वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता एकानेही ऊपरोधिक लिहिले तर मी खर्‍यांची आख्खी कविताच टाकीन ईथे.
एक नास्तिक पहिल्याने देवळात जातो तेव्हा Wink

श्री, ऊलट आहे.
८०-९० पर्यंत नास्तिकपणा फॅशनेबल आणि पुरोगामित्ववाद्यांचा होता.
आजकाल आपण कसे आस्तिक आहोत हे सांगण्याची फॅशन आहे.
कुठल्या देवाचं व्रत कसं फॉलो केलं, कुठे चालत गेलि, कुठे परिक्रमा केली हे सगळे सांगणे फॅशनेबल आहे.
एक जानेवारीला बारा वाजता शिर्डी साईबाबांच्या, तिरूपतीच्या रांगेत असणे इन आहे.
आजकाल ज्यांना बुद्धिशी प्रतारणा करता येत नाही असेच लोक नास्तिक राहण्याची ऐश करू शकतात.

त्यासोबत एक सत्यनारायणाचे उदाहरण दिले, जे केदार जोशी यांच्या 'मूर्खात काढणे' या स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंटसंबंधी होते >>

चूक ! तुम्ही सत्यनारायण लिहिल्यावर मी चर्चेत भाग घेतला तो पर्यंत मी काही लिहिले नाही. परत वाचा सर्व. तुम्हालाही कळेल तुम्ही काय लिहित आहात ते.

चर्चेला वेगळे वळण कधी लागले? मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही सत्यनारायण केला का? तर तुम्ही "दवाखान्याच्या उद्घाटनाला सत्यनारायण घालून लोकांच्या श्रद्धा एक्स्प्लॉईट करता येतात. त्या मी नक्कीच करणार. शांतपणे न बोलता लोकांना मूर्खात काढण्याचा तो एक प्रकार आहे"

असे स्वतःच मूर्खात काढणे लिहिले आहे. त्यावर मी प्रतिऊत्तर लिहिले, जे तुमच्या रेग्युलर ( की नेटवरच्या !) स्वभावाविरुद्ध जाते. आणि येथील लोकांना ते पटले, म्हणून त्यांनी पोस्ट लिहिल्या.

मग नंतर तुम्ही सारवासारव करण्यासाठी उपरोध आणला, . ( खरेतर तो डोळा मारणे हे "त्यातला सग्ळ्यात भारी म्हणजे 'आय ट्रीट ही क्युअर्स' डोळा मारा ) " ह्याला आहे. आणि दुसरा डोळा "वा डान्स पार्टि अ‍ॅरेंज नाही करता येत" ह्याला आहे हे कुणालाही समजेल. )

मग ती पोस्ट ते केदार ह्यांना उचकविन्यासाठी Wink आता काय बोलावे? ह्यावर माझ्याकडे उत्तर नाही.
आणि आता मलाच चर्चा करता येत नाही वगैरे. असो. मला ते ही चालेल. दुर्दैवाने मी सर्वज्ञानी नाही. Happy

जाता जाता तुम्ही अन्य एका धार्मिक बाफवर दवाखाना चालू करताना सत्यनारायण केला होता असे लिहिले होते. त्याचा स्क्रिन शॉट वगैरे माझ्याकडे नाही, कारन मी स्क्रिन शॉट काढत नाही. तिथेही तुम्ही उपरोधीकच लिहिले असावे कदाचित !

असो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ झाली असे म्हणून गप्प राहतो. Happy

