Submitted by संपदा on 22 July, 2014 - 05:59
सुगरणींनो आणि खवय्यांनो, बेत काय करावा हा प्रश्न विचारण्यासाठी नवीन जागा. पहिला भाग इथे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुर्या साठी कॉस्टकोतल्या
पुर्या साठी कॉस्टकोतल्या रोटी-लॅन्ड च्या पोळ्या (एकाचे ४) तळल्या तर पटकन होतात.
रेसिपी टाकणार नाहीस ना नी, मग
रेसिपी टाकणार नाहीस ना नी, मग तीन वाट्या तांदूळाला काश्मिरी पुलाव साठी काजू बदाम किती घेऊ सांग.. पिस्ते चालतील का, खूप आहेत. कांदा लागत नाही का त्याला?
१०-१५ काजू, तेवढेच
१०-१५ काजू, तेवढेच बदाम..
पिस्ते मी कधी घातले नाहीत. ट्राय कर.
कांदा घालता येतो पण यात खरंतर नसतो.
ओके!
ओके!
मला पण काश्मिरी पुलाव ची
मला पण काश्मिरी पुलाव ची रेसिपी हवी आहे...
नीधप : प्लीज मला पण द्या ना तुमची रेसिपी....
दाद, अगं मी देशातल्याबद्दलच
दाद, अगं मी देशातल्याबद्दलच म्हणत होते. तुमच्याकड्चं लक्षात नाही आलं बघ!
ithe menu waachoon bhook
ithe menu waachoon bhook khawalate jam! :fidee:
(sorry for roman typing. no other browser, can't change laptop settings)
aamachyaakaDe eka family la kelwanasathee bolaawalay. taareekha ajoon nakkee naahee, menu Tharawoon zalay.
rasa malaee (mee aadhee karoon ThewaNaar)
pole/ puree.
jeeraa raaees (saabaa. ain weLee karateel)
daal taDakaa (daal sakaaLI shijawaNar. ain weLI taDakaa deNar)
mix koshiMbeer
khobaRyaachee chaTaNI
kurmaa (saabaa karaNaar. bhaajyaa aadhee chiraNAr)
weL milala tr suraLI waDI agodar kareen, nakkee naahee.
jaast pasaraa nakoy. lekeelaa sambhaloon karaychay.
OK watatoy ka?
हो. आहे की ओके! नाहीच जमली
हो. आहे की ओके! नाहीच जमली काही साईड डिश तर बाहेरून मागवता येईल की! अळूवडीचा तयार वाफवलेला उंडा मिळतो; तो घरी आणून हवे तसे काप करून खमंग शॅलोफ्राय/डीपफ्राय करता येईल. खमण आणता येईल. बरेच पर्याय आहेत.
पुर्या आधी लाटून ठेवता येतात
पुर्या आधी लाटून ठेवता येतात का? दोन/तीन तास आधी लाटून ठेवल्या तर चालते का?
मेनू ओके आहे. भाजीमध्ये अजून
मेनू ओके आहे. भाजीमध्ये अजून एखादा आयटम अॅड केला तरी चालेल. करायलाच हवा असे नाही.
सुरळीच्या वड्या माबोरेसिपीनं कर, अजिबात चुकत नाहीत. सुरळीच्या वड्या जमल्या नाहीतर अळूवडी (विकतची आणून ऐन वेळी फ्राय करता येईल)
लाटून ठेवता तर येतील पण
लाटून ठेवता तर येतील पण कोरड्या पडण्याची शक्यता आहे. नंतर तळल्यावर वातड होतील एकादवेळेस...
आणि फुगतही नाहीत लाटून
आणि फुगतही नाहीत लाटून ठेवलेल्या पुर्या. ९, मस्त मेनू.
I am expert in surali wadi
I am expert in surali wadi
time can be only issue and that depends on baby.
we are avoiding any outsourced item coz one of them has many food restrictions. so everything has to be home made.
thanks all.
रविवारी एक मित्र दांपत्य
रविवारी एक मित्र दांपत्य त्यांच्या मुलीसह येणार आहेत. रोहनबरोबर प्लेडेट + दुपारचे जेवण असा बेत आहे.
जेवायला फुल्के, फ्लॉवर बटाटा रस्सा, काकडीची कोशिंबीर, पुलावासारखा भाज्या घालून भात (पण बिन मसाल्याचा) करणार आहे.
रोहन व त्याची मैत्रीण (दोघे वय २ वर्षे) यांच्यासाठी अजून काय करता येईल? ते दोघे भात खातील अशी आशा आहे. मित्र/मैत्रीण इंग्रज आहेत - बेताचे तिखट खातात. त्यांच्यासाठी साधे उचलून तोंडात टाकता येतील असे काय पदार्थ करता येतील? (स्टार्टर टाइप?)
मुलांना तोंडात टाकायला चौकोनी कापलेले आंबे, मेलन वगैरे फळे ठेवायचा विचार आहे.
स्वयंपाक कौशल्यात मी बिगरीत आहे. तसेच घरी मायक्रोवेव नाही.
