बेत काय करावा- २

Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59

सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऊंधियु, फुलके,
टोमॅटो सार/गुजराती कढी /सोलकढी,
खिचडी / मसालेभात / मटारभात,
सॅलड,
दहीवडे/बुंदी रायता,
(हवा असल्यास) भाजलेला मसाला पापड,
गोड पदार्थ.

(ऊंधियु असल्यावर इतर भाज्यांची गरज नाही, पण पर्याय म्हणून अगदी सौम्यसर चवीची साधी, कोरडी भाजी ठेवता येऊ शकते.)

बटाटे, भात, तांदूळाची धिरडी आणि दही ते हि रात्री?
ज्ये. ना. मधले जर(काही) मधुमेही असतील तर इतके बटाटे, भाताचे पदार्थ?
त्यात रात्री दही म्हणजे संधिवाताला आमंत्रण.
बरेचसे ज्ये. ना. काही आवडीने इतकं खाणार नाही हे नक्की.

Palak parathe, aaloo chaat, chote batate wade pudina chatani, solkadhi, masoor daal rice n daal tadaka.

माझ्याकडे दिवाळी डिनर आहे तेव्हा व्हेज पुलाव, टोमॅटो सूप आणि बटाटेवडे (विकतचे) असा बेत ठरवला आहे. फराळ स्टार्टर आणि डेझर्ट आईसक्रिम.

आमच्याकडे पहिली भाऊबीज (चिल्लीपिल्ली कं) असल्याने लहान मुलांना आवडेल असे पदार्थ काय ठेवू या मेनूसोबत?
श्री/आम्रखंड, छोले उसळ (मुलांना आवडते म्हणूनच), पोळ्या, व्हेज पुलाव, पापड/ बॉबी टाईप तळण, आणि? वाटीत देण्यासारखे पातळ काहीच सुचत नाहीये. (सोलकढी माझ्या आवाक्यात नाही अजून आणि टो सार जास्त आवडीने घेत नाहीत).

समोसा-छोले असा चटपटीत प्रकार करता येईल. सामोसे विकतचे + अल्पनाच्या रेसीपीने छोले + भेळेच्या चटण्या एकदम मस्त कॉम्बो होईल. याबरोबर एखादा पुलाव वगैरे ठेवला तर ऑलमोस्ट जेवणासारखं होईल.

वरच्या मेन्यूतच जर काही वाटीत देण्यासारखं पातळ हवं असेल तर कढी/ गुजराती कढी करता येईल. व्हेज पुलाव आहे तर मठ्ठापण करता येईल. आमसुलाचं सार?

आशू, मी सुचवेन की वाटीत काहीच नको. छोले, आम्रखंड, पुलाव, बॉबी मुलांच्या प्रचंड आवडीचा मेनू आहे, ते व्यवस्थित खाता येईल त्यांना. अजून एखादा आयटम वाढवला तर उगाच वाढलंय म्हणून खावं लागतं आणि मुलांना आवडीच्या पदार्थांना पुरेसा न्याय देता येत नाही.

अगदी बारक्या मुलांना वाटीतले लिक्विड म्हणजे खूप मेसी. तसेच आम्रखंड पण. खायला सोपे असे मुलांपुरते साखर लावलेले गुलाबजाम आणले तर?
व्हेज पुलाव, दही रायता छोले पुरी भरपूर बेत आहे. किती गोड. फटा़के वाजवताना काळजी घ्यावी लागेल अगदीच ५ च्या खालची मुलेमुली अस्तील तर.

अरे, सॉरी, सॉरी. फक्त मुले नाहीत, मोठे पण आहेत. दुपारचे जेवणच आहे. पण मुलांना सुट्टया, पहिली भाऊबीज वगैरे म्हणून खास त्यांना आवडतील आणि मोठ्यांनाही पोटभर होईल असा बेत ठरवायचाय. Happy
रायता कुठला चिमुरी? श्रीखंड आहे त्यामुळे दह्यातल्या कोशिंबीरी, रायते, ताक मठ्ठा बाद केलंय. अमा, गुलाबजाम आदल्याच दिवशी होणारेत दुसर्‍या घरात. पब्लिक तेच. मंजू, योकु आता सांगा.

