मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

तुम्ही नीधपला विचारत आहात हे माहीतीय. पण तरीही माझे उत्तरः

आसपासचे त्यांना तुमच्याइतक्याच भावनिक हक्काने शिक्षा देऊ शकत नाहीत का?>>> नाही. शारीरीक शिक्षा तर अजिबात नाही!! बाकीही कुठली शिक्षा देण्याचा अधिकार त्या लोकांना नाहीये. तुम्ही त्याची तक्रार घेऊन माझ्याकडे येऊ शकताच. पण अदरवाईज तुमचा त्याच्यावर कुठलाही हक्क नाहीये. असे माझे मत आहे. (आणि मी इतर मुलांशी असेच वागते. )

पण इतर अंगाला हात न लावता केलेल्या शिक्षा (टाईम आउट, सुपरवायझर च्या खोलीत बसणे इ.) वर आक्षेप घेणार नाही. या केस मध्ये बोलणे/ रांगोळी काढायला प्रवृत्त करणे. केरसुणी हातात देवून केर भरायला लावणे इ. रादर समोरच्याने नाही केली तर मी २ वर्षे आणि वरील माझ्या पाल्याकडून करून घेईन. <<<
निश्चितच.
अमुक मूल सतत चुकीचे वागते त्यामुळे तू त्याच्याशी खेळू नकोस असे आईवडिलांनी आपल्या मुलाला सांगणे हे ही अयोग्य नाही.
सर्व मुलांच्या बहिष्काराने कदाचित मुलाला आपली आपणच अक्कल येऊ शकते.

माझा आक्षेप दुसर्‍यांच्या मुलाला मारणे, शारिरिक इजा होईल अशी शिक्षा करणे यावरच आहे.

>> तुमच्याइतकेच उत्तम संस्कार करणारे आसपासचे त्यांना तुमच्याइतक्याच भावनिक हक्काने शिक्षा देऊ शकत नाहीत का? <<<
माझ्याइतकेच उत्तम संस्कार करणारे असतील तर त्यांना दुसर्‍यांच्या मुलाला मारहाण करायची गरज पडणार नाही.

ह्या पातळीला वर चर्चेत सहभागी झालेले कोणी जाऊ इच्छीतही नाहीत आणि कळत नकळतही असे आपल्या हातून काही होऊ नये इतपत समजण्याइतके ते जबाबदार आहेत, <<
इथले जबाबदार लोक किंवा रिया स्पेसिफिकली यांच्याबद्दल हे बोलणे नाही ना पण फक्त. मी एकुणात बोलतेय.

.

.

आपलं मुलाच घरी वागणं आणि इतर मुलांत वागणं टोटली वेगळं असू शकतं.

ग्रुप मध्ये न ऐकणार मुलगा असतो, त्याच्या सारखं वागावंसं वाटतं/ न ऐकण्याची एक गम्मत असतेच. ती चांगली नाही एव्हढंच समजावत राहायचं. <<<
याला अनुमोदन. पण त्यावर बाहेरच्यांना मुलाला मारायची मुभा असणे हे उत्तर नाही होऊ शकत हे तुम्हीही मान्य करताय.

.

तुम्ही जर म्हणालात की माझा मुलगा नेहमी असेच वागणार आहे तर? <<
असं म्हणणार्‍या पालकावर कारवाई व्हायला हवी. समाज, यंत्रणा यांच्यातून प्रेशर येऊन का होईना मुलाला असे वागणे योग्य नाही हे शिकवणे भाग पाडायला हवे.

.

मी असं कधीच म्हणणार नाही.

अच्छा यू मीन, असे पालक असतात जे असं म्हणू शकतात. ..
मग तो प्रॉब्लेम पालकांचाच आहे. त्यांचेच वागणे बरोबर नाहीये. आडातच नाही तर पोहोर्‍यातून कुठून येणार? मी त्या मुलाला फटकवण्याऐवजी त्या कुटूंबाशीच इंटरॅक्शन कमी ठेवेन. काही बिघडत नाही अशी लोकं आपल्या वर्तुळात नसली तरी.

.

तुम्ही दुसऱ्याच्या मुला(ली)ला मारायचं समर्थन करताय, त्याला आक्षेप आहे. त्यान/ तिने तसं केलेच नसेल असं बिलकुल म्हणायचं नाहीये. आणि तो शिक्षा देणारा/ री कोण आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. पेरेंट/ शिक्षक सोडून कोणी असेल तर परिस्थिती प्रमाणे वागणं बदलेलच.

.

आपण सिस्टीम बनवू शकतो जसे की रांगोळी पुसणार्‍या मुलीच्या संदर्भात नोटीसबोर्डावर किस्सा लावणे, सोसायटीने आक्षेप घेणे वगैरे.. किंवा ज्यांची चूक आहे त्यांच्यासाठी न्यूसन्स क्रिएट करू शकतो.. जसे की पुसलेल्या रांगोळीचा कचरा त्या मुलीच्या दारात ओतून येणे.

सर्व बिल्डींगला त्रास होत असेल त्या मुलीच्या वागण्याचा तर सर्वांनी आपल्या मुलांनी त्या मुलीशी खेळू नका, बोलू नका हे सांगता येते.
सोसायटीच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यांच्यावर बहिष्कार घालणे हे करता येऊ शकते.

जेथे संबंध का नाही ठेवले ह्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. <<
या ना त्या पद्धतीने हे स्पष्टीकरण सगळीकडेच द्यावे लागते. इथे त्याचा इमोशनल चिवडा जास्त होतो तिथे होत असला तरी तो दुर्लक्षित करणे शक्य होते इतकेच.

