न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्श,
येणारेस का चांगल खायला आणि बघायला?. Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

मग कळेल न सगळ्यांना Happy

विनय, खरच की. Happy

तो कार्यक्रम काय खायचाय ? Proud (तो तर लोळुन हसायचाय Wink )

बंगाली मिठाया ह्या ग्रहावरुन हद्दपार केल्या पाहिजेत. देसाई, कृपया रसमलई आणु नका.

कृपया रसमलई आणु नका.>> रसमकमी घेवुन ये रे.. Happy
आता तर मी सांगुनच टाकणार आहे सगळ्याना. Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

अहो भाई, पण आम्हाला आधीच कळलय. Happy

काय कळलंय? मलापण सांगा. Happy
आर्च, काही स्पेशल खावसं वाट्टंय का? Happy पाठवून देते.

मलापण सांगा Happy

रुनी, तुलाही काही स्पेशल खावसं वाट्टय? Wink

ए नयनिश बासुंदी खावुन तुला झोप आली का, मी ते मृ ला मला पण सांग म्हटलय पाठव नाही Happy

रसमकमी घेवुन ये रे..
>> रसम वगैरे दाक्षिणात्य पदार्थ नका आणू हो विनय.. Proud

तुम्ही रसमलईच घेऊन या... मी थोडी घेऊन पण जाईन घरी Wink

शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१), सचिन(१)

मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)

लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)

उपवास--

मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी. मँगो शेक/मँगो लस्सी, स्वीट्स (विनय आणणार)...

मला खरच झोप येतेय बासुंदी खाऊन.

>>>>> पण तुम्हा लोकांची दया आल्याने तिने म्हंटले, पण स्वैपाकात काय करायचे ते मीच करीन.
पान्ढर्‍या शाईचे हौद हवेत इथे!
बाकी हे स्वानुभवाचे बोल त्यान्चे! Proud
लोकहो, तिकडे पोचल्यावर सौ.झक्कीन्चे पहिल्यान्दी आभार माना या सुयोग्य समजुतदार निर्णयाबद्दल Happy

काकडीची कोशिंबीर, कढी करीनच रवीवारी, खास माझी कृति वापरून. अपेयपानाची दुकाने शनिवारी उघडी आहेतच. पेयांपैकी, कोक किती, पेप्सि किती, डायेट किती? झिरो (को, पे) किती?

मुलांना हॉट डॉग जास्त आवडतात का हँबर्गर्स? आईसक्रीम मधे पीच, रास्बेरी अशासारखे ब्रायर्स हवे का आपले मँगो, नि केशर पिस्ता?
कुणाला चिकन शीश कबाब हवेत का? बटाटा, हिरवी मिरची, कांदा, नि भरपूर चिकन.

लाजाल तर पस्तावाल. आपलंच ए. वे. ए. ठि. आहे. तुम्ही सर्वांनी मला लाजवलच आहे.
Happy Light 1

कुणाला तुमच्या बॅकयार्डात "अ‍ॅग्री टु डिसॅग्री" करायचं असल्यास बिअर ची पण सोय करा आता झक्की Happy

कढी करीनच रवीवारी, खास माझी कृति वापरून

>>>>>>>>
GTKSCAC74LRDCASDUOJECAG09VH7CA5GJZ6GCAOX60RZ.jpgGHQLCAA2SMHVCA4QGVAUCAEHJVSXCAGWVDVLCAWHSLSB.jpg

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

लोकहो, क्षमस्व. नवरा त्याचवेळी फ्रान्सला चालला असल्याने आमचे जीटीजीला येणे कॅन्सल. असाम्या येणार असेल तर सा. खिचडी पाठवून देईन. Happy

झाले! लोक गळायला लागले का? आता मात्र पाच ऑगस्टला येणार्‍यांची यादी, कोण कोण काय आणणार आहे ते नक्की सांगा. नि त्याप्रमाणे आणा. नाहीतर उपाशी राहिलात, काही मिळाले नाही तर तक्रार करू नका. मी माझ्यापरीने सर्वांना सगळे मिळेल याची व्यवस्था करीनच. पण पाच तारखेनंतर काही सांगता येत नाही.

पाच ऑगस्ट ? नऊ ऑगस्टला आहे ना गटग ?

असामी येणार आहे का ? माझी पुस्तके-वाचून झालेली आणि पर्व घेऊन ये.

५ ऑ RSVP ची शेवटची तारीख असावी... Happy
आम्ही नक्कि येतोय. ८लाच पोचू NJत ... Wink गटगला १२ वाजे पर्यंत हजर असु. आद्ल्याच दिवशी निघत असल्यानेकाय आणेन ते त्या वेळिच ठरवेन बहुदा

पाच ऑगस्टला त्यांना सगळी माहिती हवी आहे. नीट वाचा. Proud
झक्की, सौ. ना साबुदाण्याची खिचडी करायला सांगा प्लीज.

क्षमा, क्षमा, क्षमा!!! ए. वे. ए. ठि. ची तारीख ९ ऑगस्ट, रवीवार हीच आहे, पण पाच ऑगस्ट पर्यंत सर्व याद्या पक्क्या करा असे मला म्हणायचे होते. हे असे एकदम कुणि येण्याचा बेत बदलला, नि खाण्याचे नक्की होते ते अनिश्चित केले म्हंटल्यावर मला एकदम प्रश्न पडला की आता उपवास असलेल्या लोकांची सोय कुठून करणार?? म्हणून म्हंटले निदान पाच ऑगस्टपर्यंत तरी नक्की करा!!

धन्यवाद.

लालूचा असाम्याबरोबर येणार्‍या खिचडीवर विश्वास दिसत नाहीये. Proud
माझ्याकडची डोकी अजून नक्की नाहीत म्हणजे २ की ४. गुरुवार पर्यंत नक्की कळवेन.

...

एकंदर ए. वे. ए. ठि. मधे तोंडात घालायला पुरेसे असले की डोकी कमीजास्त झाली तरी फरक पडत नाही!! (कित्येक लोक तर डोके घरी ठेवूनच ए. वे. ए. ठि. ला येतात म्हणे!! मात्र मी घरीच असल्याने, तुम्हाला तसे वाटले तर मला सांगा. मी घरात शोधून बघीन कुठे सापडते का!, एखादे जास्तीचे सापडले चुकून, तर कुणाला देता पण येईल.)

आयला आजकाल जोक पण स्टिरीयोटिपीकल झालेत. आर्च, मागच्या ए वे ए ठी ला सुद्धा डोक्यावरुनच(?) जोक(?) टाकला होता.

मागच्या ए वे ए ठी ला सुद्धा डोक्यावरुनच(?) जोक(?) टाकला होता.>> तेव्हा डोक्यावरुन गेला म्हणुन परत टाकला असेल Happy

Pages