. शेजारी रहाणार्‍या एका छोट्या मुलीने (मनीने) सांगितलं की 'त्या' मुलीनेच पुसली रांगोळी आणि तिने ते पाहीलं म्हणून आम्हाला कळालं. आता आम्ही त्या मुलीला पकडलं आणि विचारलं तूच पुसलीस ना? मनीने सांगितलंय आम्हाला. त्यावर ते एहो म्हणाली. आम्ही सगळे (शेजार पाजारचे मिळून) तिच्या आईकडे गेलो. इतके लोकं एकत्र बघुन तिची आई गडबडली आणि तिने आमच्या समोर या कार्टीला विचारलं तू रांगोळी पुसलीस का तर सरळ या मुलीने पलटी मारली आणि नाही म्हणाली. मग तिच्या आईने आम्हाला हकलून दिलं.
काल मनीच्या आईने सांगितलं की हिने मनीला भयंकर मारलं आणि ओचकारलंय. त्यामुळे मनी इतकी गांगरलीये की ती आजारीच पडलीये अरेरे>>>>>.... प्रश्न इथे नुसताच रान्गोळीचा नाहीये. तर ज्या मुलीने रान्गोळी पुसली, ती तीच आहे हे त्या मनीने सान्गीतले म्हणून या रान्गोळी पुसलेल्या मुलीने मनीला मारले हे वरच्या वाक्यात अधोरेखीत केले आहे. आणी हेच धोकादायक दिसतेय. एक लहान मुलगी, तिचा खोटेपणा दुसरी लहान मुलगी सिद्ध करते, म्हणून त्या मुलीला बेदम मारते हे काळजीचे नाही? आणी वर त्या मुलीची आई तिचा खोटेपना लपवते हे काळजीचे नाही?. एका सोसायटीत राहुन दुसर्याची पर्वा न करणे हे पण काळजीचे नाही?

कोणाच्या जीवाला काही धोका पोहोचत नसेल तर मुलांनी केलेल्या खोड्या इतक्या सिरियसली घ्यायची काय गरज आहे?>>>>>
१० महिन्याच्या बाळाला बेड वरुन खाली ढकलणे. चेहर्‍यावरच्या ओचकार्‍यांचा फोटो तुम्ही बघितलाच आहे. चुकुन डोळ्यात बोट गेले असते तर. दगड मारुन काच फोडणे. ह्यांना तुम्ही "खोड्या" म्हणता?
ही विकृती आहे.

आणि जर खोड्याच करायच्या असतील तर स्वताच्या घरात करायच्या.

असे चुकुन मी किंवा माझ्या आजुबाजुच्य कोणीही मुलांनी केले असते ३० वर्षा पूर्वी तर आईनी फोडुन काढले असते.

माणूस सुखवस्तू झाला . त्याला जीवनात कसलाही ( सामाजिक , आर्थिक, भावनिक ) त्रास नसला कि तो असा compassionate होतो. त्यांना सोडून द्या.