ओके! मग व्हेज पुलावाच्याऐवजी जीरा राईस आवडेल का? मग दाल-फ्राय करता येईल. किंवा फक्त मटार आणि बाळकांदे घातलेला पुलाव आणि दाल तडका (फोडणीचं वरण Wink )/ दाल फ्राय.

दाल तडका / अळूची पातळ भाजी / ब-टो-फ्लॉ रस्सा (वाटीत देण्यासाठी)

चिंटू बटाटेवडे / उडीदवडे / सुरळीची वडी / ढोकळा / अळूवडी (अळूची भाजी नाही केली तर) / मिनी समोसे

रायत्यापेक्षा खमंग काकडी किंवा टोमॅटो-गाजराची दा कू व वरून फोडणी घालून कोशिंबीर

हो, मंजू तेच ठरवलं होतं काही नाही सुचलं तर. चिमुरे, नाही गं. दही बेस्ड काहीच नको. मंजूचाच अमीरी खमण जिंदाबाद होईल बहुतेक.
अकु, त्यातल्या पट्टी समोशांचा विचार करेन. पण पापड बॉबी तळल्यावर ते फार तेलकट होतील. त्यापेक्षा अमीरी खमण भारी होईल. झिग्झिग नाही. शिवाय डाळींबाचे दाणे म्हणजे मजाच.

पनीर माखनी आणि फ्रूट चाट?( कोशिंबिरी ऐवजी सलाड म्हणून?) मटार घालून पुलाव पण मस्त. व्हेज. कुर्मा पण करता येइल. मेथी मलाइ मटर/ लसूनी पालक?

तिने छोले फायनल केले आहेत ना?

आणि वाटीत द्यायसाठी पातळ पदार्थ शोधता शोधता रायता आणि अमीरी खमणवर कशी पोचली कोणास ठाऊक Proud

मंजू, Lol दाल फ्राय/ आमटीला पर्याय नाही ना. तेच ठरवलं होतं लिहीलं आधी आणि मग डावीकडे वळले - पानाच्या. फायन्ल मेनू - श्रीखंड, छोले, पुलाव, दाल फ्राय, पोळ्या, अमीरी खमण, पापड, बॉबी. आणि दिवाळीच्या करंज्या, लाडू,चकली असेलच आवडीनुसार. धन्यवाद सर्वांना.

मेन्यू मस्तच पण हा सगळा सुगरणपणा वाचून कॉम्प्लेक्स आला एकदम. आम्ही बिगरी बेसिकवाले. Happy

मी वरचे बरेच मेनू वाचले.
ज्येनांवर इंप्रेशन पाडणे हा काही हेतू नाही कारण ज्येना जवळचेच आहेत. काना नाहीयेत. आणि तसंही इंप्रेशन मारण्याच्या पायरीपासून मी बरीच पुढे निघून गेलेली आहे.
आऊटसोर्सिंग फक्त भाज्या चिरण्याचे होऊ शकते तेही बाईने दांडी न मारल्यास. आणि गोड तसेही विकतच असेल.
त्यामुळे पश्चिमेकडच्या खिडकीतून येऊन बुडत्या सूर्याने तापव तापव तापवलेल्या स्वैपाकघरात माझ्या अवकादीप्रमाणे जमेल तेवढेच करायचे ठरवले आहे. Happy

पनीर आणि व्हेज सॉटे स्टार्टर म्हणून, काश्मिरी पुलाव, टोमॅटो सार आणि पहाडी पद्धतीची दाल माखनी(काळे उडीदवाली) एवढा उरका मी पाडणारे.
याबरोबर गोड काय विकतचे आणावे ते आता सुचवा.

आहे तो मेनू ठिक वाटतोय का ते सांगा.

नी, उडीद पचायला जड असतात ना, ज्येनांसाठी आणि रात्री करतेयस तर विचारुन बघ आधी.
विकतचे गोड... चितळ्यांचे पाकातले गोल गुलाबजाम किंवा मग काका हलवाईची अंगूर मलई?

आमच्या पार्ल्यात चितळे वा काका हलवाई नाही.
दाल माखनीला पर्याय सुचवा मग काहीतरी.
काश्मिरी पुलावाच्या बरोबर दाल माखनी मस्त जाते म्हणून विचार केला होता.

Pages