आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? 
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
लोकहो ,
आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया 
खाली आणखी काही पॉईंट अॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया
आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . 
31 August, 2014 - 12:59
१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०
१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल
४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस
थंडीचा व्यायाम ही होत नाही
थंडीचा व्यायाम ही होत नाही आणि सॅलड/फळ खाणं ही नको वाटत.
जुलै ते डिसेंबर - ६५ वरून ६०
जुलै ते डिसेंबर - ६५ वरून ६० वर.(व्यायाम अधून मधून चुकतो, डु नॉट इट मधलं काही खात नाही, हॅव टु इट मधलं फळे खात नाही)
पण आता थंडीत व्यायाम करायला कंटाळा येतोय.)
अजून पाच कि. कमी करायचंय एप्रिलपर्यंत.
लोक्स मला वजन कमी करायचं
लोक्स मला वजन कमी करायचं नाहीये. फक्त पोस्ट प्रेगनन्सी च पोट कमी करायचं आहे. व्यायाम होणार नाही. खाण्यातील बदल सुचवा. प्लीज.
व्यायाम होणार नाही, खाण्यातले
व्यायाम होणार नाही, खाण्यातले बदल सुचवा-
कितीही बदल केलात तरी पोस्ट प्रेग्नन्सी पोट जैसे थे व्हायला व्यायाम आवश्यकच आहे.
पोस्ट प्रेग्नन्सी पोट हे केवळ फॅट नसून फ्लासिड झालेले (सैल पडलेले) मसल्सही आहेत.
ते जागेवर यायला अॅब्ज करणे गरजेचे आहे. काही घरकामातून ते होऊ शकेल पण जर गॅरंटीड रिजल्ट्स हवेत तर व्यायाम हवाच.
केवळ सात ते दहा मिनिटे इतक्या व्यायामावर तीन ते पाच महिन्यात अॅब्जमध्ये लक्षणीय फरक पडतो.
तुमच्या गायनॅकच्या सल्ल्याने व्यायाम चालू करा.
साती अनुमोदन. मी अजून ६६ वर
साती अनुमोदन.
मी अजून ६६ वर अडकले आहे. वजन जरा ही वर जात नाही खाली नाही. फॅट ०.१% ने कमी आहे.
प्लॅट्यू आला असावा
धन्यवाद साती. वजन अजिबात
धन्यवाद साती.
वजन अजिबात वाढलेलं नाहीये. अगदी आधी होते त्याहीपेक्षा बारीक झाले आहे. फक्त पोट आहे. तेही काही इतकं नाहीये. फक्त मला जाणवतय म्हणुन.
बाळ लहान आहे त्यामुळे व्यायमासाठी वेळ नाही हे कारण आहेच. बघेन प्रयत्न करुन.
वर्षू नील वरून गुर्जी लंबी
वर्षू नील
वरून गुर्जी लंबी छुट्टी पर हैं.. स्मित
>> मी इथेच आहे . पण बरेच दिवस कुणी इतर दिसलेच नाही म्हणून मी पण लिहिल नाही .
साती , अभिनंदन पण आता थंडीत
साती , अभिनंदन
पण आता थंडीत व्यायाम करायला कंटाळा येतोय >> हे मात्र खर .
अशावेळी मला व्यायामाची सायकल उपयोगी पडते . रात्री मास्टरशेफ किंवा एखादा चित्रपट बघत एक तास निघून जातो
७ चहा , कॉफी किंवा इतर
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
ह्या ऐवजी मी सरळ मध घेतो मर्यादीत प्रमाणात. साखर बंद.
केदार थंडी त व्यायाम
केदार
थंडी त व्यायाम करायला मला फार म्हंजे फार आवडतं... कडक विंटर मधे इन्डोअर व्यायाम करता येईल..
एकदा व्यायामा ला रूटीन मधे शामिल केलं की ( रादर प्रायारिटी दिली तर) अजिब्बात कंटाळा येणार नाही ,
सतत डोळ्यासमोर ठेवा,' आता होत नसलेले आवडते कपडे..
साती, अभिनंदन.. कीपिटप!!!
ओह, माझं अपडेट राहिलंच की..
ओह, माझं अपडेट राहिलंच की.. ऐच्छिक वजनावर आल्यावर ही गेले दोन महिने कायम आहे त्यावरच.. कारण आता व्यायाम , वॉक आणी नियमीत खाणे यावर पूर्ण कंट्रोल आलाय..
पुन्हा एकदा थँक्स टू केदार चा धागा!!
पुन्हा एकदा थँक्स टू केदार चा
पुन्हा एकदा थँक्स टू केदार चा धागा!! स्मित >>

माबोकर्स , १ जानेवारीपासून
माबोकर्स ,
१ जानेवारीपासून "New Year Resolution" परत सुरू करायचे काय ?
वर इब्लिस म्हणाल्याप्रमाणे आयडीयल टाईम आहे .
व्यायाम करताना घामेघूम होत नाही , पचनससंस्था पण चांगली असते .
त्याहूनही सणवार , सुट्ट्या नसल्याने तोंडावरही बराच ताबा राहतो .
तो क्या बोलते ?
आय अॅम इन
आय अॅम इन
आय अॅम ऑलरेडी इन. गंगेत घोडं
आय अॅम ऑलरेडी इन. गंगेत घोडं न्हात आलंय शेपूट बूडलंय. अख्खं पाण्यात बसलं की पावलंच
मी आयडीयल वजनाच्या बरीच जवळ असल्याने प्लॅट्यू येतोय. फारच निराशावादी वाटतंय.
जरा उपाय सांगा कायतरी यावर.
असं वाटतं तसंही वजन हालत नाही. खाऊ हवं ते.
सेन्या गरम चहा कॉफित मध?
सेन्या गरम चहा कॉफित मध?
चालतो?
आय अॅम ऑलरेडी इन. उद्यापासून
आय अॅम ऑलरेडी इन.

