न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०
जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363
मी
मी सगळ्यांसाठी पन्हं, लिंबू सरबत, कृती शोधुन मँगो लस्सी पण करेन.
वा वा!
वा वा! भारीच मेनू आहे. यावंसं वाटतंय बाराकरांच्या गटगला.
सगळेच
सगळेच स्नॅक आयटम्स आणणार आहेत का? जेवणाला काट आहे का? (मला लगतं असं अजिबात नाही). पावभाजी एकमताने मंजूर झाल्यास मी आणेन.
सायो,
सायो, भारतातून आणणार तो खाऊ घेऊन ये. अश्विनी, तू येच (खिचडी घेऊन).
मेनू ठरवा नीट. त्यादिवशी काही लोक मांसाहार करणार नाहीत, मी तरी नाही. डब्यातून घरी घेऊन जाईन.
मी पाहुणा
मी पाहुणा म्हणून आलो तर मी काय आणायचे ?
काहीहि
काहीहि आणले नाही तरी तुमचे स्वागत तितक्याच उत्साहाने होईल.

गुरुकाका,
गुरुकाका, नुस्ते येवा तुमी
मेनु ठरणार
मेनु ठरणार आहे का?
आत्ता
आत्ता बाबा! जरा धीर धरा!!
माझ्या मते ३१ जुलै पर्यंत मेन्यू पक्का करावा. मग ठरवता येईल, कुणाला काही आणायचे असेल तर. नाही आणले तरी चालेल.
कसे काय?
दोन कार्यक्रम तर ठरलेच आहेत. उ.उ.वि. नि गों.
मेनु
मेनु ठरवताना व्हेज किती नॉन व्हेज किती, एकूण डोकी किती ही माहिती लागेल. ते फायनल झालं की वाट्टेल तेवढ्या मेनु सजेशन्स येतील
डोकं
डोकं असणार्यांनाच गटग ला प्रवेश आहे का ?
हो, पण आत
हो, पण आत काय भरलय ह्याची विचारपूस होणार नाही.
डोक नाही
डोक नाही अस आधी कळवल तर त्यांचे पाय धरण्यात येतील.
- अनिलभाई
It's always fun when you connect.
पण मग
पण मग दोनने भागायचे? ते कुणाला येतं?
मुख्य म्हणजे डोके नसेल तर, आपयाला डोके नाही हे कसे कळेल?
आले तर
आले तर बटाट्याचा चिवडा आणि मलई बर्फी करून आणेन. कबाब रद्द.
डोक्यातल्
डोक्यातल्या बटाट्याचा का ?
त्यांचे पाय धरण्यात येतील >>> भाई, जपून पाय धरा, एखादी (लाथ) तुमच्या "असलेल्या" डोक्यात बसायची
झक्की,
झक्की, तुम्ही कित्ती चांगले आहात. तुम्ही म्हणताय तर मी काहीच आणत नाही. उगी गाडीत सांडायला वगैरे नको >>
झक्की, अशी सूट देऊ नका सगळ्यांना... नाहीतर मग माबोकर सुगरिणी काहीच आणणार नाहीत. मग तुम्हालाच काहीतरी करावं लागेल... मग तुम्ही मला मदतीला बोलवाल. नकोच ते सगळं. त्यापेक्षा तुम्हीच सगळ्यांचे पदार्थ ठरवून द्या...
अरे त्यात
अरे त्यात काय? माझ्याजवळ अनेक पदार्थ कसे करावे याच्या रेसिपिज आहेत. जरा चार दिवस आधी कळले म्हणजे झाले!

