चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदारला आणि सर्वांनाच एक प्रश्न- तुमच्या स्वानुभवावरुन फिटनेस अचिव्ह करण्यासाठी डाएट जास्त महत्वाचं का व्यायाम? दोन्ही करायला हवं हे खरंच पण कुठेतरी मी ७० % डाएट व ३० % व्यायामाचं contribution असतं असं वाचलं होतं. म्हणजे डाएट जास्त महत्वाचं असं. पण 'मी काहीही खातो पण व्यायाम करुन पचवतो' असं म्हणणारे लोकही भेटले आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी व्यायाम ७५-८०% व डाएट २०-२५% असेल.

वेदिका.. मला वाटतं हे कॉन्ट्रोवर्शिअल आहे .. दोन्हीत बॅलेंस असणं अती आवश्यक आहे.. नुस्तं डाएट केलं तर मसल लॉस होऊन , चेहरा ओढल्यासारखा आजारी दिसू शकतो..
सर्व खाऊन व्यायामाने पचवणे अ‍ॅटलिस्ट माझ्यासारख्या लो लो मेटोबॉलिजम असलेल्या व्यक्तीला शक्य नाहीये..
आगाऊ टिप.. बेटर स्वतःची बॉडी स्टडी करून प्रयोग कर आणी तुला जे सूटेबल आहे ते कर पण नेट वर वाचून नाही तर योग्य डायटेशिअन चा सल्ला घेऊन..
इथे मी अंजली मुखर्जी टाईप्स चे डायटिशिअन गृहित धरत नाहीये..

वेदिका माझ्या मतानुसार. तु फिटनेस बद्दल विचारते आहेस.
फिटनेस हा व्यायामाने आणि डाएटनेच होतो. तु वाचलेलं प्रमाण सुद्धा योग्य आहे. इट इज ऑल अबाऊट डाएट. मागच्याच भेटीत माझ्या डाईटिशियन ने सांगितलं की योग्य डाएट करून तुम्ही झोपून राहिलात तरी वजन कमी होते. पण व्यायाम करून मी वाट्टेल ते पचवतो हे ओके. पण व्यायाम करून वाट्टेल ते खाऊन वजन कमी होत नाही. वजन कमी करायचं असेल तर खाणं योग्यच असल पाहिजे. जोडीने व्यायाम सुद्धा फिटनेस साठी योग्य.

वर्षु म्हणाली तसं नुसतं डाएट करून चेहरा ओढलेला दिसु शकतो हे मान्य डाएट अयोग्य असेल (नुसते लिंबू पाणी, नुसती फळं वगैरे खाऊन) सो कॉल्ड क्रॅश डाएट केलं तर मसल मास लॉस होऊ शकतो.

मी पण अधिक भर डाएट वर देऊनच वजन कमी केले आहे आत्तापर्यंत. पण खाण्यात फायबर, फळं, प्रोटिन यांचे प्रमाण योग्य असेल तर अशक्तपणा वगैरे येत नाही.

मी १ मैल फिरणे सुरु केले एक आठवडा झाला .
फळ अजिबात खात न्हवती आता १ खाते .
पाठ दुखते म्हणून calcium घेते .
ह्या धाग्यामुळे फायदा झाला .योगा रेगुलर सुरु करायचा आहे .तो सुरु झाला कि लिहिते .
points system जमत नाही .
तेल कोणते चांगले असते .सनफ्लोवर कि शेंगदाणा कि ओलिव्ह ?
जास्त तेल वापरायची सवय बंद करून कमी तेलात भाज्या सुरु केल्या आहेत .

काय खाल्लं तर फॅट लॉस चांगला होईल?>>
boiled egg white or whole.
eat small servings after regular interval

सगळे मला काँप्लेक्स देतात.
काल ४/१०.
शेजारच्या आंटीनी शेपूची भजी आणून दिली ती खाल्ली ४.
फ्रूट सॅलॅड पण दिलं होतं पण ते १ चमचा खाल्लं.

आज नुस्त कान पकडायला कबुलीजबाब आले Sad . मध्ये काही दिवस व्यायाम चालू होता पण आहाराचे गणित काहीही चालू होते. आता इथे नियमित येणार. वजन एक किलो वाढले आहे दरम्यान. पुनश्च हरिओम.

