वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आस्चिग, २०:५० च्या पोस्टीबद्दल अनुमोदन. तोच फोकस असला पाहिजे. Happy

“The intellect has little to do on the road to discovery. There comes a leap in consciousness, call it Intuition or what you will, the solution comes to you and you don't know how or why.”

― Albert Einstein

बुद्धीने सगळे प्रश्न आपण सोडवू शकत नाही. उत्तर अचानक पुढे येउन ठाकते . कोण पाठवते ते उत्तर ? कसे येते ? कुठून येते ? हि स्वताची बुद्धी नाही तर कोणीतरी आहे , अजून वरच्या पातळीवर जो आपल्याला मार्ग दाखवतो. ― Albert Einstein

आहे का INTUTION चे एखादे injection science कडे ? कि लगाव injection आली intution ...

वेद पण असेच लिहिले गेले आहेत.

हि स्वताची बुद्धी नाही तर कोणीतरी आहे , अजून वरच्या पातळीवर जो आपल्याला मार्ग दाखवतो. ― Albert Einstein

ही दोन तीन वाक्ये भाषांतर करताना तुम्ही आपल्या पदरची घुसडलीयत हे इथेच स्पष्टं दिसत आहे.

Albert Einstein's religious views have been studied extensively. He said he believed in the "pantheistic" God of Baruch Spinoza, but not in a personal god, a belief he criticized. He also called himself an agnostic, while disassociating himself from the label atheist, preferring, he said, "an attitude of humility corresponding to the weakness of our intellectual understanding of nature and of our own being."
ही आईनस्टाईनची देव/ धर्मविषयक मत आहेत.
आईनस्टाईनचा रूढार्थाने देवा/धर्मावर विश्वास नव्हता.

पढिक पंडित नक्कीच आक्षेप घेणार या भाषांतरावर .. ते मला माहित होतेच .. बरे मग कोण देते बरे हे उत्तर ? आणि त्याची काही प्रक्रिया / पाककृती ? माझा पुढचा प्रश्न पण वर विचारला आहे तो जर वाचा कि ?

आहे का INTUTION चे एखादे injection science कडे ? कि लगाव injection आली intution ...

ताई पार डोक्यावरून गेले बघा. मराठीत सांगा कि .. कि नाही जमणार ? आणि मी कुठे म्हणाले हो देव वगैरे ? मी म्हणतो कोणी तरी आहे . जो आपल्यापेक्षा वरच्या पातळीवर ..

टण्याशी सहमत.

नास्तिकवादाचा उघड आणी आक्रमक प्रचार करण्याने आपण किती edgy आहोत हे सिद्ध होणे आणी आपला इगो सुखावणे हेच होत असेल तर काय फायदा?

श्याम मानव यांचे एक भाषण ऐकताना त्यांनी शिवलिंग हे समागमाचे प्रतिक आहे असे खरे परंतू बहुसंख्य श्रोत्यांना शॉकिंग वाटणारे विधान केले होते. त्यामुळे अनेक श्रोते टर्न ऑफ झाले. त्यांनी आपली कवाडे जणू बंदच केली. अशा इन युवर फेस प्रचाराचा काय फायदा?

श्री गुरुजी एक गोष्ट सांगत असत. एक नवशिक्या विमा एजंट आपल्या बॉस समोर फुशारक्या मारत होता. त्याने आपल्या बॉस ला सांगितले की आज मी चार नव्या लोकांना भेटलो आणी विम्याबाबत त्यंच्या शंकांना अशी जबरदस्त अभ्यासपूर्ण उत्तरे दिली की ते सारे निरुत्तर झाले. बॉसने त्याला विचारले की ते सारे खरे पण त्यातल्या किती लोकांनी विमा खरेदी केला?

अगदी माझ्य घरचे थोडेसे पर्सनल उदाहरण घेतले तर मी तुमचे श्राद्ध करणार नाही असे मी माझ्या आईबाबांना संगणे आणी ते तडीस नेणे यापेक्षा तुमच्या श्राद्धाला मी ब्राह्मन न बोलवता तुमच्या आवडत्या कामाला देणगी देइन किंवा ज्ञानप्रबोधिनी च्या लोकांकडून साधे श्राद्ध करेन हे जास्त प्रक्टिकल आहे ना?

