चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावसाळा , वजन कमी करण्याचा सगळ्यात मोठा शत्रू आलाय Happy

बाहेर कायम रीपरीप चाललेली असते . त्यामुळे व्यायामाला सुट्टी !

त्यात दिवसातून ३-४ वेळा चहा प्यायची लहर येते . बसून बसून काय करायचे म्हणून गप्पा मारता मारता स्नॅक्स पोटात ढकलले जातात .

तेव्हा रात्र ( अन दिवसही) वैर्‍याची आहे , जागे रहा Happy

केदार, वरील पोस्ट्शी पूर्ण सहमत.. खरच कंटाळा येतोय बाहेर पडण्याचा चालण्यासाठी ह्या रिपरिप पावसात.. Sad घरीच जमेल तेवढा व्यायाम आणि आहारनियंत्रण..

तेव्हा रात्र ( अन दिवसही) वैर्‍याची आहे , जागे रहा.. केदार गुर्जी Lol

चहा झाला का सुरु परत तुझा???

वर्षू नील ,

हम्म्म ... गाडी परत ३-४ चहावर आलीये . कांदा भजी , मिसळ ची फ्रिक्वेन्सी हे वाढतेय . स्वतःलाच इशारा आहे हा .

सायकलमुळे १ तास व्यायाम चुकत नाहीये हेच नशीब Happy

मी दिवसातुन २ कप चहा\ कॉफी घेतेय , फारच हौस वाटली अधेमधे तर ग्रीन टी सुरु केलयं..
मिसळ मी ब्रेफाला खाते कधी कधी .. रोज रात्री जेवणात ओट्स + भाजी + ताक्\कढी ..

सायकल ऑर्डर करायची आहे .. तोपर्यंत योग \ घरीच वॉक!

Hi all...me first post aaj ithe takat ahe...
Vishay agdi jivhalyacha ahe....VAJAN D:
Me barech sankalp kele ani modle pan last 15 days pasun me continue Dr. Kolawale,Pune yani dilela diet and golya ghetey.. ( me mumbait rahate )
Vajan kela nahi ajun...pan khoop halka nakkich vataya
vait evdhach vataty, halu halu sankalp modnar tar nahi na yachi bhiti vatey, mulat maja Bhat ani tikhat padartha he week point ahet, pan last 15 days niyamit diet palat ahe...hope he asach chalu rahil. Tumche comments vachun encouragement milala parat... mhanun hi post takat ahe.

Asawari Sad

आसावरीस,

कीप इट अप . साधारण एक महिना तरी असच सुरू ठेवा , नंतर आपोआप शरीराला सवय होईल अन रिझल्ट दिसू लागल्याने आणखी जोमाने कराल .

आसावरी , कसच्या गोळ्या दिल्यात डॉक ने???जस्ट क्यूरिअस!!!

इथे नॅचरल उपाय करून वजन कमी करण्यावर भर देण्याकरता केदार ने हा धागा सुरु केलाय.बर्‍याच जणांना फायदा ही झालाय. आपलं नॉर्मल जेवण पण लिमिट मधे प्लस रेग्युलर व्यायाम्,वॉक केल्यास वजनात जो फरक पडतो, त्याचा रेट रिलेटिव्हली हळू असतो , पण इट इज फॉर एवर.. Happy (स्वानुभावाने !!!)

Thank u kedar..me toch praytna kartey
Hi varshu..he doc na ayurvedic ahet ani golyana nav nahiyet. tyanich dilelya ahet
Dose asa ahe-
Sakali-
1 yellow Goli - jevna purvi
1 Green Goli - Jevna Purvi

Ratri- 1 yellow goli ratri jevna purvi + Potala lavayla tel ani pot saf honya sathi pawder

ani sobat diet.
Mon-Tue - Sakali 1 Fulka + 1 vati Bhaji same ratri pan
Wed-Thu - Full day only Apple + Kakdi (Kitihi)
Fri - Sakali 1 Fulka + 1 vati Bhaji same ratri pan
Sat -Sun - Full day only Apple + Kakdi (Kitihi)
Divasbharat 5 cup Tea maximum

asa ahe ekun, pan 1 fulka evaji me 2 ante dabyat

he diet karte veli no walk and no exercise.

