वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेशवे,
मधल्या मार्गाबद्दल बोलायला मी सुरुवात कुठून केली ते वरती वाचलंत का तुम्ही?
अन मुद्दे नक्की कशाला म्हणायचे?
मी विचारलेल्या प्रश्नांना बगल देण्यासाठी तुमचे पोस्ट योग्य आहे. Happy

आपलं ह्या अप्रोचबाबत बोलणं झालय आधी इब्लिस. एखाद्या माणसाचे (इथे तर किती मोठा जनसमुदाय आहे?) विचार बदलायचे म्हंटले तर त्यांना मुर्खात काढून तसं करणं केवळ अशक्य आहे. माणूस जन्माला आल्यापासून अंधश्रद्धाळू नसतो आणि पुढे त्याच्या सर्कमस्टान्सेला अनुसरुन अंधश्रद्दाळू बनतो हे विसरुन चालणार नाही. Happy

सगळे जण कुठल्या न कुठल्या बाबतीत अंधश्रद्ध आहेत, असं मानायला हरकत नसावी...

आजचा विज्ञानवादि जो स्वतःला अश्रद्ध घोषित करतो (एखाध्या वैज्ञानिक सिद्धांताला/शास्त्राला भक्तीभावे मानुन)), तोच पुढे जसजसं त्याचं विज्ञान विकसीत होत जातं, (मागचे सिद्धांत्/शास्त्र फोल ठरत जातात) तेंव्हा अंधश्रद्धाळु का म्हटला जाउ नये? Happy

इब्लिसांशी सहमत.

अंधश्रद्धेचे / श्रद्धेचे मूळ माणूस (, इतर बिनशेपटीची माकडे, हत्ती इ इ) सामाजिक संकेत 'शिकतात' यात आहे. एकाच हाताने जेवणे, काटेचमचे वापरून जेवणे, बांबूच्या काड्या वापरून जेवणे यातला कुठलाच प्रकार आपण जन्मतः शिकून येत नाही. पण गरज पडेल तसे टेबल मॅनर्स शिकत जातो. त्यात पुन्हा मान-अपमानाचे वेगवेगळे प्रोटोकॉल्स येतात. तसेच पुस्तकाला पाय लागू देण्याचे आहे.

प्रत्येक संकेत, अंधश्रद्धा काही कारणाने, प्रसंगोत्पात तयार होत असेल असे गृहीत धरले तरी एकंदरित प्रकार मठातल्या मांजरीसारखाच.

बी ने जे उदाहरण दिलं होतं ते बोलकं आहे. त्याला आवडतं म्हणून एखाद्या गोष्टीत तथ्य नसूनही तो करणार. त्याच्या पुरतं ठीक आहे. पण बी ग्रेट म्हणून आणि तो करतो म्हणून इतर करु शकतात त्याचं काय? ते फोल आहे हे न कळताच.

प्रश्न इतरांना मुर्खात काढण्याचा नाही तर त्यांना असं दाखवून द्यायचा आहे की त्यांना वाटतं त्यापेक्षा त्यांचं, मानवाचं मन जास्त कणखर आहे, आणि ते ज्या काडीचा आधार घेऊन वाचायचा प्रयत्न करताहेत त्यानी फक्त तात्पुरता आधार मिळेल. डोळे उघडून पाहिलं तर शेजारीच एक नाव आहे त्यात बसून ते नुसते वाचणारच नाहीत तर थेट किनार्‍यापर्यंत पोचू शकतील.

पेशवे, ते इंटेलिजंट डिजाईन नसून मानवानी निव्वळ इनिशीएट केलेलं रेग्युलर डिजईन असेल. त्याचबरोबर त्या ग्रहावरील लोकांना असं मानायची गरज नसावी की रोज मानवाची पूजा करायला हवी (तसं झालं तर मानवाचा देव हा त्यांचा मेटादेव असेल का? आणि मानवाचा मेटादेव कोण असेल? त्याला घाबरत असेल देव? )

>>>इब्लिस | 18 September, 2014 - 23:03

इथे वैयक्तिक 'अनुभूती'वर भर नसतो. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, असा प्रश्न असतो.<<<

इब्लिस, बोलण्याच्या भरात तुम्हीही एक अंधश्रद्धेचा उल्लेख असलेली म्हण वापरलीत. असो!

