वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पे, तो प्रयोग झाला. त्यातून कदाचित काहीतरी हाती लागेल - कदाचित तुम्हाला अपेक्षित तेच हाती लागेल, कदाचित ते लागणार नाही, कदाचित काहीच लागणार नाही - या सगळ्या शक्यतांना तुम्ही ओपन आहात.

मी अमुक पद्धतीने किंवा तमुकला नमस्कार करून पाणी जरी ओव्हनमधे ठेवलं तरी पुडिंगच होईल (किंवा जे होईल तेच पुडिंगच! :P) - ही (अंध)श्रद्धा.

पाणी जरी ओव्हनमधे ठेवलं तरी पुडिंगच होईल - ही श्रद्धा>>> अहो इबा अंधश्रद्धा ना?
जाउ दे..आता मी टाइम आउट घेते.

रार +१.
इथे चर्चा परत श्रद्धेच्या डेफिनिशन्स वर घसरली आहे. वेदिकांनी लिहिलय त्याप्रमाणे न्युसन्स वॅल्यू बघून अंधश्रद्धा डिफाईन करता येते. व्यक्ती म्हणून स्वतःला, तिच्या परिवाराला आणि पुढे संपुर्ण समाजाला त्रासदायक ठरतील अशा बर्याच अंधश्रद्धा अजून अस्तित्वात आहेत. त्या विषयी कोणी काही ठोस कामगिरी केली असेल (जशी दाभोळकरांनी केली) तर त्याला काही अर्थं आहे. नुसतं ह्या डेफिनिशन्स बद्दल टाळ कुटून आपण फक्त आपली पौष्टिक वाफ दवडत आहोत.

वेदिका, चांगली पोस्ट. Happy

देजावु व्हायला लागले आहे मला ! पूर्वी देव आहे की नाही यावर ५०० पोस्टी पडल्या होत्या, मग एकदम देव आहे या बाजूने लिहिणार्‍या कुणीतरी म्हटले देव = एनर्जी या अर्थाने मी हे वरचे सगळे म्हटले!! झाली का मज्जा! सगळी समीकरणंच बदलली ना Lol तसंच इथे आता प्रयोग, रिसर्च, एथिक्स इ. ला श्रद्धा म्हणणे सुरु झाले आहे Happy

मै... Proud आहो श्रद्धा काय फक्त देवावर आणि अमुर्त गोष्टिवरच असतात का?

हातात प्रुफ नसताना एखाद्या रिझल्ट साठी जेंव्हा काम केले जाते तेंव्हा कुठेना कुठे श्रद्धा असतेच ...त्या प्रोसेसवर, आपल्या लाइन ऑफ थिंकिंगवर... नुस्ता हंच आहे आहे म्हणुन त्या दिशेने रिसर्च करणारे श्रद्धाळू म्हणायचे का अंधश्रद्धाळू की अजुनकाही?

क्म ऑन. आता तुम्हीच कॉन्ट्रॅडिक्ट केले की- नुस्ता हंच आहे आहे म्हणुन त्या दिशेने रिसर्च होत नसतो हे मान्य ना? म्हणजेच काही ठोस कारण असल्याशिवाय तुम्ही त्या दिशेने रिसर्च / एफर्ट्स करत नाही. म्हणजेच श्रद्धेचा संबंध नसणार ना!!

>> नुस्ता हंच आहे आहे म्हणुन त्या दिशेने रिसर्च करणारे श्रद्धाळू म्हणायचे का अंधश्रद्धाळू की अजुनकाही?

रिसर्च न करणारे (अंध)श्रद्धाळू हो पे! असं काय करता!

लिहिणार्‍या कुणीतरी म्हटले देव = एनर्जी या अर्थाने मी हे वरचे सगळे म्हटले!!
>>> हाच माझा मुद्दा आहे… म्हणूनच 'अंधश्रद्धेबद्दल ' बोला, श्रद्धेबद्दल नाही… ह्या सरसकट एकमेकांच्या विरोधी ठरवणं योग्य नाही, इतकंच माझं म्हणणं आहे.

