चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मी फार फार पाप केलं Sad
नो व्यायाम, बाहेरचं खाणं खूऊऊऊउप झालं.
प्रवासात असलं की हे असं का होतं? Sad
आज आता मला व्यायामातून सुट घ्यायची इच्छा होतेय म्हणून मुद्दाम हे इथे लिहितेय.
म्हणजे सुट घ्यायची हिंमत होणार नाही

माझं अजून अर्धा किलो वजन कमी होऊन मी आता ६६.२ वर आहे. आणि फॅट % .५ ने कमी.
आता मी टारगेटच्या बरिच जवळ.
वजन फक्त १.२ किलो ने कमी करायचं आहे आणि फॅट % २ ने.

माझे अपडेट :
१३ : ९/१०
१४: ८/१०
१५ : १०/१०
१६ : १०/१०
१७ : १०/१०
१८ : ९/१०
१९ : ८/१०
२० : ९/१०
२१ : ७/१०
२२ : ७/१०
टोटल : १३०/१५०

स्वानुभवावरून दिवाळी फराळासंबंधी महत्वाच्या टीप्स :

१ . ओळखीच्या ठिकाणी फराळाला गेल्यावर भरलेले ताट आल्यास आधी एखादे रिकामे ताट कमी करण्यास मागवा. अजिबात संकोच करू नका.
२ . घरी किंवा बाहेरही जे पदार्थ आवडत नाहीत ते अजिबात खाऊ नका , उदा : करंजी आवडत नाही , पण ताटात आहे , अजिबात खाऊ नका .
३ . आवड्त्या पदार्थातही १ करंजी खाल्ली तरी तेवढीच चविष्ट लागले किंवा १ वाटी चिवडाही पुरेसा चांगला लागतो , चवीच्या आहारी जाऊन एकावेळी ५-६ लाडू , २ प्लेट चिवडा फस्त करू नका.
४ . आणखी महत्वाचे , फराळ जास्त झाला म्हणून नेहमीचे जेवण कमी करू नका . एक वेळ कार्ब्ज (चपाती , भात) कमी केला तरी चालेल पण भाज्या , फळे अन प्रोटीन्स अजिबात कमी करू नका , त्याने उलटा अपायच होईल.
५ . आणि हो , हल्ल्ली सगळे पदार्थ १२ महिने मिळतात , त्यामुळे आहे दिवाळी म्हणून दे दणका करू नका Happy

केदार मला पण add कराल का ?
सध्या व्यायाम बंद पडला आहे आणि सकाळचे फिरणे पण .उसगावात थंडी आणि पावूस सुरु झाला!
दिवाळीचा फराळ कमीच खाते आहे कारण बनवल्यावर १,२ दिवस खाण्याचा उत्साह असतो मग काय खायचे तेच ते असे वाटते .
उद्यापासून प्राणायाम ,योगा सुरु करते .

सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा Happy (बेताबेताने फराळ करून जमेल तेवढा व्यायाम करून ध्येयापासून ढळू नये ह्यासाठीही ! )
रच्याकने, दक्षे अभिनंदन ! एक प्रश्न विचारू ? तुझ्या उंचीला ६५ हे वजन आयडिअल आहे का ?

२३ : ८/१०
२४: ८/१०
२५ : ७/१०
२६ : ९/१०
२७ : १०/१०
टोटल : १७२/२००

वारंवार केलेली चूक : करंज्या

मी दिवाळित अजिबात फराळ केला नाही. कारण ना कुठे गेले, ना कुणाला बोलवलं. एखादी चकली आणि ४-५ चमचे चिवडा खाल्ला असेल. शेजार्‍यांनी दिलेला फराळ बाईला दिला. ऑफिसात मिळालेली सर्व ड्रायफ्रूटस तशीच आहेत. Happy ८ तारखेला वजन चेक करायचं आहे आता.

मलापण अ‍ॅड करा केदार लिस्टमधे प्लीज. अचानक व्यायाम करावा असं वाटत नाही.२-३ आठवड्यांपासून व्यायाम बंद आहे. चेंज केला तरीपण same filling.काय करू? please help.

अबोली, हे आधी इकडेच वाचलं की कुणीकडे आठवत नाही. पण कुठेतरी वाचलं होतं व्यायाम म्हणून करायचा कंटाळा आला तर एखादं स्पोर्ट्,अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून जे तुला जमेल ते कर जसं पोहणे,दोरीउड्या, तुला आवडणारा मैदानी किंवा घरगुती खेळ ज्याने दमायला होईल. मग काही दिवसांनी पुन्हा जीम वगिएरे सुरू करता येईल. मी मध्ये मध्ये एखादा योगा क्लास वगैरे करते. आमची टीचर विन्यासामध्ये पण दमणूक करून घेते. नाहीतर आजकाल काही लोकं झुंबा करतात ते आहे का तुमच्या आसपास? मला नाचाचं अंग नाही त्यामुळे झूंबा जमला नाही. प्रयत्न करून पहा.

शुभेच्छा Happy

बर्‍याच दिवसांनी आले या धाग्यावर पण एक महत्वपूर्ण अपडेट द्यायला .......