समोरचा काही चुकीचे करीत असेल, तर त्याला तू चुकीचे करतो आहेस, हे स्पष्टपणे सांगणे, याला मूर्खात काढणे म्हणायचे का? >>> तुम्हाला जे चूक वाटतं ते दुसर्‍याच्या दृष्टीने चूक नसू शकतं आणि त्याला काही ठाम कारणे असू शकतात आणि ती तुम्हाला पटण्याजोगी नसू शकतात. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी म्हणेन तुम्ही तुमच्या जागी ठीक, मी माझ्या जागी ठीक. खरंच इब्लिस, काही गोष्टी फक्त ज्याच्या त्याच्या अनुभवानेच मान्य/अमान्य होतात. त्याला दृश्य पुरावे नसतात. त्यामुळे अट्टाहास करुन कुणाला सश्रद्ध किंवा अश्रद्ध करायला जाऊ नये. इथे कुणीच जिंकत आणि हारत नसतो. प्रत्येकाचं मन माणुसकीने कमी जास्त व्यापलेलं असतं आणि त्यासाठी जो मनाचा उर्वरित भाग कंट्रोल करु शकतो/करायचा प्रयास करतो, तो प्रत्येक जण देवाच्या जवळच असतो कारण देव त्याच्या हृदयातच वास करत असतो. द्वेष/तिरस्कार/अहंकाराचं प्रमाण कमी कमी होणं, लाभेवीण प्रिती वाटणं, अकारण प्रसन्नता वाटणं ह्या त्याच्या जवळ असण्याच्या/जवळ येण्याच्या जाणीवा आहेत. एका तिर्‍हाइतासारखा देव शोधावा लागत नाही, डोळ्यांना दिसावा लागत नाही, स्पर्शाने जाणवावा लागत नाही, त्याचा शब्द कानाला ऐकू यावा लागत नाही. हे ज्याला अमान्य असेल त्याला चूक ठरवून बाद करणं, हे खरा सश्रद्ध करणार नाही.

हिमालय कसा निर्माण झाला हे भूगोलाच्या पुस्तकात दिलेलं असतं. सगळे खंड कसे निर्माण झाले ते पण दिलेलं असतं. ते होताना कुणीच बघितले नसले तरी मान्यच आहे. पुढे काही निराळ्या थिअर्‍या सिद्ध झाल्या तरी त्या मान्यच असतील. जे जे भौतिक आहे ते सिद्ध करता येईलच जस जसं बुद्धीच्या अवाक्यात येईल तेव्हा.

बुद्धीशी प्रतारणा म्हणजे नक्की काय?

१) समजा सलग ३ दिवस कपातला चहा कुणीही न पिता ५-१० मिनिटांत ३/४ उरला. चौथ्या दिवशी एक सूतभरच कमी झाला आणि हे २ व्यक्तींच्या समोर घडलं, तर नक्की बाष्पीभवन किती आणि कुठल्या दिवशी? की असं होऊच शकत नाही कारण ते कुठल्याच भौतिक, रसायन, जीव शास्त्रात बसत नाही? पण असं घडलं असेल तर 'असं घडलं' हे मान्य करणं ही बुद्धीशी प्रतारणा, की घडूनही अमान्य करणं ही बुद्धीशी प्रतारणा?

२) समजा एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी एकाच वेळी २ वेगवेगळ्या व्यक्तींना चांगली बराच वेळ दिसली आणी त्याच वेळी ती इतरांना दिसलीच नाही आणि असं त्याच व्यक्तीच्या बाबतीत परत परत वेगवेगळ्या ठिकाणी २ अजून वेगवेगळ्या व्यक्तीसोबत झालं (त्या प्रत्येक २ व्यक्ती इन्सेन, अडाणी नसून अगदी नॉर्मल असतील), तर ह्या दिसण्याचा नक्की अ‍ॅनालेसिस काय? की असं होऊच शकत नाही कारण ते कुठल्याच भौतिक, रसायन, जीव शास्त्रात बसत नाही? पण असं घडलं असेल तर 'असं घडलं' हे मान्य करणं ही बुद्धीशी प्रतारणा, की घडूनही अमान्य करणं ही बुद्धीशी प्रतारणा?

३) एखादी घटना अर्धी स्वप्नात दिसली आणि पुढचा भाग सत्यात घडला किंवा वाईस वर्सा. असे ५-६ वेळा झाले. तर त्याच्या पाठिमागची कारणमिमांसा काय? की असं होऊच शकत नाही कारण ते कुठल्याच भौतिक, रसायन, जीव शास्त्रात बसत नाही? पण असं घडलं असेल तर 'असं घडलं' हे मान्य करणं ही बुद्धीशी प्रतारणा, की घडूनही अमान्य करणं ही बुद्धीशी प्रतारणा?

