वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रार, एकाची श्रद्धा ही दुसर्‍याची अंधश्रद्धा असते हाच तर सगळा घोळ आहे ना...

म्हणजे जनरलाइज करू नका<<<

मी पहिल्यापासून (ह्या धाग्यावर व ह्या धाग्यापुरते) हेच म्हणत आहे की हा विषय असा आहे की जनरलाईझ करून आयुष्य व्यतीत करणाराच ठाम आहे, बाकीचे भोंगळ आहेत.

तुमचे नेमके मत काय आहे ते सांगायचे असले तर स्वतंत्ररीत्या सांगावेत अशी विनंती!

सांगायचे नसेल तर ते स्वातंत्र्य तुम्हाला आहेच, जसे अधूनमधून कोणालातरी सहमती वा असहमती दर्शवण्याचे आहे, कारण हा पब्लिक फोरम आहे,.

इतरांना सल्ले देण्याचेही स्वातंत्र्य आहेच.

'विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा' हे मे. पुं. रेगे यांचं पुस्तक अतिशय वाचनीय आहे. लोकवाङ्मय गृहानं प्रकाशित केलं आहे. जरूर वाचा. Happy

'मायबोलीवर खरेदी विभागात उपलब्धं आहे, २०० रू वर किंमत असल्यास फ्री शिपिंग'
हे लिहायचं राहिलं वाटतं.

स्पेक्ट्र्मच्या मधल्या लोकांची संख्या खूप आहे आणि त्यांचाच उपद्रव दैंनदिन जीवनात होत असतो. त्यामुळे त्यांना डावलून बदल घडणे शक्य नाही वाटत. कडाक्याच्या उन्हात अनवाणी चालावे लागणे, अशक्त वाटत असतानाही निर्जल उपवास करायला लागणे, शिवाशिव, अशी अनेक उदाहरणे रोज अनूभवणार्‍या व्यक्तीसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे.
स्पेक्ट्र्मच्या टोकाची लोक संघटित असतात आणि त्यांचा सामना कायदा, युद्ध ई. मार्गानी करता येतो. पण ह्या मधल्या ग्रुपला आवर कसा घालायचा.

दाभोळकरांच्याच शब्दात सांगायचं तर - " काहीजणांना प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच वाटते, तर आणखी काही जणांना श्रद्धेशिवाय माणूस जगणं अश्यक्य असं वाटत असतं. अंधश्रद्धानिर्मूलनाच्या नावानं प्रत्यक्षात श्रद्धा निर्मूलन होतं, असाही काहींचा आक्षेप असतो"

खुद्द दाभोळकरांनी किंवा त्यांसारख्या अनेक माणसांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम श्रद्धेनं केलं - असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा श्रद्धा - अंधश्रद्धा ह्यांचे अर्थ नुसते विरुद्धार्थी शब्द नसून त्या पलिकडे असतात.
त्यामुळेच श्रद्धेवर केलेली चर्चा, नुसताच 'उलट /विरुद्धार्थी' शब्द म्हणून 'अंधश्रद्धेला' लागू होत नाही असं मला वाटतं.
अंधश्रद्धेवरची चर्चा - अंधश्रद्दा ह्या मुद्याला समोर ठेवून करायला हवी.

रार, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला तुला वाटणारा फरक उदाहरणाने सांग.

माझ्या मते डोळस श्रद्धा असा प्रकारच अस्तित्त्वात नाही.

रार,
धार्मिक श्रद्धा आणि श्रद्धा यांत फरक आहे, असाही तुझ्या म्हणण्याचा अर्थ निघतो ना?

लोकांच्या मते गणपतीला साखर्/मोदक ठेवले की श्रद्धा नी मरीआयला बोकड कापल की अंधश्रद्धा.
Wink

आता चिनूक्स साखरपुड्याची तयारी या बीबीवर जाऊन आयुर्वेदिक गर्भसन्स्कार
पुस्तक खरेदी विभागात उपलब्ध आहे असे लिहेल याची भिती वाटते.

