मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपला तो बाब्या आणी दुसर्‍याचे ते कार्टे या उक्तीवर माझा विश्वास नाही. आपला पण बाब्याच असावा आणी दुसर्‍याचा पण बाब्याच. तसे गुण अन्गी बाळगावयाला शिकवणे काय वाईट आहे ? आपल्या चूकीने समोरच्याला त्रास होत असेल तर आपण स्वतः आणी आपल्या मुलाना सुधरायला नको का? की झान्जा वाजवुन एकच गात बसायचे? हम नही सुधरेन्गे? कमाल आहे!>> पटलं!!

मुले विचीत्र वागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. घरातील अती लाड विशेषत: आई आज्जी कॅटॅगरी! लहान भावंडं पाठीवर आल्यावर काही मुले बिथरतात (त्यासाठी घरातल्या इतर नातेवाईकांचा मोठ्ठा हातभार लागतो.), घरात भांडणे असल्यावर मुले असुरक्षित वाटून बिथरतात. इतर मुलांचे बघून कधीतरी बिथरतात, पण सगळ्यात जास्त आपल्या चुकीच्या वागण्याला कोणीतरी पाठीशी घालतेय या कारणाने जास्त शेफारतात.
मी माझ्या मुलाचे उदाहरण देते. माझा पावणे तीन वर्षांचा मुलगा अती साधूसंत कॅटॅगरी मधील आहे. मस्ती करतो पण त्याने दुसर्‍यांना लागणार नाही, अपाय होणार नाही याची काळजी घेऊनच! टिव्ही वरही त्याला हाणामारी लागली, घरात आवाज जरा चढले तरी रडवेला होतो. अचानक त्याची तक्रार आली की तो इतर मुलांना चावतोय. माझ्या मनात पहीली प्रतिक्रिया आपसूक "शक्यच नाही!!" पण बोलून दाखवलं नाही. बेबी सिटर ला माहीत आहे त्याचा स्वभाव. ती खोटं का सांगेल?
(प्लीज नोट इथे मी स्वतः आधी मान्य केलं की माझा मुलगा चुकला असेल, शक्यता आहे.) तिच्या समोर त्याला जवळ घेऊन समजावून सांगितलं की असं कोणाला चावायचं नाही. तुझे फ्रेंड्स आहेत सगळे. तुझे लाड करतात की नाही लहान म्हणून??

दोन दिवसांत घरी आमच्यावर प्रयोग झाले... नीट बघितल्यावर आमच्यापैकी ज्याचा आवाज चढेल त्याच्यावर हा प्रयोग होत असे. मग आम्ही च जो आवाज चढवेल त्याला समोरच्याने प्लीज हळू ब्ल असं शांत पणे समजवायला सुरूवात केली. आणि बेबी सिटरलाही याची कल्पना दिली. आता हाच जो कोणी आवाज चढवेल त्याला समजावतो प्लीज हळू हळू बोला. हल्ली पालकांना एवढाही वेळ नसतो की आपलं मूल वेगळं वागतंय का नेहमीपेक्षा, का वागत असावं, त्याला आपण वेळ देऊ शकत नाही म्हणून का? पण त्याच्या भौतिक गरजा भागवण्याच्या नादात त्याच्या मानसिक गरजांकडे दुर्लक्ष होतं आणि मग त्यालाही सवय लागते अमूक केल्यावर तमूक मिळेल. तमूक करण्यासाठी अमूक डिमांड करायची. आपल्या चुकीच्या सवयी पाहून ते ही शिकत जातं... आणि "सगळं" पुरवण्याच्या नादात त्याच्या चुका सुधारायचं राहूनच जातं!!