भाषांतर करताना ध चा मा नको हो मंडळी. आम्हा गरीब अडाण्यांच्या संस्क्रुतच्या अज्ञानामुळे असेच काय वाट्टेल ते अर्थ वाचावे लागतात. असो. अल्बर्ट आईनस्टाईनचं चिंतन कसं कसं आलय हे दोन वाक्यात झेपणार नाही.

एखाद्याला प्रेरणा येते म्हणजे काय होतं ? भौतिकशास्त्राच्या अभ्यासकाला रसायनशास्त्राच्या कल्पना चमकून जातात असं होतं का ? बुद्धीच्या कुठल्या तरी डिरेक्टरीत डाटा साठलेला असतो त्यावर आधारीतच एखादा प्रोग्राम अचानक एक्झेक्यूट होण्यासारखं आहे ते. डिरेक्टरीज एम्प्टी असतील तर काही चालत नाही आणि कुठलीही प्रेरणा, कल्पना अचानक चमकून जात नाही.

(प्रेरणा हा शब्द नेमका शब्द आठवत नसल्याने वापरला आहे. आठवल्यावर रिप्लेस करीन ).

मंजी असं बघा दादा, आईनस्टाईन म्हंतु 'सोत्ताविषती नी जगाविषयी आपल्याला समदंच कळल्यालं न्हाई याची जी जानीव आपल्या मनात आस्तीय तिला 'अग्नोस्टिक' जानीव म्हंत्यात. पण बाबा आपनाला येकांदी गोष्ट ठावकी न्हाई, जमत न्हाई मंजी ती देवच करतो आनि म्हनून तो लई पावरबाज हाये आसं न्हाई. कंदीना कंदी आपनाला बी सम्दं समजंल की मर्दा.'

परिचयातल्या एका संपादकांनी सांगितलेला हा किस्सा. एका आंतरराष्ट्रीय परिषदेत हे संपादक सहभागी झाले होते. त्यावेळी नुकतंच प्रेषिताच्या डॅनिश व्यंग्यचित्राचा वाद शमत आला होता. त्या परिषदेला या वृत्तपत्राचे संपादक आणि पाकिस्तानातले एक ज्येष्ठ संपादक उपस्थित होते. डॅनिश संपादक म्हणाले की, 'आमच्या देशात, खंडात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याच्या आड श्रद्धा, भावना इत्यादी येत नाही. आम्ही येशूचीही खिल्ली उडवतो'. पाकिस्तानातले संपादक म्हणाले, 'तुमचं म्हणणं मान्य. आमच्या देशबांधवांच्या भावना लगेच भडकतात, आणि तुमच्या देशातलं अभिव्यक्तीस्वातंत्र्य आमच्या देशात यावं, असं आम्हांलाही वाटतं. त्यासाठी आम्ही प्रयत्नही करतो. आम्हांला यश मिळत आहे, असंही आम्हांला वाटतं. पण जेव्हा तुम्ही असं व्यंग्यचित्र छापता, तेव्हा आम्ही करत असलेले प्रयत्न एका फटक्यत पुसले जाऊन, पुन्हा ती परिस्थिती निर्माण करायला दहावीस वर्षं किमान काम करावं लागतं. सबुरीनं केलेलं काम महत्त्वाचं आणि चिरकाल टिकणार असतं, मात्र हे काम कोणा एकाच्या टोकाच्या भूमिकेमुळे नष्टही होऊ शकतं'.

टण्याचं पोस्ट वाचून हे आठवलं.

आईनस्टाईन मुळातून वाचायला पाहीजे. गुगळून एक दोन वाक्यं आम्हाला चालत नाहीत.