टोचा, अजून भरपूर शिकायचं आहे मग तुम्हाला. १० महिन्याच्या बाळाला एखाद्या मोठ्या मुलानी ढकलावं अशी वेळच आई वडिलांनी येऊ देता कामा नये. ती जबाबदारी आई-वडिलांची असते.
जिथे अवॉईड करताच येत नसेल अशा परिस्थितीत जर तुमच्या मुलाला किंवा तुम्हा स्वतःला इजा झाली असेल तरीही योग्य मार्गानेच कारवाई(?) करायला हवी. लगेच तुम्हाला समोरच्याला धोपटायला परवानगी मिळाली हा तुमचा गैरसमज आहे.
सहसा कंटोल नसल्यासारखी वागणार्‍या मुलांना मदतीची काऊन्सिलिंगची गरज असते. परत एकदा, आपण लहान असताना कधी तसं केलं नसतं ह्याला काही अर्थ नाही.
थोडं वेगळं आणि दुरचा संबंध असलेलं उदाहरण म्हणजे लर्निंग डिसॉर्डर असलेली मुलं. इतर मुलांसारख्या त्यांना चटकन गोष्टी आत्मसात करता येत नाहीत म्हणून कित्येक मुलं पुर्वी आई वडिलांच्या प्रचंड प्रेशर खाली वावरायची. त्यांना सतत घरात, शाळेत सतत बोलणी खावी लागायची ती पण त्यांची काहीच चूक नसताना.
सरतेशेवटी नेहमी उपयोगाला येते ती स्वतःला दुसर्‍याच्या जागी टाकून पाहायची सवय. तुमची अंग काठी बारिक असती आणि तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला झोडपून निगरगट्ट बनवलेलं नसतं आणि तुमच्या पोटी जर असं मूल जन्माला आलं असतं तर काय केलं असतं?
आपल्याला आलेले अनुभव हे वैश्विक सत्य आहेत ह्या आविर्भावात राहून काही उपयोग नाही.

रीया जी,
एक उपाय सुचवतो पहा पटतोय का आणि जमेल का करायला.

त्या मुलीला आणि खासकरुन तिच्या आइला सांगा कि मी घराबाहेर क्यमेरा बसवलाय अन आता समजेल कि कोण काय करतय ते...

तुमच्या घराबाहेर एक विडिओ क्यम सारखे मोडेल आणुन बसवा.... नकली.... पण वायर वगैरे डिटेल्स ची काळजी घ्या...

त्याने जर तिचि आई जरा घबरली तर ती तिच्या मुलीला नक्की सांगेल कि अता नको काही करु

महाभारत घडून झाले या धाग्यावर .............. आता वाचून झाले सर्व प्रतिसाद

साधारण ४-१० वर्षे वयाच्या मुलांच्या खोड्या त्रासदायक असल्या तरी त्याने मनाला लावून घेवू नये ( अपवादात्मक कंपास खूपसणे वगैरे असे झाल्यास तसेच कंपास त्याच्या हातावर चटका द्यावा कुणाचीही वाट न पाहता) पण इतर जसे बेल वाजवून पळून जाणे, रांगोळी पुसणे या बाबी तेव्ढ्या सिरिअस नाहीत.

बरीच मुले काही काळ दांडगाईने वागतात त्यात सौम्य शिक्षा किंवा समजूतीने त्यांचा हिसकपणा कमी होतो. पण मोठ्या शिक्षेने बालमनावर फार आघात होतात आणि किरकोळ गोष्टीला वेगळेच वळण लागते.

ही एक छोटी घटना माझ्याच बाबतीत घडलेली
९ वीत असताना एका ऑफ पिरीएडला आमच्या एका मास्तरने मला किरकोळ कारणासाठी छ्डीने जोर् जोरात फटके दिले .एखाद्या जनावराला मारावे असे निष्ठूर होऊन . माझ्यासारखा रांगडा माणूस अक्षरशा: बोंबलून रडत होता. काही तासाने शाळा सुटल्यानंतर ही गोष्ट मी घरी सांगण्याऐवजी माझ्या मित्रांना सांगितली त्यातून मास्तरला गाठून धडा शिकविण्याचा बेत आखला गेला, ३ दिवसानंतर शनिवारी शाळेतून परतणा-या मास्तरला आम्ही ६ मित्रांनी रस्त्यात अडवले आणि निब्बार मार दिला . इतका कि तो मास्तर ३० दिवस चालू शकला नव्हता. यानंतर बरेच काही घडू शकले असते माझ्या करिअरची वाट लागली असती. जे मित्र माझ्याबरोबर होते ते सगळेच हुशार म्हणून ओळखले जात होते. माझ्यामुळे तेही अडचणीत सापडले, पण माझ्या पालकांनी त्यांचे वजन वापरुन आणि विनंत्या करुन करुन हे प्रकरण मिटवले. मात्र तिथे जर शाळेतून काढले असते तर काय झाले असते ते महित नाही.
त्यानंतर मी कधी मास्तरवर हात उगारला नाही आणि त्या मास्तरने कोंणावरच हात उगारला नाही. पण या घटनेचे मूळ कारण सौम्य शिक्षा करण्याऐवजी मोठी शिक्षा हेच होते असे मनोमन वाटते.