कालच हेल्थ चेकअप झाले.काही रिपोर्ट्स बाकी आहेत, पण ज्या कारणासाठी हा धागा/ग्रुप जॉइन केला होता ते माझं टारगेट अचिव्ह झालंय, कॉलेस्टेरॉल संपूर्ण नियंत्रणात आणि वजनही. तसेच स्ट्रेस टेस्ट खूपच परिणामकारकरित्या पूर्ण केली. स्ट्रेस टेस्ट करवून घेणार्‍या डाँ.नी मला विचारले देखील की तुम्ही रोज काय आणि किती व्यायाम करता?

व्यायाम आणि आहाराचा पॅटर्न ऐकून तेच पुढे चालू ठेवण्यास सांगितले आहे.

धन्यवाद केदार, दक्षिणा आणि या ग्रुपमधील प्रत्येकाला. तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे मी हे करु शकले.

आणि हो एक सांगायचं राहिलं कॉलेस्टेरॉलवरील नियंत्रण हे कोणत्याही औषधाशिवाय फक्त व्यायाम व आहारातील समतोलामुळे आहे. मी कुठलेही औषध घेत नाही.

माझा वॉक सुरू आहे पण मागच्या week मधे बाहेरच खाण खूप झाल... Sad
मागच्या week टोट्ल : ३५/७०
आता ह्या week पासून पून्हा जोमाणे सुरुवात Happy

मस्त आहे धागा :स्मित:.
ज्यांचा सकाळचा ब्रेकफास्ट हा चहा चपाती अनेक वर्षां पासुन आहे.त्यांना जसे हेल्दी प्रकार खाण्याचे अवघड जातात सुरवातीला त्यांतली मी एक होते.तुमच्या धाग्यांमुळे खुप सुधारले आहे. पण व्यायामाचा कंटाळा भोवतो खेळायला अजुनही आवडतं.आता जरा तुमच्या सगळ्यांची प्रेरणा घेउन परत सुरवात करेन.

वजनाचं टारगेट कमी आहे पण हेल्दी राहण्या साठी प्रयत्न सुरु करायचेत .दररोज अपडेट देता आलं नाही तरी अधनं मधनं नक्की लिहीन. Happy

अभिनंदन आशिका.. कीप इट अप!!! Happy

मी ही बर्‍याच दिवसात अपडेट्स दिलेले नाहीत..कारण खाणं,व्यायाम रेग्युलर आहे आणे एवजन सुपर कंट्रोल मधे आहे.. टारगेट अचीव केल्यावर गेल्या महिनाभर काहीच बदल नाही..

या धाग्यामुळे नियमीतपणा वाढलाय सर्वच बाबतीत..आता व्यायामाचा कधीच कंटाळा येत नाही.. हेल्दी डाएट वर भर आहे..

बेकरी प्रोडक्ट्स,फ्राईड स्टफ आर आऊट फॉर एवर

एका मित्राने फक्त हि क्लीप मध्ये जो व्यायम दाखवलाय तो फक्त नित्यनेमाने केलाय.

त्याचे पाच पौंड एका आठवड्यात कमी झाले असे त्याचे क्लेम आहेत.

ईफेक्टीव जॉगींग. मध्ये मध्ये एक मिनिट पॉज घ्यावा कसा ते हि दाखवलेय. पार्टनर असेल तर उत्तम. १:३४ स्टेपला पार्टनर बरोबर असेल तर जाँगिग कसे असावे आहे.
०.२२ मिनिटाने व्यायाम कसा असावा ह्याचे प्रात्यक्षिक सुरु होते.
http://youtu.be/tJBtu5SBq7A

कोणाला फायदा झाला तर आनंदच आहे.
........
............
...................

Happy

झंपी ह.ह.पु.वा.. जॉगिंग करताना असेच दिसत असलो तरीही इथे लिंकवर सिनेमातल्या गाण्यांचा शॉट असेल असे अजिबात वाटले नव्हते... मागे इथे leslie sansone आणि jessica smith च्या व्हिडिओज ची चर्चा झाली होती. त्यामुळे तसे च काही असेल असे वाटले होते.. मला ह्या दोघींचे व्हिडिओज आवडले आणि जमेल तेव्हा मी ते फॉलो करते.. उपयोगही होतोय..

केदार, इथे येणे अनियमित झाले की तोंडावरचा कंट्रोल कमी होतो किंवा खरतर विसरलाही जातोय.. :(.. कोणी कान उपटायला नसते म्हणून असेल..

कालपासून फोनवर www.myfitnesspal.com हे मस्त app टाकून घेतले आहे. खाण्याची डायरी मेंटेन होते आहे त्यामुळे कॅलरीसकट. शिवाय सकाळी ६-७.३० योगासने आणि प्राणायाम.. जोरात आहे एकंदरीत

झंपी.. टेर्रिबल विडिओ Rofl

धागा लपण्याचं कारण हेच आहेसं वाटतंय.. या तो मेंटेन्ड है या फिर कंटाळलेत..

वरून गुर्जी लंबी छुट्टी पर हैं.. Happy

सोनचाफा, अपडेट्स टाकत राहा इकडे, निदान स्वतःचं स्वतः कडे लक्ष ठेवायला पुरेसं होईल..

Pages