स्वाती, वर लिहिलंय - खुद्द दाभोळकरांनी किंवा त्यांसारख्या अनेक माणसांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम श्रद्धेनं केलं.
किंवा एका माणसानी दुसर्‍याशी चांगलं वागावं ह्या साध्या विचारावर आणि आचारावर माझी श्रद्धा आहे.
मी माझं सायटीफिंक काम श्रद्धेनं करते.

श्रद्धा ह्या शब्दाचे स्थळ, काळ, संदर्भ यानुसार वेगळे अर्थ होतात….
जिथे वैचारिक चिकित्साबुद्धी आणि मानसिक जाणीवा डोळसपणा गमावतात - तेव्हा 'अंधश्रद्धा' निर्माण होते.
उदा. (extreme वाटेल कदाचित तर सॉरी) मूल होत नाही म्हणून external fertilization करणं ही श्रद्धा (कदाचित विज्ञानावरची) आणि मूल होण्यासाठी अमावस्येल नरबळी देणं ही अंधश्रद्धा !

चिन्मय, होय ! म्हणूनच सरसकट श्रद्धा, अंधश्रद्धा विरुद्धार्थी मानून अंधश्रद्धेचा विषय चालू असताना श्रद्ध - अश्रद्ध अशी चर्चा योग्य नाही असं मला वाटतं.

डोळस श्रद्धा >>> असते असते आम्ही ९ वाची लोक करतो...

म्हणाजे बघा एखादा विषय मला समजु शकेल म्हणुन मी त्याच्यावर आपार मेहनत घेत रहाण. खरतर हे एव्हिडन्स नी शाश्त्रिय दृष्ट्या मी सिद्ध करु शकत नाही. पण तरी मी प्रय्त्न करत रहातो. ही डोळस श्रद्धा निदान आमच्यासाठी डोळस श्रद्धा... Happy

मायबोलीवर खरेदी विभागात उपलब्धं आहे, २०० रू वर किंमत असल्यास फ्री शिपिंग >>>> मी चिन्मयची पोस्ट आल्यावर हेच लिहिणार होतो अगदी ! Lol

काम श्रद्धेनं करणे म्हणजे मनापासून करणे असा अर्थ.
पण "माणसानी दुसर्‍याशी चांगलं वागावं ह्या साध्या विचारावर आणि आचारावर माझी श्रद्धा आहे" म्हणजे काय? मला तरी त्याचा अर्थ "माणसानी दुसर्‍याशी चांगलं वागावं ह्या मताचा मी आहे" असा लागतो.

>> खरतर हे एव्हिडन्स नी शाश्त्रिय दृष्ट्या मी सिद्ध करु शकत नाही
मग ती डोळस कशी? Happy

रार, नाही पटलं. एका प्रयोगाचा कार्यकारणभाव माहीत आहे, एकाचा नाही. त्यात तुलना नाही होऊ शकत.
'चांगलं वागावं' हा वृत्तीचा भाग झाला - त्यात श्रद्धा कुठे आली?
'चांगलं वागलं म्हणजे चांगलंच होईल' असं काही म्हटलं तर ती श्रद्धा - अंधच. Happy

असो, हा शब्दच्छल होतो आहे.

माझी अशी खात्री आहे बरं का, केवळ श्रद्धा नाही की -या धाग्याच्या अनुशंगाने श्रद्धा म्हणजे काय नी अंधश्रद्धा म्हणजे काय हे प्रत्येकाला व्यवस्थितच माहिती आहे.
उगा लोक वेड पांघरून पेडगावला जातायत.

वैयक्तीक मत विचारशील तर अंधश्रद्धा.
त्यापेक्षा १६ सोमवार 'प्रयत्न' करा श्रद्धा ठेवून रीप्रोडक्शन सीस्टीमवर, चान्सेस जास्त आहेत मूल होण्याचे ! (सॉरी, नंतर डीलीट करते वाक्य !)