अहो मि म्हणतोय नुस्ता हंच आहे म्हणुनच त्या दिशेने रिसर्च होतो टु व्हलिडेट ओर इन्वलिडेट थे हंच... प्रत्येक वेळेस पुढची पायरी स्पष्ट नसते लय चाचपडणे असते... अता काळ-वेळ-व लोजिस्टिक ह्यांच गणित बसवायच म्हणजे ... हंच करायचा तर तो स्टडिड करा .. पण केल्यावर मग सब राम भरोसे... मेथड शास्त्रिय, कामात कुचराइ नाही... पण तुम्हाला जे साध्याअ हे ते मिळेलच ह्याची काही म्हणजे काही हमि नाही तरि काम करत रहावे लागते... ह्या मधल्या काळात टाय्नि का होइना श्रद्धा च असते...

रार, कार्यकारणभाव जाणून न घेता बाळगलेला विचार आणि/किंवा केलेली कृती म्हणजे अंधश्रद्धा म्हणता येईल.

श्रद्धा = Belief
अंधश्रद्धा = Faith

From Webster Dictionary See Point 3 under Belief and Point 2 b) 1) under Faith

Belief : a feeling of being sure that someone or something exists or that something is true

: a feeling that something is good, right, or valuable

: a feeling of trust in the worth or ability of someone
Full Definition of BELIEF
1: a state or habit of mind in which trust or confidence is placed in some person or thing
2: something believed; especially : a tenet or body of tenets held by a group
3: conviction of the truth of some statement or the reality of some being or phenomenon especially when based on examination of evidence

Faith: strong belief or trust in someone or something

: belief in the existence of God : strong religious feelings or beliefs

: a system of religious beliefs
plural faiths \ˈfāths, sometimes ˈfāthz\
Full Definition of FAITH
1a : allegiance to duty or a person : loyalty b (1) : fidelity to one's promises (2) : sincerity of intentions
2a (1) : belief and trust in and loyalty to God (2) : belief in the traditional doctrines of a religion b (1) : firm belief in something for which there is no proof (2) : complete trust

मी आधीच लिहिलंय - जिथे वैचारिक चिकित्साबुद्धी आणि मानसिक जाणीवा डोळसपणा गमावतात - तेव्हा 'अंधश्रद्धा' निर्माण होते.

तुझ्या मताप्रमाणे कार्यकारणभाव जाणून न घेता बाळगलेला विचार आणि/किंवा केलेली कृती म्हणजे अंधश्रद्धा अशी जर डेफिनेशन तू केलीस, तर आता आपण चर्चा करताना अशी 'अंधश्रद्धेची' उदाहरणं शोधून त्यांच्यावर चर्चा करायला हवी आणि ती दूर कशी करता येईल ह्यावर उपाय सांगायला हवेत. आणि त्याही पुढे जाऊन त्याचं आचरण करायला हवं.

अजून एक मुद्दा म्हणजे -
इथे आपण सगळेच 'शास्त्रीय सिद्धांत', प्रुफ वगैरे बद्दल बोलत आहोत… पण ह्या स्पेशिफिकली "अंधश्रद्धा" प्रकरणामधे ' मन, मानसिक अवस्था' हा फार मोठा फॅक्टर आहे. जे आहे, ज्याचे विकार आहेत, त्याबद्दल शास्त्रीय सिद्धांतही आहेत, पण तरीही त्याच्या सगळ्या अवस्था शास्त्रानीही सिद्ध झालेल्या नाहीत अजूनतरी. पण 'त्या आहेत/त्या परिस्थियीनुसार बदलतात' हे ऑबझरवेशन शास्त्रही मान्य करतं. त्यामुळे अंधश्रद्धा दूर करताना शास्त्रीय सिंद्धांताइतकच, किंबहुना काही वेळा जास्तीच प्रमाणात ह्या मानसिक अवस्थांचाही विचार व्हायला हवा, आणि त्यावर उत्तर शोधायला हवीत जी कदाचित आत्ता हाताशी असलेल्या विद्ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेरही असू शकतील.

