Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे ये BS बॉबी नहीं जानती!!
अरे ये BS बॉबी नहीं जानती!! बॉबी गं.. लांब पिवळ्या नळ्या आपण बोटात अडकवून खायचो लहानपणी.. त्या.
तर हा मेनू आदला दिवस व सकाळ असे वापरून होईल का चांगला सांगा-
माझा मेनू जबरी आवडला. मुलांनी नुसते छोले, आम्रखंड, पोळी आणि तळणावर ताव मारला. साधं वरणभातच ठेवल्याने कष्ट वाचले आणि मोठ्यांना पोटभर झालं.
डोजेसाठी घरी पदार्थ बनवून दुसर्या घरी न्यायचेत. मुलीला जिने उतरायचेही नाहीत आणि बाहेरचं काही आम्हीच नेणार नाही आहोत. ट्विन्स आहेत!
काश्मिरी पुलाव, कांटो रायता, कॉर्न सूप, पोळ्या, भाजी(सुचवा), कुरकुरीत अळूवड्या आणि गोडात गुलाबजाम किंवा गाजर हलवा.
कापु मुद्दाम बनवणार कारण त्यात मस्त भरपूर ड्रायफ्रूटसने सजवता येईल जे मुलीच्या साठी हेल्दीही असेल. खूप पदार्थ नकोयत. लिमिटैड पण छान वाटले पाहिजे.
अळूवड्या व गुलाबजाम / गा ह
अळूवड्या व गुलाबजाम / गा ह आदल्या दिवशी करता येतील. त्यामुळे उत्तम.
कांटो रा, कॉ सू, पोळ्या व भाजी आयत्या वेळी करावी लागेल ना? (त्या दिवशी सकाळी) - भाजीत सायोची पनीर माखनी? बेकडिश केली तर अगोदर करून ठेवता येईल व आयत्यावेळी मैत्रिणीकडे मावे असेल तर गरम करता येईल. किंवा मग सोपी वाटणारी अशी कोणतीही ग्रेव्हीवाली मिक्स व्हेज टाईप भाजी.
का पु ची कच्ची तयारी आदल्या दिवशी करता येईल, पण पुलाव ताजाच बरा.
कापू बरोबर कॉसू नाही छान लागत
कापू बरोबर कॉसू नाही छान लागत आशू.
कापू मधे भाज्या वगैरे अजिबातच नसते त्यामुळे त्याच्याबरोबर टोसू किंवा टोसा सगळ्यात मस्त लागते.
कापूच्या खड्या मसाल्याबरोबर जायचे तर दाल माखनी भाजी म्हणून मस्त जाईल. किंवा मग पनीर बेस भाजी कुठलीही.
अळूवड्या रेडी आणून फ्राय करणारेस की पूर्ण तूच करणारेस?
कापूची कच्ची तयारी? डाळींबाचे
कापूची कच्ची तयारी? डाळींबाचे दाणे काढून ठेवण्याशिवाय काय असते? काहीच चिराचिरी नसते अगं.
की तुम्ही कापु मधे भाज्या घालता?
शूम्पीच्या विपुमधे बघ माझी रेसिपी.
कच्ची तयारी म्हणजे साहित्याची
कच्ची तयारी म्हणजे साहित्याची जमवाजमव करून, निवडून बिवडून ठेवणे गं!
कदाचित तुपात खडा मसाला व सुकामेवा परतून घेऊनही ठेवता येईल आदल्या दिवशी. अर्थात फार काही वेळ वाचणार नाही त्यात.
कदाचित तुपात खडा मसाला व
कदाचित तुपात खडा मसाला व सुकामेवा परतून घेऊनही ठेवता येईल आदल्या दिवशी. अर्थात फार काही वेळ वाचणार नाही त्यात. >>> वेळ तर वाचणार नाहीच. पण कितीही जरी एअरटाईट डब्यात ठेवला तरी त्या मसाल्याचा सुवास कमी होईल. ताजाच परतणे मस्त राहील!
येस येस, शूम्पीच्याच विपूत
येस येस, शूम्पीच्याच विपूत पाहून ठरीवलाय.
नीट ठळक रेसिपी टाका की बाई.
कॉसू नको का? मग टोसा तर साबा मस्तच करतात, त्या करतील. अळूवड्या आदल्या दिवशी उकडून ठेवेन सकाळी तळेन. पोळ्या रोजच्या मावशी करतील. योकु, अग्रीड.अकु, पनीर नकोय शक्यतो. भाज्यांचीच भाजी सांगा
अगं अळूवड्या रेडी आण की बये.