विज्ञानाच्या कक्षा रुंदावत जाणं हा मानवाचा विकास आहे. जे ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या रुपात आहे त्याचा शोध घेणे हे विज्ञान आहे.

केश्वी,

>> द्वेष/तिरस्कार/अहंकाराचं प्रमाण कमी कमी होणं, लाभेवीण प्रिती वाटणं, अकारण प्रसन्नता वाटणं ह्या त्याच्या जवळ असण्याच्या/जवळ येण्याच्या जाणीवा आहेत
इथवर लक्षात आलं. (मनसे रावण जो निकाले राम उसके मनमें है?)

पण (कधी नव्हे ती) तुझी बाकी पोस्ट माझ्या डोक्यावरून गेली. Sad
आता आपण चमत्कारांबद्दल बोलणार आहोत का?

आता आपण चमत्कारांबद्दल बोलणार आहोत का? >>> अजिबात नाही Happy मला नक्की बुद्धीशी प्रतारणा म्हणजे काय ते जाणून घ्यायचंय. ती तीन उदाहरणं पुढे जाणार नाहीत.

>> असं घडलं असेल तर 'असं घडलं' हे मान्य करणं ही बुद्धीशी प्रतारणा, की घडूनही अमान्य करणं ही बुद्धीशी प्रतारणा?

का घडलं याचा वस्तुनिष्ठ शोध न घेणं ही प्रतारणा. Happy
शास्त्राची सगळी वाटचालच मुळी 'का' आणि 'का नाही' या प्रश्नांचा हात धरून आहे!
प्रश्न विचारू नका हे श्रद्धेचं प्रीरिक्विजिट! (आणि आमचा प्रॉब्लेम! Happy )

का घडलं याचा वस्तुनिष्ठ शोध न घेणं ही प्रतारणा.>>> समजा वस्तुनिष्ठ शोध घेणे हीच पहिली आणि बराच काळ चालू असलेली रिअ‍ॅक्शन असेल! अख्खं जीव, भौतिक आणि रसायनशास्त्र आपल्याला माहित असू शकत नाहीच. पण तरीही....

प्रश्न विचारू नका हे श्रद्धेचं प्रीरिक्विजिट! >>> प्रश्न पडलेच पाहिजेत. ह्यात प्रत्येक वेळी २ व्यक्ती असतील तर प्रश्न पडलेच पाहिजेत. एकच असेल तर संशयाचा फायदा घेऊन किंवा ठामपणे डोकं फिरलंय म्हणू शकतो.

केदारच्या पोस्ट (नेहेमीप्रमाणे) उत्तम.

इब्लिस,
चर्चेत या हो..... इतक्यातच तुमचा हार्टब्रेक होईल असे वाटले नव्हते.... Wink

<<सश्रद्धांची मतं बदलणार नाहीत म्हणून ती बदलायचा प्रयत्न करायचा नाही
की त्यांची संख्या जास्त आहे म्हणून करायचा नाही?

की त्यांचं आपल्यापरीने बरोबरच आहे (असेल) म्हणून?प्रश्न नेहमीच त्यांचा उपद्रव किती आहे (स्वतःला आणि समाजाला) यावरून येतो>>