गणित किंवा शास्त्रात संशोधन करताना back of the head आडाखे निश्चितच असतात. माहीत असलेल्या गोष्टींपासून माहीत नसलेल्या गोष्टींविषयी निश्कर्ष काढायचे असल्यास माहीत असलेल्या गोष्टींप्रमाणेच माहीत नसलेल्या गोष्टींप्रमाणेच वर्तन असेल किंवा नसेल, असे काहीतरी मनात ठेवूनच संशोधनाला सुरवात होते, असा माझा अनुभव आहे. ते तसे का असेल किंवा का नसेल, ह्याची दर वेळी शब्दांत सांगता येणारी कारणे असतीलच असे नाही. तुम्ही शोधत असलेल्या गोष्टीचा माहीत असलेल्या गोष्टींशी कसा संबंध असला पाहिजे, ह्याचे काहीतरी अदृश्य बंध मनाला जाणवत असतात. कधीकधी ते पूर्ण बरोबर नसून अंशतः बरोबर असतील, तर कधीकधी चुकीचे असतील, परंतु अशा संशोधनाच्या मागे अशा अदृश्य (बरोबर किंवा चूक ते सुरवातीला माहीत नसलेल्या) विचारांचा कार्यकारणभाव असतो, त्यामुळे अशा संशोधनामध्ये अंतर्भूत असलेल्या श्रद्धेला 'अंध' म्हणता येईल असे मला वाटत नाही.

वैयक्तीक आणि व्यक्तीगत हे शब्द येण्यामागची काही कारणं:

- तुमच्या जवळच्या लोकांची आणि तुमची मतं भिन्न आहेत
- तुम्हाला विश्वास आहे की तुमची मतं जास्त योग्य आहेत आणि कदाचीत त्यांचं मन वळवलं तर त्यांना फायदा होईल
- जवळच्यांना बरं वाटेल म्हणून तुम्ही सोडून देऊ शकाल, पण त्यामूळे वैश्वीक पातळीवर जास्त नुकसान संभवतं

विचार न करता गोष्टी करायची सवय झाली की मग कुठेही तसं करायचा तो परवानाच असतो
आपणही आणि इतरांनीही. ते ही सोडून देणं सोपं असतं पण पुन्हा वर उल्लेख केलेला तिसरा मुद्दा मधे येतो
आणि वैश्वीक पातळीवर खरंच नुकसान होणार आहे का हे दाखवून द्या असं कोणी म्हंटल्यास तुमची वन-टू-वन सांगायची तयारी हवी आणि त्यांची खरंच ऐकायची. अशा ओपन फोरम वर ते थोडं कठीण आहे.

इथे लिहीत असलेल्या मातब्बरांनी प्रत्येकी एक एक लेख लिहीला तर छान होईल. लिहीणार का? एक एक पानाचाच सही

२००० वर्षांपूर्वी गौतम बुद्ध या आयडीने मायबोलीवर एक पोस्ट लिहीली होती. सापडली तर लिंक देईन (गापै कडून शिकून).

त्याचा आशय असा होता की, मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हां ते स्विकारा. मी जे सांगितलंय ते काल, स्थळ याला नेहमीच अनुरूप असेल असे नाही, म्हणून कालपरत्वे, स्थलपरत्वे तुम्ही त्यात बुद्धीला पटेल तसे बदल करू शकता.

