न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन यजमानांनाच ड्रॉप केलं का लिस्ट मधून Biggrin

बघताय हां Angry व्यासंगिक तलवारींचा विषय मधे आणुन ए वे ए ठी वर बहिष्कार टाकीन हां Wink Proud
आयला कसला बहिष्कार अन कसलं काय, ए वे ए ठी माझ्याविना मस्त पार पडेल उलटं लोकं "बरं झालं साला नै आला ते, लैच शाना बनतो..." असं म्हणत खादाडी करतील माझ्यावाटची. Proud

>>>"बरं झालं साला नै आला ते, लैच शाना बनतो..." असं म्हणत खादाडी करतील माझ्यावाटची.
येवढी तसदीही न घेता कदाचित अनुल्लेख करतील! Proud

मैत्रेयी म्हणतेय तसं एकदा मेनु पोस्टला की बरं पडेल.

नयनीश, तुझ्या तलवारींवरच एका कार्यक्रम ठेऊ. हाकानाका Wink

मृ, मनातल्या मनात म्हणतील हे कंसात लिवायचं राहिलं Wink
पन्ना, नको आजुन मेंब्र ड्रॉप होतील Proud

१ कि ४ कि ९ नक्की सांगा कि राव ....

असाम्या, तुझे किती ते सांग रे.. Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

असामींची ९ ची पार्टी???

नाही डेट कळली कि वरची लिस्ट बघून सांगतो भाई :D. आई बाबा आधीच्या w/e ला जाताहेत परत तेंव्हा ९ शिवाय मला जमेल असे वाटत नाही.

१ कि ४ कि ९ नक्की सांगा कि राव ....

९ ऑगस्ट.. ९ ऑगस्ट.. ९ ऑगस्ट.. ९ ऑगस्ट.. ९ ऑगस्ट.. ९ ऑगस्ट.. ९ ऑगस्ट.. ९ ऑगस्ट..

माझा परदेश गमनाचा योग संभावतो आहे त्या वेळेस (कदाचीत), त्यामुळे नक्की नाहीय अजुन

माणसा, लग्न करतोस काय??
Happy Light 1

नाही हो, आपल्या जवळच्या देशात जावे लागेल कंपनीच्या कामासाठी.

९ ऑगस्ट ला मला पण येणे जमेल.
मी एकटाच असेन...येतांना एखादेतरी पोटाला खाण्याजोगे खाद्य आणणे जरूरी आहे काय? कारण ते जमणे थोडे अवघड आहे? मात्र बुद्धीला खाण्याजोगे काहीतरी नक्की आणू शकेन!

<<येतांना एखादेतरी पोटाला खाण्याजोगे खाद्य आणणे जरूरी आहे काय?>>

छे, छे! मुळीच नाही.

<<बुद्धीला खाण्याजोगे काहीतरी नक्की आणू शकेन>> ते काय असते? म्हणजे कढी आमटी सारखे पातळ असते की पिशवीत घालून आणण्याजोगे असते? तिखट मिठाचे की गोड, आंबट? कसे खायचे?

आमच्या घरी बुद्धी नाही, पण कुणि इतर लोक आणणार असतील बुद्धी, तर त्यांना विचारा, काय नि कसे हवे ते. काटे चमचे, कप बशा, पेले मिळतील. Happy Light 1

झक्कीजी,
ते काय असते? म्हणजे कढी आमटी सारखे पातळ असते की पिशवीत घालून आणण्याजोगे असते? तिखट मिठाचे की गोड, आंबट? कसे खायचे? >>>>> अहो तुम्ही उधृत केलेली सगळीच गुणलक्षणे आहेत की या बुद्धीसाठीच्या खाद्यात...आपल्या ऋषीमुनीनींही तेच खाऊन वेद, उपनिषदे आणि आरण्यके लिहिलिन! आता अशीच काही ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्वे त्यांच्या उच्चकोटीच्या बुद्धीमत्तेचे रहस्य लॉ ऑफ अ‍ॅव्हरेजेसचा सिद्धांत मांडून विषद करताहेत पण इथे कुणाला काही कदर असेल तर. Sad
त्यांनी बुद्धी वाढवणे आणि ताण घालवणे या दोन परस्परविरोधी, शरीरास अतिक्लिष्ट पण समशीतोष्ण उपकारक क्रियाप्रतिक्रियांचे रहस्य उलगडणार्‍या एका समाजोपयक चळवळीचा प्रयत्न तन मन धन लावून चालवलाय पण Sad