+१
Aschig,
श्रध्देचा एक spectrum आहे असं समजलं तर त्यात एका टोकाला तालिबानसारखे दहशतवादी येतील जे धर्माच्या नावावर अत्याचार करतात व दुसऱ्या बाजूला दाभोळकरांसारखे प्रखर rationalists असतील. बाकीचे सर्वसामान्य स्त्रीपुरुष याच्यात कुठेतरी अधेमधे असतील. त्यांची श्रध्दा/अंधश्रध्दा धेडगुजरी किंवा partial असते- स्वत:चा convenience पाहून व स्वत:च्या विवेकबुध्दीला जे पटेल त्याप्रमाणे. मायबोलीवरचेही अनेक मेम्बर या middle range मधेच येतील. म्हणजे त्यात एखादा इंजिनियर असेल ज्याला लालबागच्या राजासाठी १२ तास रांग लावणं अंधश्रध्दा वाटेल पण तोच मायबोलीवरच्या गणेशोत्सवात घरबसल्या भाग आवर्जून घेईल व तिथे इतरांनी पोस्ट केलेले गणपतीचे फोटो बघून त्याला प्रसन्न वाटेल. किंवा एखादी तरुणी असेल जी संक्रांतीच्या हळदी-कुंकवाचा घाट घालेल पण त्यात विधवा स्त्रियांनाही सामील करुन घेईल कारण त्यांना वगळणं तिच्यातल्या फेमिनिस्टला पटणार नाही. याच middle range मध्ये अशी कुटुंबं दिसतात जिथे नवरा नास्तिक/बायको आस्तिक (किंवा उलटं), आईबाबा आस्तिक/मुलगा-सून नास्तिक (किंवा उलटं). अशा कुटुंबांत एकमेकांचं हे मानण्या/न मानण्याचं स्वातंत्र्य गृहीत धरलं जातं व त्यावरुन नाती तुटत नाहीत कारण मुळात सुसंस्कृत कुटुंबात कोणीही दुसऱ्याला मूर्खात काढणं, असभ्यपणे उध्दटपणे बोलणं असले प्रकार करत नाहीत.
तुमच्यासारख्या मंडळींनी सश्रध्दांची मतं बदलण्याचा प्रयत्न जरुर करावा पण त्यात तुमची priority वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे उपद्रवमूल्य बघून ठरवावी असं मला वाटतं.
तालिबान, आसाराम बापू, सत्यसाईबाबा किंवा तत्सम मोठया अंधश्रध्दा/धर्मांधतेला आळा घालण्याचे प्रयत्न- ही priority हवी. थोडक्यात- स्पेट्रमच्या एन्डला टॅकल करा- तिथे धोका मोठा आहे. Middle range वाले त्यामानाने निरुपद्रवी आहेत. पण तितकी हिंमत फार कमी लोकांची होते. एक दाभोळकर होते ज्यांच्यात ते धैर्य होतं पण दुर्दैवाने म्हणूनच त्यांना संपवण्यात आलं. आसाराम बापू प्रकरणातील अनेक साक्षीदारांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. सत्यसाईबाबांच्या भक्तांत तर सचिन तेंडूलकरपासून विलासराव देशमुखांपर्यंत अनेक बडी धेंडं होती त्यांना कोण चॅलेन्ज करणार? आणि मुस्लिम मूलतत्त्ववाद, धर्मांधता, त्यातून होणारा दहशतवाद, नरसंहार हा हिंदू वा इतर धर्मियांच्या धर्मांधतेपेक्षा आज कितीतरी जास्त तीव्र व गंभीर प्रश्न आहे पण त्याबद्दल चकार शब्द काढून सुखाचा जीव दु:खात घालण्याची किती rationalists ची हिंमत होते? हिंदू धर्मात सतीची चाल अनेक वर्षांपूर्वी कायदयाने बंद झाली, आता द्विभार्याप्रतिबंधक कायदा आहे- पण भारतीय मुस्लिम स्त्रियांना द्विभार्याप्रतिबंधक कायदा लागू होत नाही याबद्दल किती अश्रध्द लोक आवाज उठवतात?
निरुपद्रवी partial श्रध्दाळू लोक- जे तुमचं काहीही बिघडवू इच्छित नाहीत- त्यांना ’तू मूर्ख आहेस’ ’मी किती शहाणा आहे’ वगैरे ऑनलाईन सांगणं- यात काय साध्य होतंय? जिथे खरोखर action घेण्याची गरज आहे- संगीत, शिल्पकलेवर बंदी घालणारे मुस्लिम मूलतत्ववादी, धर्माची बिझनेस empires चालवणारे हिंदू सेलिब्रिटी ’संत’- इथे तुम्ही काय काम करताय?
एखादया डॉक्टरच्या दवाखान्यात दोन पेशन्ट असतील- एक अत्यवस्थ आहे व दुसरा फक्त सर्दी-डोकेदुखीसाठी नेहमीचं औषध घ्यायला आलाय तर डॉक्टर अत्यवस्थ पेशन्टला प्राधान्य देईल. नुसती सर्दीवाल्याला सांगेल की जरा थांब आधी याला बघतो किंवा तू एखादी क्रोसिन वगैरे घेऊन झोप आणि उदया ये. पण इथे म्हणजे अत्यवस्थ पेशन्टला तसंच ठेवून सर्दीवाल्याला तासभर तपासण्याचा प्रकार चाललाय.

