वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंड्रेला, चर्चेच्या ओघाने विविध अंधश्रद्धांबद्दलची मते मांडली जावीत अशी अपेक्षा आहे. उदा. वरील मृत्युपत्रात अनेक चालिरितींवर हल्ले चढविले आहेतः प्रेत कसे न्यायचे, कसे ठेवायचे, मेल्यानंतर काय होते, नातेवाइकांनी काय करावे, कावळ्याचा संबंध ई.

अनेकदा अनेक लोक अनेक गोष्टि पुर्वापार चालत आल्या आहेत असे म्हणुन करतात. कुणी इतरांना चांगले वाटावे म्हणुन, तर कुणी इतर काय म्हणतील म्हणुन वगैरे. यापैकी कोणत्या गोष्टि कोणत्याप्रकारे कुणाकुणाला हानिकारक असु शकतात, आणि त्या असल्यास त्या कशा बदलता येतील? सुरुवात स्वत:पासुन तसेच स्वतःच्या आप्तांपासुन केलेली उत्तम. त्यांच्याशीच आपण जर संवाद साशु शकलो नाही तर इतरांशी त्याबाबत अर्थपुर्ण व्यवहार होणे शक्यच नाही.

अंतिमसंस्कारांबद्दल तुम्हाला या अनुषंगाने काय वाटते? मला त्या मृत्युपत्रातील गोष्टि पटतात (राख नदीत टाकणे हे सोडुन).

अस्चिग, लेख (मृत्युपत्र) विचार करायला लावणारा आहे. धन्यवाद.

अंतिम संस्कारांबाबत आधी एकदा इथे चर्चा झाली होती.

कुणाचा लेख? आस्चिगचा की नार्वेकरांचा?

तसे आपले बहुतेक विधी विनोदीच आहेत. जोपर्यंत आपण धर्माचा नीट अभ्यास करत नाही, विधींचा शास्त्रोक्त अर्थ समजून घेत नाही, तोपर्यंत तसले विधी करणे म्हणजे विनोदच. म्हणजे लहान मुलांनी लुटूपुटीची शाळा चालवावी तसे. मुख्यतः विधी का करायचे हेच समजून घ्यायला पाहिजे.

सोयर, सुतक, १०वा, १२वा/१३वा वगैरे मागे खरोखर काय शास्त्र आहे का? (आमच्याकडे (आईवडलांच्याकडे) हे काही नसते म्हणुन प्रामाणिकपणे विचारतेय)
सोयर्‍यात देवाची पुजा वगैरे का करायची नाही म्हणे?
सुतकाबाबत मला जितपत माहिती आहे त्यानुसार देवाची पुजा करायची नाही, घरचे लोक कामावर वगैरे जात नाहित. हातावर पोट असलेल्यांना जे कसे शक्य होत असेल?

सासरी गेल्यावर्षी या दोन्हीपैकी काही तरी होते (लांबच्या नात्यातले) आता नक्की आठवत नाही. आणि आम्ही २ वर्षातुन एकदा गेलो होतो तरी देवाला जायचे नाही वगैरे ऐकुन मला चक्कर यायचीच बाकी होती.

इथे कोणाला दुखवायचा हेतु नाही पण मला खरोखर पद्धती माहिती नाहीत.

माझा या विषयात अभ्यास नाही, पण 'पूजा केली नाही तरी चालेल' या मूळ नियमाचा 'पूजा करायचीच नाही' असा विपर्यास झालेला असू शकतो अशी मला शंका आहे.

सोयर हे घरात जन्म (कोणाचं बाळंतपण) झालेलं असताना लागतं तर सुतक हे घरात मृत्यू होतो तेव्हा.
घरात मंडळी बाळंतपणाच्या गडबडीत असताना थोडं देवाधर्माकडे दुर्लक्ष झालं तर चालेल, घरात मृत्यू झालेला असताना मनःस्थिती ठीक नसते म्हणून तेव्हा दुर्लक्ष झालेलं चालेल, मासिक पाळीचा त्रास होत असेल तर तेव्हा दुर्लक्ष झालेलं चालेल - अशी 'सूट' दिली गेली असावी, ज्यातून नंतर अंधानुकरणामुळे सोयर/सुतक/विटाळ या रूढी बनत गेल्या असाव्यात.