इतर मुलांना मारणे, परस्पर झापणे इत्यादी उद्योग मी शक्यतो करत नाहीच. पण तरीही मला एक सांगा, एखाद्या उचापती मुलामुळे माझ्या अती साधू संत मुलाला विनाकारण ओचकारणे, बोचकारणे वै. प्रकार होत असतील आणि माझ्या मुलाला तू स्वतःला डिफेंड करायला शिक असं सांगूनही माझा किरकोळ शरीर्यष्टीचा मुलगा करू शकत नसेल, आणि त्या उचापती मुलाचे पालक "तुमच्या मुलाला प्लीज समजवा... की आम्ही समजावू??" असे वारंवार समजावूनही ते पालक माझा मुलगा असे करणारच नाही; तुमच्याच मुलाने आधी खोडी काढली असणार; लहान आहे तो अजून टाईप्स टेप वाजवत असतील तर प्लीजच उपाय सांगा की या मुलांच्या पालकांचं काऊन्सिलींग करावं की त्यांच्या मुलांचं???

अरे वळण, सन्स्कार नावाची काही चीज असते की नाही?
>>>>>>
नक्कीच असतात, आणि ते आपणच लावतो असे नाही तर सर्वच पालक आपल्या पाल्याला लावायचा प्रयत्न करतच असतील ना. म्हणजे कोणीही आपल्या पाल्याला सांगत नसावे की जा राजा जरा शेजारच्यांच्या दारातील रांगोळी पुसून ये. प्रश्न हा आहे की आपले पाल्य जर असे आपण लावलेल्या संस्काराच्यानंतरही शेजारच्यांची रांगोळी पुसत असेल तर त्याची समजूत कशी काढणार किंवा त्याला शिक्षा कशी करणार?

इथे राजेश यांनी नमूद केलेले >> मुलांचे विशेषाधिकार काढून घेणे हा एक शिक्षेचा चांगला प्रकार असू शकतो. जसे कि खेळणे काढून घेणे, TV वरचा त्याचा आवडता कार्यक्रम न पाहू देणे. आयीसक्रीम, चोकलेट न देणे, ई. >>> हे समजवून ऐकत नसेल तर प्लान "बी" म्हणून मला पटले.

आता इथून जरा विचार पुढे नेऊया,
आपल्या मुलाने शेजारच्या ताईची रांगोळी पुसली म्हणून त्याला तिने धपाटा घातला, आणि आपला मुलगा हुंदके देत घरी आला तर आपली पहिली रिअ‍ॅक्शन काय असेल? मुलाकडून खरे खोटे करायचे? त्या धपाटे देणार्‍या ताईकडून खरे खोटे करायचे? (यात कोणीही खोटे बोलू शकतो हि शक्यता लक्षात घ्या),
त्या पुढे शेजारच्या ताई-काकूंच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपल्याच मुलाला दम भरायचा? का खरे खोटे काही का असेना, रांगोळी पुसली या कारणावरून आपल्या मुलाला शारीरीक इजा पोहोचवणार्‍यांशी भांडायचे.

ड्रीमगर्ल, इथे मुळात प्रॉब्लेम मला हाच वाटतोय की त्या पालकांना असे हात वर करण्याचा ऑप्शन आहे!!
फ्रस्ट्रेटिंग सिचुएशन्स Sad
शाळा काही करत नाही आहे का ? शाळेला ऑथोरिटी असायला हवी खरे खोटे करण्याची. आणि योग्य त्या व्यक्तीकडून त्या मुलाच्या पालकांना अ‍ॅक्शन घ्यायला भाग पाडण्याची. नाहीतर बळी तो कान पिळी हेच चालणार.

इथे मुळात प्रॉब्लेम मला हाच वाटतोय की त्या पालकांना असे हात वर करण्याचा ऑप्शन आहे!!
फ्रस्ट्रेटिंग सिचुएशन्स >>>
+१११११११११११११११११११११११११

खरच असे कायदे आले तर पालक अपोआपच मुलांना कंट्रोलमधे ठेवतील.
काही नाही तर किमान आपल्या मुलांमुळे ज्यांना त्रास होतोय त्यांच्यावर अरेरावी तरी करणार नाहीत.