======================

पेशवे ह्यांच्या पोस्ट्स व इब्लिस ह्यांच्या पोस्ट्समध्ये मूलभूत तफावत आहे. ती कोणती ते काही वेळाने लिहीन. पण मुळात ह्या गोष्टीकडे बघण्याचा त्या दोघांचा दृष्टिकोन इतका वेगळा आहे की त्यात तुलना घडू शकत नाही.

व्यक्तिशः मात्र मला अजूनही इब्लिसांचेच म्हणणे पटत आहे.

गुड मॉर्निंग.

१-२ गोष्टी पट्कन डोक्यात आल्या, त्या इथे लिहून ठेवतो. नंतर डोक्यातून निघून जाईल कदाचित.

१.
एखाद्या माणसाचे (इथे तर किती मोठा जनसमुदाय आहे?) विचार बदलायचे म्हंटले तर त्यांना मुर्खात काढून तसं करणं केवळ अशक्य आहे.
<<
बुवा,
"क्षयज्ञ बाबा/बुवांच्या मठात तुम्ही येत नाही?? इतके सगळे हुशार लोक तिथे येतात! डॉक्टर्स, इंजिनियर्स, टीचर्स, नेते!!" असा प्रचार ऐकून मठात जाऊ लागणारे लोक किती असतात?
देवाच्या पाया पडून मग पेपरला जा! अशी शिकवण देणारी आई असते. तिच्यावर असलेल्या प्रेमापोटी व ती चांगलेच सांगत असेल या खात्रीपोटी लोक तो नमस्कार करू लागतात. 'श्रद्धा' निर्माण होऊ लागते.

अशा श्रद्धा न बाळगणार्‍यास कळपाने (कलेक्टिवली) मूर्खात काढले जाते, व त्याचे विचार बदलतात. ही बाब सत्य आहे की नाही?

"लोकांच्या श्रद्धांना धक्का लावायचा नाही" या समजूतीपोटी अश्रद्धांनी सत्यनारायणाला नमस्कार का करायचा? असा नमस्कार न करणार्‍याला तिथे जमलेले सश्रद्ध लोक शहाण्यात काढतात असे म्हणायचे आहे का कुणाला?

२.
बेफि,
त्या म्हणीच्या वापरा बद्दलः
अंध/श्रद्धेचे समर्थन करताना वैज्ञानिक सत्ये, दृष्टांत वापरलेले चालतात, पण विज्ञानवाद्यांनी अंध/श्रद्धांचे खंडन करण्यासाठी अध्यात्मिक भोंगळपणा वापरायचा नाही, असा नियम आहे का? Wink

"लोकांच्या श्रद्धांना धक्का लावायचा नाही" या समजूतीपोटी अश्रद्धांनी सत्यनारायणाला नमस्कार का करायचा? असा नमस्कार न करणार्‍याला तिथे जमलेले सश्रद्ध लोक शहाण्यात काढतात असे म्हणायचे आहे का कुणाला? >>

समाजात राहायचे तर पेशन्स फार महत्त्वाचा !!

गेल्या हजारो वर्षात माझ्या घरी सत्यनारायण झालेला नाही. ज्यांच्या घरी होतो (माझे सर्व शेजारी पाजारी, अन अमेरिकेत राहणारे मित्र, ज्यांच्याकडे हमखास होतोच होतो) त्यांना मी नेहमी सांगीतलं आहे की, माझा सत्यनारायणावर विश्वास नाही, मी कथेला / नमस्काराला येणार नाही, जेवायला मात्र येईन(च) ! तिथे मला पहिल्या एक दोन वर्षी वेड्यात काढण्यात आले, पण नंतर, हा माणूस देव धर्माचे मानत नाही (म्हणजे जे काय असेल त्यांच्या दृष्टिने ते) असे त्यांना पटल्यामुले ते आता माझे मतही स्वीकारतात. पहिल्या वर्षी मात्र भांडणंच ती काय व्हायची होती. पण ती त्यांना मूर्खात काढून करायची गरज नाही.

हे उदाहरण देण्याचे कारण - मी तितका वेळ त्यांना दिला. आणि मुख्य म्हणजे, तुम्ही सत्यनारायण करता म्हणजे तुम्ही मूर्ख असे म्हणालो नाही. त्यांच्या श्रद्धेत तसाही (तुम्ही आरडाओरडा करा वा नका करू) काही फरक पडणार नाही.

तस्मात , शहाणे करूनी सोडावे, सकळ जण ही भुमिका इथे उपयोगी नाही !!