तसंच पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे paternal कुटुंबियांना सोयर/सुतक लागतं पण maternal (मामे/मावस) कुटुंबियांना लागत नाही अशी प्रथा पडली असावी.

जाणकारांनी अधिक माहिती दिली तर बरं होईल.

स्वाती, त्या लिंकची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
तिथे closure बद्दल जे म्हंटल्या गेले त्यात थोडेफार तथ्य आहे. पण इतर ज्या गोष्टि आहेत (उदा. कावळा, पिंड, भुत, अतृप्त आत्मे ई. संबंधीच्या क्रिया). बहुतांश लोक त्याबद्दल विचार न करता "तसे करणे आवश्यक असते" असे म्हणुन करतात. (देवाला न जाणे, न शिवणे हे त्यातच आले).

झक्की, अनेक गोष्टि त्यांच्यावर विचार करुन त्या खर्या की खोट्या, अर्थपुर्ण की निरर्थक हे ठरविता येते. ते शास्त्रांवर किंवा पुर्वजांवर सोडल्यास त्यातुन सुटका नाही. मेल्यानंतर आपल्या वंशजांनी आपल्याला मुक्ति मिळवुन देण्याऐवजी ती आपणच जिवंतपणी मिळवायला हवी. आणि ते आपल्याच हातात आहे.

सोयर, सुतक, १०वा, १२वा/१३वा वगैरे मागे खरोखर काय शास्त्र आहे का? (आमच्याकडे (आईवडलांच्याकडे) हे काही नसते म्हणुन प्रामाणिकपणे विचारतेय)

सुतक आणि तेरावा याला सायकियाट्रीचा आधार आहे..

एखादी शॉकिंग घटना घडल्यास मनुष्य डिप्रेशन मध्ये जातो... हे तत्कालीक डिप्रेशन असते. ( अ‍ॅक्युट) ... सामान्यपणे अशा डिप्रेशनमधून बाहेर येण्यास १४ दिवस लागतात आणि त्यानंतर मनुष्य पुन्हा नॉर्मल मेन्टॅलिटीला येतो..

१४ दिवसांनंतरही जर डिप्रेशन रहात असेल ( कुणी लांबचा पाहुणा भेटायला येऊन आठवण काढल्यावर रडू येणे, हे नॉर्मल. पण समोर काहीही कारण नसताना डिप्रेशन रहाणे असे असेल) , तर ते क्रॉनिक डिप्रेशन मध्ये ( दीर्घकालीन डिप्रेशनमध्ये) बदलू शकते... अशा वेळी वैद्यकीय मदत, मानसोपचाराची मदत महत्वाची ठरते..

म्हणून तेराव्याला आपल्याकडे गोड तोंड 'साजरे' करतात. पक्वान्न करतात. कारण इतरांच्या दृष्टीने ती आता नवी सुरुवात असते..

जामोप्या यांच्याशी याबाबतीत सहमत आहे.
<<मला त्या मृत्युपत्रातील गोष्टि पटतात (राख नदीत टाकणे हे सोडुन).>>
अस्चिग , मृत्युपत्र हे माणसाच्या ते लिहिण्याच्या वेळच्या विचारांच व भावनांच स्पंदन असत. आपण मेलो जग बुडाल हे तत्व शेवटी आहेच ना!
भस्मिभुतस्य देहस्य पुनरागमनः कुतः ||

माझे इथे काही काम नाही, पण येत अस्तो अधून मधून वाचायला! तेवढाच विरन्गुळा! Happy
तर....
>>>>> सोयर, सुतक, १०वा, १२वा/१३वा वगैरे
या बाबी व जगोबाचे विवेचन जे घाटपाण्डेन्ना देखिल पटलय, मलाही मान्य! Happy
प्रश्न असा की या चालीरिती हिन्दू धर्मातील विशिष्ट जातीच पाळतात?
की जगातील बाकी इतर धर्म जसे की मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, ज्यु, इत्यादिक देखिल या डिप्रेशन करता धर्मश्रद्धेतून्/अन्धश्रद्धेतून्/औपचारीक नियमातून काही उपाय खरच करतात?
करत असतील तर जरुर कळावेत! Happy
अन्यथा, मज अल्पबुद्धी मनुष्यापुढे अशी शन्का उभी रहाते कि जर हे केवळ हिन्दून्मधे पाळले जात असेल, तर १३/१४ दिवसान्च्या नॉर्मल डिप्रेशन वा क्रॉनिक अवस्था काय केवळ हिन्दून्नाच होतात? इतरजण जर असले उपाय करत नसतील तर सन्ख्यात्मक दृष्ट्यातरी तसेच म्हणावे लागेल ना? Wink
कृपया जाणकारान्नी खुलासा करावा ही नम्र विनन्ती!