अगं अळूवड्या रेडी आण की बये.
ठळक रेसिपीसाठी परत बनवेन फोटु काढेन मग टाकेन.
न्हाय गो, विकतचं नकोय ना
न्हाय गो, विकतचं नकोय ना काही.. प्रो रविवारी आहे मग मी शनिवारी करेन ना.
)
तू रेसिपी टाक, मी फोटो टाकेन (मग तू पुन्हा उडव रेसिपी
डोंबल...
डोंबल...
गोभी टकाटक आणि पुदिनावाले आलू
गोभी टकाटक आणि पुदिनावाले आलू गोभी http://www.maayboli.com/node/35800 या दोन्ही भाज्या (कोरड्या) मस्त होतात.
ग्रेव्हीवाल्या भाज्यांमध्ये डुबकीवाले आलू / बटाट्याची रस्साभाजी (माबोवर भर्पूर व्हेरिएशन्स आहेत) / गट्टे की सब्जी / कोफ्ता करी / दम आलू / नारळाच्या दुधातली भाजी - वलवल किंवा अवियल टाईप / उंधियो या जरा वेगळ्या प्रकारच्या भाज्या. मेथी मटर मलाई / आलू मटर / पंजाबी पालक.
नाहीतर मग भरली वांगी / कां टो फ्लॉ ब रस्सा वगैरे नेहमीचे यशस्वी.
वा वा, भरपूर पर्याय दिलेस.. ९
वा वा, भरपूर पर्याय दिलेस.. ९ तारखेला प्रो आहे.. सांगेन कोणती ठरली ते. धन्यवाद सर्वांना.
अगं हा ते बाळबटाटे वाली
अगं हा ते बाळबटाटे वाली विपुमधली रेसिपी पण भारी आहे. ती मस्त जाईल कापू बरोबर
हा अलकामावशीची बाळबटाटे भाजी
हा अलकामावशीची बाळबटाटे भाजी असं काहीतरी नाव आहे.
अरे ये BS बॉबी नहीं जानती!!
अरे ये BS बॉबी नहीं जानती!! बॉबी गं.. लांब पिवळ्या नळ्या आपण बोटात अडकवून खायचो लहानपणी.. त्या. >>> ओके आल लक्षात
आम्ही त्याला fingers म्हणायचो.
अरे ये BS बॉबी नहीं जानती!!
अरे ये BS बॉबी नहीं जानती!! >>आम्ही पोंगा पंडित म्हणायचो
मी केलेला आणि भयंकर हिट्टं
मी केलेला आणि भयंकर हिट्टं झालेला मेन्यू -
सुरळीच्या वड्या, (आधी करून ठेवता येतात)
श्रीखंड (आकठेये), पूरी (तळण - नवरा)
भरली भेंडी (मसाला आकठेये... सुलेखाची रेसिपी)
दह्यात कालवलेलं मेतकुट आणि काकडीची साधी कोशिंबीर
जीरा राईस
गोळ्याची आमटी (वाटप आकठेये)
आंब्याचा कलाकंद (सीमा फेम.. अर्थात आकठेये)
स्टार्टर्स नाहीत. पण सध्या गरम होतय... आल्याबरोबर अॅपल ज्यूसमधे ( क्लाऊडी) आलं आणि हवी त्यांना पुदिन्याची पानं घालून...
उसाचा रस असल्याचं मानून प्याले आणि मग विचारतात... कसला रस होता.
ये आकठेये आकठेये क्या है?
ये आकठेये आकठेये क्या है?
उसाचा रस असल्याचं मानून
उसाचा रस असल्याचं मानून प्याले आणि मग विचारतात... कसला रस होता. >>> :p
(आधी करून ठेवता येतात) =
(आधी करून ठेवता येतात) = आकठेये आकठेये
(No subject)
८ पदार्थ करायचे आणि त्यातले ५
८ पदार्थ करायचे आणि त्यातले ५ आकठेये...इसको शिळासप्तमी बोलते है

(अर्थात माझी ही तिच गत असते. त्या दिवशी बिघडेल बिघडेल ह्या भीतीने.त्यामुळे मेन्यू आवडलाच)
अर्रे बाबा... प्लीज. वाटप आधी
अर्रे बाबा... प्लीज.