इनफॅक्ट तुमच्या घरीसुद्धा तुमच्याच मताचे लोकं असतील ह्यावर माझा विश्वास नाही. (कारण माझ्या घरी नाहीत. आणि तुमच्याच मताची लोकं असतील तर आपले अभिनंदन, तुमच्या घरी, तुम्ही म्हणता तसे कोणीही मूर्ख नाही ह्याबद्दल अभिनंदन !)

जस्ट क्युरियस आपला मोठा दवाखाना उघडला तेंव्हा आपण पूजा केली होती का? हो तर का? (नाहीचे उत्तर माहिती आहे.

हा लढा वैयक्तिकच असतो, आहे आणि राहील.

अर्थात मी फक्त "श्रद्धा" ह्या विषयी सत्यनारायणाच्या उदावरून लिहितो ते मला मान्य आहे.

श्रद्धा न बाळगणार्‍यास कळपाने (कलेक्टिवली) मूर्खात काढले जाते, व त्याचे विचार बदलतात. ही बाब सत्य आहे की नाही? >>

मूर्खात काढले जातात. ही बाब सत्य

पण त्याचे विचार बदलतात ही गोष्ट पटली नाही. लोकं अश्या लोकांना मूर्खात काढून उजव्या की डाव्या सोंडेवर वाद घालतात त्यामूळे "माझे विचार" का बदलावे? थोडक्यात मी स्वतः मग दोलायमान आहे, असे तुम्हाला नाही का वाटत? एकदा का तुम्ही स्विकारले की देव नाही, तर नाहीच. मग स्वतः पुरते पालन करायचे. इतरांनी काही म्हणले तरी तुमचे विचार बदलायचे काय कारण?

मग असे म्हणता येईल का? की देव नाही हा विचारच तुम्हाला मानवला गेला नाही, आणि केवळ कोणी व्यक्ती तसे म्हणत होती म्हणून तुम्ही काही दिवस त्यावर श्रद्धा ठेवली आणि लोकांनी कलेक्टिवली मूर्खात काढल्यामुळे परत "स्वगृही" परतलात.!

लोकं काय म्हणतात ह्याचा काय संबंध?

केदार,
वेल्कम बॅक.

>>
मूर्खात काढले जातात. ही बाब सत्य
<<

सश्रद्धांनी अश्रद्धांना मूर्खात काढलेले चालते?
का? कोणत्या अधिकाराने?

सत्यनारायण हे जस्ट उदाहरण होते. Happy 'देवाला नमस्कार कर' हे आई सांगते, हे उदाहरण कुठे गेले?

इब्लिस धन्यवाद. Happy

अहो त्याच न्यायाने तुम्ही त्यांना मूर्खात काढत आहातच की ! कोणत्या न्यायाने Happy त्यामुळे कोणी कोणाला न्यायाने मूर्खात काढू शकत नाही. त्यांनी मूर्ख म्हणले तरी म्हणू देत. काय फरक पडतो. नविन विचार मांडणार्‍यांना अश्या शिव्या खाव्या लागतातच.

ते उदाहरण जस्ट आहे हो Happy (जस्ट चा दुसरा अर्थ)

म्हणून त्याच उदाहरणातून विचारले की तुम्ही दवाखाना सुरू करायच्या वेळी काय केले? आणि तुमचे मत तुमच्या घरी सर्व पाळतात का?

त्यातील दुसरा प्रश्न "वैयक्तिक" दाखवून देणार आहे. आणि पहिला प्रश्न जेन्युईन आहे. पण त्यातही "वैयक्तीक श्रध्दा आहे. जो माणूस सत्यनारायणाला शिव्या देतो त्याने स्वतः तरी हे रूल पाळले का? हे विचारायचे आहे. (मी करत नाही कारण मी सत्यनारायण मानत नाही हे देखील त्यामुळेच लिहिले.)

(बाकी ह्या बाबतीत तुम्ही अन मी एकाच बोटेत आहोत, पण आपले विचार वेगळे आहेत. इतकेच!)