उद्यापासून अपडेट देते.
न्यू यिअरचे रिझोल्यूशन कधीच फुलफिल होत नाहीत म्हणून डिसेंबरातच रिझोल्यूशन करूया.
दक्षे, उकळत्या चहा / कॉफीत मध
दक्षे,
उकळत्या चहा / कॉफीत मध नाही घालायचा. कपात / मगात ओतून घेतला की मग जरा वेळाने छोटा चमचा (प्रमणात) भरून ढवळून घ्यायचे.
रोहन तू येच आता.. तुला फक्त
रोहन तू येच आता.. तुला फक्त मध घातलेला चहा सर्व करते
नक्कीच. आलो की चक्कर होणारच
नक्कीच. आलो की चक्कर होणारच आहे.
रात्री मास्टरशेफ किंवा एखादा
रात्री मास्टरशेफ किंवा एखादा चित्रपट बघत एक तास निघून जातो स्मित
<<
असले उद्योग केले तर दुप्पट जेवण होतं
*
माझ्या व्यायामात खंड नाहीये, त्यामुळे पुन्हा रिझोल्युशन करण्याची गरज नाही. पण व्यायामाचा निश्चय करणार्या सगळ्यांना शुभेच्छा!
*
सस्मित,
सातींनी सांगितलं तसं पोटाच्या स्नायूंसाठी व्यायाम हवाच, तसंच पोस्ट प्रेग्नन्सी दुसरंही कारण असतं. ते म्हणजे कटिबंधाच्या हाडांची लिगामेंट्स शिथिल झालेली असतात. त्यांनाही ठिकाणावर आणणे गरजेचे असते. सबब, व्यायाम आवश्यक.
रात्री मास्टरशेफ किंवा एखादा
रात्री मास्टरशेफ किंवा एखादा चित्रपट बघत एक तास निघून जातो स्मित
<<
असले उद्योग केले तर दुप्पट जेवण होतं << होन असा शो बघितला की जेवन बघुनच भुक लागते.
आय अॅम इन << मी टु, मी टु!!
ओक्के , उद्यापासूनच अपडेट्स
ओक्के , उद्यापासूनच अपडेट्स परत सुरू करू
१ तास सायकलिंग सकाळीच डन १
१ तास सायकलिंग सकाळीच डन

१ सफरचंद , २ अंडी (पांढरा भाग )
गोड , तळलेले काहीही नाही .
रात्रीपर्यंत काही गडबड झाली नाही तर १०/१० आज
इब्लिस/ साती, ऋतुनुसार वजनावर
इब्लिस/ साती, ऋतुनुसार वजनावर होणारा परीणाम याविषयी काही लिहाल का प्लिज?
म्हणजे उदाहरणार्थ थंडीत शरीराला पाणी कमी लागते. तर त्याचा वजनावर काही परीणाम होतो का?
हां, मंजूडी, गुड पॉइंट..
हां, मंजूडी, गुड पॉइंट..
हाऊस गेस्ट्स आहेत सध्या .. कधी कधी रात्री ही.. कार्ब्ज खाणं होतंय... पण व्यायाम आणी वॉक नियमीत असल्याने वजनावर कंट्रोल आहे..
धन्यवाद इब्लिस. बघते. प्रयत्न
धन्यवाद इब्लिस. बघते. प्रयत्न करुन वेळ काढावा लागणारसं दिसतय.
शनिवारी चीजबर्स्ट पिझ्झा चे २
शनिवारी
चीजबर्स्ट पिझ्झा चे २ भाग
२ संत्री , २ अंडी
व्यायाम : ३ तास क्रिकेट
रविवारी
१ केळ , १ सफरचंद , घरी चिकन
व्यायाम : ३ तास क्रिकेट
tumche way kahi pan aaso
tumche way kahi pan aaso darroj 30 minit workout kara.
tyapurvi madam rutuja divekar yanche pustak dont loose out work out jarur wacha.
खूप दिवसांनी आले मा.बो.वर..
खूप दिवसांनी आले मा.बो.वर.. आहाराच्या क्वांटिटी वर कंट्रोल होता पण भरपूर पाहुणे आणि लेकाची आजारपणं ह्यात वॉकिग सुटलं आणि योगाही कधी कधी बुडलं.. आता परत सुरु.. वजन वाढलं ही नाहीए पण कमीही नाहीए अर्थातच ६८ च आहे.. सगळ्यांना इथे बघून छान वाटलं.. उत्साह आला..
साती, अभिनंदन.. वर्षू, आवडते पण न होणारे जुने कपडे समोरच ठेवून आहे..
Pages