न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०
जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363
आम्हाला पण
आम्हाला पण धरा... आम्हाला पण धरा >>>> अमृता.. जपून जरा.. इथल्या कोणी ध चा मा केला तर खरं नाही तुमचं काही...
सुचने
सुचने बद्दल धन्यवाद

बारात काहिहि होउ शकत ह्याची मला पुरेपुर कल्पना आहे
अमृता,
अमृता, तुम्ही पण येणार हे वाचून आनंद झाला. तुमचे २ मोठे, १ लहान ना?
विनयचे बोलणे फारसे मनावर घेऊ नका. ते स्वतः अर्धवट काही तरी वाचतात. पैसे फक्त त्यांनी मला द्यायचे, कारण त्यांना त्यांचा कार्यक्रम करायचा आहे. म्हणून तर मी कबूल केलं, करा म्हणून.
कुणाला त्यांच्या कार्यक्रमात 'हेकलर' म्हणून मधे मधे गडबड करायची असल्यास मला जास्त पैसे देऊन ही सोय करता येईल.
मला 'हेकल'
मला 'हेकल' केल्यास गल्लिश्श गल्लिश्श शिव्या ऐकाव्या लागतील.
९ ऑगस्टला
९ ऑगस्टला चतुर्थी आहे. कुणाचे उपास-बिपास ?
झक्कींची
झक्कींची निर्जळी आहे त्या दिवशी, उगीच आग्रह करू नका त्याना , पाप लागेल !!
<< ९ ऑगस्टला
<< ९ ऑगस्टला चतुर्थी आहे. कुणाचे उपास-बिपास ?>>
त्याच दिवशी जागतिक बु.प्रा. दिन आहे. निदान त्याबद्दल आदर म्हणून ..
झक्की
झक्की जीटीजी चा मेन्यू काय असणार आहे???
तिथे बर्याच (सुग्रण) पार्ल्याक्वा हजर असणार आहेत.. सो अपेक्षा खूप आहेत..
त्या दिवशी
त्या दिवशी हेही .....
आणि हेही.......
९ ऑगस्टला
९ ऑगस्टला चतुर्थी आहे. कुणाचे उपास-बिपास ?
>>
सिंडे, उपासाचे साबुदाण्याचे वडे वगैरे करुन आण तिथे... दहीवड्यांच्या ऐवजी हे चालतील...
<<झक्की
<<झक्की जीटीजी चा मेन्यू काय असणार आहे???>>
अहो, ठरवा की. सगळ्यांचेच आहे हे ए. वे. ए. ठि. सगळ्यांनी मिळून ठरवायचे. तेंव्हा प्रत्येकाने आपापल्या सूचना द्यायला सुरुवात करा. महिन्याच्या शेवटी यादी करू.
खूप
खूप वेगवेगळ्या प्रकारच्या (कबाब मसाला आणि चाट मसाल्यात मुरवलेल्या) ग्रिल्ड भाज्या, कॉस्टकोच्या व्हेजी पॅटीज. (माझी सोय झाली.) बाकी काय वाट्टेल ते!
मी आपली
मी आपली सुरुवात केलीय. अगदी टेंटेटिव्ह मेनु टाकलाय. एवेएठीकरांनी बदल करावे. फायनल अप्रुव्हल झक्कींचं.
प्यायला :
पन्हं, जलजीरा, साधी/मँगो लस्सी, बीयर (इतर अपेये)
चाट आयटम्स
दहीवडे
दही कचोरी
ग्रिलवर :
भाज्या
मासे
चिकन
व्हेज्/नॉनव्हेज कबाब
व्हेज्/मीट बर्गर्स
ग्रिल्ड भाज्या/मीट फ्लॅटब्रेडमधे घालून
लहान मुलांना हॉट डॉग्ज, चीज बर्गर
सगळ्यात शेवटी (ज्यांना भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखं वाटत नाही) : फोडणीचा दही-भात
गोडाला:
ग्रिल्ड फळं
केळ्यात चॉकलेट भरून ग्रिल केलेलं
त्यावर हवं तर आइस्क्रीम
फालुदा
मी
मी मुलांकरता कप केक्स अन त्यावर डेकोरेशन करायचं साहित्य आणीन
पेयांमधे
पेयांमधे चहा नाही ???? मृ... शो. ना. हो..
अधे मधे ज्यांना कोणाला लागेल त्यांना चहा बनवून द्यायला ( आणि बरोबर अर्धा अर्धा कप दर वेळी प्यायला) मी तयार आहे.. ! झक्कींनी फक्त भांडी आणि चहा, साखर, दुध आणि आलं ह्याची सोय करावी..
( हे मी अगदी सिरीयसली म्हणतो आहे.. "त्या" चहाचा संदर्भ जोडून चर्चा भरकटवू नये.. कृपया
)
ज्यांना भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखं वाटत नाही >>> ही ही.. अगदी..
केळ्यात चॉकलेट भरून ग्रिल केलेलं >> हे सही वाटतय.. !!!
पन्हं कुठे
पन्हं कुठे मिळते?
पावभाजी नको का? नुसत्या व्हेजी बर्गरने कसे होणार?
ग्रिल्ड भाज्या म्हणजे कोणच्या भाज्या ग्रिल करतात? मला वांगी, कणसे , बटाटे, कांदे माहित आहेत. आणखी काय ग्रिल करता येईल? ज्याला मराठीत घोसाळी म्हणतात त्याला इथे काय म्हणतात? स्क्वॅश? इथे नेहेमीच साईड डिश व्हेजीमधे असते.
केळ्यात भरायचे चॉकलेट कसे असते?
दही वडा आणि दही कचोरी? दहीवडा नि बटाटे वडे, कसे होईल? मिसळ, नि आणखी काय असते चाटमधे? पाणीपुरी?
दहीभाताला फोडणी देतात का? कांदा, मिरची शिवाय आणखी काय घालतात?
चहा ची सर्व व्यवस्था होईल. चहाचा मसाला वेगळा चालेल का? आले आहेच. चहा पत्ती (वाघबकरी, किंवा ब्रूकबाँड) पाहिजे की पुड्या चालतील? ADM, तुम्ही फर लवकर सांगितले. आता सर्व तुमच्यावर पडणार! पण घाबरू नका, मदतीला मी आहेच.
फ्लॅटब्रेड म्हणजे सिरियन ब्रेड, पिटा सारखे असते का?