वाटप आधी म्हणजे संध्याकाळी जेवायला लोक येणार असतिल तर सकाळी.
आधी म्हणजे आदल्या दिवशी नाही. श्रीखंडाचा चक्का नक्की आदल्या दिवशी किंवा त्याही आधी सुरुवात करावी लागते.
गोळ्याची आमटी तर अगदी पानावर बसायच्या जरा आधी बनवावी लागते. ती परत परत गरम करता येत नाही.. करू नये.
प्रामाणिकपणे सांगते शीळं वाढणं जमणार नाही मला... जेवण बनवता येत नसेल चांगलं.... पण जे बनवेन ते साधं, आणि ताजं असेल... शीळं नक्की नाही!
उसाचा म्हणून प्यायलेल्यांना माझ्या चेहर्यावरून कळलं.. उसाचा नाही. म्हणून विचारणा.
आमच्याकडे बरेच वेळा झालेला व
आमच्याकडे बरेच वेळा झालेला व हिट्ट होणारा मेन्यू म्हणजे -
पोळ्या / पराठे (मेथी, कोथिंबीर, पालक वगैरे) - कणीक मळून, भिजवून ठेवता येते. पराठे किंचित कमी भाजून ठेवता येतात. आयत्या वेळी शेकायचे.
बुंदी रायता (करायला सोपे व झटपट)
छोले / डुबकीवाले आलू किंवा पनीरची ग्रेवीवाली भाजी (अगोदर तयारी करता येते किंवा बनवून ठेवले तरी चालतात)
जिरा राईस/ साधा भात - आयत्या वेळी
दाल तडका (सोप्पी) - डाळ अगोदर शिजवून आयत्यावेळी तडका.
सलाद किंवा जास्तीची कोशिंबीर (टो-का-कां रायता / दा कू घालून) - चिराचिरी आयत्यावेळीच.
कैरीचे लोणचे (घरी बनवलेले)
स्टार्टर (अळूवडी / सुरळीवडी / कोथिंबीरवडी / ढोकळा / मूंग गोटे / मिनी समोसे) व गोडाचा पदार्थ बाहेरून आयता आणतो. (जिलबी / आम्रखंड / वाडीची राधाकृष्ण बासुंदी / अंगुर मलाई वगैरे)
गोड घरी करायचे असेल तर मग साजूक तुपातला सत्यनारायण शिरा / शेवयांची खीर / पायसम् / पुरण / फ्रूट सलाद. (अगोदर बनवून ठेवणे)
तळण शक्यतो नाहीच.
विडे करायचे असतील तर आदल्या दिवशी करून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये. फळे चिरून डबाबंद करून फ्रीजमध्ये.
श्रीखंड घरीच करणे कंपलसरी
श्रीखंड घरीच करणे कंपलसरी का?
उत्तम प्रकारचे श्रीखंड मिळते की विकत. घरी करायच्या खटपटीत जो वेळ जातो तो धरला तर घरचे आणि बाहेरचे श्रीखंड दोन्हीची किंमत एकच येते.
चितळेही घरचेच की! बंधू नाहीत
चितळेही घरचेच की! बंधू नाहीत का ते आपले?!!
ज्जेबात!
ज्जेबात!
(No subject)
:p
दाद menu आवडला. मला पण एकदा
दाद menu आवडला. मला पण एकदा daring करुन २-३ starters + २-३ भाज्या न करता, तुझ्यासारखा साधा, सोप्पा पण ताजा menu बनवायचा आहे.
नीरजा, नाही गं. इथे सिडनीत
नीरजा, नाही गं. इथे सिडनीत विकतचं श्रिखंड किती दिवस दुकानातल्या फ्रीजमधे असतय कुणास ठाऊक. भारतातल्यासरखे हलवाई, दुधा-दह्याचे पदार्थं बनवणारे आणि विकणारे नाहीत इथे... म्हणून खटाटोप.
आणि खरं सांगायचं तर चक्का करण्यात जो खटाटोप आहे तोच. पुढे दळलेली साखर आणि ते चाळणीतून काढायला वेळ नाही लागत. अनुभवावरून सांगतेय.
तसंही मी नेहमी एकच अन जास्तीत्जास्तं दोन कुटुंब बोलावते त्यापेक्षा जास्तं नाही. एव्हढ्यांसाठी म्हणावा तितका खटाटोप असा नाही वाटत.
Pages