Pan 15 divsatach farak disayla laglay he matra khara.

Asawari

मी इथल्या सर्वांना सांगेन की कृपया एखाद्या डायेटीशियन ला गाठून तुमचा आहार रेग्युलेट करा आणि त्याबरोबर व्यायाम करा. स्वतःच्या मनाने आहार ठरवरल्याने कदाचित उद्दीश्ट गाठने कठीण होईल. प्लस काही डेफिशियंसी अस्ल्यास ती वाढण्याचा संभव असतो.

तेच ना आसावरी.. हे डाएट रियलॅस्टिक नाहीये. अश्या प्रकारच्या डाएट ने कमी होते वजन भराभरा.. आणी जर्रा रिलॅक्स केलं कि दुप्पट वेगाने वाढते ही.. ( हॅव बीन देअर!! Wink )

पण तू आता गोळ्यांवर खर्च केला आहेस तर चालू दे असंच.. पण मेंटेन करताना मात्र व्यवास्थित न्यूट्रीशिअस जेवणावर भर दे आणी नियमीत व्यायाम इज मस्ट मस्ट मस्ट!!!

बेस्टॉफ् लक Happy

Agadi Barobar ahe Varsha..mala he kaymach shakya nahiye..me lifestyle change var bhar denar ahe..ani ho.. kay khate ani kiti khate he sutra vaparnar ahe.

Dhanyavad

आसावरी ,

तेच ना आसावरी.. हे डाएट रियलॅस्टिक नाहीये. अश्या प्रकारच्या डाएट ने कमी होते वजन भराभरा.. आणी जर्रा रिलॅक्स केलं कि दुप्पट वेगाने वाढते ही.. ( हॅव बीन देअर!! डोळा मारा )
>> +१

दिवसभर काहीही न खाणे खूप घातक आहे . Sad
मी स्वतः २ वेळा जीएम डाएट केलय . परत तिथेच येतो आपण

सध्या एक कलिग प्रोटीन डाएट करतेय . नो कार्ब्स .

तिलाही हेच सांगितलय की कदाचित थोडे चांगले रिझल्ट दिसतील पण दूरगामी परिंणाम चांगले नसतील .

Kedar...agdi barobar ahe...me madhe gym pan join kela hota pan job timings mule khoop khade hot ase...GM diet cha vicharane angavar kate yetat...nusta 1 divas boild bhaji ....kasa possible ahe

प्रोटीन डाएट manje nemka kay asta?

वर आसावरीने सांगितलेल्या सारख्या गोळ्या खरोखर किती काम करतात माहित नाही .
आमच्या इचलकरंजी जवळ कुरूंदवाड मधे एक जण अर्धांगवायूवर औषध देतात . हमखास गुण .
पण अट एकच , पथ्य पाळले पाहिजे , पथ्यामधे नो दारू , नो मांसाहार , नो तंबाखू बिडी, नो वांग वगैरे ..
आता रोगी त्या औषधामुळे बरा होतो की पथ्यामुळे हे सांगायला नको . Happy

मसाला ओटस?>> नका खाऊ. तो दोन मिनिटात तयार होणारा अदार्थ आहे त्यामुळे त्यात सोडीयमची मात्रा जास्त असते.

घरात चालण्यासाठी लेस्ली सॅन्सन चा ३ मैल वॉक करते.
साधारण त्याच लेवल चा अजून कोणाचा आहे का?
तोच तोच पणा आलाय व्यायामात ....

चला एक किलो कमी झालं आहे.. अजून घरी व्यायाम नाही जमत आहे रोजचा.. आठवड्यातून तीन चार वेळा चाळीस मिनिटे वॉक.. रोज एक तास योग.. खाणं थोडंथोडं कंट्रोल करण्यास सुरुवात.. बघुया पुढे काय ते !

जी एम डायट वर जुन्या मायबोलीवर आणि इथे काही लिखाण आहे. लेटेस्ट अनुभव कुणी शेअर करील काय? सुरु करण्याचा विचार आहे. मनोनिग्रह म्हणाल तर हिरवे अथवा वाळलेले गवत देखील बिन मिठाचे खायची तयारी आहे ::फिदी:

Pages