रिया, कोकणस्थ आणि ईतर, जे नक्की काय झालं होतं ह्याची आजिबात माहिती नसतांनाही मॉब लिंचिंग च्या आवेशात माझ्या पोस्टवर तुटून पडत आहेत त्यांना एवढंच सांगते की ऊत्तर किंवा स्पष्टीकरण देण्याची गरज नसतांनाही किंवा ते देऊनही आता काही ऊपयोग नाही हे माहित असुनही हा जो काही 'हीन' वगैरे आरोप होतो आहे त्यासाठी.

बेफिकिरांनी सोयीस्करपणे स्वतःच्या पोष्टी ज्यांमध्ये त्यांनी कुणाचीतरी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक ऊणीदुणी काढली होती, ऊडवून माझी एक आऊट ऑफ काँटेक्स्ट पोस्ट मात्र तेवढी कॉपी करून ठेवली? कशासाठी? काय हेतू आहे नक्की असे करण्याचा?

वय, देश, शिकवण ई.चा दाखला देऊन तुम्ही ह्या धाग्यावर लिहिण्यास लायक नाहीत हे कुण्या एका आयडीला बेफिकीर सांगत होते. दुसर्‍या एका आयडीने त्यांच्या पोस्टी प्रोवोकेटिव आहेत असे कोट केले. माझ्या पोष्टीत मी वय, देश, शिकवण यापेक्षाही त्यांच पालक असणं त्यांना विषयावर अधिकारवाणीने बोलण्यास पुरेसं आहे असं म्हणाले आणि ह्यानंतर सुरू झाला विपर्यासाचा खेळ.
बेफिकिरांच्या स्वतःच्या पोष्टी ऊडवणे आणि अनपेक्षित निषेधाच्या पोष्टी यामागचा ऊलगडा एका मायबोलीकरीण मैत्रीणीने मॅसेज पाठवून माझ्या पोष्टीचा नेमका काय अर्थ घेतला जातो आहे हे सांगितल्यावर झाला. मी लगोलग माझी पोस्ट संपादित करून झाल्या चुकीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. पण बेफिकीरांना कदाचित माझी पोस्टीतून संभ्रम पसरवणे जरुर वाटत असेल म्हणून ती त्यांनी कॉपी करून ठेवली.

मी बेफिकीरांना ओळखत नाही आणि मला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही आणि कुणाचीही माहिती जाणुन घेण्याची ईच्छाही नाही. त्यांच्या ईतरांना लिहिलेल्या होस्टाईल पोश्टी मला आवडत नाही. ह्या आधीही मी त्यांच्या आणि ईतरांच्या अश्या (फक्त अश्याच) पोस्टींचे खंडन केले आहे आणि ईथून पुढेही करत राहीन.

हा मुद्दा माझ्यासाठी संपलेला आहे आणि ईतरांनीही तो लावून धरू नये ही विनंती. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्ते करीत आहे. अपेक्षित नसलेला अर्थ घेतला गेल्याने मानसिक त्रास झालाच आहे पण आपण अनपेक्षितपणे कुणाला दु:ख दिले ह्या जाणीवेने यातनाही झाल्या. बेफिकिरांसहित कुणालाही दुखावण्याचा ईरादा नव्हता हे तहे दिलसे पुन्हा सांगते.

