बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी मला वाटलं की पाकृ हवी आहे माहिती आहे का? आणि युसुयुसां हे दोनच बाफ इथे उपस्थित झालेत. पण आता 'माझे आवडते पदार्थ मी असे खातो' हा बाफ पण आला आहे इकडे.

Uhoh
एवढं काय लगेच?
युक्तीवरच हवा होता तो प्रश्न पण एकाच ब्राऊझर मधे दोन्ही विंडो उघड्या असल्याने माझा बीबी चुकला हे माझ्याही आत्ताच लक्षात आलंय. त्याबद्दल सॉरी. प्रश्न तिकडे हलवते.
उपवासाच्या खाकर्‍यावर त्यातले घटक लिहिलेत आणि माझ्यामते ते नॉन उपवासाचे नाहीत.
काही आयडीया असतील तर द्या नाही तर सोडुन द्या. हे का घातलं आणि मिसळ की भेळ आणि कशा कशाच्या गुंडाळ्या यात वेळ कशाला घालवताय?

सिमंतीनी, स्वाती : थँक्स Happy

काही आयडीया असतील तर द्या नाही तर सोडुन द्या. हे का घातलं आणि मिसळ की भेळ आणि कशा कशाच्या गुंडाळ्या यात वेळ कशाला घालवताय? >>> काय प्रॉब्लेम काय आहे नक्की?

इथल्या पोस्टी वाचून मनात येणारी प्रतिक्रिया लिहायचीच नाही की काय?

काय प्रॉब्लेम काय आहे नक्की
>>>
एक्झॅक्टली हाच पर्श्न मलाही पडलाय मंजुडी!

असो! माझ्याकडुन हा विषय इथेच संपवतेय.

तू ही आत्ताची पोस्ट टाकेपर्यंत मलातरी कसलाच प्रॉब्लेम नव्हता. जरा दृष्टीकोन बदलून त्या पोस्टी वाचल्यास तर तुझ्याच लक्षात येईल की एकूणच चाललेल्या गंमतीत हातभार लावलेला होता.

एकूणच चाललेल्या गंमतीत >> याचाच वैताग आला.
तुझ्या एकटीवर चिडचिड नाही. तुझ्या पोस्ट मधल्या दोन्ही गोष्टी त्यात आल्याने तुला वाटलं असेल की ती पोस्ट तुलाच एकटीला उद्देशुन आहे.

एखादी व्यक्ती सतत सगळं गंमतीत घेते म्हणजे सतत तिची खेचत रहावं असं नाही
(हे ही फक्त मंजुडीलाच उद्देशुन नाही)

मी आता खरच विषय बंद करतेय

तुझ्या एकटीवर चिडचिड नाही. तुझ्या पोस्ट मधल्या दोन्ही गोष्टी त्यात आल्याने तुला वाटलं असेल की ती पोस्ट तुलाच एकटीला उद्देशुन आहे.

एखादी व्यक्ती सतत सगळं गंमतीत घेते म्हणजे सतत तिची खेचत रहावं असं नाही
(हे ही फक्त मंजुडीलाच उद्देशुन नाही)>>

तुझ्या शंकेवर सीमंतिनी, स्वाती, मी, चनस, नंदिनी आणि शूम्पीने पोस्टी टाकल्यात. त्यापैकी सीमंतिनी आणि स्वातीला तू थँक्स म्हटलं आहेस. म्हणजे उरल्या मी, चनस, नंदिनी आणि शूम्पी! ह्यातलं कोणकोण तुझी 'सतत खेचत' असतं?
तुझी पोस्ट मला एकटीला उद्देशून नाही असं तू लिहिलं आहेस, पण उरलेल्या या चौघींची रिप्रेझेंटिटिव्ह म्हणून तुला प्रतिप्रश्न करतेय असं समज.

कोणीतरी आपली सतत खेचतंय असं वाटत राहणं हाच प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय. जौद्याझालं!

धागा वाहवु नका!! अरे धागा कसला.. चाल्लय काय!!
बरं दसर्याला पॉट लक साठी मेनु सांगा..

तो ठरला की मग कुणी काय करायचं वाटुन घेता येइल!
३-४ फॅमेलीज!

पॉटलकसाठी आधी गोड काय ते ठरवा. त्यानुसार मेनू फिरतो. गोड मेनमध्ये असणार आहे का- श्रीखंड वगैरे? की डेझर्ट असणार आहे- आईसक्रीम, कस्टर्डसारखे?