एकदा का तुम्ही स्विकारले की देव नाही, तर नाहीच. मग स्वतः पुरते पालन करायचे. इतरांनी काही म्हणले तरी तुमचे विचार बदलायचे काय कारण?
<<
देव आहे. त्याची पूजा करा.
आमचा देव सगळ्यात मोठा आहे. त्याचीच पूजा करा.
इ. प्रचार करायची 'त्यांना' जर परवानगी असेल,
तर, तो प्रचार चुकीचा आहे, अन देव नाहीच, हा प्रचार करायची मला बंदी आहे का??
मी स्वतःपुरते पाहून इतरांना वाट्टेल ते करू द्यावे, हा आग्रह का? Wink
मी सत्य प्रचार करतो म्हणून तुमचे/त्यांचे श्रद्धाळू विचार बदलतील अशी भीती वाटते का? Wink

दवाखान्याच्या उद्घाटनाला सत्यनारायण घालून लोकांच्या श्रद्धा एक्स्प्लॉईट करता येतात. त्या मी नक्कीच करणार. शांतपणे न बोलता लोकांना मूर्खात काढण्याचा तो एक प्रकार आहे. (असे अनेक प्रकार आहेत. त्यातला सग्ळ्यात भारी म्हणजे 'आय ट्रीट ही क्युअर्स' Wink )

यच्च्यावत सर्व सणावारांचे मार्केटिंग सगळ्या कंपन्या ठरवून करतात. श्रद्धा एक्स्प्लॉईट करून पैसे कमवतात. हे आपल्याला मान्य असते. दुकान टाकलं, तर हे होणारच.

दवाखान्याच्या उद्घाटनानिमित्त जनरल पब्लिकसाठी वसंत व्याख्यानमाला वा डान्स पार्टि अ‍ॅरेंज नाही करता येत. सत्यनारायण/कीर्तनच घालावे लागते. Wink

इब्लिस आणि इतर काहीजण ह्यांच्या मुद्यांमध्ये असलेली तफावत का आहे ते लिहायचा प्रयत्न करतो.

पेशवे किंवा केदार ह्यांची भूमिका :

मला पटत नाही. मी करत नाही. ज्यांना पटते त्यांना मी मूर्ख समजत नाही, मूर्ख म्हणत नाही व त्यांची मते बदलायला जात नाही. स्वतःच्या भूमिकेबाबत मात्र ठाम राहतो. 'मला पटत नाही' ह्या मतावर माझी जी श्रद्धा (/विश्वास) आहे तीच श्रद्धा (/विश्वास) ज्यांना जे पटते त्यावर त्यांची (/चा) असू शकते (/तो) हे मी समजू शकतो.

इब्लिस ह्यांचे मतः

हा विषय असा आहे की येथे फक्त स्वतःपुरते मत पक्के करून ते आचरणात आणणे हे पुरेसे नाही. निदानपक्षी जेव्हा खास ह्याच विषयावर चर्चा चाललेली असेल तेथे तरी 'तुमचे तुमच्यापाशी, माझे माझ्यापाशी' ही गुळमुळीत भूमिका न घेता ठामपणे प्रतिवाद करायला हवा. ह्याचे कारण ही चर्चा एका फोरमपुरती ऑफिशियल चर्चा असून त्याद्वारे मतपरिवर्तन होण्याची काहीतरी शक्यता आहे. तेथे विज्ञानवादी विचारसरणीच्या लोकांनी प्रखर व ठाम विज्ञानवादी भूमिकाच घ्यायला हवी.

==========================

मला इब्लिस ह्यांचे मत का पटले? तर ते एक भोंगळ मत नाही आहे. त्यांच्याविरुद्ध बोलणार्‍यांनी मात्र भोंगळ मते दिलेली दिसतात. म्हणजे 'ठाम अंधश्रद्धावाद' / ठाम श्रद्धावाद / ठाम दैववाद असे कोणतेच मत दिसले नाही. दिसली ती मते 'आम्ही स्वतः नाही मानत, पण दुसर्‍यांनी मानणे आम्हाला पटू शकते' अश्या स्वरुपाची होती. ही वरवर दिसायला ठाम मते वाटत असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये कोठेतरी 'श्रद्धा पाळणारा पंथ अस्तित्त्वात असू शकतो' ह्याला तात्विक मान्यता आहे व त्यामुळेच त्यातही श्रद्धावादी होण्याची काही मुळे असू शकत आहेत.

-'बेफिकीर'!

आजचा विज्ञानवादि जो स्वतःला अश्रद्ध घोषित करतो (एखाध्या वैज्ञानिक सिद्धांताला/शास्त्राला भक्तीभावे मानुन)), तोच पुढे जसजसं त्याचं विज्ञान विकसीत होत जातं, (मागचे सिद्धांत्/शास्त्र फोल ठरत जातात) तेंव्हा अंधश्रद्धाळु का म्हटला जाउ नये?

