वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाटपांडेजी,

अंधश्रध्दा निर्मुलन ही एक अनावश्य्क गोष्ट आहे अशी माझी श्रध्दा आहे. त्यातुन काही लोक निराशेपोटी, अपयशातुन निर्माण झालेल्या वैफल्यातुन या सारख्या चळवळीत सामील होतात.

तुकाराम महाराजांनी सुध्दा बुवाबाजीवर कोरडे ओढले पण श्रध्दा सोडली नाही.

" कैसे झाले भोंदु " हा अभंग पहा जो बुवाबाजीवर टिका करणारा आहे.

दुसर्‍या बाजुला पांडुरंगावर अपार श्रध्दा होती.

तुमच्या मागच्या पाना वर " श्रध्दा म्हणजे समजुत " या शब्दावरचे माझे विचार आहेत. चर्चेसाठी फक्त.

दोन्ही टोकांना जे लोक आहेत ते बदलणार नाहीत.

दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप."
"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"
आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे.
[आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे')
आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.असा त्याचा अर्थ घेतला जातो.
तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
अवांतर- मला एक प्रश्न पडला आहे काही लोक आपल्या मुलीच नाव श्रद्धेपोटी श्रद्धा ठेवतात तसे बुद्धीदांडगे नास्तिक लोक आपल्या अश्रद्धेपोटी आपल्या मुलीच नाव अश्रद्धा का ठेवत नाहीत?

मेंदुच्या मनात या पुस्तकात अंधश्रद्धा व मेंदुविज्ञान हे एक प्रकरण आहे .त्यात लेखक सुबोध जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्‍याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.

अवांतर- मला एक प्रश्न पडला आहे काही लोक आपल्या मुलीच नाव श्रद्धेपोटी श्रद्धा ठेवतात तसे बुद्धीदांडगे नास्तिक लोक आपल्या अश्रद्धेपोटी आपल्या मुलीच नाव अश्रद्धा का ठेवत नाहीत?
>>>
कारण श्रद्धावंत लोकांच्या आयुष्यात श्रद्धा ही जितके आयुष्य व्यापून बसलेली असते तसं बुद्धिदांडग्या नास्तिक लोकांच्या मनात 'श्रद्धा न पाळणे' हे काही आयुष्य व्यापून बसलेले नसते.
आमच्यासाठी ते फक्तं एक मायनर अंग आहे जीवनाचे. आणि जोपर्यंत श्रद्धेचा अट्टहास करणारी माणसे भेटत नाहीत तोपर्यंत आपली अश्रद्धा तीव्रपणे दाखवावी असा प्रसंग येत नाही. खरंतर रोजच्या आयुष्यात श्रद्धा आहे की नाही असा विचार करायची गरजच नसते.

Wink

>>आमच्यासाठी ते फक्तं एक मायनर अंग आहे जीवनाचे. आणि जोपर्यंत श्रद्धेचा अट्टहास करणारी माणसे भेटत नाहीत तोपर्यंत आपली अश्रद्धा तीव्रपणे दाखवावी असा प्रसंग येत नाही.<<
मला तसे वाटत नाही कारण अतिरेकी सश्रद्ध वा अतिरेकी अश्रद्ध लोकांमधे आपापल्या श्रद्धा/अश्रद्धे चा किडा वळवळत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी तो अस्मितेचा विषय असतो.

>>बुद्धिदांडगे अश्रद्ध आणि अतिरेकी अश्रद्ध यात फार फरक आहे काका.
तुम्हाला लक्षात नाही यायचा.<<
माझ्या मेंदुच्या आकलनाच्या काही मर्यादा आहेत व मला त्या मान्य आहेत.

> सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.असा त्याचा अर्थ घेतला जातो.

ह एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि या बद्दल दूमत नसावं. सतीची प्रथा (किंबहुना नवर्याबरोबर बायकोनी सती जायला हवे ही श्रद्धा) योग्य आहे असं म्हणणारं कुणी नसावं अशी आशा आहे.