अतः दीप भव

:ड्युआयमोड ऑनः इथल्या अवांतर पोस्टी इग्नोर करण्यात आलेल्या आहेत. :ड्युआयमोडऑफः

:कंपूमोडऑन: गण्या डॉट यांच्या सर्व पोस्ट्स आवडल्या :कंपूमोडऑफः

बुद्धाला मानणारे लोक बुद्धाची मूर्ती का ठेवतात आणि सोबत आंबेडकरांचा फोटो का लावतात यावरून आमची श्रद्धा कशी बरोबर अशी खाज भागवून घेणारे महाभागही कमी नाहीत. तसंच रॅशनल थिकिंगचा महामंत्र जपत स्वतःला पुरोगामी म्हणवणारेही यात मागे नसतात. सारासारविवेकबुद्धी चा वापर करायचा झाला तर कुणाच्या अंगात बुद्ध येत नाही किंवा आंबेडकरांच्या फोटोला नमस्कार करून कुणी मला परी़क्षेत अमूक इतके मार्क्स पडू देत असं म्हणत नाही. या दोन्ही प्रतिमांना कुणी नवस बोलल्याचे आजवर पाहण्यात नाही. या प्रथांच्या मागचा उद्देश वाईट आहे असं ठामपणे म्हणता येईल का ? आंबेडकरांच्या आधी जी काही अभूतपूर्व परिस्थिती होती त्यातून मुक्त केल्याने असलेली कृतज्ञता आणि विचारांचा विसर पडू नये नाहीतर पुन्हा तेच जिने नशिबी येईल ही भीती यापेक्षा त्या कृतीचं मूल्य काहीच नाही. जागृतीची लेव्हल अतिशय कमी असल्याने जेव्हां केव्हां अतः दीप भव होईल तेव्हां होईल , पण तोपर्यंत आपल्याला खरा रस्ता दाखवणारे कोण आणि कुठल्या मार्गाने जायचेय याची जाणीव ठेवण्यासाठी केलेला हा प्रपंच आहे. या आक्षेपाला उत्तर देण्याची क्षमता अशा लोकांच्यात असेलच असं नाही.

पण अशी उदाहरणे देऊन स्वतःची पाठ थोपटून घेनारे, स्वतःचा कंड कुरवाळून घेणारे आणि धोपटल्याचे समाधान मिळवणारे यांची जागृतीची, एक्स्पोजरची लेव्हल हीच आहे का ? प्रागतिक म्हणवून घेऊन आपल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन दुस-याला लहान दाखवून करणा-यांकडून रॅशनल थिंकींगची अपेक्षा ठेवता येत नाही.

@साती
>>धर्मांध लोकांचा विरोध करताना मग काही लोकांना निधर्मांध व्हावं लागतं.
सश्रद्ध लोकांचा गोंधळ निस्तरण्यासाठी कडवं अश्रद्धं बनावं लागतं.<<
या प्रकारची मांडणी मी गेली बरीच वर्षे ऐकतो आहे.पुर्वी मीसुद्धा ही मांडणी करत असे. परंतु आक्रमक पद्धतीने प्रबोधन होउ शकत नाही. एकाने गाय मारली म्हणुन दुसर्‍याने वासरु मारणे हे माझ्या मते विवेकी नाही. शेकडो वर्षे रुजलेल्या अंधश्रद्धा या काही दशकात दूर होतील ही अपेक्षा मला योग्य वाटत नाही.पुरोगाम्यांमधे समविचारी लोक एकत्र नांदु शकत नाहीत. समजा तुमचे माझे दहा मुद्द्यांपैकी सात मुद्द्यांवर एकमत आहे व तीन मुद्द्यांवर मत भेद आहेत तर सात मुद्द्यांवर सहमतीने काम करण्याऐवजी मी ते तीन मुद्देच पणाला लावतो व तुमचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो.ज्या अर्थी तुम्हाला माझे तीन मुद्दे पटले नाहीत त्याअर्थी ज्या कारणासाठी मला माझे सात मुद्दे पटत आहेत त्या कारणासाठी तुम्हाला ते पटतच नाही म्हणुन माझी चूल वेगळी तुमची चुल वेगळी.परिवर्तनाचा किमान समान कार्यक्रम इथे कोसळून पडतो.जयंत नारळीकरांनी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.. प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात म्हटले आहे " 'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला.
आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का?"
@वैद्यबुवा >>संपुर्ण समाजाला त्रासदायक ठरतील अशा बर्याच अंधश्रद्धा अजून अस्तित्वात आहेत. त्या विषयी कोणी काही ठोस कामगिरी केली असेल (जशी दाभोळकरांनी केली) तर त्याला काही अर्थं आहे. नुसतं ह्या डेफिनिशन्स बद्दल टाळ कुटून आपण फक्त आपली पौष्टिक वाफ दवडत आहोत.<<
सगळेच काही दाभोलकर होउ शकत नाहीत. लता मंगेशकर सारखे गाणे गाता येत नाही म्हणुन इतरांनी गाउच नये का? या टाळ कुटण्याकडे जर आपण सकारात्मक पाहिले तर विचार करायला प्रवृत्त होणे हे सुद्धा एक प्रबोधनाचे यश आहे.