अव्यक्त मी ची आयडिया मस्त आहे. ट्राय करून पाहायला हरकत नाही. पण त्या मुलीने मनीला मारले बोचकारले असेल ज्यामुळे मनी आजारी पडली त्यासाठी मनीच्या पालकांनी पोलिसांकडे जायलाच हवे, त्रास देणार्‍या मुलीला स्वतः फटकावण्यापेक्षा हा उपाय बरा.

त्या मुलीला आणि खासकरुन तिच्या आइला सांगा कि मी घराबाहेर क्यमेरा बसवलाय अन आता समजेल कि कोण काय करतय ते...
>>>
हे केलंय Happy म्हणजे असा कॅमेरा बसवलाय वगैरे सांगितलं नाही पण मनीने या मुलीला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि आधीही आम्ही तिला रंगेहाथ (शब्दशः Wink ) पकडलेलं.
त्याचाच परिणाम म्हणुन तिच्या आईने आता त्यांची मुलगी रांगोळी पुसते हे माय केलंय पण त्यांना आमच्या रांगोळ्या सांभाळत बसायला वेळ नाही आणि म्हणू आम्ही रांगोळी काढू नये असं सुचवलंय Happy

मला खरच बस्के, वैद्यबुवा (आत्ता पटकन हिच नावं आठवली पण हे सगळ्यांसाठीच) यांच्यासारख्या मुलांना मारू नये असं सांगणार्‍या लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतोय -
तुम्ही ज्या सराऊंडींगमधे रहाताय तिथे तुमच्या मुलांना कोणीतरी फिजिकली हर्ट केलं तर त्यांना प्रोटेक्शन देईल असे कायदे आहेत त्यामुळे तुम्ही आणि तुमची मुलं काही अर्थी सेफ आहेत किंवा अशा दांडग्या मुलांचे पालक किमान घाबरून आहेत आणि मुलांना कंट्रोल मधे ठेवण्याचा प्रयत्न करतात.
पण जर तुमच्या अजुबाजुला 'आमच्या मुलाची चूकच नाही, आमची मुलं अशीच वागणार, तुमची मुलं खोटं बोलत असतील' असा स्टॅण्ड घेणारी लोकं असतील तर? तुमच्या मुलांना ते फिजिकली हर्ट करूनच्या करून त्याचं चुकलंच नाही, तुमच्याच मुलाने चूक केली वगैरे सांगितलं आणि त्यांच्या मुलाला अजिबातच न समजावता त्याने तुमच्या मुलाला असच हर्ट करणं सुरू ठेवलं किंवा तुमच्या आर्थिक मालमत्तेचं नुकसान करणं सूरू ठेवलं तर तुम्ही काय कराल?

लक्षात घ्या -
१) तुम्हाला कायद्याची मदत मिळणार नाहीये
२) त्या मुलाचे पालक काहीही करायला तयार नाही आहेत
३) तुमच्या मुलाला फिजिकली हर्ट होतंय किंवा तुमच्या मालमत्तेचं (आर्थिक) नुकसान होतंय

रीया,
दुसर्‍याच्या मुलाला मारणे हे चुकच. ते कायद्याला धरुनही नाही.
भारतात कायद्याची मदत मिळणारच नाही हे जे गृहित धरले जाते ते काही प्रमाणात बरोबर आहे पण नेहमीच नाही. सोसायटीतच्या अधिकार्‍यांकडे तक्रार करावीच पण मालमत्ता नुकसान, शारीरिक इजा झाल्यास पोलीसात तक्रारही करावी. त्यासाठी फोटो, रेकॉर्डिंग वगैरे बरोबर न्यावे. पोलीस नुसते समज द्यायला आले तरी बहुतेक पालक नसता त्रास नको म्हणून पोरांना झटपट योग्य वळण लावतात आणि नुकसान भरपाईही करतात.