१७/०९/२०१४

९/१०

१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे इ. : १

दक्षिणा, इतकं कच्चं खाऊन गॅसेसचा त्रास होत नाही का?

आणि नुसत्या डाएट कंट्रोलने फॅट लॉस ज्या वेगाने होतोय त्या वेगाने होऊ दे ना... घाई कशाला करायची..
अमूक दिवसांत अमूक इतका फॅट लॉस हे गणित माझ्याच्याने अजिबात सोडवत नाही. बाकी व्यवधानं सांभाळायची तर फॅट लॉसकडे वेगात जाणं शक्य नाही. आपल्या प्रयत्नांत सातत्य राखणं महत्त्वाचं असं मला वाटतं.

१७/०९/२०१४

८/१०

१)व्यायाम : ४ (हे जमतय आत्ता Happy )
२)फळे/भाज्या/सॅलडः ०
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : ०
७)साखर ३ चमचे इ. : १

१५ दिवस हा धागा वाचलाच नव्हता. सातीजी मला वाटतेय प्रत्येकाला त्याचे मार्क्स आणि वजन याचा संबंध नक्किच जोडता येइल.

काल वेइंग मशिन आणले. स्केनॉल चे आहे. डिजिटल. २००० ला पडले. इथे वाचुन साधे घ्यायचे ठरले होते ११०० चे पण बरोबर आलेले डॉ म्हणाले डिजिटल घेतले तर बच्चुचे पण वजन चांगले करता येइल.

वेदिका ,
केदारला आणि सर्वांनाच एक प्रश्न- तुमच्या स्वानुभवावरुन फिटनेस अचिव्ह करण्यासाठी डाएट जास्त महत्वाचं का व्यायाम? दोन्ही करायला हवं हे खरंच पण कुठेतरी मी ७० % डाएट व ३० % व्यायामाचं contribution असतं असं वाचलं होतं. म्हणजे डाएट जास्त महत्वाचं असं. पण 'मी काहीही खातो पण व्यायाम करुन पचवतो' असं म्हणणारे लोकही भेटले आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी व्यायाम ७५-८०% व डाएट २०-२५% असेल.

>> माझ्या मते ५० -५० % . उगाच जंक फूड खात राहिल आणी २-२ तास व्यायाम करत राहिल तरी चूक अन व्यायाम न करता खूप कमी खाणही चूक .
आपल्या तक्यातही ते ६०-४० आहे Happy

मंजूडे प्रोटिन आणि कच्चं खाऊन गॅस होतात ना. पण प्रमाण खूप कमी आहे त्या मानाने.
बाकी बरोबरिल ओवा असतोच नेहमी.

आणि अगं गाडी थोडी पुढं जायला धक्का हवाय. वजन अडकलंय एकाच ठिकाणी. म्हणून.

मंजूडे प्रोटिन आणि कच्चं खाऊन गॅस होतात ना. पण प्रमाण खूप कमी आहे त्या मानाने.
बाकी बरोबरिल ओवा असतोच नेहमी.

आणि अगं गाडी थोडी पुढं जायला धक्का हवाय. वजन अडकलंय एकाच ठिकाणी. म्हणून.

Mi 2 kg overweight aahe. Te kahi kelya badalat nahi last 5/6 years tech aahe. Barech hectic zale ter tevdyapurte kami hote pun parat same. Maza problem weight nasun pear shape aahe

१७/९
३/१०

१८/९/२०१४
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. : १
७)साखर ३ चमचे इ. : १
एकूण-६/१०..............

Manisha dont concentrate on your weight. it is just a number.
just check your fat% v. fat, muslce mass etc. try to work on thse levels.

१८/९/२०१० ८/१०

१)व्यायाम : ३
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :०
७)साखर ३ चमचे इ. : १

१८/०९/२०१४

८/१०

१)व्यायाम : ४
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :०
५) बाहेरचे खाणे :१
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :०
७)साखर ३ चमचे इ. : १

१९/९/२०१४
१)व्यायाम : ०
२)फळे/भाज्या/सॅलडः १
३)प्रोटिन :१
४)नो बेकरी प्रॉडक्ट्स :१
५) बाहेरचे खाणे :०
६) रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे इ. :०
७)साखर ३ चमचे इ. : १
एकूण-४/१०..............

Pages