चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वजन ७४ वरून ६९.२ दीड महिन्यात. व्यायाम काही नाही. स्पेशल डाएट नाही, आपला चौरस आहार फक्त वेळच्या वेळी आणि पंधरा दिवसाची लडाखची ट्रिप. भरपूर चढणं उतरणं. खूप मस्त वाटतय माझं मलाच.

अरे मला व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर अ‍ॅडा की,,

बर्याच दिवसानी आलेय इथे. ऋजुता दिवेकरच पुस्तक वाचल काही दिवसापुर्वी.
इथल हेडर वाचून एक प्रश्न पडला आहे.
इथे ' (फळात केळ्/चिक्कू
कमीतकमी ठेवा) ' अस लिहिले आहे.ऋजुताने रोज सकाळी एक केळ खा अस म्हटल आहे . फिलिंग कन्फ्यूज्ड

बर्याच दिवसानी आलेय इथे. ऋजुता दिवेकरच पुस्तक वाचल काही दिवसापुर्वी.
इथल हेडर वाचून एक प्रश्न पडला आहे.
इथे ' (फळात केळ्/चिक्कू
कमीतकमी ठेवा) ' अस लिहिले आहे.ऋजुताने रोज सकाळी एक केळ खा अस म्हटल आहे . फिलिंग कन्फ्यूज्ड

जिम ला जान्या अधि वजन ६५ होते पन नन्तर १५ दिव्सानि ६८ आता १ महिन्याने ६७ झाले असे का ?
जिम नन्तर काय खावे कारण मि रान्नि ८ ला जाते आनि १० ला येते??

माझे अपडेट :
८ : १०/१०
९: १०/१०
१० : ८/१०
११ : ८/१०
१२ : ७/१०
टोटल : ४३/५०
वारंवार झालेली चूक : चहा Happy

ऋजुताने रोज सकाळी एक केळ खा अस म्हटल आहे >>
मी ते पुस्तक वाचलेल नाही , त्यात इतर वेळी काय खाण दिलय हे मला माहित नाही Happy
पण केळात रिलेटीव्हली जास्त कॅलरी असतात म्हणून ते कमी खा (खाऊ नका अस नाही ) अस लिहिल होत .

माझे अपडेट :
८ : ७/१०
९:९/१०
१० : ८/१०
११ : ८/१०
१२: ४/१०
टोटल ३६/५०

४० बीएस >>> मला please या ग्रूप मधन काढून टाकाल का? ग्रूप छान आहे पण सद्ध्या मला possible नाही. सगळ्यांना शुभेच्छा!

केळ्यात पॉटॅशियम असतं आणि इतरही अनेक काही महत्त्वाचे इन्ग्रेडियण्ट्स. शिवाय केळं चिकू ह्यात असलेली नैसर्गिक शर्करा शरिराची झीज भरून यायला खूप्प महत्त्वाची.

तूप हे मेंदूसाठी सर्वात महत्त्वाचं. अशा फॅट्स मधूनच मेंदूला पोषण मिळतो. (तळलेल्या पदार्थातही फॅट्स असतात पण त्यातले पोषक पदार्थ संपलेले असतात.) शिवाय प्रोटीन्सचं पचन होण्यासाठी फॅट्स आवश्यक असतात.

पण केळं चिकू ही फळं शक्यतो वर्क ऑट सोबत खावीत किंवा सकाळी उठल्या उठल्या जेव्हा पोट आठ - दहा तासाचे रिकामे असते. त्यामुळे वजन वाढणार नाही उलट त्यातले पोषक पदर्थ शरीरात नीट अ‍ॅब्सॉर्ब होतात आणि अ‍ॅसिडिटिचा त्रास कोणाला असेल तर कमी होतो. पण आपल्याकडे मोस्ट डाएटीशियन्स हे असे नीट समजवून सांगत नाहीत. आणि सांगितले तरी लोक तसेच्या तसे फॉळो करत नाहीत. आणी वेळे अवेळी फळे खाऊन इन्शुनिल इम्बॅलन्स होऊ शकतो. त्यामुळे जास्त साखर असलेली फळे जसे की केळे. चिकू सीताफळ ही खाऊ नका असे म्हटले जाते.

अजूनही लिहिण्यासारखे बरेच आहे ...