ऋन्मेऽऽष , तुला इथे काय चाललंय ते काहीही कळालेलं नाहीये. तू जरा ब्रेक घे असा फुकटचा आणि कळकळीचा सल्ला.
तुझ्या पोस्ट्समुळे तेच तेच बोलावं लागतंय आणि फार विषयांतर होतंय.
तू मला काहीही मार्ग सुचवल्याचे दिसले नाही. उलट फाटे फोडणे चालू आहे.

रिया, याचे कारण मी तुला पर्सनली इथे कुठलाही मार्ग सुचवावा या उद्देशाने लिहित नाहीयेच मुळी, पण कोणी चुकीचे विधान करत असेल तर ते मी खोडणारच.
जर रांगोळी पुसणार्‍या मुलीसाठी धपाटे हि शिक्षा असेल तर माझ्यामते ते चूकच आहे. जर कोणी असा चुकीचा उपाय या पब्लिक प्लॅटफॉर्मवर सुचवत असेल तर मी तो कसा चुकीचा आहे हे दाखवणारच. Happy

असो, वर मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणीही देऊ शकतो.

अरे वळण, सन्स्कार नावाची काही चीज असते की नाही?
>>>>>>
नक्कीच असतात, आणि ते आपणच लावतो असे नाही तर सर्वच पालक आपल्या पाल्याला लावायचा प्रयत्न करतच असतील ना.>> याबाबत साशंकच आहे. Happy वळण हे काही हात धरून श्री गणेशा गिरवण्यासारखं लागत नाही. आपण आपल्या वागणूकीतून मुलांना वळण लावतो. अगदी शब्दशः अर्थ घेऊ नकोस की त्या मुलीचे पालक जाऊन शेजार पाजारच्या दारापुढच्या रांगोळ्या पुसत असतील.... हे एक उदाहरण झालं जे त्या मुलीने तिच्या बाळबोध वृत्तीने केलं पण रियाच्या पोस्टनुसार तिच्या घरातील इतर व्यक्ती कचरा खिडकीतून टाकणे, सोसायटी व्हरांड्यात थुंकणे असले प्रकार करत असतील तर ते वळ्ण लावत असतील आपल्या मुलीला? खरंच त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का तसे करण्याचा? Happy

म्हणजे कोणीही आपल्या पाल्याला सांगत नसावे की जा राजा जरा शेजारच्यांच्या दारातील रांगोळी पुसून ये. >> नक्कीच असे सांगितले नसेल. बरोबर! पण ती मुलगी असे सतत करतेय अशी कोणीतरी तक्रार करतेय तर स्वतः खात्री करून घ्यावी की नाही आपली मुलगी खरंच असं काही करतेय का? करत असेल तर का करतेय? की सरसकट हात वर करावेत नाही माझी मुलगी असं करतच नसणार!! प्रश्न हा आहे की आपले पाल्य जर असे आपण लावलेल्या संस्काराच्यानंतरही शेजारच्यांची रांगोळी पुसत असेल तर त्याची समजूत कशी काढणार किंवा त्याला शिक्षा कशी करणार? >> अर्ध्या पहील्या वाक्याला वरील पहीला परिच्छेद!! उरलेल्या अर्ध्याला... मुलांना स्वतः समजून सांगता येत नसेल तर सरळ चाईल्ड काउन्सिलर कडे न्यावे!!! सोनाराने कान टोचलेले बरे असतात. अर्थात या उदाहरणात इतकीही इच्छा वा तयारी दिसत नाहीये पालकांची. वर आपल्या वागणुकीतूनच आदर्श (???) ठेवताहेत तिच्यापुढे!!

