न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म..... :जीभ चावलेली बाहुली: , मी पण घरी न विचारता म्हणुन गेलो चिकन बिर्यानी आता घरी विचारलं तरी शिव्याच बसणार आहेत असं दिसतय. त्या मुळे बिर्यानी टेन्टेटिव बरका मंडळी.

अनिलभाई
पन्ना (2+1) -- शाकाहार आणि मांसाहार दोन्ही ( non veg मी लालूसारखं डब्यात भरुन नेणारे )
सायोनारा (2+2)
अडम
शोनू (2 + 2)
सचिन_बी
सिंड्रेला (१ शाकाहारी + १ (बायको घरी बनवत नसल्याने जरा जास्तच) मांसाहारी + १ मनात आले तर खाइल काहीतरी)
विनय देसाई (शाका. + मासे)
मृण्मयी
लालू (1 or 4)
मैत्रेयी (2+2)
नयनीश (४+१)
अश्विनी (?)
संदीप चित्रे (?)
आसामी (?)
अमृता-किरण (?)
रुनी -- शाका
गुरूदास (?)
बो-विश
अजय (?)

अरे संकष्टी आहे त्या दिवशी <<< श्या... असल्या गोष्टी सांगायच्या नसतात.. आता मी पण पूर्ण शाकाहारी.. Sad

विनय Happy

लालू, आहे मी इथेच Happy थीम 'व्हेजी ओन्ली' हीच ठेवावी का मग आता?नॉन व्हेज खानारे फार कमी दिसतायत!
मेनु ठरवायचा का ? लिहा आपापले चॉइस Happy -> म्हणजे कोण काय आणणार ते लिहा.

आता लवकर लवकर, प्रश्नचिन्हे दूर करा, तसेच उपास किती, शाकाहारी किती, मासे किती, चिकन, हँबर्गर, हॉट डॉग किती? हे हि कळवा.

कुणि काही आणणार असाल तर तसे कळवा, म्हणजे आम्ही पण तेच तेच करणार नाही.

आता मला ग्रिल काढून ठेवणे, बॅडमिंटन, हॉर्स शू इ. ची तयारी केली पाहिजे नि "खुर्च्च्या" टेबले पण!! उत्साह आला आहे. पटापटा करायला लागतो.

Happy Light 1

आपापले चॉइस म्हणजे वेजी जे चांगलं जमतं ते ना? कोणी एक आयटम पिक केला की तो बाद (दुसर्‍यानी तो आणायचा नाही).

कोणी एक आयटम पिक केला की तो बाद (दुसर्‍यानी तो आणायचा नाही). >>> वा वा नयनिश शिकला शेवटी Happy Proud

पन्ना (2+1) -- शाकाहार आणि मांसाहार दोन्ही ( non veg मी लालूसारखं डब्यात भरुन नेणारे )
सायोनारा (2+2)
अडम (शाकाहारी)
शोनू (2 + 2)
सचिन_बी
सिंड्रेला (१ शाकाहारी + १ (बायको घरी बनवत नसल्याने जरा जास्तच) मांसाहारी + १ मनात आले तर खाइल काहीतरी)
विनय देसाई (शाका. + मासे)
मृण्मयी
लालू (1 or 4)
मैत्रेयी (2+2)
नयनीश (४+१)
अश्विनी (?)
संदीप चित्रे (?)
आसामी (?)
अमृता-किरण (?)
रुनी -- शाका
गुरूदास (?)
बो-विश
अजय (?)

मी आईस्क्रीम किंवा तत्सम काहितरी आणेन... किती आणि काय ते जाणकारांनी सांगा...

पन्ना (2+1) -- शाकाहार आणि मांसाहार दोन्ही ( non veg मी लालूसारखं डब्यात भरुन नेणारे )
सायोनारा (2+2)
अडम (शाकाहारी)
शोनू (2 + 2)
सचिन_बी
सिंड्रेला (१ शाकाहारी + १ (बायको घरी बनवत नसल्याने जरा जास्तच) मांसाहारी + १ मनात आले तर खाइल काहीतरी)
विनय देसाई (शाका. + मासे)
मृण्मयी
लालू (1 शाकाहारी, मांसाहार डब्यातून घरी नेईन.)
मैत्रेयी (2+2)
नयनीश (४+१)
अश्विनी (?)
संदीप चित्रे (?)
आसामी (?)
अमृता-किरण (?)
रुनी -- शाका
गुरूदास (?)
बो-विश
अजय (?)