जाई., जेव्हा तुम्ही ओव्हरवेट असता, आणि वजन कमी करायच्या मार्गावर असता त्यावेळी 'केळी, चिकू, आंबा, सिताफळ, फणस, बटाटा, सुरण, छोले, भात स्ट्रिक्टली वर्ज्य' करणे योग्य असते.
तुमचा बीएमाय व्यवस्थित असेल तर सगळ्या गोष्टी प्रमाणात खायलाच हव्यात. तरच सगळ्यांतले विविध पोषक घटक तुमच्या शरीरात जातील.

धन्यवाद केदार !
हो अदिति ! तिने एक चमचा तूप खाण्यास हरकत नाही अस म्हटल आहे खर . पण रोज खायला धाडस होत नाही हे ही खरेच Lol मला वाटत सर्व खाव पण थोड्या प्रमाणात .

केदार , तुम्ही दिलेल्या सूचनामध्ये आणि ऋजूताच्या सूचनामध्ये फारसा फरक नाही. तिनेही चहा कॉफ़ी कमी करा . दोन खाण्यामध्ये जास्त वेळ नको , फ़ळ , चौरस आहार , थोड थोड खाण, आणि सर्वात महत्वाच म्हणजे व्यायाम हे सांगितले आहे. मला ते आता पटल आहे . फॉलो करायचा जमेल तसा प्रयत्न चालू आहे .

Those who are on weight loss program, make sure you eat something every 2 hrs during the day.
This is to avoid the acidity. As you might have reduced ur diet, u may encounter acidity problems.

Specially between 2 PM to 8 PM.

Easy and best way is to eat almonds. At least 4 almonds every 2 hrs will help you feel full stomach and wont increase the calories as well.

This is based on personal experience.

बर्याच दिवसात अपडेट दिले नाहीत.
अडीच महिन्यात तीन किलो वजन कमी झालेय.
तरी फळे खात नाही, भाज्या खूप खातेय.
रात्री लवकर जेवणे इथे अपडेट देणे सोडल्यावर एकदाही जमले नाही.
व्यायाम आठवड्यातून दोन-तीन वेळाच होतोय.

नमस्कार माबोकर,

नमस्कार केदार,

सर्वप्रथम धन्यवाद ...... हा अतिसुंदर धागा तसेच "निसर्गाच्या गप्पा" हा धागा वाचनात आल्यामुळे अखेर माबोचे सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला. किमान ४-५ वर्षे नियमित वाचक असुनही केवळ लेखन तितकेसे रुचत नसल्यामुळे माबोचे सदस्यत्व घेतले नव्हते. पण आज तुमच्यामुळे आणि जागुताईंमुळे हे साध्य झाले. आता नियमित वाचनाबरोबर नियमित लेखन करण्याचाही संकल्प आहे. Happy Happy Happy

गणपती नंतर कधीच अपडेट्स देउ शकले नाही. पण जमेल तेव्हा इथले नवीन पोस्ट्स वाचून जात होते. तब्येतीमुळे अगदी रोज व्यायाम जमतच होता असे नाही पण शक्य असेल तेव्हा रोजचा तासभर योग आणि प्राणायाम आणि जमेल तेव्हा, जमेल तेवढा वेळ पॉवर वॉक करत होते. बाहेरचं शक्य तेवढं टाळलं. घरी जेवणाच्या वेळा जमतील तशा पाळल्या. रात्रीचं उशीरा जेवण टाळ्लं आणि गोड क्वचितच खाल्लं. रोजचं फळ खाणं जमतच असे नाही पण कडधान्य किंवा किमान वरण्/डाळ आणि भरपूर भाज्या चालू आहेत. भात सुरुवातीस पूर्ण सोडला होता पण अलिकडे दुपारी थोडा खाते.

इथे आल्यापासून साडेतीन किलो वजन कमी झालं आहे. ( ७२ चं आता ६८.५ आहे) इथे येण्यापूर्वी नेहेमीच्या ७० चं ७२ झालेलं होते.. ७० चं कधी कमी होतच नव्हतं.. त्यामुळे फ्रस्ट्रेशन मुळे दोन किलो वाढलं होतं. कदाचित व्यायामच कमी पडत होता. आता सगळ्या गोष्टी जुळून आल्या बहुतेक म्हणून फरक दिसला.