ते काहीही ठरलं नाही! डोकं न वापरता तयार मेनु हवा आहे!
तो बनवायलाच फक्त कश्ट घ्यायचेत.. ठरवायला नाही! :प

तसं सुचवा.. माझं किवा त्याण्चं काहीच ठरलेलं नाहीये अजुन..

डोकं न वापरता>> मग मी नाही सुचवू शकणार Wink Light 1

माझं किवा त्याण्चं काहीच ठरलेलं नाहीये अजुन..>> मग ठरवा काहीतरी! Proud

तंदुरी चिकन, मॅक्रोनी व चीज, व्हेज मंचुरीअन, सोल कढी, पुरी, मटकीची उसळ, सबवे मधील सलाड, मॅक्डी मधील ओरीओ आइस्क्रीम/ रेडव्हेलवेट केक.

स्टार्टरः तंदुरी गोभी. फिश इन पॉकेट्स, खाकरा भेळ. योकदम वर्ल्ड्क्लास मेन्यू. असली गंमत आम्ही दिवसातून कधीही केव्हाही खातो. आजिबात डोके लावत नाही. दिवे घ्या धनुकली ताई.

पारंपारीक मध्ये - १. मसालेभात + कोशिंबीर (एक फॅमिली) २. स्वीट (दुसरी फॅमिली) ३. पुर्‍या/पोळ्या + भाजी (तीसरी फॅमिली) ४. ज्यांच्याघरी जमणार त्यांनी कोथिंबीर वडी/पापड म्हणजेच तळण वै + वरणभात किंवा (भात नको असल्यास मसालेभाताला सपोर्टीव्ह) अळुचीभाजी /ताक, मठ्ठा यातलं काहीतरी, चटणी, लिंबु इ.

मला "माझं स्वतःचं डोकं न वापरता मेनु हवाय, आयता दुसर्याच कुणी मेहनत करुन जोडुन दिलेला" म्हणायचं होतं पोर्णिमा ताई! Happy
आणि ठरवायचं काम आउट्सोर्स करायलाच तर ईकडे आलेले.. Wink
हलकेच घेतलेले आहे.

मला दसर्यासाठे व्हे़ज मेनु हवा असं ही सांगायचं राहीलंच्चे Wink

हर्षा चा मेनु चांगलाय.. पण असा मागल्या वेळी झालाय मसालेभात वगैरे..(मसालेभात, पुर्या, ब.भा.,रव्याची खीर्,पापड्,सुरळीच्या वड्या)
थोडा वेगळा ही चालेल! पंजाबी, राजस्थानी, कश्मीरी अशी थीम घेउ का?

त्यात काय काय करता येइल..?

तमिळ मेनू सुचवू का?

अप्पलम (पापड), पचडी (मूग डाळीची कोशिंबीर). सुंदल, पोरीयल, कुटू, सांबार. रसम, चटणी (खोबर्‍याची), साधा भात, पुलाव किंवा पुळीओगरे किंवा लेमनराईस, दहीभात. अप्पम किंवा फुलके. उडदाचे वडे, गोडाला: पायसम, पोंगल,

  1. मृच्या रेस्पीने वांगं मुगवडी फ्राय, भरली भेंडी , सिंडीच्या रेस्पीने पेंसिल भाजी, यापैकी एक,
  2. सशलच्या रेस्पीने मेथी पुलाव, ,
  3. पापड, फुग्यामिरचीचं रायतं , सुरळीच्या वड्या / कोथिंबीर वडी पैकी एक
  4. आंबेमोहर तांदळाचा भात , वरण / आमटी / टॉमेटो सार पैकी एक
  5. फुलके,/पोळ्या
  6. फिरनी

असं वाटून द्या एकेक फॅमिलीला

धन्नो, कर्नाटक थीम घे. Happy
मैसूर बोंडा स्टार्टर, बिशीभेळी भात / वांगी भात / खारा भात / चित्रन्ना, अक्की रोटी, रागी मुद्दे /रोटी (पण हे काही लोकांना आवडणार नाही.), रस्सम, स्चिट डीश - मैसूर पाक, गोड पोंगल.

गुजराथी अनुमोदन!!