देव, मन, बुद्धी, कल्पना (वीज चमकून जाते तशी - उदा कविता, एखाद्या कल्पनाचित्राचा आराखडा, वास्तूरचनाकाराला सुचलेला आराखडा, अभियांत्रिकी कल्पना इ...... नेमका शब्द सुचवा प्लीज) यांच्या परस्परसंबंधाविषयी न गुगळता, न लिंकता स्वत्:चं चिंतन लिहा बघू. वाचायला आवडेल.
...
आश्चिग सारख्यांच्या दोनेक वाक्यांनी बुद्धीला कशी चालना मिळते ? त्यामागे चिंतन असल्याशिवाय हे होत नाही.

सुंदर भाषांतर .. पण त्याचा प्रतिवाद करणे हा काही माझा किवा इथला मुद्दा नाही ..
coming back ..
हि intution काय भानगड आहे ? ती कशी येते ? कुठून येते ? काही शास्त्रीय प्रक्रिया आहे का याची कि ज्यामुळे आपण ती निर्माण करू शकतो ? आपल्या भारतीय अध्यात्मात याचा अनुभव घेतलेले किती तरी लोक आहेत. ते लोक त्या जाणीवेला देव म्हणतात .. वेद / रुचा अपौरुषेय आहेत असे म्हणतात .. ते याच पद्धतीने निर्माण झाले आहेत ..

<<<<<<“The intellect has little to do on the road to discovery. There comes a leap in consciousness, call it Intuition or what you will, the solution comes to you and you don't know how or why.”

― Albert Einstein >>>>>>>>
हे Einstein त्याच्या कुठ्ल्या पुस्तकात लिह्ले आहे कळेल का?

A scientist had also said:
99% intuitions are rubbish and 1% are worth perspiring over.

मी आताची पहिली पोस्ट लिहीत असताना अभि१ ची पढिक पंडीत वाली आणि साती ची पोस्ट आली. दुसरी लिहीतांना चिनूक्स आणि इतर पोस्टी आल्या. खरंच चांगला धागा सुरू केलाय आश्चिगने. रिफ्रेश होतंय सर्व. चिनूक्स छान पोस्ट.

डॉ. कलामांचा मात्र अध्यात्मावर विश्वास आहे. पण अध्यात्माकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोण संपूर्ण व्यावहारीक आहे. प्रत्येक शास्त्रज्ञ नास्तिक असेलच असं नाही. त्याच्यावरचे संस्कार सोडण्याचा क्षण भारतासारख्या ठिकाणी त्याच्या आयुष्यात आलाच असेल असं नाही. पण वैज्ञानिक क्षेत्रात काम केल्याने त्यात फरक पडत असावा असं म्हणूयात का ?

चिनूक्स, विकु

तुम्ही टग्या या आयडीने लिहिलेल्या पोस्टला माझी पोस्ट म्हणत आहात. त्यांचे दान त्यांना द्या! Happy

माझेदेखीएल टग्यांच्या पोस्टीला अनुमोदन (आअणि वर त्यांनी लिहिलेल्या वैयक्तिक अनुभवाबाबतदेखील).

त्याच्याशी मिळते जुळते अजुन एक उदाहरण म्हणजे डोकिन्स व हिचन्स. डॉकिन्स सश्रद्धांना थेट मुर्खात न काढता आपला मुद्दा समजावून देत पुढे जातात तर ख्रिस्तोफर हिचन्स थेट मुर्खात काढत, आसूड ओढत गेले. मला हिचिन्स वाचायला आवडतात पण मी मुळातच हिचन्सच्या मतांचा होतो मात्र एखादा सश्रद्ध हिचन्स वाचतात थेट 'कोट' आवळायला लागतो स्वतःभोवती.

The intuitive mind is a sacred gift and the rational mind is a faithful servant. We have created a society that honors the servant and has forgotten the gift.

हे पण आइनस्टाईनचंच कोट आहे.

आईनस्टाईनची कुशाग्र बुद्धी हा आश्चर्याचा विषय आहे. त्याला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सुचली. ती त्यालाच का सुचली असावी ? या विश्वाचा विस्तार किती ? ज्याच्या त्याच्या कल्पनेच्या आवाक्याएव्हढा. कल्पनेची भरारी किती ? त्या विषयातल्या एक्स्पोझर इतकी किंवा थोडी टेक ऑफ स्टेजएव्हढी.