बाकी रांगोळी पुसणे याला पर्याय आहे. घरात बोर्डवर रांगोळी काढायची. त्याचे फोटो नोटिसबोर्डवर लोकांना बघायला लावायचे. सध्या त्या मुलीसाठी तू रांगोळी काढणे, तिने पुसणे, चहाडी केलेल्या मुलीला मारणे हा पॉवर गेम झालाय. तुमच्या रिअ‍ॅक्शनने ती अधिकच उचापती करतेय. अशावेळी अनुल्लेख करणे चांगले.

बुवांना अनुमोदन. स्वाती२ +१.

माफ करा, कायद्याची _काहीही_ मदत मिळणार नाही, हे हायपोथेटीकल आहे. अशी परिस्थिती खरचं आहे का तुमच्या सिच्युएशन मध्ये? मिटिंगमध्ये त्या बाई आल्या/ त्यांनी उत्तरं दिली म्हणजे परिस्थिती बदलायला जागा आहे.
तुम्ही त्यांच्या खिडकीची काच फोडली आणि मग त्यांनी तुमची विंड-शिल्ड आणि तुम्ही पायातपाय घालून त्यांना पाडलतं आणि त्यांनी.... गुंडाला बोलवून तुम्हाला सरळ केलं ... तुमची समजा गुंडांपर्यंत पोहोच नाही आणि कायद्याची मदत तुम्हीच म्हणता नाही.... वाण्याकडून २ किलो मूग आणणे या व्यतिरिक्त काय कराल? (संपादित, धन्यवाद नीधप)

स्वाती२, अमितव + १

त्या मुलीला फटका मारणे हा नक्कीच पर्याय नाही. पुन्हा कधी तिने असं तुझ्यापुढ्यात केलं तर तिचे दोन्ही हात घट्ट धरून ठेव, पण तिला तुला चावू देऊ नकोस. आणि पुसलेल्या रांगोळीचे रंग तिच्याच तोंदाला फास. आणि सांग पुढच्या वेळी असं केलस तर बीट आणि हळदीचे रंग लावेन तुला शाळेत जाताना. धमकी देणे महत्त्वाचे. तसे केलेच पाहिजे असे नाही. किंवा शाळेत जाऊन तक्रा॑र करायची धमकी दे. धमकी. म्हणजे तुला माहित आहे तू असे करणार नाहीस पण तिला भीती वाटली पाहिजे.

आपण वेळ काढायलाच हवा. आणि जर सध्या वेळ काढणे शक्य नसेल तर मग मुद्दा बाजूला ठेवणेच श्रेयस्कर. पुरावे गोळा करत राहायचे आणि मनीसारख्या मुलीचे नाव मध्ये येणार नाही हे पाहायचे.

आपण फक्त त्या रांगोळी पुसणार्‍या मुलीबद्दलच बोलतोय. त्या दुसर्‍या पुंड मुलाबद्दल बोलतच नाही आहोत. का? तसेच त्या पुंड मुलाचे. कॅमेरातून घेतलेले फोटो पोलिस स्टेशन आणी शाळेत नेऊन देईन असं सांग. पुन्हा धमकी. पण ही खूप महत्वाचे काम करते.

पालकांनी किंवा मोठ्यांनी मारणे हा पर्याय सिच्युएशन खरच हाताबाहेर जाताना वापरायला हवा. जसे की तो पुंड मुलगा आर्थिक नुकसान करतो आहे. पण तिथेही स्वतः मारण्याआधी पोलिसात त्याची कम्प्लेंट करणे आणि त्याला चक्क वाळीत टाकणे हा पर्यात मला अधिक योग्य वाटतो.

माफ करा, कायद्याची _काहीही_ मदत मिळणार नाही, हे हायपोथेटीकल आहे. अशी परिस्थिती खरचं आहे का तुमच्या सिच्युएशन मध्ये? मिटिंगमध्ये त्या बाई आल्या/ त्यांनी उत्तरं दिली म्हणजे परिस्थिती बदलायला जागा आहे.
>>>
अर्थातच आहे Uhoh
आम्ही 'एक लहान मुलगी आमची रांगोळी पुसतेय, आमच्या लहान मुलीला एक लहान मुलगी मारतेय ' हे घेऊन पोलीस स्टेशन मधे जाऊ शकत नाहीच Uhoh गेलो तर पोलीस हकलूनच देतील Uhoh
तुम्हाला खरच भारतातील ही परिस्थीती माहीत नाहीये का?