पुरोगाम्यांमधे देखील काही कट्टर पुरोगामी, कडवे पुरोगामी, सनातन पुरोगामी, मवाळ पुरोगामी, जहाल पुरोगामी, अशांत पुरोगामी, अस्वस्थ पुरोगामी, मौकाचौका पुरोगामी, इधरघूस उधरघूस पुरोगामी, आक्रमक पुरोगामी असे पुण्यातल्या मारुती आणि गणपतींसारखे अनेक प्रकार आहेत.

एक निबंध वाचन्यात आलेला तो देत आहे विशयाला धरुन आहे कि नाहि माहित नाहि पन वाचन्यासाखा आहे.
भारत की अवनति का मूल

एक हम हैं कि लिया अपनी भी सूरत को बिगाड़।
एक वह हैं जिन्हें तसवीर बना आती है॥

वर्ण व्यवस्था का महारोग भारत की एक ख़ास सौगात है। वैसे तो कर्म-विभाग की वर्ण व्यवस्था की तरह कहीं यह महामारी नहीं पाई जाती है। संसार के उन्नतिशील देशों में-जैसे इंग्लैंड, फ्रांस, जर्मनी, इटली, जापान, चीन और अमेरिका आदि महादेशों में इस संगठन विघातिनी वर्ण व्यवस्था का कोई पता नहीं है। वे लोग अपने-अपने देशों के पवित्र नामों के साथ गौरव पूर्वक पुकारे जाते हैं। जैसे जापानी, चीनी, जर्मन, इटालियन, अमेरिकन आदि। भारत की भाँति वर्ण व्यवस्था के बखेड़े में वे लोग नहीं पड़े हुए हैं। कई लोग यह कहा करते हैं कि योरप आदि देशों में भी ग़रीब, अमीर, विद्वान् और अशिक्षितों के भेद मौजूद हैं और अलग-अलग श्रेणियाँ बनी हुई हैं जो प्रायः लड़ती रहती हैं। किन्तु वे भूल जाते हैं कि योरप आदि में वहाँ का कोई अमीर से अमीर या विद्वान से विद्वान् मनुष्य-किसी भी गरीब या अशिक्षित के हाथ से भोजन करने में परहेज नहीं करता, न उसको छूकर अपने को अपवित्र मानता है। इसी प्रकार गरीब से गरीब मनुष्य के साथ एक अमीर अपनी कन्या का विवाह करने या अपने पुत्र के साथ उसकी कन्या का विवाह करने में संकोच नहीं करता। वास्तव में छुआछूत और रोटीबेटी का परहेज ही भारत में प्रचलित वर्ण व्यवस्था का मुख्य स्वरूप है। संसार के अन्य किसी सभ्य देश में इसका नामोनिशान नहीं पाया जाता। योरप और अमरीका प्रभृति देशों में इस तरह की मिसालें मौजूद हैं कि जिन में जूता गाँठने वालों और लकड़ी चीरने वालों के लड़के अपनी योग्यता के अनुसार प्राइम-मिनिस्टर (मुख्य सचिव), राष्ट्रपति और बिशप (पुरोहित) तक हो गए और उनसे किसी प्रकार का भी किसी ने परहेज नहीं किया। परन्तु भारतवर्ष की दशा तो विचित्र है। यदि दो अपरिचित व्यक्ति यहाँ आपस में प्रथम मिलते और बातचीत करते हैं तो उनका सबसे पहिला सवाल होता है कि तुम कौन हो। यदि वह बतादे कि मैं डाक्टर हूँ तो काम न चलेगा, यदि वह बतादे वकील हूँ तब भी काम न चलेगा, यदि वह बतादे कि दुकानदार हूँ तो भी मामला हल न होगा, यदि वह कहे कि मैं फौज में कैप्टेन हूँ तो भी समस्या त्रिशंकु की तरह अधबीच ही लटकती रहेगी। यद्यपि ‘तुम कौन हो।’ इस प्रश्न का उत्तर हो चुका-तो भी वह पूछेगा कि तुम्हारी जाति क्या है। अब यदि आप कन्नौजिए हैं तो झट कह दीजिए-अन्यथा कलवार का जायसवाल, बढ़ई का जाङ्गिड़ा ब्राह्मण और लोहार का विश्वकर्मा नाम बता कर अपना पिंड छुड़ा लीलिए। बेचारे धोबी सोलंकी बने हैं, भंगी बाल्मीकि बने हैं और कहार कश्यप बने हुए हैं। बेचारे अपने बुजुर्गों के देश में चोरों की तरह निवास करते हैं। हम ऐसे सैकड़ों पढ़े लिखे बाबुओं को जानते हैं जो अपनी असलियत को छिपाए हुए शर्मा वर्मा से काम चला रहे हैं। बेचारे करें भी क्या। बदकिस्मती से यह देश इतना भ्रष्ट हो गया है कि इन तिलक छापधारी पुरोहितों के मारे कोई पूरी साँस लेकर जी भी तो नहीं सकता है?

