चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे यायला सुद्धा लाज वाटत होती.. कमी झालेलं वजन पुन्हा पूर्वपदास आलं आहे.. Sad व्यायाम, योग दोन महिने बंद आहे.. Sad आहार पूर्वपदावर आहे..:( बोजडपणा आल्यासारखं झालं आहे.. आळस आहे.. काय करावे ? कसे करावे ? काही कळेना,, बाssई !! उद्यापासून परत सुरु करते सगळे हळू हळू..

सोनचाफा ,
होत अस Happy वजन कमी करण्याइतकच किंवा त्याहीपे़क्षा ते परत वाढू न देण अवघड असत . मी स्वतः ७८ नंतर ८५ गाठून आलोय .
काही प्रॉब्लेम नाही . पुन्हा सगळ सुरू करा . यावेळी आपोआप सेल्फ कंट्रोल जास्त असेल .

सोनचाफा, केदार,

माझपण असचं झालंय. ८८ वरून छान ८० पर्यंत उतरलं, मग फिस्कटल आणि परत गाडी ८८ वर. आता ८३ वर आणलीय. पण यंदा पंचाहत्तरी गाठल्याशिवाय थांबायचं नाहीच अस ठरवलंय.

बघूया कितपत संकल्प यशस्वी होतो Happy

बाकी, मार्क सिस्टम पुन्हा सुरु करायची का?

थँक्स केदार आणि अनिरुद्ध, प्रोत्साहनाची गरज होती.. मार्क्स सिस्टिम चालेल काय धावेल सुद्धा पण इथे येणं रोज् होतच असं नाही ना Sad

सोनचाफा, केदारने वर सांगितलेच आहे.पण माझा अनुभव शेयर करते.गेले दीड-महिना फिरणे नसूनही फक्त आहारावर(शेव, फरसाण्,समोसा) नियंत्रण ठेवले.त्याऐवजी आवर्जून फळ खायची. माझे ४ किलो वजन कमी झाले आहे.यादरम्यान मला तेलकट खावे वाटले तर खायची.
अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

मार्क सिस्टीम साठी मी तरी कायम तयार आहे . माझे रोज चालू असतेच.
इन फॅक्ट , त्या सिस्टीममुळे सेल्फ कंट्रोल राहयला प्रचंड मद्त होते .
"आजचा दिवस चालत " या मोडमधे आपण जात नाही Happy

देवकी, लक्षात ठेवीन.. खरं तर तोंडावरचाच ताबा थोडा जास्तं सुटला होता म्हणून झालं हे सगळं.. आंब्याच्या मोहाला बळी पडले ह्यावर्षी Sad मलाही किमान दहा किलोचा पल्ला गाठायचा आहे.
केदार, इथे येऊन गेल्यापासून व्यायामाला सुरुवात केली परत.. ह्या वेळेस जास्त कंट्रोल ठेवेन सगळ्यावर. Happy
गोड कमी किंबहुना नाहीच, व्यायाम रोजचा, कडधान्ये इन, तळलेले आउट...

ऑल द बेस्ट सोनचाफा . Happy

आंबा हे मोहाच क्लासिक एक्झाम्पल आहे . "खाऊन घेऊया की . वर्षातून एकदाच तर येतो" Happy

मला आंबा फार आवड्तो.पण मी या वर्शी आपोआप कमी खाल्लेत आंबे आमरस तर नाहीच.कारण गेल्या चार महि
ण्यात फार टेंशनमधे गेलेत आधीचे वजन थोडे कमी झाले .टेंशन मधे नक्की वजन कमी होते का वाढते? क्रुपया माबोवरील अभ्यासु डॉ आणि आहार तज्ञ यांनी प्रकाश पाडावा. Happy

पण आता या दिवसांत परत आपोआप अरबट चरबट खाउन वजन वाढतय काल घरी माझ्यासाठी आईस्क्रीम आणले होते माझहे फेवरेट आणि मग मी अक्खी डैरी मिल्क खाल्ल्ली आता गिल्ट येतय. आणखी मला वेळेवर न जेवण्याची लहानपासुनच सवय आहे.मी रात्रीचे कधीही जेवते. राग आला तर मुद्दाम जेवतच नाही मग घरचे बसतात मस्का मारत सिनु जेव आता.नायतर सेंटी मारत बसतात.माझा मोठा दादा माझे हे असे फाजील लाड करतो की बस वजन कमी व्हायचे नावच होत नाही त्यात अजुन हेरीडेटली मधुमेह आहे. अजुन नाही पण फॅमीली डॉ म्हणाले होते तु आधीपासुनच दक्षता घे.पण मी नाही काही सगळच ऐकत त्यांचं कधी कधी पर्सनल्ली आय हेट डॉ ,पण इथले डॉ साती फार छान समजावुन सांगतात. Happy काउ , इब्लिसजी आणि केतकी यांचे सुधा सजेशन्स आवडतात शेवटी हेल्दि खाल्ल्लं की स्कीन पण फ्रेश राहते.असं आपलं मलाच फील होतं .