विनाकारण ओचकारणे, बोचकारणे वै. प्रकार होत असतील .......................... टेप वाजवत असतील तर प्लीजच उपाय सांगा की या मुलांच्या पालकांचं काऊन्सिलींग करावं की त्यांच्या मुलांचं???>>>>>>>>>>>>> dreamgirl | 28 October, 2014 - 16:30 लाख अनुमोदन

हे घ्या जिवंत उदाहरण हे अस बरेच वेळा झालंय आणि तिने मारलेल्या नखांचे व्रण चेहऱ्यावर शिल्लक राहिलेले आहेत आणि हे सर्व नात्यात्ल्याच नतद्रष्ट मुलीने केलंय, ती बया सोसायटीतल्या इतर लहान मुलांना बेड वरून ढकलून देणे, चावणे, मारणे हे प्रकार करते ( हे सर्व उद्योग माझ्या लेकी बरोबर झालेत सुद्धा )तिचे पूज्य माता पिता म्हणतात तिला त्रास दिलं की ती अशिच वागते, शेजारच्या लहान बाळाला त्या बयेने बेड वरून खाली ढकलून दिलाय आता १० महिन्याचे बाळ हिला कांय त्रास देणार, तिच्या आई वडीलांनी आमची कन्या आणि ती त्यांच्या घरी आली की कन्येला आत घेऊन तिच्या तोंडावर दरवाजे लाऊन घेणे पसंत केलंय

नक्कीच असतात, आणि ते आपणच लावतो असे नाही तर सर्वच पालक आपल्या पाल्याला लावायचा प्रयत्न करतच असतील ना.>> याबाबत साशंकच आहे
>>
साशंक नव्हेच ! रॅदर हे सगळं आपण डिस्कस करतोय कारण पालक हे करत नाहीयेत Sad
ऋन्मेष , यासाठी मीच तूला म्हणाले की तुला मुद्दा कळत नाहीये

केदारदादा Angry

त्या मुलीला दे दोन धपाटे आणि सांग तिच्या आई वडीलांना की आमच्य अमुलील अत्रास दिला की आम्ही असचं करतो Sad
नाही तर त्या मारकुट्या मुलीला ऋन्मेष कडे पाठवून दे Wink
तो हाताळतो चांगल्या प्रकारे Wink

बापरे! कळजी घ्या..

मुळात व्हीक्टीम बनु नये हे मुलांना शिकववंच लागेल असं दिसतय!
अपण ही दोन चार तिथल्या तिथे लगावुन..सोक्ष मोक्ष लावुन येत जा असं च शिकवीन म्हणते!

माझ्या शेजारणीच्या मुलीला (८ वर्ष ) तिच्या ट्युशन टीचर चा मुलगा आल्या आल्या थोबाडीत मारतो! उगाच.. मी काही काऊसलर नाही, पण टीचर ला सांग कींवा त्याला तु ही ठेउन येत ज दोन चार असे सुचवले आहे.
चुक क बरोबर हे क्रुपया कुणी ही सांगु नका!

फारच त्रासदायक अस वाचंलय ह्या धाग्यावर.
मुले असं का करतत हे जाणुन घ्यायला आवडेल.. (आवडेल??) Sad
घ्यायचंय..

पण मुलांना असला फिजिकल त्रास होउ नये अशीच प्रार्थना!

वरचा फोटो पाहून तिळपापड होतोय अंगाचा. मुलं असं का करतात वगैरे त्याची कारणं गेली चुलीत. आपल्या मुलांची सुरक्षितता महत्वाची (असं वर कुणीतरी म्हटलंय कोण ते आठवेना).

धनुकली, रिया >>>> मी सुद्धा माझ्या मुलीला सांगितले की तुपण तिला नखं मार तर आमची साधी भोळी कन्या त्या बयेला जाऊन म्हणाली तु मला नखं मारलीस तर मी पण तुला नखं मारेन, तर तिचे परमपूज्य पिताश्री आणि मातोश्री ह्यानी अबोला धरलाय Proud

केद्या काही अपाय झाला कायमचा तर केवढ्याला पडेल? मुलीची सुरक्षितता महत्वाची. तस्मात, तू एकदा त्यांना जाऊन काय ते नीट सांग समजावून. तरीही अबोला धरला तर धरुदे. गेले उडत.