देखिए-इस वर्ण व्यवस्था का झगड़ा समाप्त भी तो नहीं होने पाता। कायस्थों को कोई वर्मा मानता है और शूद्र। गड़रियों को कोई पाल क्षत्रिय मानता है और कोई शूद्र। इसी प्रकार सुनारों को कोई वैश्य बताता है कोई क्षत्रिय। दर्जी (सूचीकार क्षत्रिय) सुई पकड़ने के कारण, भड़भूँजा (भुर्जी क्षत्रिय) कड़छुला धारण करने के कारण और घसियारा (वन्य क्षत्रिय) खुर्पी पकड़ने के कारण बनाए जा रहे हैं। जायसवाल (वैश्य), अहीर (यादव क्षत्रिय) और कलाल हैहय क्षत्रि अभी तब अधबीच में हैं। यह सब क्यों? इसका एक ही जवाब है कि भारत की वर्ण व्यवस्था के यह सब कुफल हैं। तभी तो स्वामी दयानन्द ने लिखा था कि प्रचलित वर्ण व्यवस्था भारतीयों के लिए मरण व्यवस्था हो रही है। यही गुलामी की भावना उत्पन्न कर रही है, इससे समानता का भाव लुप्त हो गया है और अपनी-अपनी उच्चता का घमंड इतना अधिक बढ़ गया है कि जिसकी कोई सीमा नहीं रही है। बहुधा भारत में इसी वर्ण-व्यवस्था की आड़ में उपद्रव खड़े होते रहते हैं। सम्प्रति भारत गुलामी की जंजीरों में जकड़ा हुआ है। सत्तर हजार बेचारी निरपराध गौवें नित्य प्रति ब्राह्ममुहूर्त में मारी जाती हैं-तब भैंसों, बकरी, भेड़, मछली, मुर्गों और कबूतरों को कौन गिनावे। आश्चर्य तो यह है कि अपने को ब्राह्मण कहलवाने वाले भी इन बेचारे मूक प्राणियों को अपने पेट में पालने से नहीं झिझकते। ऐसी दशा में ‘वर्णानां ब्राह्मणो गुरुः’ की विडम्बना करना वर्ण व्यवस्था के प्रति एक मजाक नहीं तो क्या है। आज इस प्रचलित वर्ण व्यवस्था के कारण भारत के नर नारी गुलाम बने हैं। एक ब्राह्मण अपने को क्षत्रिय, वैश्य और शूद्रों से श्रेष्ठ बतलाता है एवं इन तीनों वर्णों को वह नीच दृष्टि से देखता है। इसी प्रकार क्षत्रिय वैश्यों और शूद्रों को नीच समझता है और वैश्य शूद्र को दबाता है। अब रहे शूद्र। इन्होंने अछूतों को अपना गुलाम मान लिया है। शूद्रों को भी तसल्ली है कि हम से भी नीच 7 करोड़ अछूत हैं। अछूतों में भंगी नीच, परन्तु भंगी कहता है कि खटिक नीच, खटिक कहता है पासी