वेदिका, पोस्ट आवडली.
पण हे जे स्पेक्ट्रमच्या मधले आहेत त्याना रिलिजियस फॅनाटिक करायचे काम काही लोकांकडून आणि माध्यमारून सतत चाललंय.
ते थांबावं म्हणून मग दुसर्‍या बाजूने इक्वल आणि अपोझिट फोर्स लावावा लागतो.
धर्मांध लोकांचा विरोध करताना मग काही लोकांना निधर्मांध व्हावं लागतं.
सश्रद्ध लोकांचा गोंधळ निस्तरण्यासाठी कडवं अश्रद्धं बनावं लागतं.

वेदिका ह्या नाण्याची दुसरी बाजू आहे.. स्पेक्ट्रमच्या टोकाला माणुस जन्मतः जात नाही. ती प्रक्रिया असते. म्हणजे जे लोक आधी मध्यम भगात दाखल होतात व हळु हळु ते स्पेक्ट्रमच्या ह्या किंवा त्या टोकाला सरकतात. असे असेल तर मध्यमभागी असलेल्या लोकांवर, प्रिवेन्शन इज बेटर द्यान क्युअर, ह्या न्यायने लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे करण त्यांना हाताबाहेर जाण्यापासुन रोखता येते. त्यामुळे, पार्शिअल श्रधाळू लोक हेच खरतर टार्गेट असायला हवेत... बनचुके नस्तिक व धर्मांध हे एका अर्थाने लॉस्ट कोज आहेत कारण त्यांना त्या स्थानावरून हलवणे सोपे नाही ..

.

नेहमीप्रमाणे एक गोष्ट दिसली.

पटले, आवडले, तर सांगायला यायला कोणाला वेळ नसतो. नाही पटले, नाही आवडले (आणि सहज शक्य होत असले) तर एखाद्या आय डी वर शाब्दिक आसूड ओढायला रांगा लागतात.

क्षुद्र मानसिकता!

===============================

एकमेकांत घोळ घालणे पूर्णपणे सोडून अश्या पोस्टी लिहा बरे:

१. मी कोणतीही श्रद्धा, समज, रुढी, परंपरा, संकेत, शिकवण, देव, धर्म, व्रते मानत नाही व मानणार्‍यांना हे प्रोअ‍ॅक्टिव्हली सांगतो की हे मानू नका.

२. मी काहीही मानत नाही पण मानणार्‍यांना सांगत बसत नाही की त्यांनी काय मानावे, काय मानू नये.

३. मी सर्व श्रद्धा, समज, रुढी, परंपरा, संकेत, शिकवण, देव, धर्म, व्रते मानतो व न मानणार्‍यांना हे प्रोअ‍ॅक्टिव्हली सांगतो की ते सगळे महत्वाचे आहे.

४. मी सर्व श्रद्धा, समज, रुढी, परंपरा, संकेत, शिकवण, देव, धर्म, व्रते मानतो पण इतर कोणी ती मानावीत असा आग्रह धरत नाही.

५. मी दुसर्‍याच्या मानसिक समाधानासाठी अश्या गोष्टी करत राहतो व काही कारणाने त्या करणे नाही जमले तर वाईट वाटून घेत नाही आणि त्या आवश्यक आहेत की अनावश्यक हे त्या 'दुसर्‍याच्या' समाधानापुढे मला क्षुल्लक वाटल्यामुळे मी त्या अभ्यासात घुसतच नाही.