मी बटाटेवडे, चटण्या, मिरच्या, ब्रेड आणेन. एक मांसाहारी पदार्थही आणेन.

वा वा नयनिश शिकला शेवटी >>>>> येकदम ट्रेन्ड नवरा आहे मी Wink
खाण्याचं ठरतय पण गाण्याचं काय ? लाडवक्का येणार नाही म्हणतायत त्यामुळे गाण्यात क्वालिटी पेक्षा क्वान्टिटीतच समाधान मानावं लागणार वाटतं. अरे पण, जनीचं गाणं सगळ्यांनीच म्हणायचं हे मात्र नक्की. Proud

मी पण , एकटाच.

मी येणार नाहीयेय . कृपया वाट पाहू नये.

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

जनी कोण? इथे कुणी जनी पण येणार आहे का? मला तर कुणाचेच गाणे येत नाही. अगदी माझे जीवन गाणे सुद्धा.

अडम, राग येणार नसेल तर एक सूचना करतो. तुम्ही लांबून येणार, तर आइस क्रीम मीच आदल्या दिवशी आणून ठेवीन म्हणतो. सध्या मी मँगो, पिस्ता यांचा विचार करतो आहे. एडिसनमधे मस्तानि आईसक्रीम कुठे मिळेल का? इकडे मिळत नाही. कुणाला मस्तानी (आईसक्रीम) हवे आहे का?

<<मी पण , एकटाच.>> विजय, अवश्य या. एकदा भेटायचेच आहे तुम्हाला!

Happy Light 1

अहो झक्की.. तुमच्या घरी टेनीस कोर्ट आहे का???
मी, सँटी, सिंडी, पन्ना, नितेश वगैरे मंडळी खेळू म्हणतो.. Happy

बाय द वे (म्हनजे त्या रस्त्याने चाललोच आहे तर)

पूर्वीच्या पिढीत वनभोजन नावाची कविता होती. त्यात प्रश्नच प्रश्न आणि त्याची उत्तरेही होती. ह्या गटगची चर्चा वाचून मला तिची फारच आठवण होत आहे. थोडी मी टाकतो बाकी तुम्ही टाका...

कुठे जायचे?
कधी जायचे?
कसे जायचे?

कुठे जायचे ? आम्बेराई
कधी जायचे ? प्रभात समयी
कसे जायचे ? पायी पायी...

बाजाची मी पेटी आणीन
मंजुळ पावा मीही वाजवीन,
मधुर गाणे मीही गाइन

एवढे आठव्ते आहे .

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

जनी तिकडे मेघालयात Wink

विजय, अवश्य या. एकदा भेटायचेच आहे तुम्हाला!>>>> एकदाच बोल्ड करायचं राहिलं झक्की Wink
विकु Light 1 बाकी झक्कीच नाही आम्हा सगळ्यांनाच बुप्रा(आता कल्ट)किंग कुलकर्णींना बघायचय! Proud
मस्तानी आईसक्रीम कॅन मध्ये मी तरी कुठेच नाही बघितलं. बॉम्बे चाट मध्ये बाय ऑर्डर मिळतं. मस्तानी चा सिरप किंवा पाऊडर मिळते का बघा. ते टाकलं वॅनिला आईसक्रीम मध्ये की झालं मस्तानी आईस्क्रीम तयार हाकानाका!

हे म्हणजे, भातावर पॅकेटमधला बिर्याणी मसाला टाकला की झाली बिर्याणी म्हणण्यासारखं आहे. Proud

पन्ना (2+1) -- शाकाहार आणि मांसाहार दोन्ही ( non veg मी लालूसारखं डब्यात भरुन नेणारे )
सायोनारा (2+2)
अडम (शाकाहारी)
शोनू (2 + 2)
सचिन_बी
सिंड्रेला (१ शाकाहारी + १ (बायको घरी बनवत नसल्याने जरा जास्तच) मांसाहारी + १ मनात आले तर खाइल काहीतरी)
विनय देसाई (शाका. + मासे)
मृण्मयी
लालू (1 शाकाहारी, मांसाहार डब्यातून घरी नेईन.)
मैत्रेयी (2+2)
नयनीश (४+१)
विजय कुलकर्णी (१)
अश्विनी (?)
संदीप चित्रे (?)
आसामी (?)
अमृता-किरण (?)
रुनी -- शाका
गुरूदास (?)
बो-विश
अजय (?)

मी हॉट डॉग्ज, ब्रेड, रेलिश, मस्टर्ड वगैरे सगळं आणेन. फक्त साधारण किती लागतील ह्याचा अंदाज द्या कोणीतरी. अजुन पण एक पदार्थ (शाकाहारी) आणेन.