आई ग्गं केदार!! Sad
नखंही कापलेली नाहीयेत त्या मुलीची??? किती लक्षंय आई वडीलांचं!! -_- आमच्याकडे आठवड्यातून तीनदा प्रोग्रॅम असतो साग्रसंगित!! अर्णव खूप छोटा असल्यापासून!! आम्ही दोघंही नोकरी करतो. घरी त्याला बघणारं कोणीच मोठं नाहीये तरी आम्हीच आळीपाळीने लक्ष ठेवायचो, त्याची नखं वाढत आहेत, केस कापायचे आहेत, रोज दोनदा ब्रश करायचा आहे... असो.

अशी मुले घरी आली की आपणच विशेष लक्ष ठेवायला हवं तिच्या/त्याच्या आईबाबांच्या सरबराईत न गुंतता. त्यांना जाणवलंच पाहीजे की तुम्हाला आवडत नाहीये मुलीचे वर्तन!! नाही पेक्षा शांत स्वरात सांगायचं... की तुमची मुलगी विनाकारण मारतेय चावतेय... जेव्हा ती असे करणे थांबवेल तेव्हा आणा तिला. (हे एवढं स्पष्ट बोलणं बर्‍याच जणांना जमत नाहीच!!)

तर तिचे परमपूज्य पिताश्री आणि मातोश्री ह्यानी अबोला धरलाय
>>>>
हुश्श! बरं झालं Angry
येऊच नका म्हणावं परत तुमच्या कन्येला घेऊन आमच्याकडे

येऊच नका म्हणावं परत तुमच्या कन्येला घेऊन आमच्याकडे >>> असं करण जमत नाहिये ना Sad संस्कार आमच्या आईवडीलांचे Uhoh

या सर्वाचा परिणाम म्हणून लेक थोडी अग्रेसिव्ह व्हयला लागलेय

केद्या, संस्कार तुझ्या मुलीवर कर सगळ्यांशी चांगलं वागायचे. ते तू करतच असणार. पण मग सुरक्षितता पण जप. बाकी काळजी करु नको कशाचीच.

या सर्वाचा परिणाम म्हणून लेक थोडी अग्रेसिव्ह व्हयला लागलेय>> चांगलंय!!! स्वतःच शिकतेय हळूहळू... मलाही वाटायचं माझ्या गुणी बाळाकडे पाहून कित्ती गुणाचं बाळ माझं!! पण इतर मुलांचं बघून शिकतो स्वतःच डिफेंड करायला... तू स्वतःहून कोणाचीच आधी विनाकारण कळ काढायची नाहीस हे शिकवायला आपण असतोच की नंतर!!!

.

अरे केदार, क्रुन्मेश कडे पाठव ना त्या मुलीला, काय ओचकारायचे ते ओचकारु दे. क्रुन्मेश ला राग पण येणार नाही. तो तिच्यावर चांगले संस्कार करेल. त्या मुलीला पण ओचकारायला हक्काचा काका मिळेल.
तुमची आणि त्या मुलीच्या आई-वडीलांची पण सुटका.

ऋषी पकूर कडे रणबीर पकूर आला की मग ऋषीला या मुद्द्याचे गाम्भिर्य समजेल.:फिदी: तोपर्यन्त त्याला भावी शशीकला/ मनोरमा तसेच भावी शक्ती कपूर/ गुलशन ग्रोव्हर याना साम्भाळु द्या.