२००० वर्ष फास्ट फॉरवर्ड करा - आजच्या कोणत्या श्रद्धा (कोणत्याही धर्मातल्या) टिकून राह्तील असं वाटत?
सश्रद्ध लोकांना एक-एक दोन-दोन उदाहरणं देता येतील का?
त्या उदाहरणापैकी कोणत्या श्रद्धा मानल्या नाहीत तरी फरक पडणार नाही असं वाटतं?
उदा:
(१) देवानी विश्व निर्माण केलं? माझ्या मते तसं असेल तर इतकं मोठं विश्व निर्माण करणार्या देवाला तुम्ही ते मानलं काय आणि न मानलं काय, काहीही फरक पडणार नाही
(२) चांगल्या गोष्टी केल्या तर स्वर्गात जातो, वाईट केल्यास नरकात?
तो देव इतका छोटा आहे का की त्याला काही फरक पडेल?
आणि तशी श्रद्धा असणारे किती लोक वाईट कृत्य न करता जगतात?

जी वैश्वीक सत्य असावीत त्या बद्दल विचार करा. त्या गोष्टी आजही लागू हव्या २००० वर्षांनी पण. इथेही लागू हव्या, मंगळावरपण आणि केप्लरनी शोधलेल्या ग्रहांवर पण ...

साती, aschig, आणि इब्लिस यांच्याशी पूर्णपणे सहमत.
मी सुद्धा एक अश्रद्ध नास्तिक

कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्‍याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
<<

घाटपांडेसाहेब,

"त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला"

हे जावडेकरांचे "इंटरप्रिटेशन" आहे अन ते टोटली चुकीचं आहे.

सरळ साधे लॉजिक वापरलेत तर फोलपणा दिसतो.

घाबरून गळ्यातल्या ताईताला धरून प्रार्थना करणारा, अन हातातल्या दांडक्याला गच्च धरून येईल त्या श्वापदाशी मुकाबला करायला तयार होणारा, या दोघांपैकी कोणता टिकण्याची शक्यता जास्त वाटते?

उद्या उठून पोटभर शिकार मिळेल की नाही? या अशाश्वतीपायी, रिच्युअल्स करून, उदा. अमक्या धोंड्याला थोडा नैवेद्य आजच्या सशाच्या शिकारीतून दाखव (अर्थात मला दे), मग मी हरणाचं चित्र काढून त्या चित्रात त्याची शिकार झाली असं दाखवतो, की उद्या तुला नक्कीच हरणाची शिकार मिळेल! असे सांगणार्‍या कमकुवत शिकार्‍यांनी, पण हुशार डोकं असणार्‍यांनी निर्माण केलेली ही (धोंड्याला नैवेद्य दाखवला की मला खायला मिळेल, ही श्रद्धा. मिळालंच तर उद्या अधिक मोठा नैवेद्य.) आयड्या आहे.

साऊंड्स फॅमिलियर?

तेव्हा, 'तो स्वतः अंधविश्वासामुळे तगला', हे इंटरप्रिटेशन मला मान्य नाही.

(अंध)विश्वास निर्माण करणार्‍यांनी पद्धतशीरपणे, स्वबळावर तगून रहाणार्‍यांना उल्लू बनवून 'श्रद्धा' शिकवली, अन स्वतःचा 'उल्लू सीधा' केला, हे इंटरप्रिटेशन बरोबर ठरेल. अन यामुळेच लवकरात लवकर, या असल्या श्रद्धांना तिलांजली दिली, तर बरे!

*
टीपः ५. अपना उल्लू सीधा करना -(मतलब निकालना)

नैवेद्य शब्दाची उपपत्ती इंटरेस्टिंग आहे. कुणी जाणकारांनी लिहा, कृ.ध.

पुर्णपणे बुद्धीला नाही पटले. >>> अरे बुद्धी प्रामाण्यवाद हा ज्याच्या त्याच्या बुद्धी व आकलणानुसार असतो. म्हणजे चार आंधळ्यानी जेंव्हा हत्ती कसा आहे ह्याचे वर्णन केले तेंव्हा त्यातला प्रत्येक आंधळा हा बुद्धी प्रामाण्यवादीच होता. बुद्धी प्रामाण्यावादाची गोची अशी आहे की दुसर्‍याच्या बुद्धीवर विष्वास ठेवता येत नाही आणि स्वतःच्या बुद्धीच्या लिमिटेश्न्स समजत नाहीत. म्हणुन, सर्व बुद्धीं जे आकलीत करू शकतात तेव्हडेच सत्य आहे असे मानावे लागते... हे आकलीत करण्याचे तंत्र म्हणजे विद्यान. त्यातुनही सिंगुलरिटी ऑफ एक्स्पेरिअन्स हॅज नो प्लेस इन इट... वैयक्तिक श्रद्धा व अंधश्रद्धा दोन्ही नैसर्गीकच आहेत. जे नैसर्गीक आहे ते वैज्ञानिकही असायला हवे Wink