झक्की, अहो
झक्की, अहो किती ते प्रश्न ... तुम्ही अगदी जुदाई सिनेमातल्या परेश रावलसारखे प्रश्न विचारताय...
दहीवडे सिंड्रेलाकडे द्या... परवाच तिने मला सांगितले की तिला दहीवडे उत्तम जमतात म्हणून...
परवाच तिने
परवाच तिने मला सांगितले की तिला दहीवडे उत्तम जमतात म्हणून...
>>>
'खायला' म्हटली असेल ती !
चहाचा
चहाचा मसाला वेगळा चालेल का? आले आहेच. चहा पत्ती (वाघबकरी, किंवा ब्रूकबाँड) पाहिजे की पुड्या चालतील? >>>>
)
मला मसाला नसला तरी चालतो.. बाकीच्यांना हवा असेल तर व्यवस्था असू द्या..
(नाहीतर पुढच्या जिटीजी ला काय सुधारणा आवश्यक आहेत ह्या बीबी वर हा मुद्दा यायचा...
आणि पुड्या नको.. पत्ती पाहिजे..
<<दहीवडे
<<दहीवडे सिंड्रेलाकडे द्या... परवाच तिने मला सांगितले की तिला दहीवडे उत्तम जमतात म्हणून...>>
शाब्बास सचिन. मदत करावी तर अशी.
तुम्ही मनावर घेऊ नका हो सिंड्रेला. तुम्हाला तुमचा मुलगा, नव॑रा, नोकरी हे सगळे सांभाळून हे जमेल का? नि शिवाय प्रवासात ते सांडले वगैरे ते उगाच कार खराब व्हायला नको. आपल्याला दुसरी व्यवस्था करता येईल.
सचिनचे लग्न झाले नाहीये, त्याला या गोष्टी लक्षात येत नाहीत. त्याच्या गळ्यात एक मुलगी बांधून द्या. मग जरा ठिकाणावर येईल तो!
गळ्यात एक
गळ्यात एक मुलगी बांधून द्या <<< गळ्यात ??? मुलगी????
तो केवढा , त्याचा गळा केवढा.. छोटीश्शी असेल तर पेलेल त्याला... नाहीतर पडेल ना तो (संसारात)
विनय
विनय, आता
विनय, आता बांधल्या बांधल्या आणि पडल्या पडल्या विनोद का?
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
'खायला'
'खायला' म्हटली असेल ती ! >>> अजिबात नाही. मला दही आवडत नाही, दही वडे तर त्याहुन नाही
झक्की, तुम्ही कित्ती चांगले आहात. तुम्ही म्हणताय तर मी काहीच आणत नाही. उगी गाडीत सांडायला वगैरे नको नै का
मग लोकहो,
मग लोकहो, दहिवडे हवेत की नकोत? एक मत तर नको असे आहे.

गटगमधे
गटगमधे कुठलीही गोष्ट एकमताने ठरवली गेली पाहिजे
(No subject)
बटाटेवडे
बटाटेवडे हवेतच. मी आणेन. दहीवडेही असूदेत.
साबुदाण्याची खिचडी पण हवी.
हे असू
हे असू देत,......
पण हे?
साबुदाण्य
साबुदाण्याची खिचडी मी आणीन..(जर यायचे निश्चीत झाले तर)
<<निश्चीत
<<निश्चीत झाले >> 'झाले' नाही केले तर असे म्हणा वाटल्यास, पण कराच हा आग्रह. मला चांगले म्हणणारे लोक असायला हवेत.

Pages