सुरुवातीला अगदी व्यायाम ते रोजचा इनटेक सगळ्याचा अपडेट दिला. खूप उत्साह वाटत होता आणि हा हा म्हणता वजन उतरेल याची खात्री वाटायला लागली. चुकीचं खाताना इथली आठवण यायची. पण नंतर सण, प्रवास, तब्येतीच्या तक्रारी यात व्यायाम, जेवण सगळ्याची हयगय व्हायला लागली.. अपडेट द्यायला काहीच नसलं की अपराधी वाटूनही हातून काहीच होत नव्हतं. तेव्हा फक्त इथे येऊन पोस्ट्स वाचून जात होते. नवीन टिप्स लक्षात ठेवत होते. आता एवढ्या दिवसांनी काट्यावर फरक दिसला तेव्हा खूप बरं वाटलं. केदार, दक्षी, सातीताई आणि निलू ह्यांना धन्यवाद ! काटेकोर अपडेट नाही द्यायला जमला तरी जेवण व्यायाम सगळ्यावर लक्ष ठेवून परिणाम काय होतात ते सांगत जाईन. Happy

मी चालायची वेळ वाढवून दिड तास केलीये.
एक तासाने दमायला होणं कमी झालेलें.

चवळीची उसळ आणि भाकरी एवढंचं खाल्लय सकाळ पासून.
आता एक कप चहा प्यायला जातेय.
बाकी काहीही गोड खाल्लेलं नाही.

(हे रोजचे अपदेटस म्हणून वाचलं तरी चालेल Proud फक्त उसळीच्या जागी भाज्या असतात. आईला सकाळी वेगळा वेगळा स्वयंपाक बनवणं शक्य नाही Sad त्यामुळे चालवून घ्यावं लागतंय )
मला मार्क्स तुच दे आता केदार Proud

यीईईईईईईईईईईईएप्पी Happy

मला वाटत होतं मी काहीच करत नाहीये Sad
म्हणून मी अपडेट्स देत नव्हते Happy

मला खर खर सांगू तर फळं आणायला जायला वेळ नसतो Sad
आणि ऑफिसात फळ बाहेर काढलं की सगळे त्यावर तुटुन पडतात Uhoh
एकच तुकडा वाट्याला येण्यापेक्षा न खाल्लेलं बरं म्हणुन आणतच नाही.

आता २-३ दिवसांपुर्वी हॉटेलात चरणं झालेलं Uhoh त्याचं प्रायश्चित्त म्हणुन काल फक्त मुडाखि खाल्ली Happy

६ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर पर्यंतचे अपडेट्स
व्यायाम- ४०
इतर- ५०
एकूण- ९०/१६०

भारतात येत असल्यामुळे पुढचा एक महिना मी इथून रजेवर आहे. व्यायाम शक्य तेवढा करणार. खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असेल पण पाणीपुरी, भेल अशा गोष्टीना जरा सूट देणार. Happy माफी असावी. परत आले कि येतेच.

रीया ,
सुरू ठेव आहे ते आणि त्यात अ‍ॅड कर
व्यायाम होतोय ४ गुण आहेत .
गोड नसणे , बाहेर न खाणे अन भाज्या /उसळीचे ४ गुण होतायत )
फक्त फळ /फळ्भाज्या खाणे अन जेवणे/झोपण्याच्या वेळा पाळल्या की झालच की Happy

काही प्रश्न..
साबुदाना चालतो का वजन कमी करताना?
वरण.. तुर डाळ वरण फोडणी देउन चालेल का खाल्ल तर (भात न खाता फक्त आमटी)
बटाटा अगदीच नको का?
बाकी शरीर ओके पण पोट्च फार फुगल्या फुगल्या सारख वाटत
काही स्पेशल व्यायाम पोटासाठी?

हॅल्लो..

या ९ दिवसाच्या हॉलिडे मुळे अपडेट्स देण्यात उशीर झाला.. पण सुट्टीत नियमीत व्यायाम आणी वॉक घेतला आणी खाण्यावरचा ताबा अजिबात सुटू न दिल्याने वजनात किंवा इंचवाईज काहीच बदल झाला नाही..

आपल्या प्रायरिटीज आपणच पाळायच्या असतात, हे अंगी बाणवयाला या धाग्याचा लागलेला हातभार अनमोल आहे Happy

पुढच्या सोमवार पासून नियमीत अपडेट्स टाकीनच!! Happy Happy

खाण्यावरचा ताबा वाचून टेंशन नका घेऊ लोक्स.. नो डाएट किंवा फॅड फूड्स हाँ.. रोजचंच जेवण ,पण कमी कार्ब्स
खाल्ले , लिमिट मधे फळं, कोशिंबिरी, सॅलड्स, भाज्या, चिकन्,फिश खाल्लं . बेकरी प्रोडक्ट्स आणी गोड पदार्थ ( आवडत नाहीत म्हणून.. Wink ) अजिबात खाल्ले नाहीत.. सिंपल सा फंडा है..

Pages