अश्रद्ध आणि विज्ञानवाद्यांना त्या गोष्टीतल्या आंधळ्यांची भूमिका देणे हेच चुकीचे गृहितक आहे.
चुकीच्या गृहितकावर आधारित सिद्धताही चुकीचीच येणार.
आंधळे किंवा झापड लावलेले असलेच तर ते सश्रद्ध आहेत.
विज्ञानवादी एकमेकांबरोबर आपला डाटा क्रॉस व्हेरिफाय करतील, हत्तीचा आकार सगळ्या कोनातीन पडताळतील आणि माहूतालाही माहित नसलेल्या चार गोष्टी हत्तीबद्दल नव्याने शोधून काढतील.
Happy

पेशवे,

आंधळ्यांने हत्तीचा पाय धरून अक्खा हत्ती खांबासारखा आहे, हे सांगितले असे तुम्ही मानता, ही खरी अंधश्रद्धा.

कोणताही आंधळा अर्धवट स्पर्शज्ञानाने त्या वस्तूचा आकार डिक्लेअर करणार नाही, ही सत्य परिस्थिती आहे.

बुद्धीप्रामाण्यवादात, समोरच्याच्या बुद्धीवर १००% विश्वास ठेवता येतो, जर त्या माणसाने सांगितलेली गोष्ट मला किंवा कुणालाही त्याच कसोट्यांतून सिद्ध करता आली तर.

इथे वैयक्तिक 'अनुभूती'वर भर नसतो. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, असा प्रश्न असतो.
सोडियम हायड्रॉक्साईडमधे हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळले तर मीठ व पाणी मिळते, हे शास्त्र, पण उदा. पुष्यनक्षत्राच्या योगावर हेच केले, तर दूध व साखर मिळते, असे कुणी सांगितले, अन ते मी प्रयोग करूनच न पहाता/पियर रिव्ह्यूशिवायच मान्य केले, तर ती श्रद्धा.

भारी पोस्ट आहे पेशवे. Happy
इब्लिस तुम्ही टोकाची भुमिका घेत आहात खुपच. माणूस कितीही बुद्धीप्रामाण्यवादी असला तरी देव/शक्ती सोडून इतर गोष्टींवर श्रद्धा/विश्वास ठेवतो किंवा तसं ठेवायची आंतरिक (इननेट ह्या अर्थानी) गरज माणसाला जगण्या साठी उपयोगी पडते असं (किंवा साधारण ह्या अर्थानी) घाटपांडे व इतर म्हणत आहेत. थोडक्यात ते माणूस श्रद्धाळू किंवा अंधश्रद्दाळू का होतो ह्या मागच्या सायकॉलॉजी बद्दल सांगत आहेत.
अंधश्रद्दाळू माणूस विचार कसा करतो ही सायकॉलॉजी समजून नाही घेतली तर त्या माणसातली अंधश्रद्धा दूर करणे फार अवघड होईल.

जी वैश्वीक सत्य असावीत त्या बद्दल विचार करा. त्या गोष्टी आजही लागू हव्या २००० वर्षांनी पण.
प्रतेक सजिव मृत्यु पावतो. जिथे जन्म तिथे मृत्यु.
मृत्यु सगळ्यानाच येनार आहे.तो कोणत्याही जाति धर्मातला देशा-प्रातातला आसो.
प्रत्येक मानवाचे प्रान्याचे रक्त लाल आहे.
मृत्युचे भय सगळ्यानाच आहे.
आपल्यचे मृत्यु आजार वेदनादाई आसतात.
सजिव श्वास घेतात.
हि काहि वैश्वीक सत्य असावीत का?

अश्रद्ध आणि विज्ञानवादी हे समानार्थी शब्द नाहीत. अंधाळा असणे हे लिमिटेश्न्स बद्दल आहे. वैचारिक आंधळे पणा बद्दल नाही. विज्ञान ही सिद्धता नाही तर सिद्धतेची प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेच्या स्वतःच्या लिमिटेश्न्स म्हणजे गोष्टितला आंधळेपणा. हे माहित असण आणि स्विकारण म्हणजे विज्ञानाला झापड न बनवण.