स्वाती, मला नाही वाटत की इथे अजुनही 'एका लहान मुलीने दुसर्‍या लहान मुलींना मारणे आणि त्यामुळे त्या लहान मुलीने घाबरणे' हा गुन्हा मानला जात असावा.

मुळात आमच्या सोसायटीचे अधिकारी वगैरे असला काही प्रकार आमच्याकडे नाही. सोसायटीच्या कमिटी मधल्या लोकांनी मिटींगमधे मांडलेल्या प्रश्नांना वरील उत्तर मिळाली आहेत.
इतर कोणतीही लहान मुलगी मला इतकं आगतिक करू शकत नाहीच. ही मुलगी खरचच गुंडगिरीच्या मार्गावर चाललीये.तिचं काहीही होवो मला घेणं देणं नाही. पण आत्ता मला तिचा त्रास होतोय आणि त्यावरचा तोडगा मला हवाय. माझ्या परीने मी जो शोधलाय तोच मला योग्य वाटतोय आणि मी तेच करणार. त्यानंतर काही वाईट झालं तर इथे येऊन कबुल करेन की मी तुमचं ऐकलं नाही आणि माझं जास्तच नुकसान झालं.पण तोपर्यंत खरच सांगते तुमचे उपाय अगदीच निरुपयोगी आहे.

अनुल्लेख, एक्झॅक्टली. आज मी तो विचार करतच होते की ती मुद्दाम करतेय सगळंच.
आता तिला अटेंशन मिळतंय आणि मज्जा वाटतेय की सगळे कसे माझ्या मागे फिरतायेत.
सध्या काही दिवस मी दारासमोर अगदी साधीशी टिपक्यांची रांगोळी घालणार आहे आणि तीने पुसली तरी काही बोलणार नाहीये.
किमान २ महिने हेच करेन. पण तरीही काही बदल दिसला नाही तर २ महिन्यांनी मात्र चांगली फोडून काढणार आहे तिला.
सध्या २ महिने बर्फ आणून ठेवते घरात.

<<आमच्या लहान मुलीला एक लहान मुलगी मारतेय ' हे घेऊन पोलीस स्टेशन मधे जाऊ शकत नाहीच >> यु आर गेटिंग इट राँग.

<<एका लहान मुलीने दुसर्‍या लहान मुलींना मारणे आणि त्यामुळे त्या लहान मुलीने घाबरणे' हा गुन्हा मानला जात असावा.>> हा नक्की गुन्हा आहे आणि तो बत्तीस वर्शापूर्वी सुद्धा होता. माझ्या नवर्‍याच्या बाबतीत झालेली गोष्ट आहे. पोलिसांनी दखल घेतली होती आणि कल्प्रिट मुलाला सॉल्लीड दम भरला होता.

पालकांना ट्राय करायला सांगा विथ डॉचे सर्टिफिकेट. नक्की न्याय मिळेल. आणि ह्या प्रकरणामुळे इतर पुंडांनाही धडा मिळेल अशी आशा.

मुळात तो पुंड मुल॑गा तुमच्या गाडीचे स्कूटरची सायकलचे नुकसान करतो आहे तेव्हा तुम्ही स्वतः पोलिसात गेलात का? का नाही? का कायद्याच्या रक्षकांवर अविश्वास दाखवायचा?

