न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०
जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363
मी शाकाहार
मी शाकाहार + उपवासाचे पदार्थ खाईन. जास्त केले असतील तर डबा भरुन नेईन उपवासाचे पदार्थ.
मी
मी पण..
अश्विनी किंवा बाकी कोणी उपासाचे पदार्थ विषेश करून सा.खि. आणणार असली तर मी ते पण खाईन साध्या शाकाहारा बरोबर..
ड्ब्यात भरून काही नेणार नाही..
झक्की मोड
झक्की मोड ओन..
डबे घरुन आणावेत. आमच्या कडे खाली डबे मिळणार नाहीत. खाली डबे वरही मिळणार नाहीत. उगाच खालीवर करु नये.
झक्की मोड ओफ..
- अनिलभाई
It's always fun when you connect.
अनिलभाई,
अनिलभाई, अगदी अगदी. झक्कींना छान ओळखून आहात.

झक्कींकडे न वापरलेल्या झिपलॉक बॅग्ज मागाव्यात.
आर्च,
आर्च, तुम्ही नक्की विशिष्ठ शहरवासी होता पूर्वी. परस्पर आपले लोकांना सांगायचे यांच्याकडून ते न्या! तुम्ही पाठवता का रिकामे डबे नि न वापरलेल्या झिपलॉक बॅगा?? तेव्हढीच तुमची आठवण राहील इथे. जमले तर एखाद्या डब्यातून किंवा झिपलॉक बॅगेतून काहीतरी पाठवून देऊ परत!
तशी आमच्या घरी खालीवर खूपच होते, बाय लेव्हल आहे ना घर! कलोनियल असते तर खालच्या खाली लोकांना कटवता आले असते.
अरे... लालू
अरे... लालू नी सांगितलय ना.. टाईमपास नको इथे म्हणून.. ! मेन्यू आणि शा,मा,उ, ह्या पैकी काही की सगळच ते सांगा पाहू लवकर..
शाळेत बाई
शाळेत बाई किंवा सरांचे "पपलू" कॅटॅगरीमधले मॉनिटर्स् असतात ना तसं करतोय हा adm .. :p
सशल, तुला
सशल, तुला लालू ला नक्की काय म्हणायचं आहे ?? "बाई" की सर???
विनय, तुमचा
विनय,
तुमचा अटलांटा गटग बिबि वरचा मेसेज साभार करण्याची संधी चांगली वाटतेय सध्या.
---
नमस्कार
मजा वाटली तुमच्या गटग ची तयारी बघून... आनंद झाला, म्हणून मुद्दाम नमूद करतोय.
आगाउपणा वाटला असेल तर माफ कराव.
धन्यवाद
----
तुम्ही
तुम्ही हेर्बीवोरस आहात,कार्निवोरस आहात की ऑम्नीवोरस आह्त हे नमूद करायचय .हाकानाका?***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
ते "डब्यात
ते "डब्यात भरुन नेणार" म्हणजे मला कळले नाही!
सगळे मिळून झक्कीन्च्या नावान चान्गभल करू! कस?
हा.कां.ना.का.
स्वतःच्या घरुन डब्यातुन झक्कीन्कडे नेणार? की झक्कीकडून डब्यात भरुन आणणार?
पर्याय दुसरा असेल तर मी पण पोतभर रिकामे डबे घेऊन यावे म्हणतो!
पर्याय
पर्याय दुसरा असेल तर मी पण पोतभर रिकामे डबे घेऊन यावे म्हणतो
>>>
तुला ते कस्टमवाले रिकामे डबे म्हटल्यावर सोडणारच नाहीत...
***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
या पानावर
या पानावर लिस्ट नाहीच. पुन्हा सुरुवात...
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२)
मांसाहारी-
लहान मुले - पन्ना(२), सिन्डी(१), अश्विनी(२),
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम
आता लोकांनी यात स्वतःबद्दल दुरुस्ती,अॅडिशन करा.