maitreyee | 16 जुलै,
maitreyee | 16 जुलै, 2009 - 09:42
बरं मी काय म्हणते, झक्कींकडच्या ए वे ए ठी ला थीम्ड पार्टी ठेवायची कल्पना कशी आहे? हवाईयन, बॉलिवुड वगैरे ?
RJ | 16 जुलै, 2009 - 09:44
>>>> बॉलिवुड थीम... मग झक्कींना कुठला पार्ट देणार?
ashwini | 16 जुलै, 2009 - 09:45
>>थीम्ड पार्टी
हे तू खाण्याचं म्हणतेस की इतर काही?
cinderella | 16 जुलै, 2009 - 10:23
झक्कींकडच्या पार्टीची चर्चा "तिकडेच" करा की तरीसुद्धा बॉलीवूड थीमपक्षा हवायन थीम बरी वाटते, कमीत कमी पानं फुलं तरी असतात
adm | 16 जुलै, 2009 - 10:30
पण बॉलीवूड थिम मधे काय पदार्थ येतात??
Mrinmayee | 16 जुलै, 2009 - 10:32
>>बॉलीवूड थिम मधे काय पदार्थ येतात??
गाजरका हलवा
पकोडे
मूली के पराठे
चाय
आणखी आठवतीलच..
maitreyee | 16 जुलै, 2009 - 10:41
बॉलिवुड मेनु सही आहे अग फक्त खाण्याची नै कै थीम, कपड्यांची पण हवाईयन बरी आहे, इम्प्लिमेन्ट करायला सोपी ट्रॉपिकल थीम चे शर्ट, टॉप, स्कर्ट असं काही ना काही असतंच सगळ्यांकडे , शिवाय त्या टिपिकल ( प्लॅस्टिक च्या) फुलाच्या माळा, टिकी लाइट्स, खायला बार्बेक्यू मेनु आहेच, त्यात पिना कोलाडा वगैरे झक्कींना अॅड करायला सांगू डिझर्ट मधे पण अनन्साचे काप वगैरे.
बॉलिवुड थीम ला जरा भ मे अन ड्रेसप ची जास्त आवड असली तर ठीक, नाहीतर उपयोग नाही!
अर्थात हे सगळ्यांना इन्टरेस्ट असेल तर च. सहज सुचलं म्हणून इथेच आधी विचारलं .
Mrinmayee | 16 जुलै, 2009 - 10:45
>>असं काही ना काही असतंच सगळ्यांकडे
पांशा: नसल्यास सरळ भारतीय पोशाखात यावे. वाळकं गवत गोळा करायला अथवा नारळ फोडायला जाऊ नये.
cinderella | 16 जुलै, 2009 - 10:57
हवाईयन नको. इथल्या लोकल पार्टीज मधे होतेच ती थीम. त्यापेक्षा "मराठी" थीम ठेवु. काय जे पदार्थ आणायचे ते अस्सल मराठी असले पाहिजेत. कपड्यांचं ज्याने त्याने बघुन घ्यावं, खाणं महत्वाचं, काय ?
वाळकं गवत गोळा करायला अथवा नारळ फोडायला जाऊ नये >>> मृ, मी म्हणुनच बॉलीवूड थीम नको म्हणाले
maitreyee | 16 जुलै, 2009 - 11:01
छ्या मराठी ही काय थीम आहे? रोजचेच कपडे अन रोजचेच खाणे असं होईल ना मग नको नको.
cinderella | 16 जुलै, 2009 - 11:07
तू मराठी कपडे नको घालुस. म्हणुनच मी म्हणाले खाणं महत्वाचं.
maitreyee | 16 जुलै, 2009 - 11:08
adm | 16 जुलै, 2009 - 11:19
मराठी कपड्यांच्या थिम मधे काय येतं??? नववारी / साधी साडी, धोतर, फेटा इ ?? की अजून काही ?
रोजचेच कपडे अन रोजचेच खाणे असं होईल ना मग >>>>> आयला.. मैत्रेयी तू रोज नववारी / साधी साडी घालतेस ऑफिस ला ????
कपड्यांसारख्या भौतिक गोष्टींना महत्त्व न देता आपण खाण्याची थिम ठरवू या.. युरोपियन पदार्थ ठेवायचे का?? पन्ना तुझं ते स्पॅनिश फ्लॅन आण..
Panna | 16 जुलै, 2009 - 11:22 नवीन
मृ, तुझं तिकीट झालं का बुक करुन?
अडमा, थीम ठरु दे आधी. नायतर झुणका भाकरी सोबत खायला लागायचा तो फ्लॅन
संपादन lalu | 16 जुलै, 2009 - 11:21 नवीन
त्यापेक्षा '(स्वतःला) चांगले जमणारे पदार्थ' अशी थीम ठेवली तर बरं होईल. म्हणजे चांगलं खायला मिळेल.
'(स्वतःला)
'(स्वतःला) चांगले जमणारे पदार्थ' शंभर टक्के अनुमोदन.

पण चांगले जमणारे म्हणजे चवीला पण चांगले असेहि ना?
म्हणजेच
म्हणजेच चांगले हो.
आता सगळ्यांनाच वरण भात, वरणफळे जमतात असे व्हायला नको. तेव्हा 'चांगले जमणारे चांगले(चमचमीत) पदार्थ' असे म्हणू.
बाकी
बाकी काहीही चालेल फक्त ती वरणफळं नकोत
बाराकर
बाराकर संकष्टीचा उपवास नाही का करत? उपवास थीम ठेवावी.
साबुदाण्याची खिचडी
उपवासाची मिसळ
वर्याचा भात आणि दाण्याची आमटी
उपवासाचे कटलेट
उपवासाचे बटाटा वडे
ग्रीलवर किंवा वाळूत भाजलेली रताळी त्याची चाट
श्रीखंड
फ्रुट सॅलड
रस मलाई
मग रात्री उपवास सोडून परत यायच. वरण भात, तूप, भाजी चपाती, कोशिंबीर, आणि उकडीचे मोदक अशी सात्वीक थाळी खाऊन घरी जायच सगळ्यांनी.
अहो,
अहो, तुम्ही या तर आधी आर्च, मग इथे काय वाट्टेल ते खायला मिळेल.

क्या तरीच
क्या तरीच क्याय. ती येवुन कस चालेल. लोकांना कळेल ना?.
- अनिलभाई
It's always fun when you connect.
काय कळेल
काय कळेल लोकांना? काय काय ? ए या लवकर इकडे सगळ्यांनी, काहीतरी गॉसिप आहे भाईंकडे
भ. मे.
भ. मे. कोणाचा आहे ते कळेल की काय?
वरचा उपवास
वरचा उपवास थीमचा मेनू वाचून 'एकादशी, दुप्पट खाशी' या म्हणीची आठवण झाली...
ती म्हण
ती म्हण नसून 'मिशन स्टेटमेन्ट' आहे
अनिलभाईंन
अनिलभाईंनी बरोब्बर ओळखलं.
Pages