न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण आउट. Sad मला Ca ला fly करावे लागतेय त्याच दिवशी नेमके .. arghh ........

बॉस्टनला या. खिचडीपण मिळेल आणि उभ्या उभ्या विनोदाच्याऐवजी चांगले बसून नाटक पाहायला मिळेल. Proud

उभ्या उभ्या विनोदाच्याऐवजी चांगले बसून नाटक पाहायला मिळेल.>> एवढ्यात "बसले" सुद्धा अश्विनी नाटक ? :D.

उभ्या उभ्या विनोदाच्याऐवजी चांगले बसून नाटक पाहायला मिळेल.
>>
अहो, फक्त ते विनय उभ्या उभ्या विनोद करतात... सगळेजण उभे राहत नाहीत काही... आम्ही सगळे बसूनच बघतो... Proud

>>एवढ्यात "बसले" सुद्धा अश्विनी नाटक ?
अरे प्रेक्षक बसणार. आणि नाटकही 'बसले' असते आत्तापर्यंत, तू जर प्रत्येक प्रॅक्टीस बुडवली नसतीस तर... Happy

सगळ्यांनी कणसं खाल्ल्यावर दात घासायला आपापले टूथब्रश आणावेत. झक्कींना पाहुण्यांकरताचे ब्रश आहेत का असं विचारुन भंडावून सोडू नये.

हुकुमावरुन...

सायो, अगं साधे "चमचा कुठेय" किंवा "डिश कुठेय" असले कामचे प्रश्न झक्कींना विचारायची कोणाची हिंमत नाहीये तर टुथब्रश वगैरे सोडुनच दे. दातात कणसाचे तुकडे घेऊन हिंडतील लोकं पण नो क्वेश्चन्स!

असामी.. विपु बघ जरा तुझी..
>> अरे उत्तर दिलय ना तुला कधीच.... का तू आपल्या विपूचा TRP वाढ्वतोयस ? Wink

तू स्वतःच्याच विपूत उत्तर दिलसं... Uhoh
म्हणून इथे सांगितलं.. बाकी विपूचा TRP वाढवायची आयड्या छान आहे.. Proud

झक्कींना पाहुण्यांकरताचे ब्रश आहेत का असं विचारुन भंडावून सोडू नये.

>>>
अन्यथा ते त्यांचे जुने वापरलेले ब्रश पाहुण्याना ,पाहुण्यांकरताचे ब्रश म्हणून देतील.
भाईसारखा एखादा खवचट पाहुणा म्हणेल 'वापरलेला दिसतोय?'

उभ्या उभ्या विनोदाच्याऐवजी चांगले , नाटक पाहायला मिळेल.

>>>
म्हनजे ऊ.ऊ. विनोद चांगले नाहीत असे म्हणायचेय की काय? Uhoh

हूडा, किती हे डेस्परेट प्रयत्न काड्या घालण्याचे? आजकाल मिशन झक्की बंद आहे वाटतं? Happy

अरे न आणलेली कणसं खाऊन ब्रश झक्कींकडे मागून फ्लॉस पण करून झालं? Proud

कणसांसाठी त्या सँट्यावर अवलंबून राहू नका. टांगा मारण्यात पटाईत आहे तो Wink (शिट्टी ए वे ए ठीचा अनुभव)

झक्कींचा पत्ता काय आहे ?
>>>>

रूप महल, प्रेम गलि , खोली नम्बर चार सो बीस....

ए झक्कींच्या घरी जाताना कोणी व्हाया जर्सी सिटी जाणार आहे का????
मला प्लीज उचला जाता जाता.. किंवा आसपास कुठल्या टाऊन मधे जर भेटता येत असेल तर सांगा.. माझा मित्र जर्सी सिटी त रहातो...
बहूतेक सँटी लॉ. आ. ते सा.सु. जाताना ज.सि. मधून जाईल ना???

अहो, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत लोकांचं 'हो-नाही' 'हो-नाही' चालू असतं... (शिट्टी गटग Proud )

तेव्हा मला आदल्या दिवशी शेवटची संख्या कळली की मग मी कणसं आणेन... नाहीतर ती उरलेली कणसं खायला माझ्याकडे घोडा (टांगा) नाहीये... Proud झक्कींकडे आहे की नाही माहित नाही..

ना ची टां Proud
सँट्या, ते 'नाही' वाले वेगळे.. मी आणि सिंडि पहिल्यापासून 'हो' होतो.
हो कि नै सिंडे??
(बघ, आता परत हो म्हणेल Proud )

Pages