------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से

हे म्हणजे, भातावर पॅकेटमधला बिर्याणी मसाला टाकला की झाली बिर्याणी म्हणण्यासारखं आहे. >>>>>>>> आर्च, तु येतेयस ना? फक्त बिर्यानी नको आणुस हां, काहीतरी दुसरं आण Wink .

अरे माझ्या कविते बद्दल कोणी काहीच कसे सांगत नाही...? Angry

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

रॉबिनहूड, तसले इथे कुणी नाहीत. इथे बहुधा सगळे हिंदू आहेत, मराठी बोलतात. तसले मुसलमानी काही बोलायचे असेल तर पुण्याला जा. शिवाय इथे चारा खायला गाई म्हशी शेळ्या बकर्‍या पण नाहीयेत. Happy Light 1

तारीख ९ ऑगस्ट
ठिकाण : झक्कींचे घर
वेळ : दुपारी १२ वाजता

अहो बोवाजी ,मी त्या वनभोजन कवितेबद्दल बोलतोय. १९६० ते १९६५ च्या दरम्यान पहिल्या यत्तेला होती. वर अर्धवट टाकली आहे ती....

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

वेळ ११ वा. असे वाचा.
भारतात अशी पद्धत आहे म्हणे की जेव्हढे तुम्ही मोठे (म्हणजे वयाने नव्हे, मानाने, श्रीमंत, सरकारी अधिकारी, कुठल्यातरी कं. तले मोठे अधिकारी, श्रीमंत असे) तेव्हढे तुम्ही उशीरा यायचे. या गडबडीत १२ ला बोलावले तर सगळे जमेस्तवर दुपारचे ४ वाजतील!

Happy Light 1

राग येणार नसेल, तर एक प्रेमळ विनंति.

३० जुलै पर्यंत मोठे किती, छोटे किती, उपासवाले किती, शाकाहारी किती, मासे खाणारे किती व इतर (म्हणजे हॉट डॉग, चिकन वगैरे) खाणारे किती हे नक्की करा.

एक महत्वाचे: न लाजता सांगा, की उपासाचे अधिक शाकाहारी अधिक मासे अधिक इतर, हे सगळे खाइन. म्हणजे काय किती आणायचे ते कळेल. बाकी काही बंधने नाहीत. नियंत्रण फक्त दारू पिण्यावर! गाडी चालवणार असाल तर निदान त्या आधी दोन तास तरी दारू पिणे बंद. जे नुसतेच बाजूला बसणार आहेत त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पीत बसले, तरी मला चालेल!

शिवाय मेन्यू पण निदान २ ऑगस्टार्यंत नक्की करा. जर कुणि काही आणणार असतील तर तसेहि कळवा. काही आणलेच पाहिजे असे बंधन मुळीच नाही.

धन्यवाद.

Happy Light 1

आत्तापर्यन्त शाकाहारी - ७ मोठे. यातल्या कोणाचा उपवास नाही.

झक्की धन्यवाद. कृपया आता इथे टीपी करु नका. उपयोगी माहिती शोधत बसावी लागते.

संकष्टीच्या दिवशी ... Sad

मी एकटाच असेन बहुधा. अश्विनी येतेय कि नाहि माहित नाहि. किरण अम्रुताचे पण माहित नाही नक्की.

कौन है वो बततमिज जिसने मेरा नाम निकाल दिया. Angry

अनिलभाई (१) (शाका. + मासे) ( चिकन मी लालूसारखं डब्यात भरुन नेणारे )
पन्ना (2+1) -- शाकाहार आणि मांसाहार दोन्ही ( non veg मी लालूसारखं डब्यात भरुन नेणारे )
सायोनारा (2+2)
अडम (शाकाहारी)
शोनू (2 + 2)
सचिन_बी
सिंड्रेला (१ शाकाहारी + १ (बायको घरी बनवत नसल्याने जरा जास्तच) मांसाहारी + १ मनात आले तर खाइल काहीतरी)
विनय देसाई (शाका. + मासे)
मृण्मयी
लालू (1 शाकाहारी, मांसाहार डब्यातून घरी नेईन.)
मैत्रेयी (2+2)
नयनीश (४+१)
विजय कुलकर्णी (१)
अश्विनी (?)
संदीप चित्रे (?)
आसामी (१)
अमृता-किरण (?)
रुनी -- शाका
गुरूदास (?)
बो-विश
अजय (?)

- अनिलभाई
It's always fun when you connect.

Pages