६. मी दुसर्‍याच्या व त्यातून मिळणार्‍या स्वतःच्या समाधानासाठी हे करतो व मला माहीत असते की हे अनावश्यक आहे की आवश्यक ह्याबाबत विचार करण्याची मला गरजच नाही पण मी असे करणे ही एका जवळच्या दुसर्‍याच्या समाधानाची व त्यामुळे माझी गरज आहे.

सातवे मत येथे देत नाही आहे.

>>
नेहमीप्रमाणे एक गोष्ट दिसली.
पटले, आवडले, तर सांगायला यायला कोणाला वेळ नसतो.
<<

या पोस्टच्या आगेमागेच वेदिका यांची पोस्ट पटल्या/आवडल्याबद्दलच्या पोस्ट्स आहेत की!

तुम्ही बहुधा नेहमीप्रमाणे एक(च) गोष्ट बघितलीत. Happy

>>> स्वाती_आंबोळे | 19 September, 2014 - 23:49 नवीन

>>
नेहमीप्रमाणे एक गोष्ट दिसली.
पटले, आवडले, तर सांगायला यायला कोणाला वेळ नसतो.
<<

या पोस्टच्या आगेमागेच वेदिका यांची पोस्ट पटल्या/आवडल्याबद्दलच्या पोस्ट्स आहेत की!

तुम्ही बहुधा नेहमीप्रमाणे एक(च) गोष्ट बघितलीत. स्मित
<<<

तुम्ही माझ्याशी बोलताय का?

त्या वेदिकांच्या पोस्टच्या आधी आलेल्याही काही पोस्ट्स आहेत.

त्या तुमच्या आहेत असे नव्हेत.

सॉरी टू से, मी बोललेले फक्त काही विशिष्ट जणांच्या भोवती फिरत नसते,

त्यामुळे, पार्शिअल श्रधाळू लोक हेच खरतर टार्गेट असायला हवेत... बनचुके नस्तिक व धर्मांध हे एका अर्थाने लॉस्ट कोज आहेत कारण त्यांना त्या स्थानावरून हलवणे सोपे नाही .. >> ह्या दोन वाक्यांवरून पेशव्या spectrum च्या end ला नक्की कोण आहे असा प्रश्न पडला तर तो साहजिक होईल का ? Wink

सत्यनारायण व्रताचं हे एक interpretation एका व्यक्तिकडून ऐकले आहे. ही व्यक्ती बारा मध्ये एका महविद्यालयात संगणक शास्त्राची प्राध्यापक होती आणि पूजा वगैरे साठी पौरोहित्य पण करीत असे.

If you look at the entire Kathaa, every episode / story says that the person performing the pooja was earlier very poor / not doing well / wanted more / wanted popularity (story about king). He / she then performed the pooja, called people over and then he started getting better jobs / better business etc.

It is said that this pooja should be preferably performed during the eveing and it is very important to take तीर्थप्रसाद.

The iterpretation is:

This was a "Social Networking" event. The idea is to perform the pooja in the evening so that most everyone in the town / village / area is home after work. Importance of तीर्थप्रसाद is that everyone who attends meets the host / host family - usually they are the ones who distribute. Thus they perhaps get to know each other. When people know you, they help you get a job / business / popularity.

He gave it in English, so have written in English.

विचार करण्यासारखे आहे....

इथे श्रद्धेबद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे की अंधश्रद्धेबद्दल ?
कारण ' सश्रद्ध आणि अश्रद्ध' याबद्दल बोलणं आणि 'सअंधश्रद्ध आणि अअंधश्रद्ध' ह्याबद्दल बोलणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.

>> सॉरी टू से, मी बोललेले फक्त काही विशिष्ट जणांच्या भोवती फिरत नसते
इतर काही विशिष्ट जणांभोवती फिरत असते असे दिसते आहे. Proud

म्हणजे जनरलाइज करू नका. Happy

>> ' सश्रद्ध आणि अश्रद्ध' याबद्दल बोलणं आणि 'सअंधश्रद्ध आणि अअंधश्रद्ध' ह्याबद्दल बोलणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.

रार, आय हॅव टु डिसअ‍ॅग्री.

Pages