माझ्यात असलेल्या व मी खोडून मुळापासून उपटून फेकून दिलेल्या "ज्योतिषविषयक" अन्धश्रद्धान्बाबत वेळ मिळाल्यावर, आठवेल तशा तशा, जरुर लिहीन Happy

>>माझा या विषयात अभ्यास नाही, पण 'पूजा केली नाही तरी चालेल' या मूळ नियमाचा 'पूजा करायचीच नाही' असा विपर्यास झालेला असू शकतो अशी मला शंका आहे.<<

मुळात ते 'आचारसंकेत' होते, नंतर आपल्याच सामाजिक आंतरक्रियांमधून त्यांना नियमांचे लेबल मिळत गेले. पण जेव्हा समाज म्हणून आपण एखादी पद्धत/आचारसंकेत पाळू लागतो, तेव्हा त्यांचे कळत-नकळत व्यवस्थेत रूपांतर घडते अन् ते तसे घडले, की त्यांना नियमांचे स्वरूप व लेबलही पावते. समाजशास्त्रीय दृष्ट्या त्याला (आजवर तरी) इलाज नाही. या संदर्भात यंदाच्या हितगुज दिवाळी अंकात बापू करंदीकरांनी लिहिलेल्या लेखातील मनोहर सप्र्यांच्या पत्रसंग्रहात मांडलेले एतत्संबंधित विचार चिंतनीय आहेत.
अर्थात काळागणिक काही गोष्टी बदलत जातात. कदाचित अंत्यसंस्कार वगैरे गोष्टींमध्ये आपल्या समाजात काही बदल घडतीलही. पण एकदा ते तसे झाले आणि त्या भविष्यकाळातील सर्व समाजघटक ते आचरू लागले, की त्यांचे पुन्हा व्यवस्थेत आणि नियमांमध्ये रूपांतर होणार. ओघानेच, ते त्या वेळच्या काही लोकांना जाचक वाटू लागणार. Happy

लिंबूटिंबू, येथे तुला (खरं तर सर्वच मंडळींना) बर्‍यापैकी व्यापक माहिती मिळेल :
* (इंग्लिश मजकूर) मर्तिकाच्या चालीरिती (इंग्लिश विकिपीडिया)
* (इंग्लिश मजकूर) मर्तिकाच्या चालीरिती वर्गात मोडणार्‍या लेखांचे संकलन (इंग्लिश विकिपीडिया)

>>>>>> ओघानेच, ते त्या वेळच्या काही लोकांना जाचक वाटू लागणार
अगदी अचूक विश्लेषण! Happy

अस्चिग,
>>>मेल्यानंतर आपल्या वंशजांनी आपल्याला मुक्ति मिळवुन देण्याऐवजी ती आपणच जिवंतपणी मिळवायला हवी. आणि ते आपल्याच हातात आहे.

यातल, "आपणच मुक्ती जिवंतपणेच मिळवायला हवी" , हे 'सत्य' आहे आणि, तेही आपल्याच हातात आहे, हे 'अर्ध-सत्य' आहे.

आता मूळ प्रश्न म्हणजे, 'मुक्ती' म्हणजे काय?

आपल्या सगळ्या संतमंडळींच अस म्हणन आहे... 'मन' जेव्हा 'संकल्प' आणि त्याबरोबर आपसूकच.. आगंतूकपणे येणारा 'विकल्प' करायच निरंतर थांबत, तीच स्थिती म्हणजे 'मुक्ती' होय!

