चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं वजन ६६.६ वर अडकलं होतं ते फायनली हाललं. ६५.९ झालंय.
डाएट व्यवस्थित सुरू आहे. डिसेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात थोडी ढिलाई केली होती पण फळं, लिंबु पाणी आणि नुसतं पाणी आणि सॅलड याला फाटा दिला नव्हता. त्यामुळे वाढलं नाही. टारगेट च्या फार जवळ असल्याने गाडी फारच हळू हळू पुढे जातेय.
मी अगदी वजन इंचा इंचाने लढवतेय Happy

आता फॅट % फक्त २ ने कमी करायचं आहे. ते झालं की वजन किती का असेना मी फुलस्टॉप करणार.

रोज काय व्यायाम गरजेचा आहे नक्की कळत नाहिये..
४-५-६ सूर्यनमस्कार, १०-१५ उठाबशा, ३-४ मिनिट श्वसाचा व्यायाम,
वार्म अप सारख थोड बेंडिंग, ई. पिंगा घातल्या सारखा पाठिचा व्यायाम..
हे सगळ २०-२५ मिनिट करत आहे..
सगळच थोड थोड होतय का?
काही सिक्वेन्स हवा का?

कसे आहात सगळे?
या धाग्यावर काहीच अपडेटस येत नाहीयेत.
सर्वांचा व्यायाम व संतुलित आहार चालू असेलच.
माझाही आहे.
अर्धा तास ब्रिस्क वॉक बरोबर सूर्यनमस्कारांची भर घातलीये. हळूहळू वाढवत सध्या रोज ८ घालते.
रविवारी सुट्टी.

वजनाचं काही खरं नाही.
काम वाढलं की बकाबका खावंसं वाटतं. घरचाच वरणभात पण जास्तं खाल्ला की वजन वाढतंच.
रात्री कामामुळे उशीर झाला तर सकाळी उठणे, व्यायाम, सायकलिंग सगळे त्यादिवशी होत नाही.
६०वरून ६५ आणि आता परत ६३ असा सध्याचा स्कोअर आहे.
आज पुन्हा सुरूवात केलीय म्हणून इथे पोस्ट टाकली.
Wink

जंक फूड न खाणं ही एकच गोष्टं नव्वद टक्केहून जास्त वेळा पाळायला जमली.
बाकी सगळी मजाच मजा.

लोकहो, मला प्रोत्साहन द्यायला आपापले अपडेट द्या.

वजन कमी करणारांनी मध घेऊ नये. मध म्हणजे कॉन्सेन्ट्रेटेड साखरच जवल जवळ. त्यातील बाकी औषधी गुण वगळता. एक टे स्पू मधात ६४ कॅलरीज असतात ज्या जाळय्ला तुम्हाला १७ मिनिटे चालावे लागते. १ टे स्पू साखरेत ४६ कॅलरी असतात....
http://www.benefits-of-honey.com/calorie-in-honey.html

Although honey is a fattening food, it does provide some nutritional benefits lacking in white sugar. Honey does contain vitamins including niacin, riboflavin, thiamin and vitamin B6. But honey contains only traces of these minerals, and honey alone won’t help you meet the USDA’s recommended daily standards. These trace vitamins might make honey a slightly better choice than white sugar, but it’s still not a health food. Although numerous websites claim honey to be some kind of miracle food, most of these claims are mythical and unfounded. Remember, honey only contains 2% vitamins.

hello all,
pregnancy nantar wajan kas kami karaw /?
maz pot ajun tasach rahil aahe ,,
aani leki mule wel kami milato wyayamala ,... Sad

सुरूवातीला कधीतरी इथे लिहीलं होतं म्हणून आताही इथेच लिहीते.
बाळ झाल्यानंतर वजन एवढं वाढलं होतं की आता बहुधा परतीचे दोर कापले गेले आहेत असं वाटून मी हताशच झाले होते. कितीही आटापिटा केला तरी दहा वीस किलो वजन कमी कसं करणार असं वाटायचं. प्रेगोत प्रचंड गोड खाल्लेलं लिटरली अंगाशी आलं होतं. तरी गोड खायची हुक्की काही संपत नव्हती. भात तर सोडणे अशक्य. मेरा कुछ नही होगा असं वाटत असतानाच हा धागा, अगो, दक्षिणाच्या सक्सेस स्टोरीजने हुरूप आला. आहारावर कंट्रोल केला. पहिले पाच सहा महिने काही वेगळा व्यायाम करणे शक्य नसल्याने बसमधून तीन चार स्टॉप अलीकडे उतरून चालत जायचे. पाठीवर laptop चे ओझे आणि बाळाला बघायची ओढ यामुळे आपसूकच भरभर चालणे व्हायचे. पण फरक काही दिसत नव्हता. मग सकागळी जिम लावले. ते कसेबसे तीन महिने होतेय.तोवर पुढे तीन महिने अॉफिसचे ट्रेनिंग लागले. जिम बंद. चालणे बंद. मग कामात इतकी गुंतले की वजन कमी करणे हा इश्यूच वाटेना. घरी काम, घरातून बाहेर पडताना काम, अॉफिसात काम, घरी गेल्यावर घरचे काम. खाण्यावर बारीक नजर नव्हती पण " तिरपा कटाक्ष भोळा" होता. पण खाण्याचे प्रकार व प्रमाण दोन्हीत फरक पडला होता. अचानक या महिन्यात अनेकांनी मी पुन्हा पहिल्यासारखी बारीक दिसू लागल्याची पावती दिली. गेल्या सहा महिन्यात वजन बघायलाही वेळ झाला नसल्याने मी वेड्यासारखं "हो का? थँक्यू" म्हणत होते. Proud ड्रेसही आधीचेच ढगळे गबाळे वापरत होते. परवा वजन चेक केलं, तर फक्त तीन किलो दूर आहे मूळ वजनाच्या. आणखी स्लिम दिसायचं असेल तर सहा किलो!
तर, इथे मिळालेल्या सर्व सल्ले, मोटिव्हेशनसाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद!

