बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_प्राची_ माबोवरच्या पदार्थांच्या रेसिपीज हुडका. बरेच वेगवेगळ्या नावाचे, चवीचे व झटपट पदार्थ मिळतील.

कॉर्न चाट, आप्प्यांचे अनंत प्रकार (गोड / तिखट), आलेपाक [पोहे], टिक्कीचे वेगवेगळे प्रकार मिळतील.
सुंदल बनवू शकता. सोपे आहे एकदम.

गोडात फिरनी, माबोस्पेशल मलईबर्फी, हयग्रीव, फळे + कस्टर्ड + आईस्क्रीम कॉम्बो, आंब्याचा शिरा वगैरे.

आताच्या गणेशोत्सवात लै भारी भारी पदार्थ बनवले गेलेत, ते ट्राय करू शकता!

विकतचे स्वीट्स आणणार असाल तर काहीतरी फॅन्सी नाव असलेले आणा, म्हणजे ओळखणार्‍यांना अवघड जाईल!

मला उद्या ऑफिसमधून परस्पर भोंडल्याला जायचंय. आज संध्याकाळी करून ठेवून डब्यात नेता येईल अशी खिरापत सांगा ना. काकडीचे/भोपळ्याचे घारगे, नंदिनीच्या रेसिपीने हयग्रीव (दूध लागेल ना पण?) यंदा गणेशोत्सवातील मोदकांच्या काही नवीन पाकृ पैकी एक डोक्यात आहे. मुली फार छोट्या आहेत 5-8 वर्षांच्या. चमचमीत पटकन खातील एकदोनच पदार्थ न्यायचेत. भेळफरसाण नको.

मी धाग्यावर क्लिक करून डायरेक्ट पोस्ट केली. वर अकुनेही तेच सुचवले आहे. पण माझी अट वेगळी आहे अकु. Proud

नंदिनीच्या रेसिपीने हयग्रीव (दूध लागेल ना पण?) >>> दूध नाही घातलेस तरी चालेल. पटकन कूकरमध्ये गरम कर आणि थोडे दूध घाल. अगदी ज्यांच्याकडे गेलीस त्यांच्याकडे जमत असेल तरी गरम करता येईल. नाहीतर तसंच गार दिलं तरी छान लागतं थोडं घट्टसर लागतं. तोठरा बसू नये म्हणून शिजवताना डाळ चांगली घोटून घे.

रेसिपी करायला कमी कटकटीची आहे आणि ओळखायला अति कठिण,. Proud

हो ना, पण आमच्या त्या दोन बाल जगदंबा पुरण एवढं आवडीने खाणार नाहीत. इतरांसाठी करते फायनल. आता तिखट तरी सांगा तुम्ही. क्रिस्पी काहीतरी

तुला गोडामध्ये खटपट करायची असेल तर पाकातल्या पुर्या हा एक ऑप्शन आहे.

तिखटामध्ये सुंदल प्रकार चालेल का? नवरात्रीची तमिळ स्पेशल रेसिपी आहे. पण ते क्रिस्पी होणार नाही. (झटपट मात्र होइल.) Proud

झटपट इज मेन क्रायटेरिया. सुंदल इथे आहे का? रेसिपी सांग.मी आधी झटपट चिरोटे पाहिले पण चिरोट्यांच्या नावाखाली खाऱ्या दिल्या तर धरून मारतील पोरीसुद्धा.

तिखट क्रिस्पी आज संध्याकाळी करून डब्यात न्यायची उद्या संध्याकाळसाठी खिरापत कचोरी ड्रायफ्रुट समोसे इत्यादे विकतचे प्रकारच आठवताहेत.
खारे शंकरपाळे होतील पण झटपट होणार नाहीत.

हो ना मंजू. संकटकाळी सुटण्याचा मार्ग आहेच तो. नंदिनी, नेकी और पूंछ पूंछ?

भोंडल्याचा विषय आहेच तर इथेच विचारते.
आमच्या सोसायटीत मराठी मुली जास्त नाहीत. नॉर्थ्/साऊथकडच्या फॅमिली आहेत. भोंडला करायचा झाला तर कसा करावा, कुठली गाणी म्हणली तर योग्य रहातील, प्लिज सुचवा.

चैत्रगन्धा माझे २ सेंट्स: आधी मराठी भोंडल्याची गाणी ३-४ तरी म्हणावी. नुसते हात धरून गोल फिरण्यापेक्षा मराठी गाण्यांवर पण नाचू द्यावे लहान मुलींना. (गरबाला गेलो तर सुरुवात गुजराथी गीतानेच सहसा करतात मग काय तो फिल्मी धुडगूस.)

६ - ७ उस्गावातिल माणसे जेवायला येणार आहेत - सलाड, पुर्या, भाजी, पुलाव, आणि काही तरी गोड असा बेत करायचा विचार आहे. अजून काही सुचवा!

अंडाकरी-पोळ्या असा बेत असतो तेव्हा त्याबरोबर तुम्हाला कोणत्या भाज्या, कोणत्या स्वरुपात खायला चांगल्या वाटतात?

अंडाकरी-पोळ्यांबरोबर उकडलेला बटाटा घालून कुठलीही सुकी भाजी आवडते.
ढोबळी मिर्ची-बटाटा, वांगं-बटाटा, मटर-बटाटा, भरपूर ब्राऊन केलेला ढीगभर कांदा-बटाटाफ्राय, बारिक चिरलेल्या (फ्रेंचकट बीन्स्)-बटाटा...किंवा मग कुठल्याही शेंगांची फ्रायभाजी. भाजी नसेलतर बटाट्याचं, भोपळ्याचं किंवा ढोबळ्या मिर्च्यांचं दही घतलेलं रायतं.

धनि - हो, पुर्‍या जड होऊ शकतील.
लाईट स्टार्टर - ढोकळा / फाफडा / अळूवडी / कोथिंबीरवडी / सुरळीची वडी / मिनी समोसे (हे सर्व विकत मिळू शकेल)
मसाला पापड / बेक्ड चिप्स इत्यादी.

Pages