'संकल्प' म्हणजे.. मी हे करणार..ते करणार वैगरे, तर 'विकल्प' म्हणजे, आताच जे काही करायच ठरविल आहे,ते होइल की नाही? मन या चक्रातच कायम अडकलेल असत.

आता ही स्थिती 'निरंतर- अखंड' कशी रहाणार? यातच खरी गोम आहे. आता एक गोष्ट मात्र खरी की मनाच हे 'चंचलपण' जर दूर करायच असेल, तर 'अखंड स्थिरपण' असणार काहीतरी पाहीजे.(चिखलात अडकलेल्या माणसाला बाहेर निघण्यासाठी, चिखला बाहेर असणारी स्थिरवस्तू पाहीजे नाही का?)

मनात एकही विचार न येता, पाच मिनट स्तब्ध बसणच आपल्याला जमत नाही, मग मन स्थिर व्हायच कधी आणि मुक्ती तर जणू मृगजळच...

<<पण 'पूजा केली नाही तरी चालेल' या मूळ नियमाचा 'पूजा करायचीच नाही' असा विपर्यास झालेला असू शकतो >>
अनुमोदन.
मुळात अभ्यास नाही, श्रद्धा नाही. मग काय काहीहि करायला, बोलायला, लिहायला मोकळे.

मर्तिक करणारे काही काही करतात, त्याची चर्चा होते. मग कुठेतरी जाऊन, सर्व तयारी चोख करून, मोठ्ठी पार्टी करायची, ही प्रथा तरी 'विचित्रच आहे' असे का वाटू नये? जेवायचे तर घरी बसून वरण भात खाल्ला तर काय बिघडले? कुणाशी बोलायचे तर दारू, मटण कशाला पाहिजे? कारण तसेच करायचे ही अंधश्रद्धा. ते चालते,

हिंदू धर्म मात्र टीकेला चांगला विषय आहे, चघळायला! कुणीहि उठावे नि काहीहि बोलावे!

मनात एकही विचार न येता, पाच मिनट स्तब्ध बसणच आपल्याला जमत नाही, मग मन स्थिर व्हायच कधी आणि मुक्ती तर जणू मृगजळच...
-------------------------------
सावट. हजार मोदक तुम्हाला Happy अगदी अचुक लिहिलेत.

हिंदू धर्म मात्र टीकेला चांगला विषय आहे, चघळायला! कुणीहि उठावे नि काहीहि बोलावे!

१०० मोदक... खास हिंदु संकष्टीचे! Happy

सावट, मुक्ति ही या आयुष्यापासुन मिळवायची, या जगापासुन मिळवायची ही एक धारणा आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे. पण हातचे सोडुन पळत्यापाठी यातला तो प्रकार आहे. बौद्ध 'संतांमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणतात सगळ्यांना मोक्ष मिळाल्याशिवाय (मिळवुन दिल्याशिवाय) आम्हि स्वतःच्या मोक्षासाठी प्रयत्न करणार नाही. दुसरे म्हणतात की आपल्या मोक्षाकरता इतर मदत करु शकत नाही आणि आपण इतरांना त्या करता मदत करु शकत नाही. खरे उत्तर मधे कुठे तरी असावे. मन स्थीर ठेवणे या पेक्षा मन ताळ्यावर ठेवणे हे जास्त महत्वाचे. मन, बुद्धी हे विचार करण्याकरता असतात. मनाकरता आवश्यक स्थिर गोष्ट काळानुरुप बदलायला काय हरकत आहे? दहावी,बारावी (तेरावी नाही!), आई वडिलाचे ऐकणे, मग स्वतः विचार करणे (कधि-कधि बायको-नवर्याचे ऐकणे), मुलांचे किंवा इतर 'प्रॉजेक्ट्सचे संगोपन', म्हातार्या आई-वडिलांबरोबर रिकनेक्ट करणे, मग आपण म्हातारे होणे आणि शक्य त्याप्रमाणे आपले प्रॉजेक्ट्स जिवंत ठेवत इतरांची मदत करणे.