गिफ्ट ही कल्पना मान्य केल्यास आर्किटेक्टलाच वास्तुस्शास्त्राची रचना का सुचत असावी ? एखाद्या इंजिनीयरला किंवा प्रॉडक्ट डिझायनरलाच कारच्या इंजिनचं किंवा कारच्या रचनेची कल्पना का सुचत असावी ? बुद्धीला स्पर्श करून गेलेले विषय, त्यांचं आकलन आणि चिंतन असल्याशिवाय का असं होतं ?

एखादा गझलकार गझल शिकतो नंतर त्याला गझलेतले शेर सुचू लागतात. तो आश्चर्य करतो की आपल्याला हे शेर कुठून येतात ? पण असा विचार करत नाही की गझल शिकण्याआधी आपल्याला शेर कुठून का येत नव्हते ? पोहायला शिकण्यासारखं आहे हे. एकदा पोहायला शिकलं की पोहण्यासाठी बुद्धीचा वापर करावा लागत नाही. ते आपोआप होतं असं आपल्याला वाटतं. खरं तर आपल्याला त्याचं ज्ञान झालेलं असतं. ती कला आत्मसात झालेली असते.

चंमतग अशी आहे की आईनस्टाईनची म्हणून गुगळभाऊंना उपलब्ध होणारी कोट्स ही आईनस्टाईनची नाहीतच. आईनस्टाईनच्या नावाने अनेक फेक कोट्स नेटवर आहेत. मी वर दिलेल्या पोस्ट मधलं कोट हे देखील असंच एक रूप आहे. हे कोट प्रत्यक्षात मॅथ्यू स्टेन्स च्या " Planetary Survival Manual: A Guide to Living in a World of Diminishing Resources" या २००० सालच्या पुस्तकातून घेतलं गेलं आहे. यातही मेख म्हणजे स्टेन्सने आईनस्टाईनचे म्हणून दिलेले कोट कुठून घेतलंय याचा संदर्भच दिलेला नाही.

त्याने विपर्यास केला हे नक्कीच. याचं मूळ बॉब सॅंपलने १९७६ साली लिहीलेल्या "A Celebration of Creative Consciousness" या पुस्तकात आहे. त्यात असं दिलंय..

"Albert Einstein called the intuitive or metaphoric mind a sacred gift. He added that the rational mind was a faithful servant. It is paradoxical that in the context of modern life we have begun to worship the servant and defile the divine." (p. 26)

यातला पहिला भाग हा आईनस्टाईनच्या नावे आहे. दुसरा बॉब सँपलचा स्वतःचा आहे. आईनस्टाईनचा म्हणून सांगितलेला भागही ऑथेन्टीक नाही. त्याचा संदर्भ या लेखकानेही दिलेला नाही किंवा कुठे रेकॉर्ड असल्याचं नमूद केलेलं नाही.

एक धडा आपण घेऊयात का ?

अल्बर्ट आईनस्टाईन हा एक महान शास्त्रज्ञ होता. त्याचा मेंदू हा आश्चर्यकारक होता. मात्र त्याच्या नावे मानसशास्त्र किंवा अध्यात्मावरची कोट्स कुणी दिली तर केवळ आईनस्टाईनने दिलीत म्हणून डोळे झाकून विश्वास का ठेवावा ?

http://en.wikiquote.org/wiki/Talk:Albert_Einstein#Unsourced_and_dubious....

नास्तिकवादाचा ’आक्रमक’ प्रचार याबद्दल-
मुळात ’आक्रमक’ कशाला म्ह्णायचं? आयुष्यभर धमक्या येत असूनही काम करत राहणारे दाभोळकर आक्रमक म्हणता येतील. धर्मांधतेतून उद्भवणाऱ्या दहशतवादाशी जिवावर उदार होऊन लढणारे गुप्तचर यंत्रणा, armed forces, पोलिस यंत्रणा यांना आक्रमक म्हणता येईल. पण इंटरनेटच्या पडदयाआड स्वत:ला सेफ ठेवून निरुपद्रवी partial श्रध्दाळूंना उद्देशून पोस्ट्स लिहिण्यात कसली आली आक्रमकता?
अर्थात, सगळ्यांना दाभोळकर होता येत नाही मग त्यांनी यथाशक्ती योगदान देऊच नव्हे का याचं उत्तर ’योगदान जरुर दयावे’ हेच असेल पण त्याला आक्रमक वगैरे लेबल लावणं हास्यापद होईल Happy