नीच, पासी कहता है धानुक नीच, इस परम्परा कहीं समाप्त नहीं होती-फलतः भारतवर्ष द्रुतगति से नीचे ही नीचे जल-प्रपात की तरह गिरता जा रहा है। भारतीयों में अन्दर ही अन्दर कलहाग्नि धधक रही है। न जाने कब वर्ण व्यवस्था का ज्वालामुखी फूटेगा और छुआछूत का भूकम्प... बरसों से यही अवस्था देश की हो रही है। जब-जब वर्ण व्यवस्था का जोर बढ़ा-शत्रुओं ने भारत को आकर खूब लूटा खसोटा। यह हमारा प्यारा पवित्र भारत देश सोने की चिड़िया कहलाता था; जिसमें इतना धन, धान्य उत्पन्न होता था कि स्वयं खा पीकर सारे संसार को खिला पिला दे। जिस की उन्नति हिमालय के शिखर से भी ऊँची मानी जाती थी। जिस देश में वीर शिरोमणि भीष्म पितामह जैसे बाल ब्रह्मचारी उत्पन्न होकर अपने तेज से संसार को विस्मित कर चुके, मर्यादा पुरुषोत्तम राम जैसे राजा, स्थितप्रज्ञ श्रीकृष्ण जैसे योगी; व्यास, वसिष्ठ, कपिल कणाद जैसे उद्भट विद्वान; भगवान् गौतम बुद्ध जैसे अखण्ड ब्रह्मचारी और आदर्श सुधारक उत्पन्न हुए, आज वही हमारा प्यारा भारत देश वर्ण व्यवस्था के बखेड़े में पड़ा हुआ मटियामेट हो रहा है। फिर प्राकृतिक दृष्टि से भी भारत बड़ा सौभाग्यशाली है। जिस पवित्र भारतवर्ष का क्षेत्रफल 18 लाख वर्गमील है, जिस की रक्षा में एक ओर हिमालय पहाड़ अपनी बर्फ़ीली चट्टानों को चमका रहा है और दूसरी ओर हिन्द-महासागर अपनी उत्तुङ्ग तरङ्गों से भारत की पवित्र कोखों को प्रक्षालित कर रहा है आज उसी भारतवर्ष को विदेशियों ने आकर अपने बुद्धि बल से गुलाम बना लिया है। यदि आज यह वर्ण व्यवस्था न होती तो भारतीयों का संघ बल तो इतना महान् होता कि संसार की कोई शक्ति इस की ओर आँख उठाकर भी नहीं देख सकती, परन्तु शोक! महान् शोक!!! आज इस वर्ण व्यवस्था ने भारत को अन्धा, बहिरा, लूला, लँगड़ा, कोढ़ी और अपाहिज आदि बना दिया है। यदि हिम्मत कर के भारतीय लोग इस महामारी को मार कर भगा सकेंगे तब तो संगठित होकर 33 करोड़ बने रहेंगे नहीं तो समय आ रहा है जब यह हिन्दुस्तान सचमुच इंगलिस्तान या अरबिस्तान बन जाएगा।
तभी हम कहा करते हैं-