कुणी म्हणेल कृष्णाची गीताच मी वेगळ्या शब्दात सांगतोय. पण कर्म करा येथपर्यंतच ते आहे. त्या मुळे मेल्यावर मोक्ष मिळेल या फळाची पण अपेक्षा ठेउ नका, आणि करत असलेले कर्म स्वतः विचार करुन करा. कुणि सांगितले म्हणुन नव्हे, कुठेतरी लिहिले आहे म्हणुन तर मुळीच नव्हे.

मला अ‍ॅनॉलॉजी आवडत नाहीत (वरील चिखलाप्रमाणे) कारण काही संबंध नसलेल्या गोष्टि समान असल्याप्रमाणे वापरल्या जातात. पण अनेकांना केवळ एखाद्या फॅमिलिअर स्वरुपात काही सांगितले तरच बहुदा गोष्टि कळतात म्हणुन येथे एक वापरतो: वर कुठे तरी म्हंटले आहे की मेल्यानंतर्चे विधी हे प्लसेबोप्रमाणे दु:ख विसरायला मदत करतात. मग एकदा ते कळले असेल तर त्यांची गरज काय (ज्याप्रमाणे मुर्ती वापरायची कारण निराकार ईश्वराची प्रार्थना करणे कठीण जाते, पण एकदा तो निराकार आहे हे कळले की मुर्तिची आवश्यकता उरत नाही.

झक्कि, (१) इथे अहिंदु नाहीत (फारसे तरी) त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसे म्हणण्यात अर्थ नाही, (२) हिंदु चालिरितींबद्द्ल ऐकायला, वाचायला आणि विचार करायला भरपुर वेळ मिळाला आहे. त्तुम्हाला एखादा मुद्दा मांडायचा असेल तर जरुर मांडा.

<<<एखादी शॉकिंग घटना घडल्यास मनुष्य डिप्रेशन मध्ये जातो... हे तत्कालीक डिप्रेशन असते. ( अ‍ॅक्युट) ... सामान्यपणे अशा डिप्रेशनमधून बाहेर येण्यास १४ दिवस लागतात आणि त्यानंतर मनुष्य पुन्हा नॉर्मल मेन्टॅलिटीला येतो..>>>

माझ्या कधीतरी आलेल्या वाचणानुसार १३वे हे मृत व्यक्तीला मोक्ष मिळाला किंवा त्या आत्म्याला शांती मिळाली असे समजून तोंड गोड करणे आणि जगरहाटी पुढे चालवणे यासाठी असते.

किती दिवस मृत व्यक्तीविषयी शोक करणार?

शरद

धन्यवाद मनोज,

अस्चिग,

>>>मुक्ति ही या आयुष्यापासुन मिळवायची, या जगापासुन मिळवायची ही एक धारणा आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे. पण हातचे सोडुन पळत्यापाठी यातला तो प्रकार आहे. बौद्ध 'संतांमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणतात सगळ्यांना मोक्ष मिळाल्याशिवाय (मिळवुन दिल्याशिवाय) आम्हि स्वतःच्या मोक्षासाठी प्रयत्न करणार नाही. दुसरे म्हणतात की आपल्या मोक्षाकरता इतर मदत करु शकत नाही आणि आपण इतरांना त्या करता मदत करु शकत नाही. खरे उत्तर मधे कुठे तरी असावे. मन स्थीर ठेवणे या पेक्षा मन ताळ्यावर ठेवणे हे जास्त महत्वाचे. मन, बुद्धी हे विचार करण्याकरता असतात

व्वा अस्चिग,

आवडल..!

धारणा, श्रध्दा, आणि विश्वास या शब्दामध्ये बराच फरक आहे.
श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात खरा फरक धारणेचाच असतो. न पाहीलेल्या देवावर,रूढी-समजूती-ऐकीव गोष्टिवर विसंबून असलेली तथाकथीत श्रध्दा ही अंधश्रध्देपेक्षा वेगळी म्हणता येत नाही... कारण ती कालानूरूप वेगवेगळी-बदलणारी असते. 'विश्वास' हा स्थिर असतो.

एकदा, "मुक्ती ही जिवंतपणीच मिळवायची स्थिती आहे", हा विश्वास-विचार, मनाने म्हणजे अर्थात बुध्दिने (बुध्दीच कामच भल-बुर निर्णय देण्याच, विचार करण्याच)पक्का केल्यानंतर, मग मुक्ती मिळवायची कशी हा मुख्य आणि अतिमहत्वाचा मुद्दा ठरतो.