अशाच काही ऋषीतुल्य व्यक्तींच्या गुजराथी वंशजाने त्यांच्या पूर्वजांनी शिवालिक टेकड्यांवर केलेल्या दुर्मिळ वनीकरणात उगवलेल्या कंदमुळांपासून बनवलेले हे खाद्य विकण्याचे समाजोपयोगी कार्य आमच्या भागात सुरू केले आहे. तर निर्णयाधिकारी आणि इतर योगदात्यांनी ईच्छा दर्शवल्यास या खाद्याची व्यवस्था मी करू शकेन असे मला म्हणायचे होते. फाईन ?

आमच्या घरी बुद्धी नाही, पण कुणि इतर लोक आणणार असतील बुद्धी, तर त्यांना विचारा, काय नि कसे हवे ते. काटे चमचे, कप बशा, पेले मिळतील >>> आपल्या या सौजन्यपूर्ण समाजाभिमुखतेचे समविचारी आणि उदार मतवादी लोकांना तेवढेच उदात्त कौतूक आहे.

बरोबर पाव आणायला विसरु नकोस रे. Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

पाव म्हणजे ब्रेड का पावशेर?
Happy Light 1

पातळ रस्सा आला की पाव ब्रेड आणी पावशेर दोन्ही लागतं Wink
भाई, या वेळेस हिमेस चा जलवा दिसणार का?

जर कुणाला रूट १० वेस्ट माहित असेल तर अगदी सोप्पे आहे माझे घर.

रूट १० वरून डावीकडे वळणे नेहेमी डाव्या लेनमधूनच नसते. जगप्रसिद्ध असा बा. रा. तील 'जग हँडल लेफ्ट टर्न' माहित नसेल तर बाहेरगावच्या लोकांची चुकामुक होते. शिवाय बा. रा. मधे गाडीत गॅस भरायला खास मेक्सिकन किंवा पाकिस्तानी नोकर ठेवले आहेत. त्यांना फक्त 'फिल अप' किंवा २० डॉ., १० डॉ. इ. शब्दच समजतात. त्यांच्याशी गप्पा मारणे कठीण. स्वतः गॅस भरायला परवानगीच नाही!! कायदा आहे तसा.

१० वेस्टला जात रहा, उजव्या बाजूला मोठे पेट स्टोअर दिसेल. त्या चौकात, हिलसाईड अ‍ॅव्हे. ला डाव्या लेनमधून डावीकडे वळा. पुढे गेल्यावर डाव्या बाजूला रॉक्सबरी हाय स्कूल आहे. पुढे पहिल्या ट्रॅफिक लाईटला डावीकडे वळा. तो रायटर रोड. जरा सात आठ घरांनंतर डाव्या बाजूला ११४, आमचे घर. पांढरी मेल बॉक्स. लक्षात राहिले तर फुगे लावून ठेवीन. मेल बॉक्सवर. घरासमोर पार्किंग भरपूर आहे. घरात शिरण्याच्या भानगडीत न पडता, सरळ मागच्या बाजूला जा. महत्वाचे सगळे तिथेच आहे. घरात काही नाही!.
Happy Light 1

झक्की, मला नुसता पत्ता चालेल. Wink

ते काय असते? म्हणजे कढी आमटी सारखे पातळ असते की पिशवीत घालून आणण्याजोगे असते? तिखट मिठाचे की गोड, आंबट? कसे खायचे

>>>
म्हणजे खाद्य, चाव्य, लेह्य की चोष्य असे विचारायचे का तुम्हाला?