जर तो नविन सिद्धांत स्विकारत असेल तर मग तो अ.श्र. कसा??

तो मागचे सिद्धांत फोल ठरलेत हे मान्य करत जातो.. मी १९०० हे संशोधन केलेले पण आज त्यापुढचे संशोधन झालेत आणि त्यामुळे १९०० चे संशोधन आज कालबाह्य आहे हे तो मान्य करतो. अ.श्र. असे काही मान्य करत नाहीत ना.

दवाखान्याच्या उद्घाटनाला सत्यनारायण घालून लोकांच्या श्रद्धा एक्स्प्लॉईट करता येतात. त्या मी नक्कीच करणार. शांतपणे न बोलता लोकांना मूर्खात काढण्याचा तो एक प्रकार आहे. (

दवाखान्याच्या उद्घाटनानिमित्त जनरल पब्लिकसाठी वसंत व्याख्यानमाला वा डान्स पार्टि अ‍ॅरेंज नाही करता येत. सत्यनारायण/कीर्तनच घालावे लागते. >>

Lol अरेरे इब्लिस विज्ञानवादी माणसाचे हे अधःपतन पाहून मला त्रास होतो आहे. काय फरक पडतो नुसते चहापान किंवा खाने पिणे करायला. त्याला तुम्ही पुजेचा आधार का घेता? बोलवायचे आणि सांगायचे की सत्यनारायणाला नाही तर दवाखान्याच्या उदघाटनाला, प्रचार करण्यासाठी बोलावले. ताकाला जाऊन भांडे का लपवता?

उल्ट तुम्ही त्यातलेच एक झालात. आणि इथे मात्र शिव्या देता. Happy म्हणजेच तुमच्या सत्यनारायण पुजा मांडण्याला तुम्ही लोकांना मूर्खात काढणे असे ठरवत आहात. अजिबात पटत नाही. तुम्हाला देव नाही हे मान्य आहे तर मग पुजा करायची कशाला? पण तुम्ही ती केलीत. म्हणजे स्वतःच्या भूमिकेवर देखील तुम्हाला ठाम राहता येत नाही, मग इतरांनी काय करावे, काय नाही ह्या चर्ची का?

हा तुम्ही असे म्हणला असतात, की तेंव्हा पुजा केली, ते चुकले आता कधीच करणार नाही, तर तुमचा मुद्दा मान्य करण्यासारखा आहे. पण तुम्ही ते देखील म्हणाला नाहीत. असे म्हणता, मी करतो ते मी पुजा करतो पण ती लोकांना मूर्खात काढायला, पण इतर करतात ते श्रद्धा म्हणून, आणि म्हणून ते मूर्ख आहेत.

ह्यात मला एक प्रकारचा गंड दिसतो.

इतरांना म्हणता की "श्रद्धा एक्स्प्लॉईट करून पैसे कमवतात " मग तुम्ही काय केले ? मग त्यांना दोष देण्याचा तुम्हाला अधिकार काय?

हे म्हणजे तो रस्त्याच्या उलट्या बाजूने हेडलाईट ऑन करून चालवतो, म्हणून मी पण तसेच उलट्या बाजूने हेडलाईट ऑन करून चालवणार कारण त्यामुळे कोणीतरी एक्स्प्लॉईट होईल आणि माझा मुद्दा लोकांना पटेल. ह्यात काहीही तर्क नाही!

आणि बेफिकीर फक्त एका फोरम बद्दल विचार करतात, अस्तित्वात (रियल लाईफ) इब्लिस स्त्यनारायण पुजा पण मांडतात आणि तरीही ते मत भोंगळ नाही, ठाम आहे !

थॅंक गॉड ( पन इंटेडेड) मी अस्तित्वातही मी विकत घेतलेल्या घरात, किंवा मी राहत असलेल्या घरात,मी सत्यनारायण टाईप पुजा मांडू देत नाही.आणि करतही नाही. कोण ठाम आणि कोण भोंगळ?

बाकी श्रद्धा आणि मार्केटिंग ह्यावर लिहितोच.