केदार मी तुम्हाला एक विचारु मला आता पावसाळ्यात अजीबात व्यायाम करावासा वाटत नाही .पण वजन झपाट्याने वाढतय .काही उपाय.फार आळशी आहे मी एकदा पी सी वर बसले की माझा आपोआप मोदक होतो.';गणपतीचा" अनुमोदक नाही Proud

प्लिज माझ्या जुन्या विपुचे उत्तर द्याल का? सायकल वाली प्लिज माझहे वडिल अजीबात ऐकत नाहीत.त्यांना मधुमेह असल्याअमुळे दिसायचा हल्ल्ली फार ताण पडतो ते ६४ च्या आसपास आहेत.मला त्यांची फार काळजी वाटते.त्यांना ही योग्य डाएट मी सुचवतेच ,पण तुमच्या या धाग्याचा फार चांगला उपयोग होतो केदार जाधव . Happy

आशुडी, मस्त वाटलं वाचून. अभिनंदन!
तुझ्या बोटित मी पण. मला उंचीनुसार ५७ चा पल्ला गाठायचाय आणि अजून मी ६ किलो दुर आहे Sad
रोज सकाळी व्यायाम, फळं वगैरे नीट सुरू आहे पण फ्राईड खाण्यावर कंट्रोल होत नाहिये Sad

नमस्कार सिनि ,

तुमच्या विपूत लिहीता आले नाही म्हणून येथे लिहितोय .
कुठलीही मॅग्नेटीक सायकल घेऊ शकता . ८ -९००० पासून पुढे मिळते .

आजकाल ओएलेक्स किंवा क्विकर वर अगदी कमी वापरलेल्या सायकल्स मिळतात . आरंभशूरांची कमतरता नाहीये Happy
माझ्या बहिणीलाही तशीच घेतली आहे . बर्याच कमी किमतीत मिळू शकते.

केदार, आंब्याचं खरं आहे.. खरंतर मी रोज अर्ध्या आंब्यच्या वर नाहीच खाल्ला.. तोही रिकाम्या पोटी किंवा कामं केल्यावर कारण मला माहित होतं वजन वाढेल हमखास म्हणून पण गेल्या वर्षी अजिबात खाल्ला नव्हता म्हणून ह्या वर्षी मोहाला बळी पडले असं म्हटलं मी..
सुटीत सारखे पाहुणे, त्यांना आवडतील अशा पद्धतीने (!!!!) बनवलेल्या भाज्या/आमट्या, नाश्ते (चमचमित !!) फिरणं त्यामुळे बाहेरचं खाणं, व्यायामाला बुट्ट्या ह्याचा परिणाम आहे सगळा.. आता नॉर्मल लाईफ सुरु झाल्यावर तेलावर हात आपोआप कमी, पोर्शन कंट्रोल, रोज कोणता तरी व्यायाम चालू आहे.. बरं वाटतय.. Happy

खरंतर मी रोज अर्ध्या आंब्यच्या वर नाहीच खाल्ला >> बाप्रे !! मी डझनाने मोजलेत Proud .. डाएटची वाट लागलीच होती म्ह्णुन खाल्ले..
सगळं वेळापत्रक गडबडलयं.. आता मुहुर्त बघणार परत डाएट सुरु करायचा Angry

चनस, मुहुर्ताचं सोड.. सगळं एकत्रित जमायला थोडा वेळ लागतोच.. जी गोष्ट जशी जमेल तशी आजपासून सुरु कर.. आजच्या पेक्षा योग्य वेगळा मुहुर्त नसतो..

चनस, मुहुर्ताचं सोड.. सगळं एकत्रित जमायला थोडा वेळ लागतोच.. जी गोष्ट जशी जमेल तशी आजपासून सुरु कर.. आजच्या पेक्षा योग्य वेगळा मुहुर्त नसतो.. > + १

आंब्याचं खरं आहे.. खरंतर मी रोज अर्ध्या आंब्यच्या वर नाहीच खाल्ला.. तोही रिकाम्या पोटी किंवा कामं केल्यावर कारण मला माहित होतं वजन वाढेल हमखास >>>>> ___/\___ . देवा! आंबा खाताना वजन वाढेल वगैरे चिंता करू नये. वर्षाकाठी एकदा मिळणारा आंबा,बाजारातून नाहीसा होईपर्यंत खाऊन घ्यायचा.