सोळा हजार फुटांवर ऊडणार्‍या विमानातून ऊडी मारणारा जेव्हा म्हणतो,

१) माझं पॅराश्यूट नक्की ऊघडेल - विश्वास (कुठल्याही श्रद्धेचा अभाव) (पॅराश्यूट असूनही न ऊघडणे - अपघात )

३) पॅराश्यूट असतांनाही अपघात होऊ नये म्हणून देवाचे स्मरण - श्रद्धा (कदाचित कमी पडलेला विश्वास वाढवण्यासाठी किंवा अवघड प्रसंगी मानसिक बळ येण्यासाठी )

४) पॅराश्यूट सतांनाही मी ऊडी मारेन आणि मरणार नाही - अंधश्रद्धा (कारण, मी ताईत बांधला आहे, घरच्यांनी देव पाण्यात ठेवला आहे, बुवांनी सांगितलं आहे, देवीने कौल दिला, म्हसोबाला सामिष नैवेद्य दाखवला ई. ई.)

'पॅराश्यूट घालून ऊडी मारणे' केवळ ही एक आणि एवढीच क्रिया जमिनीवर सुखरूप ऊतरण्यासाठी अत्यावश्यक आणि पुरेशी असतांना ऊडी मारण्याआधी आणि नंतर केलेल्या (देवाना, पूर्वजांना धन्यवाद) अगणित गोष्टी श्रद्धा ते अंधश्रद्धा ह्या स्प्रेक्ट्रम वर ठेवता येतील. जेवढा त्या गोष्टींचा ऊडी मारण्याशी परस्परसंबंध (वैज्ञानिक कसोटीवर) कमी तेवढा स्पेक्ट्रमवरचा काटा श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे झुकत राहणार.

** लाउड थिंकिंग **

>> धार्मिक श्रद्धा आणि श्रद्धा यांत फरक आहे

पॉइंटाचा मुद्दा आहे.

तसा विचार केला तर देशासारख्या संकल्पनाही देवाइतक्याच अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आहेत. तरीही देशासाठी प्राण देणा-घेणारे असतात आणि आपण त्यांचा अभिमानच बाळगतो ना? देश या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कल्पनेवरची श्रद्धाच झाली की ती.

** लाउड थिंकिंग मोड ऑफ **

शूम्पी, मनापासून करणे म्हण, विश्वास म्हण, ट्रस्ट, फेथ काहीही म्हण… श्रद्धा हा एक शब्द.

शब्दच्छलच !
म्ह्णूनच इथे अंधश्रद्धेबद्दल, अंधश्रद्धेची उदाहरणं देऊन बोलायला हवं असं मला वाटतं… आणि मग कोणाची अंधश्रद्धा ही कोणाची श्रद्धा असते हा प्रश्ण आला, तर दाभोळकरांसारख्या माणसांनी केलं ते काम, ती उदाहरणं द्यावीत, बदलायचा प्रयत्न करावा.
'अंधश्रद्धा निर्मूलन' तेव्हाच शक्य आहे जेव्हा 'अंधश्रद्धेबद्दल' बोललं जाईल, ती अंधश्रद्धा का आहे हे प्रमाणातून, चिकेत्सेतून, अनुभवातून सिद्ध करता येईल… अंधश्रद्धेचा लढा असण्यासाठी अंधश्रद्धेवर बोलायला हवं, श्रद्धेवर नाही !

अहो अस काय करता इबा... म्हणजे प्रुफ इज इन द पुडिंग ... सो ते पुडींग होइपर्यंत किंवा न होइ पर्यंत ज्या जोरावर काम चालत ती डॉळ्स श्रद्धा .. त्या प्रोसेस मधुन पुडींग बाबत काहीतरी माहीती हाती लागेल अशी... सगळा रिसर्च ह्या डोळस श्रद्धेवर चालतो ...

Pages