केदार, आज तुमचे जे नाव 'केदार' आहे ना ते देवाचे नाव आहे आणि तुमचे आई बाबा देव मानतात म्हणून त्यांनी तुमचे नाव केदार ठेवले आहे. आणि अजून एक, अलिकडे तुम्ही ट्रेक ला जावून आलात ना हिमालयात, मुळात हिमालयाची निर्मिती ही साधनेसाठी झाली आहे. ही साधना कुणी केली म्हणून आज ट्रेकर्स तिथे जाऊन आपले छंन्द पुर्ण करतात.

आता बघा,

खरे तर बी ने बेफिकीर वा इब्लिस विरोधी भुमीका घ्यायला हवी. कारण ते दोघे भोंगळ मताचे नाहीत, पण बी मलाच, ज्याला इतरांच्या ज्याकाही श्रद्धा आहेत, त्या तशा असू शकतात हे मान्य आहे, त्याला प्रश्न विचारतोय. Happy

मुळात हिमालयाची निर्मिती ही साधनेसाठी झाली आहे. >>. भुकंपामुळे झाली आहे निर्मिती. इब्लिस जरा या हो मदतीला. Proud

हिमालयात मी जातो. इतकेच नाही तर मी अनेक देवस्थळी जात असतो. आवड म्हणून. तिथे देव असतो ह्यावर मात्र विश्वास नाही. म्हणून कैलासला जाऊनही मी शंकराला शोधत बसलो नाही. तसेच ज्यांचा विश्वास आहे,त्यांना मी तुम्ही मूर्ख आहात, देव नाही असे म्हणत बसत नाही. त्यामुळे तुला देव आहे असे वाटत असेल तरी मला फारसा त्रास नाही. फक्त तुझे मत मला मान्यच व्हावे असा तुझा आग्रह नसावा. (जसा माझा नाही)

मुळात हिमालयाची निर्मिती ही साधनेसाठी झाली आहे.

..

कावळ्याची निर्मिती पिंडाआठी झाली आहे.

जास्वंदीचे फुल देवासठी निर्माण झाले आहे.

इ इ

केदार नमस्कार, लाँग टाइम नो सी.... Happy

भुकंपामुळे झाली आहे निर्मिती>>> आणि भुकंप कुणी केला. अहो भुकंप त्यासाठेच तर केला गेला होता. तुम्ही फक्त रिजल्ट बघता बॉ.... Wink

केदार, मी दिलेला जो प्रतिसाद आहे तो मी लिहायला सुरुवात केली तेव्हा इब्लिसांचा सत्यनारायणवाला प्रतिसाद तेथे आलेला नव्हता. तुमचा तो मुद्दा मला व्यवस्थित मान्य आहे, तेव्हा कृपया माझे नांव ह्या चर्चेत वेगळ्या पद्धतीने गोवू नयेत अशी विनंती Happy

बघा केदार मी नव्हतो म्हणालो.... कायच्या काय लॉजिक लावता बॉ तुम्ही Wink

<मुळात हिमालयाची निर्मिती ही साधनेसाठी झाली आहे> अशी त्यांची श्रद्धा आहे. तिला धक्का द्यावा की नाही? हिमालयाची निर्मिती भूकंपामुळे झाली असली तरीही साधनेसाठी झाली नाही असा होत नाही ना.

मी हे उपरोधाने लिहीत नाहीए. वादे वादे जायते....., तसं श्रद्धेला धक्का लावू नये हे प्रिन्सिपल कुठवर टिकवता येईल ते तपासून पाहण्याचा प्रयत्न करतोय.

भरतजी, भुकंप म्हणजे काय धक्काच ना? Wink

बेफि. तुम्ही कळत नकळत कुनाच्या भावनिक / धार्मिक / सामाजिक / जातिय भावना दुखावताय बरं.... Wink

आणि श्रध्देला धक्का लावणार्‍याने लावणे आणि लावुन घेणार्‍याने लावुन घेणे किती तरी रिलेटीव आहेत. उद्या रस्त्यावरुन जाताना देवळाकडे बघुन नमस्कार केला नाही म्हणुन जर दुसर्‍याच्या श्रध्दा दुखावायला लागल्या तर अवघड होइल.

आणि जुन्या काळापासुन हेच तर चालत आलय. एकमेकांच्या श्रध्दा दुखावणे यावर तर सगळे चालत आलय, आणि चालत राहिल, मला अजुन या शब्दाची पुर्ण व्याख्या अजुन वाचण्यात आलेली नाही. कुणाकडे असेल तर इथे डकवावे.

Pages