शाकाहारी-
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२),विजय (१)
मांसाहारी-
लहान मुले - पन्ना(२), सिन्डी(१), अश्विनी(२),
उपवास अशी एक कॅटेगरी हवी का?
लालू, माझी
लालू, माझी एकची दोन मुलं नको गं करुस
हॉट डॉग्ज ना डिमांड कमी दिसतेय, त्यामुळे मी भेळेचं सामान आणतेय.
------------------------------------------------------------------------------
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२), विजय (१)
मांसाहारी-
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान.
------------------------------------------------------------------
प्यार की कसम है, न देख ऐसे प्यार से
-----------------------------
------------------------------------------------------------------------------
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२)
मांसाहारी-
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान.
काय आणायचं ते ठरत नाहिये अजून, लवकरच लिहिते
मी
मी शेव-बटाटा-दही-पुरी किंवा पाणीपुरी किंवा पावभाजी आणु शकते. काय आणु ?
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२), विजय (१)
मांसाहारी- सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान, शेबदपु.
वरील
वरील सर्वांना अनेक धन्यवाद. मी जे करायला पाहिजे, पण काही वेडगळ कल्पना डोक्यात असल्याने करत नाही, ते तुम्ही करताहात!!
ग्रिलवर काय करणार? खालील पदार्थ आमच्या जवळच्या दुकानातच मिळतातः चिकन, श्रिंप, कॅटफिश फिले, टिलापिया फिले, सामन फिले, शीश कबाबसाठी लागणारे सामान, कणसे. मस्तानी आईसक्रीं मिळत नाही, पण नेहेमीचे, मँगो, पिस्ता मिळते, टूटी फ्रुटी (मी स्वतः कधीही टुटी फ्रुटी खाणार नाही. भारतात एकदा त्यात मला फुलकोबी, पानकोबी नि शेंगा दिसल्या! ते मला आवडले नाही!)
काय आणू बोला? आधी सांगितले म्हणजे आद्ल्या दिवशीपासून मुरून (मॅरिनेट) करून ठेवता येईल. कशात मुरवून (मॅरिनेट) ठेवायचे ते सांगा मात्र.
<<"डब्यात
<<"डब्यात भरुन नेणार">>
लिंबूटिंबू, हा अमेरिकन प्रकार आहे. पार्टीला गेल्यावर उरलेल्या पदार्थातले जे जे काही आवडले असेल ते लोक घरी नेतात. म्हणजे ते आवडले असे कळते.
कारण जोरात ढेकर देणे इथे फारसे सभ्य मानले जात नाही.
बॉसच्या बायकोला म्हणायचे 'तुम्ही भात कसा केला हो, छानच झाला होता, मला रेसिपि द्या!'
व खूप उरला असेल तर डबा भरून घरी न्यायचा नि आपल्या घरी फेकायचा!
खालील
खालील पदार्थ आमच्या जवळच्या दुकानातच मिळतातः
>>>>
ते येताना तुम्ही आणालच.
(एक पुणेरी हुकूम.)
कारण जोरात ढेकर देणे इथे फारसे सभ्य मानले जात नाही.
>>
वरील यादीत (यजमानांसह) सभ्य लोक अभावानेच दिसत आहेत.
***
ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
<<माझी एकची
<<माझी एकची दोन मुलं नको गं करुस >>
होऊ शकतात, पण लालू तसे नाही करू शकणार! त्याचा कर्ता करविता कुणि वेगळाच!
शाकाहारी-
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१)
मांसाहारी-
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान.
काय आणायचं ते ठरत नाहिये अजून, लवकरच लिहिते
खादाडीचं जे ठरेल ते आणायला हरकत नाही.
>>>>
>>>> लिंबूटिंबू, हा अमेरिकन प्रकार आहे. पार्टीला गेल्यावर उरलेल्या पदार्थातले जे जे काही आवडले असेल ते लोक घरी नेतात. म्हणजे ते आवडले असे कळते.
कल्पना चान्गली हे! पण जर एखादा पर्दार्थ चान्गला झाला अन आवडला सगळ्ञान्ना तर शिल्लक राहीलच कसा?