नाहीतर कौन बनेगा करोडपती अशी काही आवडता टीव्ही शो थीम घेऊन पदार्थ करा: एखादा "कोड रेड" (कोल्हापुरी रस्सा), एखादा "फास्तेत फिंगर फर्स्ट" (बेबी समोसा). सात करोडचा पदार्थ माझ्या मते तरी झकास आम्रखंड.

मेनू सुचवा..
दिवाळीमधे एक दिवस डिनर. आम्ही धरून ७ माणसे. ज्ये ना आहेत त्यामुळे अभारतेय चवीचे सक्य्तो नको.
मी एकटीच करणार आहे. फारतर बाईकडून काहीतरी करून घेइइन सकाळिइ.
व्हेजच हवा आह मेनू.
गोडाचे मोस्टली विकत आणेन.

मी सुचवलं तर चालेल का?

ज्ये ना आहेत त्यामुळे चौरस आहार असेल तर केलेल्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता जास्त आहे. नेहमीच्या टिपीकल मेनू ला पर्याय वापरलेत तरी चालू शकेल.
उदा.
कोशिंबीरीऐवजी चक्क्यातले (hung curd) रशियन सलाड - बाईकडून भाज्या, अननस dice करुन घेता येइल.
पातळभाजीऐवजी --- पनीर माखनी ( सायोची रेसिपी सोपी आहे) / पालकपनीर
नेहमीच्या उसळीऐवजी वाटणाची उसळ
भाताचा नेहमी होत नसलेला कोणताही प्रकार चालू शकेल.
साधारणतः ज्येनाना मैद्याचे प्रकार नान, भटुरे आवडत नाहीत, तोडायला, चावायला आणि पचायला जड पडतात.
सुक्या भाजीला, चटणीला पटकन पर्याय सुचला नाही.

डिनरऐवजी लंचला बरं पडत नाहीतर रात्रीची वेळ आहे म्हणून नीट खाल्लं जात नाही. फक्त आपल्याला वेळेची घाई होऊ शकते.

-बिसिबेळेभात. भाज्या चिरून मिळाल्यातर यात फार गुंतून रहावं लागत नाही. MTRचा बिबेभा मसाला अफलातून आहे. भरपूर साजुक तूप, तळलेले काजू घालून भारदस्त पदार्थ होतो. Happy
-याबरोबर दह्यातली कुठलीही कोशिंबीर किंवा दहीबुंदी.
-उकडलेले बटाटे आणि नारळाचं दूध हे मुख्य घटक असलेलं पोटॅटो स्ट्यू.
- हिरवा मटररस्सा. ओला नारळ, हिरव्या मिर्च्या, भरपूर कोथिंबीर, दालचिनी, लवंग आणि आलं एकत्रं वाटून, गोडलिंबाची पानं-तूप्/तेल जिर्‍याच्या फोडणीत परतून यात ताजे/फ्रोजन मटारदाणे घालायचे. पाणी घालून हवा तर पातळ रस्सा, किंवा दाट मसाला.
-तांदळाचं पीठ-नारळपाणी, मीठ आणि यीस्ट एकत्र करून, तासभर आंबवून या पिठाची मिनी धिरडी छान फ्लफी आणि जाळीदार होतात. स्ट्यूबरोबर मस्तं लागतात. तव्यावर पसरायचीसुद्धा गरज नाही. डोश्यापेक्षा किंचित पातळ बॅटर पळीभर ओतून तसंच शिजू द्यायचं. (ही आधी करून ठेवता येतात. गारदेखिल चांगली लागतात.)

बिसिबेळेभात, दह्यातली कोशिंबीर, पोटॅटो स्ट्यू, हिरवा मटरमसाला आणि तांदळाची धिरडी.

गोड काय आणणार त्यावरून मेन्यू उलटा ट्रॅक करता येईल -
उदा: १) गोड आम्रखंड - पुरी बटाटा-मटार भाजी, फ्लावर रस्सा आणि मसाला भात. कोशिंबीर काकडीची फोडणीची. पापड.
२) गोड रसमलाई किंवा रसगुल्ला, खीर (इतर दुधाचे काही) - पोळी, तुझीच रताळ्याची दाक्षिणात्य भाजी, मिक्स उसळ, गाजराची कोशिंबीर. जीरा राईस.
३) गोड पुरणपोळी किंवा इतर कुठलीही गोड पोळी - भरली वांग्याची भाजी, भात-आमटी, टमॅटो कोशिंबीर, पापड-कुरडई

सो ऑन...

Pages