आजपर्यत, विविध धर्मामध्ये जे 'ज्ञाते' होऊन गेले त्यांच्या अनुभवानुसार असे लक्षात येते की, 'मुक्ती' ही 'ग्रुपने-झुंडीने' मिळवायची गोष्ट नाही, तर ती प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. ही महत्वाची गोष्ट आपण नजरेआड करता कामा नये.

>>>मला अ‍ॅनॉलॉजी आवडत नाहीत (वरील चिखलाप्रमाणे) कारण काही संबंध नसलेल्या गोष्टि समान असल्याप्रमाणे वापरल्या जातात
>>>मनाकरता आवश्यक स्थिर गोष्ट काळानुरुप बदलायला काय हरकत आहे?

बरोबर आहे तुमच!

प्रत्येकाच-वैयक्तिक मन, समाज मन, राष्ट्रमन हे एकाच पातळीवर तोलून चालत नाही.
जेव्हा मुक्ती ही वैयक्तीक असते,हे पक्क होत, तेव्हा मन हे पण वैयक्तिक पातळीवरच पहाण अपरिहार्य आहे.

मला वांग्याची भाजी आवडते(हे माझ्या मनाने आणि बुध्दीने विचार करून ठरविलेले असत, हे विसरून चालणार नाही), ती भाजी इतर मनांना आवडत नाही... तेव्हा आपण जे बरोबर ठरवितो ते बरोबर असेलच असे नाही हे ओघानेच आल! अशा बुध्दिवर-मति वर विसंबून रहाता येते नाही. तेव्हा आपली वैयक्तीक बुध्दिही चिखला-दलदलीपेक्षा वेगळी म्हणता येत नाही.

आपल वैयक्तिक मन, हे स्थूल नसल्यामूळे, सूक्ष्म असल्यामूळे, त्याला स्थिर करणारी वस्तूही सूक्ष्मच पाहीजे हे ओघानेच आल.'स्थिर' याचा अर्थ, सर्व काळात स्थिर, कालसापेक्ष बदलणारी नव्हे!

...आणि यावरच जर मुक्ति अवलंबून आहे, तर ती सूक्ष्म वस्तू काय, हे पहाण जरूरी ठरत!

>>>> आपल्या लक्षाच्या दृष्टीने अतीमहत्वाचे आहे....!
ओके, पटल
पण या बीबीचे "लक्ष्य काय हे?" Wink

पण या बीबीचे "लक्ष्य काय हे?"
>>
मी पण हेच विचारणार होतो. कारण अंधश्रध्दांवरून गाडी लगेच अध्यात्माकडे वळते.

मला अंतिम संस्कारांबाबतचे फ चे म्हणणे एकदम पटले. ते आचारसंकेत असावेत, आणि नंतर नियम झाले असावेत.

आणि मेल्यानंतर मुक्ती (मोक्ष) मिळते असे कुठे म्हणतात आपल्याकडे? ह्या मुक्तीचा अर्थ 'ह्या देहापासून मुक्ती' असा आहे बहुतेक. हिंदू तत्वज्ञान आत्म्याचे अस्तित्व मानते. त्यामुळे मेल्यानंतर देह दहन करून नष्ट केला की आत्म्याची ह्या देहाशी असलेली आसक्ती संपते आणि तो पुढील प्रवासाला निघतो. म्हणून मेल्यानंतर मुक्ती मिळते असं म्हणत असावेत.

मेल्यानंतर्चे विधी हे प्लसेबोप्रमाणे दु:ख विसरायला मदत करतात. मग एकदा ते कळले असेल तर त्यांची गरज काय (ज्याप्रमाणे मुर्ती वापरायची कारण निराकार ईश्वराची प्रार्थना करणे कठीण जाते, पण एकदा तो निराकार आहे हे कळले की मुर्तिची आवश्यकता उरत नाही.