(कृपया याचा अर्थ वै. अस्विनी याना विचारावा (मामी नव्हेत))

इथून शुभेच्छा रे. सरवाना. ७ ऑग. माह्या पोरीचा बड्डे!! मी दिवाळी पे़क्शा उत्साहाने साजरा करते पण यावेळी तू फक्त खाण्यापिण्याचे बघ असे सान्गण्यात आले आहे. सामोसा, चिप्स, केक tang असा मेनु आहे. हाकानाका.
झक्की घरी पोहोचण्याच्या सूचना छान आहेत. jug handle left hand turn. maahit naahe te kaay aste.
ithe hyderabaad madhe loke "cut " maartaat fakt.

<<मला नुसता पत्ता चालेल >>
जीपीएस का? म्हणजे तुम्ही आमच्या कडील 'गर्द सभोति रान साजणि,' गाण्यातल्या चाफेकळी सारख्या व्हाल. फक्त 'काय शोधीशी' असे विचारले की म्हणाल 'झक्कींचे घर'. म्हणजे एका चांगल्या गाण्याचे विडंबन. पण यमक जुळेल! करून पहा कविता!
Happy Light 1

Lol

झक्कींच्या घरी का जाशी... (वापरून बघतो).

विनय Happy

उ. उ. वि. चा कार्यक्रम ज्यांना चुकला असेल त्याना ९ August दिवशी मे २००९ मधे न्युयॉर्कला झालेला कार्यक्रम, आणि जुलै २००९ ला बॄममला झालेला कार्यक्रम,झक्कींच्या घरी TV वर दाखवण्यात येईल.

(हे दोन वेगवेगळे कार्यक्रम आहेत)

तिकीटविक्री चालू आहे... पैसे झक्कींकडे न देता मला Direct Cash पाठवायची आहे... (त्यानीही कार्यक्रम चुकवलेला आहे).
हा कार्यक्रम झक्कींच्या विनंतीनुसार Indiain Standard Time प्रमाणे सुरू करण्यात येईल. त्यामुळे हजर असणे गरजेचे आहे, वेळावर येण्याची सक्ती नाही.

आपली हजेरी आजच नोंदवा..

(बघायचा नसल्यास तसे नमुद करावे. कारणे दिली अथवा न दिली तरी चालतील...)

विनय Wink

<<उ. उ. वि. चा कार्यक्रम ज्यांना चुकला असेल त्याना ९ August दिवशी मे २००९ मधे न्युयॉर्कला झालेला कार्यक्रम, आणि जुलै २००९ ला बॄममला झालेला कार्यक्रम,झक्कींच्या ब्याकयार्डात Live दाखवण्यात येईल.

(हे दोन वेगवेगळे कार्यक्रम आहेत)>>

विनय, अनेक धन्यवाद.

<<कारणे दिली अथवा न दिली तरी चालतील...>>

उपयोग होणारच नाही. त्यावेळी सर्व बाथरूम्स बंद ठेवण्यात येतील. जागेभोवती कुंपण घालण्यात येईल. सेल फोन वाजल्यास जप्त होतील व दंड भरल्याखेरीज परत मिळणार नाहीत.
Happy
असा त्याचा गर्भितार्थ आहे.

<<बघायचा नसल्यास तसे नमुद करावे. >>
म्हणजे त्यांच्यावर विशेष नजर ठेवता येईल.

आत्यागआ.
Light 1

आम्हाला पण धरा... आम्हाला पण धरा
२+१ आधी उसागावात पोचते मग बघते काय आणु शकेन ते Happy

झक्कींच्या घरी जाण्याचा योग इतका लगेच येइल अस वाटल नव्हत.
BTW आम्ही शिट्टीत येतोय पुन्हा. किरण ह्या विकांताला पोहचेल, मी आणि जुई बहुदा महिना अखेर येउ.
त्यामुळे ९ ऑगस्ट सहज शक्य आहे अस आत्ता तरी वाटतय. Happy

आम्हाला पण धरा <<< तिकीटाचे पैसे भरा.... Lol

(लोक अर्धवट वाचतात पोस्ट.... Sad )

विनय Happy

Pages