इथे वरील उदाहरणाकडे बोट दाखवत मला बोलण्याचा चान्स घेण्यात काही अर्थ नाही. ते बघून कोणाइतकीच हळहळ मलाही वाटणारच. माझ्या आधीच्या एकदोन पोस्ट मध्येही मी अपवाद नमूद केलेलेच. रांगोळी पुसणे आणि बेदकारपणे लहान मुलांना ओरबाडणे या नक्कीच दोन वेगळ्या केसेस झाल्या. इथे ते वरचे गालावरचे व्रण पाहून नक्कीच कोणालाही वाईट वाटेल. मला स्वताला जास्तच कारण मी स्वता माझ्या डोळ्याजवळ एक लहानपणीची खूण मिरवतोय ज्यात डोळा जाता जाता बचावला.

असो, आधीही इथे मुलांच्या खोडकरपणाचे किस्से आलेले पण कोणाला शारीरीक इजा झाल्याची बघून आपला जीव जास्त हळहळतो. आणि म्हणूनच इतरांच्या मुलाने चपला फेकल्या वा रांगोळी पुसली म्हणून त्यालाही शारीरीक इजा पोहोचवणे (धपाटे वगैरे) चूकच एवढे तुर्तास समजले तरी पुरेसे.

असो, बरेचदा मुले बेताल वागतात यामागे ते कोणाच्या तरी जीवावर उडत असतात हे देखील एक कारण असते. त्याचे ते पंख छाटून टाकणे हा बरेचदा नामी उपाय ठरतो. यावर एक किस्सा शेअर करू इच्छितो, पण आता घाईत आहे, नंतर करतो..

अशी मुले घरी आली की आपणच विशेष लक्ष ठेवायला हवं तिच्या/त्याच्या आईबाबांच्या सरबराईत न गुंतता. त्यांना जाणवलंच पाहीजे की तुम्हाला आवडत नाहीये मुलीचे वर्तन!! नाही पेक्षा शांत स्वरात सांगायचं... की तुमची मुलगी विनाकारण मारतेय चावतेय... जेव्हा ती असे करणे थांबवेल तेव्हा आणा तिला. (हे एवढं स्पष्ट बोलणं बर्‍याच जणांना जमत नाहीच!!)

>> अगदी बरोबर.. पाहुण्यांची सरबराई गेली खड्ड्यात.. तुमची चिमुरडी लाखपटीने जास्त महत्वाची आहे.

माझ्या पुण्यातल्या मावशीच्या सोसायटीत एक फॅमिली अशीच त्रास देते विशेषतः त्यांची मुलं. पण सोसायटीत कोणीही काहीही बोलत नाही. मावशीने सोसायटीच्या मॅनेजमेन्टकडे तक्रार केली तर मॅनेजमेन्ट अ‍ॅक्शन घेत नाही. का तर म्हणे वाईटपणा कोण घेणार. माझा मावसभाऊ तिथे राहात होता तेव्हा त्याने गल्लीतले चार मित्र गोळा करुन या फॅमिलीचा बंदोबस्त केला होता. पण आता तोही इथे अमेरिकेत स्थायिक झालाय. त्यामुळे आता ते लोक पुन्हा त्रास देतात. एकटी मावशी काय करणार? तरी तिला म्हटलं की तू खडसावून सांग त्या लोकाना तर म्हणाली- "नको मी काय ६ महीने अमेरिकेत असते, एखादा महिना नातेवाइकांकडे, एखादा महिना ट्रिप वगैरे. म्हणजे फक्त ४ महिने मी घरी राहते. ते मी कसेही काढेन. माझ्यापेक्षा जास्त त्रास वर्षभर इथेच राहणार्‍या इतर रहिवाश्यांना होतो पण वाईटपणा नको, आपण बोललो असं नको म्हणून कोणी बोलत नाही. दुसरा बोलेल अशी वाट बघत बसतात. मग मी तरी कशाला तोंड उघडू?"

हा मला वाटतं सगळीकडे प्रॉब्लेम आहे. त्रास होत असणारे सगळे एकत्र आले तर त्रास देणारे एकटे पडून त्यांना काहीतरी शिक्षा होईल.

Pages