सकाळी एकदाच चहा घेत आहे.. नंतर आजिबात नाही..
संध्याकाळी ग्रीन टी घेत आहे..
सकाळ्च्या चहा ऐवजी दुध+थोडी साखर घ्यायचा विचार आहे..
दुध नुसत जात नाही मला म्हणुन बोर्नव्हिटा/कॉम्प्लॅन टाईप काहितरी थोडस टाकुन प्यायचा विचार आहे..

काय करु ? दुध+थोडी साखर+बोर्नव्हिटा/कॉम्प्लॅन ह्या कॉम्बोमुळे वजन उलट वाढेल काय?
प्लिज मदत करा..

परवा वजन चेक केलं, तर फक्त तीन किलो दूर आहे मूळ वजनाच्या. आणखी स्लिम दिसायचं असेल तर सहा किलो!

>> अभिनंदन आशूडी , कीप इट अप Happy

दुध+थोडी साखर+बोर्नव्हिटा/कॉम्प्लॅन ह्या कॉम्बोमुळे वजन उलट वाढेल काय?

>> अजिबात घेऊ नका . बोर्नव्हिटा/कॉम्प्लॅन यांचा तसा काही फायदा नाही , अन खूप कॅलरीज ही असतात .

ग्रीन टी , किंवा कमी साखरेचा चहा , किंवा बिन साखरेची कॉफी ट्राय करून पहा Happy

अरे व्वा.. आशूडी.. मस्तं गं.. कीपीटप!!! Happy

माझ्याजवळ अपडेट्स द्यायला अ‍ॅज सच काही नाहीये.. हां पण रेग्युलर वॉक आणी लिमिटेड खाण्यामुळे गेल्या कित्येक महिन्यात ५० ग्राम पण वाढलं नाही वजन.. काही महिन्यांपूर्वी माझं टार्गेट अचीव झालंय Happy

व्यायामाला परत सुरुवात केलीये.
२ किलो कमी झालंय सध्या
अजुन ८ किलो Uhoh
होईल होईल ... नक्की होईल!
उद्यापासून डाएट प्रॉपर घ्यायला सुरुवात करणार

अजिबात घेऊ नका . बोर्नव्हिटा/कॉम्प्लॅन यांचा तसा काही फायदा नाही , अन खूप कॅलरीज ही असतात .

ग्रीन टी , किंवा कमी साखरेचा चहा , किंवा बिन साखरेची कॉफी ट्राय करून पहा
>>>>>
धन्यवाद केदार.. Happy

फक्त कंसिस्टन्सी महत्वाची हे लक्षात ठेव .
>>
येस
सध्या उतरतं वजन बघुन मस्त वाटतंय Happy
फॅट्स पण तितक्याच स्पीड ने कमी होईला हवेत.

फक्त एक थांबा आला मधे की डळमळायला नकोय इतकंच

फक्त एक थांबा आला मधे की डळमळायला नकोय इतकंच >> महिनाभर केलस ना की सवय होईल , मग व्यायाम चुकला किंवा अति खाल्ल तर स्वतःलाच कसतरी वाटेल Happy

व्हीट फ्लेक्स ट्राय करत आहे..
दुधात घालुन खाण्यापेक्शा अजुन कस खाता येतिल?
दुधा बरोबर जात नाहियेत..
नुसते खल्ले तर चाल्तिल का?
नुसते ड्राय खाणे बर वाटतय..
मदत..

प्रचंड घामाने हैराण झाल्यामुळे, वॉकिंग पूर्ण बंद आहे.बाकी फार काही नाही.पण १५ मिनिटे योगासने + रोज एक फळ + संध्याकाळी फरसाण,शेव एकदम बंद केले.समोसा काही महिन्यांनी खाल्ला.४ किलो कमी झाले.

ग्रीन टीचा काही फरक पडतो का? मा.बो.वर ग्रीन टीचा धागा वाचून हा प्रकार काय आहे ते पाहू म्हणून आणला.सुरुवातीला आवडला नाही.पण नंतर आवडल्यामुळे तो पितेय.वजन कमी होण्याशी संबंध असेल का?

ग्रीन टी चा मेटॅबोलिझ्म वाढवण्यासाठी उपयोग होतो. चहा कमी करण्यासाठीही मला ह्याचा उपयोग झाला.

कमी करायची वेळ येऊ न देण्यासाठी सध्या मला मुळात वजन वाढू न देणं गरजेचं होऊन बसलंय! Proud
नुसता आराम नि खादंती चालू आहे! व्यायाम शून्य! Uhoh

आशूडी, अभिनंदन Happy

_आनंदी_,जर अ‍ॅसिडिटी होण्याची प्रवृत्ती असेल तर सकाळी चहा, कॉफी घेण्यापेक्षा दूध घेणे केव्हाही चांगले.
रुम टेंपरेचरपेक्षा किंचित गार दूध ( थंडगार नको ) काहीही न घालता नुसतेच पिऊन पाहिले आहे का ? मला दुधाचा वास आणि चव अजिबात आवडत नाही पण ह्या पद्धतीने पिऊ शकते ( तरी दुधाचा वास आणि चव दोन्ही घेत नाही. घटाघट दूध संपवून वर लगेच काहीतरी खाते चव घालवायला )
अशा पद्धतीने दूध पिऊन मग वर ड्राय व्हीट फ्लेक्स खाऊ शकता Happy

Pages