देवकी, आंबा खाताना वजन वाढेल म्हणून चिंता नाही केली.. खाण्यापूर्वी कापताना केली.. Proud
आणि ज्यांचं वजन गरजेपेक्षा जास्त आहे आणि जे प्रयत्नपूर्वक कमी करु इच्छितात त्यांनी विचार केलेला नक्कीच वाईट नाही. त्यातून मागे सातीताईंनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीच्या अतिरेकाने वजन वाढते मग तो वरण-भात का असेना.. हे पूर्ण खरं आहे. घरातच अनुभव आहे.. सा.बा., दीर सग़ळेच कधी पुन्हा आंबा खायला मिळेल की नाही अशा प्रकारे आंबे हाणतात आणि दर वर्षी भरपूर वजन वाढवून घेतात.. त्यामुळे त्यांच्या बोटीत चढायची माझी तरी ईच्छा नसते. Wink

सा.बा., दीर सग़ळेच कधी पुन्हा आंबा खायला मिळेल की नाही अशा प्रकारे आंबे हाणतात आणि दर वर्षी भरपूर वजन वाढवून घेतात>>>>>>>> माझ्यासारखे आहेत म्हणजे कुणीतरी,हुश्श.
तुम्ही खाण्यावर नियंत्रण ठेवता हे कौतुकाचे आहे.कीप इट अप.

,'आंबा खाताना वजन वाढेल म्हणून चिंता नाही केली.. खाण्यापूर्वी कापताना केली. सोनचाफा.. Rofl

देर आये दुरुस्त आये.. Wink हे ही नसे थोडके..

देवकी .. मी पण आहे तुझ्या बोटीत ... आंबे खाल्ले पण बाकी खाणं कमी केलं .. Happy
बाकी कंट्रोल सुरु करतेय पण व्यायामाच गणित नाही जमलं .. सकाळी उठतं नाही लवकर नि ऑफिसमधुन घरी जायला उशीर होतो Sad

आंब्यातलं फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरात जायलाच हवेत. रोज एक आंबा खायला हरकत नाही, पण आंबा किंवा आमरस पोळी/पुरीबरोबर खाल्ला तर कॅलरीचा बाँब!! त्यामुळे आंबा सकाळी खाणं चांगलं. नाश्त्याला एक अख्खा हापूस आंबा खाल्ला (फक्त आंबाच, इतर काहीही नाही) आणि दिवसभरात बाकी डाएट आणि व्यायाम सांभाळला तर अजिबात वजन वाढत नाही.

मंजूडी ,

आंब्यातलं फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरात जायलाच हवेत. रोज एक आंबा खायला हरकत नाही, पण आंबा किंवा आमरस पोळी/पुरीबरोबर खाल्ला तर कॅलरीचा बाँब!! त्यामुळे आंबा सकाळी खाणं चांगलं. नाश्त्याला एक अख्खा हापूस आंबा खाल्ला (फक्त आंबाच, इतर काहीही नाही) आणि दिवसभरात बाकी डाएट आणि व्यायाम सांभाळला तर अजिबात वजन वाढत नाही.

> +१

आंब्यातल्या कॅलरी अन इतर फळातल्या कॅलरीत फारसा फरक नाही , पण दूध अन साखर घालून केलेला आमरस अन आज २ हापूस अन १ पायरीच खाल्ला फक्त याने सगळा घोळ होतो . Happy

ह्म्म ! आंब्यांच्या बाबतीत वरचे सगळे मुद्दे पटले..
आमच्याकडे आंबे ताट भरून कापून घेतात आणि नाश्त्याबरोबर किंवा जेवणानंतर खातात.. बरोबर व्यायामाचा अभाव असतोच जोडीला.. Lol त्यामुळे कोणाला वजन खात्रीशीर वाढवायचे असेल तर हा उपाय सुचवेन मी Wink !
रच्याकने, आजपासून योग सुरु.. आता चालणे सुरु करायचे आहे. बेळगावी गारठली आहे. बाहेर चालणं नको वाटतय त्यामुळे सॅन्सन बाईं झिंदाबाद ! Happy

प्रत्येक सिझन मधे येणारी फळेखावीच, त्यामुळे आंबा हा खाल्लाच पाहिजे . अश्यावेळी बाकीचे डाएट संभाळणे उत्तम>>>> माझ्या डायटशियेनेही हाच सल्ला दिलाय

ओह, हे आमरस पोळीचं माहीत नव्हतं. सध्या रोज तेही रात्री चालू आहे! Uhoh सगळं जेवण करून मग नुसता वाटीभर आमरस चालेल का? पोळी नाही बुडवणार Proud
मी पण आता पुन्हा तुमच्यासोबत. आणखी स्लिम झाले तर वाईट नाही वाटणार. वेगळा व्यायाम शक्य नाही पण आहारनियंत्रण करणार.

Pages