डार्विनचा उत्क्रांतीवाद मी मानतो. असे असले तरीही उत्क्रांतीवाद हा इंटेलिजंट डिझाइनर पुर्णपणे एलिमिनेट करत नाही. उत्क्रांती चक्र आपणही सुरू करू शकतो व ती कोणिही इंटेलिजंट डिझायनर नसतानाही सुरू होऊ शकते. ती कोणी डिझायनर नसताना सुरू झाली ह्याला अजुनही पुराव्याने शाबुत करता येत नाही. करणार कसे? पृथ्विवरचे जीवन सध्यातरी एकमेवाद्वितीय आहे. जीवन सुरू व्हायला जे लागत ते सगळ काय आहे ह्याची सध्या आप्ल्याला पुर्ण कल्पना नाही. म्हणजे जर ते आपोआप सुरु होत असेल तर ती प्रक्रिया रिपिट करता येत नाही. हा सध्या सिंगुलर इव्हेंट विज्ञानत कसा बसवायचा? (तसेच ते कुणि डिझायनर्ने केल ह्यालाही काहीच म्हणजे काहिच पुरावे नाहीत)

एक पुर्ण इकोसिस्टेम तयार करण हे मनुष्यप्राण्याच एक ध्येय्य आहे. कारण ते जर आपण करू शकलो तर आपण इतर ग्रहांवर जाऊन राहु शकु. जर ते करण्यात आपआण यशस्वी झालो तर ज्या ग्रहावर आपण ती तयार करू. तो ग्रह ते जिवन इंटेलिजंट डिझाइनने डार्विनच्या उत्क्रांती प्रोसेस वापरून तयार झाल असेल...

परमेश्वर किंव देव हे मी मानत नाही करण तो असल नसल्याने मला मानसिक वा इतर फरक पडत नाही. पण ज्यांना पडतो त्यांना तुम्ही मुर्ख आहत असे मी म्हणु शकत नाही. सेल्फ अवेअर्नेस काय असतो हेच वैज्ञानिक दृष्ट्या माहित नसताना त्याच्यातुन उद्भवणार्या मानसिक जाणिवांना लेबल लावण्यात वैज्ञानिक असे काय आहे?

ह्या संद्र्भात एक उदाहरण देतो. मिरर बॉक्स. जे नाही ते आहे असे भासवून वेदना घालवता येते... म्हणजे मनाला भावनांना प्रत्य्क्श वैज्ञानिक सिद्धांतांशी फारसे घेणे देणे नसते बहुतेक... Wink

हा मिररबॉक्स कॉनसेप्ट वापरला आहे "हाऊस एम डी" च्या एका एपिसोडमध्ये.

जे नाहीये ते भासवले जाते ते बरोबर आहे पण वेदना खरं खरं असते पेशवे कारण त्यांचे लिंब्स जे कधी कधी "क्लेंच्ड" असतात अनकम्फर्टेबल पोजिशन्स मध्ये ते अनक्लेंच होतात. म्हणजे ह्या प्रकारातली वेदना हा मनाचा खेळ नसावा बहुधा.

पण ज्यांना पडतो त्यांना तुम्ही मुर्ख आहत असे मी म्हणु शकत नाही. सेल्फ अवेअर्नेस काय असतो हेच वैज्ञानिक दृष्ट्या माहित नसताना त्याच्यातुन उद्भवणार्या मानसिक जाणिवांना लेबल लावण्यात वैज्ञानिक असे काय आहे?
<<
ते मूर्ख नाहीत तर मग काय आहेत?
अन ज्या गोष्टी वैज्ञानिक दृष्ट्या माहित नाहीत त्यांना अध्यात्मिक लेबले लावणे बरोबर आहे असे वाटते की काय तुम्हाला?
गेट थियरी ऑफ पेन वाचलीत, तर वेदनांबद्दल मेंदूला कसे फसवतात त्याबद्दल थोडी माहिती मिळेल.

"श्रद्धा" ही कन्सेप्टच वैचारिक आंधळेपणा डिनोट करते. प्रश्न विचारूच नका. "श्रद्धा" ठेवा!!

बुवा,
टोकाचीच भूमीका घेणे गरजेचे आहे.
कॅन्सरची गाठ कापताना, नुसता कॅन्सरच नव्हे, आजूबाजूला २-३ सेमि 'हेल्दी'पार्ट सुद्धा कापून काढावा लागतो. मधला मार्ग काढता येत नाही तिथे. Wink

Pages