लाटून ठेवता तर येतील पण
लाटून ठेवता तर येतील पण कोरड्या पडण्याची शक्यता आहे. नंतर तळल्यावर वातड होतील एकादवेळेस...>
थॅन्क्स योकू, आशूडी.
भजी खातात का इंग्रज? कटलेट्स
भजी खातात का इंग्रज?
कटलेट्स पण छान होतील तळकट नको असल्यास. मिनी ब वडे?
मुलांना टूथपिकमधे अडकवलेले चीज चेरी पायनैपल? भातासोबत मुलांसाठी मऊ शिरा ठेवला तर खातील का? (मला परदेशी लोकांबद्दल काहीच माहीत नाहीये खानपान म्हणून मनाला येईल ते सुचवतेय)
मृदुला: मुलांसाठी: ब्रेड गोल
मृदुला:
मुलांसाठी: ब्रेड गोल कापून त्यामध्ये ऑरेंज मार्मलेड घालून सँडविचेस, मॅक अँड चीज पास्ता. पीनट बटर सँडविच नुटेला बनाना सँडविच. जर ब्रेड पीनट बटर इत्यादीची अॅलर्जी नसेल तर. फ्रेंच फ्राइज.
कपकेक्स. डोनट्स
मोठ्यांसाठी : व्हेज चीज quiche / एग ऑन टोस्ट, टायगर प्रॉन्स फ्राय करून. मंचुरिअन चिकन/ गोभी
मिनि बर्गर आणि मिनि पिझा.
पनीर/चिकन टिक्का? माझ्यामते
पनीर/चिकन टिक्का? माझ्यामते बेस्ट राहील हे! इंग्रजांना मस्त आवडेल...
पनीरला कुठलीही माफक तिखट चटणी
पनीरला कुठलीही माफक तिखट चटणी दह्यात कालवून लावणे आणि शॅलो फ्राय.
ऑऑवर क्रश लसूण, हर्ब्ज वगैरे परतायचे आणि त्यात पनीर तुकडे खरपूस सॉटे मग वरून मीठ भुरभुरायचे.
त्यांच्यासाठी साधे उचलून
त्यांच्यासाठी साधे उचलून तोंडात टाकता येतील असे काय पदार्थ करता येतील? (स्टार्टर टाइप?) >>
लहानग्यांसाठी
~ गाजर, मुळा, काकडी यांच्या चकत्या किंवा उभे चिरून त्यावर (आवश्यक असल्यासच) मीठ / रॉक सॉल्ट भुरभुरून
~ बॉबी टाईप मंचिंग - पापड्या-कुरडया किंवा तळलेला मोठ्ठा पॉप्पडम्! ओनियन रिंग्ज. फ्रायम्स टाईप. मुरक्कू (हे तांदळाचे असतात, कुरुमकुरुम खाता येतात व चवीला सौम्य असतात म्हणून)
~ लाजोची पोटॅटो न्योकी? किंवा आलू टिक्की (फार मसाले वगैरे न घालता). किंवा सरळ उकडलेल्या बटाट्याचे चौकोनी तुकडे करून त्यावर मीठ, चाट मसाला घालून.
~ मोनॅको / क्रॅकजॅक बिस्किटांवर किंवा वेफर टाईप बिस्किटांवर चीज स्लाईस, टोमॅटो केचपचे टॉपिंग. भाज्या खात असतील तर किसलेले गाजर, बारीक चिरलेली सिमला मिरचीही (अगदी थोड्या प्रमाणात) त्यावर घालता येईल. तसेच त्यावर अननसाचे तुकडे, पाकवलेली चेरी किंवा टूटीफ्रूटी वगैरे नेहमीचे प्रकार.
मोठ्यांसाठी
यातलेच काही पदार्थ, किंवा मिनी इडली / उडीद वडे - सौम्य चटणी / केचप.
गणेशोत्सावतल्या सेलर बोट्स
गणेशोत्सावतल्या सेलर बोट्स आणि जागूतैच्या परड्यांचा काही उपयोग होतोय का बघ मृदुला
वा वा! मस्त आयड्या
वा वा! मस्त आयड्या एकेक.
रीया, बिगरीत आहे हे वाचले नाहीस का?
अरुंधती, गाजर काकडी सळ्या एकदम बरोबर. दोन्ही मुलांना आवडतात. फ्रायम्स करेन. पण तेल/ मीठ मुळे जरा विचारात होते.. थोड्याच करेन.
>ऑऑवर क्रश लसूण, हर्ब्ज वगैरे परतायचे आणि त्यात पनीर तुकडे खरपूस सॉटे मग वरून मीठ भुरभुरायचे.
ओक्के, आणि टूथपिक्स / बेबी फोर्क्स ठेवेन खायला.
>ब्रेड गोल कापून
आवडलीय ही आयडीया. दोन्ही मुलांना जाम आवडत नाही. (गोड नाही फारसे.) हमूस वापरून करेन सँडविच. दोन तीन आकार करेन. चांदणी वगैरे.
>भजी खातात का इंग्रज
एकदम आवडीने. मी दरवेळी भजीच करते. म्हणून यावेळी काहीतरी वेगळे.