बस्के, कृपया सोयीस्कर पातळीवर वादात उतरू नका अशी नम्र विनंती!>> व्हॉट डझ धिस मीन? मी कशाही प्रकारे चर्चेत भाग घेईन. तुम्ही सांगू नका मी काय करायचे ते. कृपया!

तसंच स्पष्टीकरणं न देताही जगता येतं भारतातही. इतकं काही अवघड नाहीये. तसं नसेल तर इतकं पायात पाय घालून इंट्रॅक्शन्स असण्याची गरज असते का खरंच असंही विचार करावा सर्वांनी! त्यात देश-परदेश काही संबंध नाहीये. स्वतःची स्पेस जपण्यात भौगोलिक स्थान मध्ये येऊ नये.

<<तुम्ही दुसऱ्याच्या मुला(ली)ला मारायचं समर्थन करताय, त्याला आक्षेप आहे>>

तुमचं मूल काहीतरी मेजर काडया करत असेल (दुसर्‍याच्या मुलाला शारीरिक इजा वगैरे) तर पालक म्हणून तुम्ही, तुमचे संस्कार, तुमची शिस्त ही सगळी फेल गेलेली आहे असं इतर मुलांचे पालक सरळ अर्थ घेणार आणि आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी जे काही करायला लागेल ते करणार (तुमच्या मुलावर हात उगारणं वगैरे गरज पडल्यास).
कोणतंही मूल खूपच जास्त मिसबेहेव्ह करत असेल तर पालकांचीच लायकी काढली जाते की घरच्यांनी काहीच शिकवलेलं दिसत नाही. मग ते इनइफेक्टिव्ह पालक मुलात काही बद्ल घडवून आणू शकतील या भरोश्यावर बाकीच्यांनी राहावं व आपल्या पाल्यांच्या सेफ्टीची चिंता करु नये असं होणार नाही.

एकच वाक्य वाचलेलं दिसतंय.
असो तुम्ही करा मारहाण दुसर्‍याच्या मुलाला मग त्या मुलाच्या पालकांनी तुम्हाला धुतलं येऊन तर रडू नका मात्र.

एक गम्मत: एकदा मुलगा ऐकत न्हवता आणि समोरून पोलिसची कार चाललेली. बायको पटकन म्हणाली,ऐकलं नाहीस तर पोलीसला बोलवीन. तिला म्हटलं, पोलीसला बोलावलस तर तो/ ती आपल्याला घेऊन जाईल पोराच्या केसाला धक्का लागणार नाही याची खात्री करून. जगात कुठेही असा हे वाक्य हात उगारण्यापुर्वी आठवा आणि कृती करा. (परदेशात कुठल्याही मुलाला स्वदेशात किमात दुसऱ्याच्या मुलावर हात उगारण्यापूर्वी)

.

.

अगतिक वगैरे काहीही झाली नाहीये. पोराला कार सीटवर बसायचं न्हवत इतकं क्षुल्लक कारण होत, आणि पोलीस/ बागुलबुवा इ. भारतीय मानसिकतेतून आलेल्या भीतीदायक गोष्टी आहेत.

तर मुद्दा इतकाच आहे, हात उगारण्यापुर्वी परत विचार करा.

असो तुम्ही करा मारहाण दुसर्‍याच्या मुलाला मग त्या मुलाच्या पालकांनी तुम्हाला धुतलं येऊन तर रडू नका मात्र.
>>
अ‍ॅक्चुअली हे वाचून पटकन हसायला आले.. क्षमस्व!
पण हा खूप महत्चाचा मुद्दा आहे.

समोरच्या मुलाच्या पालकांचे उपद्रवमूल्य जास्त असेल तर आपण हि हिंमत खरेच दाखवू का??
म्हणजे बघा, दोन मुलांनी मिळून आपली काहीतरी खोडी काढली, त्यातील एकाच्या घरचे सीधेसाधे वा भांडणात आपल्याला झेपतील असे म्हणून आपण त्यांच्या पोराच्या कानफडात मारणार आणि दुसर्‍याच्या घरचे दांडगट आणि गुंड प्रवृत्तीचे म्हणून आपण चरफडत बसण्याशिवाय काही करू शकणार नाही... मग तेव्हा काय करणार? मजबूरी का नाम गांधीजी??? Wink

.

.

बेफिकीर मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी चर्चेत येते. माझ्याकडे इतका वेळ नाहीये की प्रत्येक चर्चेत प्रत्येक मुद्दा घेऊन १०-१० पोस्टी टाकाव्यात.
शिवाय मुलांना फटकावणं हा मुद्दा माझ्यामते 'किरकोळ' मूळीच नाहीये. त्याहीपलिकडे जाऊन तुम्ही या वेबसाईटचे अथवा चर्चेचे अ‍ॅडमिन नाही आहात लोकांना चर्चेत कधी व कसं यायचं हे सांगायला! Uhoh

आणि मी काही अमेरिकेत जन्मलेली नाहीये. इथे यायच्या आधी भारतातच होते, व वर लिहीले तसे जगता येते हे स्वानुभवातूनच लिहीले आहे! माझी ही सर्व मतं अमेरिकेला जायच्या आधीपासूनच होती बरं! इकडे येऊन, मला स्वतःला मूल झाल्यानंतर त्या सर्व मतांना बळकटी मिळाली आहे इतकंच. मी भारतात मुव्ह झाले तरी माझी मतं बदलणार नाहीत.

Pages