अन जो शिल्लक पदार्थ असेल, तो नावडल्यामुळेच शिल्लक राहिला असणार ना? मग त्याला आवडला असे म्हणून घरी न्यायचे?
असो, मला तर काही कळत नाही यातल
काल श्रावण्या होत्या नागपन्चमी निमित्ते, जानवी बदलण्याचा कार्यक्रम, देवळात होता, दुपारी दोन नन्तर लिम्बीच्या माहेरीच होत जेवण सगळ्ञान्ना, तर तिथे दिन्ड केल्या होत्या! (ते देशस्थ त्यामुळे दिन्डच करतात, कोके अस्ते तर उकडीचे मोद़क केले अस्ते) नन्तर घरी आलो.
लिम्बीन तिकडून काही तरी शिल्लक पदार्थ दोनचार डब्यातून भरुन आणले होते
दुपारी झोपुन झाल्यावर भुक लागलि तर लिम्बीला विचारले, काय आणल आहे ग? दिन्ड आहे का?
लिम्बी म्हणाली, इश्श्य, दिन्ड कस्ली शिल्लक रहायला? सगळी सम्पली, थोडी खीर आहे, अन वरण भात आहे भरपुर शिल्लक!
वरील घरी न्यायचे उदाहरण बघता मला हे आठवले
मग काय? सन्ध्याकाळी इडलीचे तयार पीठ दोन किलो आणले, इडल्या केल्या एकेका घाण्यात वीस वीस, चार घाण्यात काम तमाम, शिल्लक आणलेल्या वरणाला फोडणी देऊन आमटी केली, अन काल रात्रीचे जेवण इडली-आमटी अस केल!
मग काय
मग काय लिंबूभौ देशस्थ आणि कोकणस्थ असे दोन्ही खाद्यप्रकार मिळतात का तुम्हाला? चांगलंय की मग!
हो हो,
हो हो, चान्गलच्चे ना भाग्या, फक्त उकडीचे मोदक खावेसे वाटले की मोदक वळायला मलाच बसावे लागते!
पण जर
पण जर एखादा पर्दार्थ चान्गला झाला अन आवडला सगळ्ञान्ना तर शिल्लक राहीलच कसा?
<<< लिंबूभाऊ तो पदार्थ एकाद्या अकंजूष माणसाने केलेला असला तर सगळ्यांना पुरून उरू शकतो...
विनय
मी
मी शाकाहारी... मी डबे घेऊन येणार...

मागच्यावेळी मी सायो ने केलेला पास्ता घेऊन गेलो होतो घरी... लाजेखातर अजून जास्त काही नेले नव्हते. या वेळी लाज वगैरे काही नाही..
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२), विजय (१), सचिन(१)
मांसाहारी-
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान.
आम्ही
आम्ही पोचलो शिटीत. हाटेलात आहोत सध्या. ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहात घरात जाउ. ९ ऑगस्टला येता यायला हरकत नाही अस सध्या वाटतय.
आमच पण नाव यादीत येउ दे
शाकाहारी- रुनि, लालू, असामी, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी, अश्विनी(२), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२)
मांसाहारी-
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१), अश्विनी(२),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, साबुदाण्याची खिचडी, आईसक्रीम, भेळेचं सामान.
-----------------------------
काय आणायच ते ठरवेन लवकरच.
विनय,
विनय, उभ्या उभ्या विनोद नक्की करणार ना? माझी एक मैत्रिण (माबोकर नाहीये) केवळ 'उभ्या उभ्या विनोद' साठी बॉस्टनहून यायचा विचार करते आहे. तिचं पण बीएमएमला मिस झालं. तेंव्हा कन्फर्म सांगा.
अश्विनी..
अश्विनी.. नक्की हसणार ना?
मिस झालेला प्रयोग बघण्यासाठी प्रेक्षक येणार असतील तर नक्कीच करू.. (BMM पेक्षा दुप्पट) दोन प्रयोग करण्याचा विचार आहे...
विनय
Pages