जुल्म से भाई हमारे सैकड़ों,
नित मुसल्माँ और ईसाई हो रहे।

जुल्म होते हैं धरम के नाम पर,
कौम के मिटने के ये आसार हैं॥

चायला कामधाम आटपून एखादी चक्कर मारावी तर चर्चा ७-८ पानं पुढे गेलेली असते.

>> आजकाल आपण कसे आस्तिक आहोत हे सांगण्याची फॅशन आहे.
>> कुठल्या देवाचं व्रत कसं फॉलो केलं, कुठे चालत गेलि, कुठे परिक्रमा केली हे सगळे सांगणे फॅशनेबल आहे.
>> एक जानेवारीला बारा वाजता शिर्डी साईबाबांच्या, तिरूपतीच्या रांगेत असणे इन आहे.
>> आजकाल ज्यांना बुद्धिशी प्रतारणा करता येत नाही असेच लोक नास्तिक राहण्याची ऐश करू शकतात.

हे एकदम पटलं. शिर्डी नाहीतर गेला बाजार सिद्धिविनायकला चालत जायची प्लानिंग दर महिन्याला कुठे ना कुठे ऐकायला येतं

>> माझ्या मते डोळस श्रद्धा असा प्रकारच अस्तित्त्वात नाही.

ह्याला देखील माझा पूर्ण पाठींबा. कारण maitreyee चं हे पोस्ट

>> मग एकदम देव आहे या बाजूने लिहिणार्‍या कुणीतरी म्हटले देव = एनर्जी या अर्थाने मी हे वरचे सगळे म्हटले!! झाली का मज्जा! सगळी समीकरणंच बदलली ना हाहा तसंच इथे आता प्रयोग, रिसर्च, एथिक्स इ. ला श्रद्धा म्हणणे सुरु झाले आहे

>> आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो.

हे देखील पटतंय कारण कोणे एके काळी मी खूपच आक्रमक होतो. प्रसादाला नाही म्हणणं किंवा तो गटारात टाकून देणं असे उपद्व्याप मी सर्रास करायचो. अमुक एक गोष्ट करू नये असं कोणी म्हणालं कि मी हटकून ते करायचो. माझं काही वाईट झालं नाही पण सश्रद्ध लोकांची मतेपण बदलली गेली नाहित. किंबहुना माझ्याकडे दुर्लक्ष करून ते अधिकच कट्टरपणे त्यांच्या अंधश्रद्धा अजूनही जोपासत आहेत.

>> आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो.

एकदम पटलं.

केरळातल्या एका गावाने हुंडा प्रथे विरुद्ध लढा उभारून तो यशस्वी करून दाखवला आहे. गेल्या कित्येक वर्षात हुंड्यावरून एकही तंटा बखेडा झालेला नाही. एका गावाने ठरवलं तर भारतातली ही एक कीड नाहीशी झाली, या गावचा आदर्श घेतला तर देशातून हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. २४ तास फालतू गोष्टी दाखवणा-या न्यूज चॅनेल्सना अशा गोष्टींसाठी वेळ नसला तरी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ही बातमी सगळीकडे पोहोचते आहे.

https://www.facebook.com/logical.indian/photos/a.430765593719832.1073741...

>> आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो.

सरधोपटपणे हे खरं आहे का ते सांगणं कठीण आहे.
आणि कुंपणावरील किती लोक कुठे वळत असतील कुणास ठाऊक.

उत्तम चर्चा.

धर्मांतरासाठी जसा आक्रमक प्रचार केला जातो तसा नास्तिकवादाचा देखील करायला हवा या ( अमंग्स्ट अदर्स गुरुवर्य डॉकिन्सांच्या) मताशी मी सहमत आहे. तर आमच्या घरातील 'इतर' व्यक्ती स्वतः नास्तिक असूनही इतरांच्या श्रद्धेला चॅलेंज देऊ नये अश्या ठाम मताची आहे.

वारा व सूर्याचे उदाहरण आवडले. तरी विचारांमध्ये मूलभूत फरक घडवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागतील असे वाटते. म्हणजे पॅसिव (न)-प्रयत्नांनी काम भागणार नाही असे वाटते.

रच्याकने नोकरी वगैरे मिळाली नाही तर एक मंदीर काढून जागृत देवस्थान असा प्रचार करायचा - अ‍ॅज बिझनेस - असे मी (बालपणी काही काळ) ठरवले होते.

नास्तिकवादाचा प्रचार नक्कीच व्हायला हवा. पण तो आक्रमक पणे नव्हे.
सुरुवातीला आपली नास्तिकता न लाजता न घाबरता उघड करता यायला हवी.
मला माहित असलेले कित्येक नास्तिक, बाकीचे काय म्हणतील म्हणून चार चौघात सगळे सोपस्कार करतात आणि मग बायकोच्या शॉपिंग बद्दल मागून वैतागावे तसे मागून वैतागत रहातात.

Pages