असोच. तू गांधिगिरी कराय्ची ठरवली आहेस ना तर रोज रांगोळी काढ छोटीशी आणि तिला बोलाव आणि सांग बाळा तू पुसावीस म्हणूनच मी रांगोळी काढली मी तुला बिलकुल ओरडणार नाही आहे पूस बरं ही रांगोळी आणि मग रांगोळी पुसल्यावर तिला एक एक्लेयर टाईप चॉकोलेट दे. लेट्स सी हे वर्क होतय का?

फुकटचा पण परिणाम्कारक सल्ला : एक्दम सुबक रांगोळी काढा (काइंड ऑफ बेट) आणि त्यावर अत्यंत जहाल्/पॉवर्फुल खाजकुजलीची पावडर शिंपडा, स्ट्रटिजीक पोझिशन्स्वर. सावज रांगोळीत हात्/पाय घालेल आणि मग परत तुमच्या/रांगोळीच्या वाटेला जाणार नाहि...

बाकिच्या लहान्/थोरांना याची कल्पना देऊन ठेवा, नाहितर भलतेच बळी पडायचे... Happy

तुमच्या घरासमोरची रांगोळी हि तुमची प्रॉपर्टी आहे, त्याला धक्का पोचवणारा (२-३दा सांगुनहि न ऐकणारा) वँडलीजम या गुन्ह्याला पात्र ठरंत नाहि?

>>स्वाती, मला नाही वाटत की इथे अजुनही 'एका लहान मुलीने दुसर्‍या लहान मुलींना मारणे आणि त्यामुळे त्या लहान मुलीने घाबरणे' हा गुन्हा मानला जात असावा.>>
रीया, गंभीर दुखापत झाली नसेल तर इथेही मानला जात नाही. रांगोळी पुसणे हा देखील नाही. मी गाडीच्या काचा, आरसा फोडणे वगैरे मालमत्तेच्या नुकसानाबद्दल बोलत होते. बाकी तिथे रहात नसले तरी तिथल्या परीस्थितीची चांगलीच जाणीव आहे. माझे सगळे नातेवाईक भारतातच राहात आहेत. माझ्या आईबाबांना आणि इतर नातीवाईकांना अधुन मधून सोसायटीतल्या न्युसन्स वॅल्यूवाल्या मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा सामना करावा लागतो. मी वर दिलेले उपायच करतात. खरे तर एकदाच करावे लागते. बाकीच्यांना आपोआप मेसेज मिळतो.
आईच्या इथे एक मुलगा रोज इंटरकॉमवर फोन करणे, बेल वाजवणे असे करायचा. मुलाचे वडील अतिशय तापट. ते त्याला बेल्टने मारायचे. त्यामुळे तक्रार करायलाही नको वाटायचे. त्या मुलाला वॉचमन सांगितले की आजोबांकडे पोलिसांनी दिलेले कार्ड आहे. पोलिस ताई चौकशीला येतात. त्यांनी पोलीसांना सांगितले की तु त्यांना रोज त्रास देतोस तर काय होईल? तो मुलगा घाबरुन त्रास द्यायचा बंद झाला.

आम्ही 'एक लहान मुलगी आमची रांगोळी पुसतेय, आमच्या लहान मुलीला एक लहान मुलगी मारतेय ' हे घेऊन पोलीस स्टेशन मधे जाऊ शकत नाहीच अ ओ, आता काय करायचं गेलो तर पोलीस हकलूनच देतील >>> जाऊन पाहिलंत का?

हा मुद्दा बाफला अवांतर आहे तरीही लिहतेय.

तुम्ही ज्या भागात राहता त्या भागाच्या पोलिस इन्स्पेक्टरचे नाव तुम्हाला माहित आहे? नगरसेवकाचे नाव तुम्हाला माहित आहे का? कधी त्यांना भेटून तुम्ही बोलला आहात का? पोलिस स्टेशनचा नंबर तुमच्याकडे आहे का?

पोलिस काहीच करत नाहीत म्हणणं फार सोप्पंय. कारण आपल्याला वाटतं की पोलिसांनी येऊन आपली स्वतःहून मदत करावी. पण आपण स्वतः कधीतरी कायद्यावर विश्वास दाखवून त्यांच्याकडे मदत मागितली आहे का? अशी मदत मागता येते हे तरी माहित आहे का?