पण हे ज्याचे त्याचे ( म्हणजे तुमचे) वैयक्तिक मत झाले.... तू तो प्लासिबो वापरू नकोस, हे दुसर्‍याला कसे सांगणार? तुम्हाला कळून चुकले असेल, तो प्लासिबो आहे, तर तुम्ही करु नका... प्रश्न मिटला....

आस्चिग, आज इ-प्रसारणवर तुमच्या गोष्टीचा पूर्वार्ध ऐकला. आवडला. पुढील भागाची वाट पहात आहे.
हिंदू धर्माच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा अश्या गोष्टी जास्त इंटरेस्टिंग आहेत.

> आपल वैयक्तिक मन, हे स्थूल नसल्यामूळे, सूक्ष्म असल्यामूळे, त्याला स्थिर करणारी वस्तूही सूक्ष्मच पाहीजे हे ओघानेच आल.'स्थिर' याचा अर्थ, सर्व काळात स्थिर, कालसापेक्ष बदलणारी नव्हे!

मला ओघ कळला नाही. मुक्ति हवीच असे तरी कशाला? आणि कशापासुन?

हो, मुळ मुद्दा अंधश्रद्धांचा. आपले बहुतेक विचार, खास करुन श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हंटले की गाड्या अध्यात्माकडे वळतातच.

किरकोळ गोष्टिंपासुन दुसरी सुरुवात करुन पाहुया.

Hopefully, मांजर आडवे जाणे, पाल पडणे याला अपशकुन मानणारे फार उरले नसावेत. तसे मानणे यावर सगळ्यांचे एकमत आहे का? (सर्वांनी इथे येऊन "हो" असे म्हणणे अपेक्शित नसल्याने, ज्यांना त्यात तथ्य आहे असे वाटते त्यांनी तसे लिहावे.)

डावा डोळा लवलवणे? तळहात खाजवणे? तिघांनी मिळुन एखादे काम सुरु करणे? बाहेर जातांना विचारणे? शनिवारी नखं न कापणे? जेवायचे नाव काढल्यावर काहीतरी खाउनच बाहेर पडणे. ...

आशिक, तुझ्या शेवटच्या दोन्ही परिच्छेदातील गोष्टी मी शक्य तितक्या पाळतो
हां, आता मान्जर आडवे गेलेच, अन पुढे तर जायलाच हवे तर मान्जराला दोन सणसणीत शिव्या घालायला विसरत नाही, व जशी मानसपुजा करतात त्याच प्रकारे दोन पावले मागे मनातल्या मनात फिरतो व पुढे चालू पडतो! Happy
शनिवारी नखे कापू नयेत, दाढी करु नये हे पाळतो, मात्र शनिवारीच नेमकी बोर्डमिटिन्ग आली असल्यास शनिदेवाची (मनातल्या मनात) क्षमा मागुन दाढी उरकतो
अशा वेळेस, शनिवारी दाढी करु नका हे सान्गायला शनी आला होता का अमुक हजार किलोमीटरवरुन असे स्वतःला/घरच्यान्ना विचारत नाही, हे सान्गणे न लगे! Proud

या कशासही मी अन्धश्रद्धा मानित नाही! Happy
कारण जर यास अन्धश्रद्धा मानायचे, तर "बोर्ड मिटिन्गला" दाढी करुनच गेले पाहिजे, कण्ठलन्गोट लावलाच पाहिजे, ही देखिल एक प्रकारची "अन्धश्रद्धाच होत" नाही का? Wink

बर बीबी चा विषय काय हे? अन हे काय विचारले जातय?
(बीबीच्या विषयानुरुप बोलायच तर माझ इथे काही काम नाही खर तर)

माफ करा मित्रहो,

>>>मेल्यानंतर आपल्या वंशजांनी आपल्याला मुक्ति मिळवुन देण्याऐवजी ती आपणच जिवंतपणी मिळवायला हवी. आणि ते आपल्याच हातात आहे.

अस्चिग, यांच्या या टिप्पनी वर भरकट्लो..

आणि परत त्यांच्याच,

>>>मला ओघ कळला नाही.मुक्ति हवीच असे तरी कशाला? आणि कशापासुन?

या टिप्पनी मूळेच...
गाडी एकदम रुळावर, चालूद्या, आम्ही वाचतोच हे!

धन्यवाद!

Pages