मुलांच्या दांडगाईने वागण्याबाबत इतर मुले, इतर पालक आणि शाळा ह्यांनी काय करावे?

Submitted by वेल on 25 August, 2014 - 04:33

आजच शाळेतल्या एका पालकाकडून कळले की तिच्या मुलीला (पहिलीतल्या) तिच्याच वर्गातल्या मुलाने ढकलले. ती मुलगी स्वतःच्या जागेवर बसली होती आणि हा मुलगा त्या बेंचच्या बाजूने चालला होता. त्या मुलीचे नाक फुटून रक्त आले. ती मुलगी खूप घाबरली आहे.

त्या पालकाने शाळेत तक्रार केलेली आहे. शाळा नियमानुसार काय करायचे ते ठरवेल.

पण आपल्या मुलांनी अशा मस्तीखोर मुलांसोबत कसे वागावे? त्या मुलांपासून लांब राहावे हा उपाय नाही कारण ह्या परिस्थितीत ती मुलगी त्या मुलाच्या अध्यात मध्यातही नव्हती,

आपण आपल्या मुलांना अशी परिस्थिती हाताळायला शिकवताना काय शिकवावे? शिक्षकांकडे तक्रार करणे हा एकच ऑप्शन आहे का?

मला काही उपाय सुचले ते असे -

आपल्या मुलांना stand united शिकवावे. कोणी इतर कोणाला त्रास देत असेल तर ज्याला त्रास होतोय त्याची बाजू घेऊन आपण त्या त्रस देणार्‍या मुलाला हे लगेच थांबव असे शांत पण ठाम शब्दात सांगावे ( सहा वर्षाच्या मुलाकडून खूप जास्त अपेक्षा होत असेल कदाचित पण मी हे माझ्या मुलाला प्रॅक्टिकली कसं करायचं ह्याचा डेमो दिला आहे. तो ते तसं करू शकेल की नाही माहित नाही.)

त्रास देणारा हामुलगा नेहमीच इतर मुलांना त्रास देतो त्यामुळे त्या मुलाच्या वागण्याविरुद्ध शाळेत लेखी तक्रार करावी. आणि ह्यामध्ये मुलाला काउंसेलिंग देण्याची मागणी करावी. शिवाय पुन्हा असेच होत राहिल्यास पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्याची धमकी द्यावी.

कृपया तुमची मते मांडा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजाभाऊ Lol

असामी, कॉलेजात असताना "डबा खायला घ्यायचं बंद केलं" या वाक्यात काहीच घोटाळा नाहिये का? >> नंदिनी, अग, एव्हढा सुतळी बाँब असताना लवंगी फटाक्यांच्या मागे काय लागायचे ते Lol

जाउ दे रे ऋन्मेऽऽष , तुझ्या (अजून एका ) लेखाच्या भितीने लोक मला बडवतील रे. 'लेखांच्या सरमाळेबाबत इतर हितगुजकर, मॉडरेटर आणि अ‍ॅडमीन ह्यांनी काय करावे?' असा बाफ यायचा Wink

आमच्या ग्रूपमधील मुलांच्या जागी लाळघोटेपणा करत मुलींना मदत करायला पुढे पुढे करायचा>>>>

सबमिशन साठी असेल तर तो सबमिशन सम्राट असणार ( आधी पुर्ण करणारा वगैरे)
सहसा मुले सबमिशन आधी करत नाहीत हा स्वानुभव, अगदीच आदल्या रात्री जी टी नामक प्रकाराची पुरेपूर मदत घेवून.
मग हा प्राणी सबमिशन पुर्ण करुन मित्रांना मदत करण्याऐवजी मूलींना करत असेल तर ती त्याची फारच व्ययक्तिक बाब आहे असे वाटते ( अशी मदत केल्यास पोरी भाव देतात असा गोड गैरसमज असावा त्याचा...) असो.

तरीही बहिष्कार हा उपाय नाही ,शाळा कॉलेजामध्ये मुले मुली यांच्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. बहिष्काराने द्वेष निर्माण होतात.

असामी, चिल्लेपिल्ले कसे लवंगीची माळ सुटी करून एक एक वाजवत बसतात तशी आता इथे लेखांची माळच (त्याखाली परत प्रतिसादांचे तोरण*) वाजणार आहे असे एकंदरीत चित्र आहे. सुतळीबाँब सोडूनच द्या.

* फारेण्डाला उपमा रेसिपीसाठी अजून एक संधी.

'लेखांच्या सरमाळेबाबत इतर हितगुजकर, मॉडरेटर आणि अ‍ॅडमीन ह्यांनी काय करावे?' असा बाफ यायचा

Rofl

रुन्मेष डबा हातात घेऊन मीन गर्ल्सच्या नायिकेसारखा नाक वर करुन मित्रावर बहिष्कार घालून चालत आहे असं दृश्य समोर आलं.

आता इथे लेखांची माळच (त्याखाली परत प्रतिसादांचे तोरण* >> Lol

अरे किती खेचाल राव,
विषयावर सुद्धा बोला.
माझ्या निवडक दहात

हे तिन्ही वेगवेगळ्या ललितांचे ( ललित लेखांचे) शिर्षक आहेत का? Light 1

असे लेख लिहायला हरकत नाही.:फिदी:

ऋन्मेष सुट्टीचा पुरेपूर फायदा घे. नन्तर डायरेक्ट मे जून मध्ये चान्स मिळेल तुला.

Rofl

रियाचा मूड लाइट झाला का Wink

कुमार ऋन्मेषचे विचार आणि त्यावर लोकांनी केलेलं मंथन यावर एक वेगळी बखर लवकरच प्रकाशीत करणेत येईल असं दिसतय

मला वाटत आता या धाग्याचे नाव चेंज करुन "कुमार ऋन्मेष च्या धाग्यांबाबत आणि विचारांबाबत ईतर आय डी आणि अ‍ॅडमीन यांनी काय करावे ? "असे ठेवावे... Lol

आत्तापर्यंत पालक, बालमानसशास्त्रप्रेमी व मुलांमुळे त्रास होणारे लोक याच तीन पार्टी बोलत होत्या. पण मंत्रिमंडळात सगळ्या जातींचा एक-एक मंत्री असावा तसा त्या वात आणणार्‍या मुलांचाही एक प्रतिनिधी (कुमार रुन्मेश) आता इथे आहे Happy

Pages