सोसायटीमधले सर्व लोक मिळून एका कुटुंबाला "तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतोय तस्मात तुमचं वागणं सुधारा" हे सांगू शकत नसतील तर चूक जितकी त्या कुटुंबाची आहे त्याहून जास्त सोसायटीमधल्या प्रत्येक व्यक्तीची आहे.

दुसर्‍या मुलीला खूप मारणारी बोचकारणारी मुलगी अतिरेकी नाही? मनीच्या दृष्टीकोनातून विचार करून पाहा.>>>> हेच मला पण वाटतेय. पण हा मुद्दा लक्षात न घेता, केवळ ती वात्रट मुलगीच आकर्षणाचा केन्द्रबिन्दू झालीय. आणी त्यातच तिला मजा वाटत आहे. पण पुढे जाउन ( आणी आई पाठीशी घालतीय म्हणून) ही पोरगी जास्तच आगाऊ झाली तर?

राज खाजकुयलीचा प्रकार माझ्या मनात आला होता.:फिदी: पण मग रियासकट सगळ्यानाच ग्लोव्हज घालावे लागतील.

माझ्या पोस्टवर तुटून पडत आहेत त्यांना एवढंच सांगते >>>>>>????

बेफिकिरांसहित कुणालाही दुखावण्याचा ईरादा नव्हता हे तहे दिलसे पुन्हा सांगते.>>>>??

हुप्पाहुय्या तुमची पोस्ट तुमच्या प्रोफाईलशी मॅच करत नाही, परत नीट वाचा. सान्गीतल्याबद्दल गैर समज नसावा.

सोसायटीमधले सर्व लोक मिळून एका कुटुंबाला "तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतोय तस्मात तुमचं वागणं सुधारा" हे सांगू शकत नसतील तर चूक जितकी त्या कुटुंबाची आहे त्याहून जास्त सोसायटीमधल्या प्रत्येक व्यक्तीची आहे.>>> नन्दिनी या वाक्याकरता तुला लाखभर अनुमोदन. पोस्ट आवडली.

रीया तू वैतागली आहेस मान्य आहे. मीही वैतागले असतेच.
पण कायद्याचा सपोर्ट नाही वगैरे तू वापरून पाहील्याखेरीज बोलू नयेस. २महिन्याच्या ऐवजी १५दिवस तू लिहिलेला उपाय कर. जमत असेल तर व्हिडिओ घे. पुरावा जमा कर अन जा ना पोलिस स्टेशनमध्य्र व्हाय नॉट! पोलिस काय सांगतात ते बघूया मग.

माझं मत आदर्शवादी आहे हे मला माहीतीय. त्याचा मलाच त्रास व्हायचा भारतात असताना हेदेखील माहीतीय (लाल दिव्याला मी स्कुटीवर थांबले असताना भली थोरली बस माझ्या अंगावर येणार सिग्नल मोडत इत्यादी!) . परंतू मी मला त्रास होतोय म्हणून शॉर्टकट घेऊन पळवाटा काढणं नाही करू शकत. सगळेच मॉरली बरोबर वागू लागले तर सुधारेल ना देश आपलाही? सिस्टीम नाहीये याबद्दल एकमत आहे सगळ्यांचे .. मग ती सिस्टीम आणण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहीजेत ना? स्वच्छ भारत अभियान आत्ता आले. त्याआधी २० वर्शं आम्ही आम्ही आमच्या कॉलनीतील कचराकुंडी जिकडे घाणीत डुकरं लोळायची तो सगळा साफ करून कालांतराने तिथे देऊळ उभे केले. बदल घडवता येतो. व त्यासाठी कायदा हातात घेण्याची , चुकीचे वागण्याची गरज नसते.

Pages