>चीज चेरी पायनैपल
पायनॅपल कापायचे कसे ते येत नाही. आधी सराव करून बघायला हवा. नेक्ष्ट टाइम.
>शिरा
ही पण आयडिया छान आहे. शिरा मिनि कप केक सारख्या प्रसाद साइझ बाईट मधे.
आता थोडे कागदी प्लॅनिंग करते. मला एकंदरित लोकांना घरी बोलवून खाऊ घालणे थोडे स्ट्रेसफुल वाटते.
मृदुला, तळातळी नको असेल तर
मृदुला, तळातळी नको असेल तर उकडलेल्या बटाट्याचे काप जरा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलावर / बटरमध्ये खरपूस परतायचे व त्यांच्यावर आवडीप्रमाणे (व चवीप्रमाणे) हर्ब्ज, मीठ, मसाला वगैरे भुरभुरून.
वांग्याचे काप (बेसन + मीठ + तिखट वगैरे लावून) परतता येतील.
कॉलीफ्लॉवरचे किंवा ब्रोकोलीचे फ्लोरेट्सही असे तेलावर / बटरवर परतून किंचित क्रिस्पी छान लागतात. वरून हवे ते मसाले - तिखट - मीठ - मिरपूड वगैरे भुरभुरणे.
ब्रेड पकोडा (पुन्हा तळातळी किंव शॅलो फ्राय आलेच!), ब्रेड स्टिक्स व इंडियन डिप्स (वेगवेगळ्या चटण्या)
स्टार्टर टाइप? >> इंग्रज
स्टार्टर टाइप? >> इंग्रज लोकांसाठी दालचिनी घालून चहा आणि बेबी समोसे हमखास प्रिय मेन्यू. नाहीतर आपले थालीपीठ भाजणी असेल तर कांदा, कोथिंबीर घालून बेबी थालीपीठस लावायची आणि बटर बरोबर द्यायचं. काय आहे काय आहे विचारत खातील - रोस्टेड लेंटील इंडियन फ्लॅटब्रेड अस घसघशीत नाव सांगायचं. बिगरी काय नी डिग्री काय - प्रेमाने खाऊ घाल की झाल.
माझा अनुभव नोन-देसीन साठी
माझा अनुभव नोन-देसीन साठी खासकरुन गोरे..फार खटाटोप करुन आपल मराठी जेवण रान्धू नये, नाहीतर कोल्हा आणि करकोचा होतो. फारच Indian food आवडत अस म्हणाले तर १-२ देसी items ते पण generic (curry - chana/saag paneer, rice,chicken tikka masala, cocktail samosas) सोबत some good bread, cheese and fruit, cold cuts tray, salad, pasta - esp lasagna if you are feeding a crowd. गोडात - मी usually काहीतरी Bake करते because I like baking but I'm sure any regular desi sweet should be fine as well.
वय २ वर्षे मुंलासाठी - mac-n-cheese, sausages, cut-up-fruits.+ मोठ्यासाठी जे आहे त्यातल.
प्रमाण मिळालेले आहे म्हणून
प्रमाण मिळालेले आहे म्हणून प्रश्न काढून टाकला.
२५-३० ग्रॅम सुके काबुली चणे per person, per serving.
..
..
एकंदरित बरेच घोळ झाल्याने
एकंदरित बरेच घोळ झाल्याने शेवटी केवळ डोसे केले. मसाला डोसा आणि चटणी. सुरुवातीला ढोकळा आणि नंतर केक. त्यात ढोकळ्याचा प्रयत्न चुकला. म्हणजे आमच्या इटुकल्या कुकरमधल्या डब्यात तो चिकट झाला. त्यामुळे तो कॅन्सल झाला.
मुलांना मात्र थ्री कोर्स - चवळीच्या उसळीचे सूप, कूर्जेट पॅनकेक्स आणि स्ट्रॉबेरीज.
एकूण फार वेळ खाण्या/ करण्यात घालवला नाही. मुलांसह दंगा केला. मजा आली.
प्लीज मला इअर एंड मिटंग +
प्लीज मला इअर एंड मिटंग + पॉटलक साठी साईड डिश सुचवा. हॅम, पुल्ड पोर्क असेल. स्कॅलॉप्ड पोटॅटो, कॉर्न कॅसेरोल आधीच कुणीतरी आणतयं. पास्ता सॅलड, मॅकरोनी सॅलड, चिकन सॅलड स्प्रेड आधीच नेऊन झालय.
अपेटायझर किंवा डिझर्ट चालेल
अपेटायझर किंवा डिझर्ट चालेल का? - कोस्टको मधल्या झुकीनी केक्स अपेटायझर म्हणून हमखास आवडतात. (घरी फक्त बेक करून वेळ असेल तर एखादा डीप करायचा सोबत.) साईड म्हणून पण चालतात फक्त प्रमाण जास्त न्यावे लागेल. गोड - कपकेक्स. जे कोणी आणत मी तात्पुरती त्यांच्या प्रेमात असते
Pages