दुसरा मुद्दा म्हणजे aschig व बाकीचे सन्माननिय अपवाद वगळता काही so-called नास्तिकांची real intentions वेगळीच असावीत अशी शंका येते. एकीकडे हिंदू धर्मात स्त्रियांवर खूप अन्याय होतो असं म्हणायचं पण दुसरीकडॆ भारतीय मुस्लिम पुरुषांनी चार लग्न करण्याला त्यांचं ’धार्मिक स्वातंत्र्य’ म्ह्णायचं आणि समान नागरी कायदयाला विरोध करायचा- हे खूपच contradictory आहे. अशा प्रकारची selective नास्तिकता असणारे लोक म्हणजे स्वत:चे राजकीय benefits सुरक्षित ठेवण्यासाठी काहीएका विशिष्ट धर्माला व जातींना टार्गेट करायचं, त्यातून स्वत:चा राजकीय propaganda पुढे आणायचा आणि यासाठी नास्तिकवादाचा पध्दतशीर misuse करायचा असा प्रकार असल्याची शंका येते. Aschig चा धागा यासाठी हायजॅक होऊ नये हीच सदिच्छा.

बाकी साडेतीनशे पोस्ट नुसतीच vague चर्चा झाल्यावर एखादा स्पेसिफिक मुद्दा घेतल्यास चर्चेचा उपयोग होईल.

दुसरा मुद्दा म्हणजे aschig व बाकीचे सन्माननिय अपवाद वगळता काही so-called नास्तिकांची real intentions वेगळीच असावीत अशी शंका येते. एकीकडे हिंदू धर्मात स्त्रियांवर खूप अन्याय होतो असं म्हणायचं पण दुसरीकडॆ भारतीय मुस्लिम पुरुषांनी चार लग्न करण्याला त्यांचं ’धार्मिक स्वातंत्र्य’ म्ह्णायचं आणि समान नागरी कायदयाला विरोध करायचा- हे खूपच contradictory आहे. >>>>

मुळात हाच एक अजेण्डा आहे. माणूस स्वतःच्या घराच्या डागडुजीचा विचार करतो. इतरांच्या नाही. शेजारचा आपलं घर नीटनेटकं ठेवत नाही तर आम्ही का ठेवावं असा विचार करणा-यांना एकतर इग्नोर मारणे किंवा दयार्द नजरेने पाहणे हे उपाय आहेत. शिवाय उपाययोजना करून विचार करता येण्यासाठी मदत करणे हे माणुसकीचे कर्तव्यही असतेच. अर्थात घरातले माझे शत्रू झालेत अशी भावना झालेल्यांना आपल्याला नेमके काय झालंय हे लक्षात आणून देणं थोडं कठीण असतं, अशक्य नसतं.

>>अर्थात घरातले माझे शत्रू झालेत अशी भावना झालेल्यांना आपल्याला नेमके काय झालंय हे लक्षात आणून देणं थोडं कठीण असतं, अशक्य नसतं.<<
बर्‍याचदा तुम्हाला फक्त हिंदुच्याच अंधश्रद्धा दिसतात का? या विचारश्रेणीच्या लोकांना या अंधश्रद्धा आहेत हे मान्य असत पण तुम्ही इतर धर्मियांच्या अंधश्रद्धांविषयी बोलत नाही किंवा तुलनेनी कमी व सौम्य बोलता म्हणुन राग असतो. तुम्ही स्वतः जरी जात धर्म वगैरे मानत नसला तुम्ही ज्या जातीत वा धर्मात जन्माला आला तो तुमचा धर्म्/जात असे समाज मानत असतो. वर मी पुरोगाम्यांच्या विखुरलेपणावर लिहिले आहेच. त्यामुळे हा लढा अधिक अवघड बनतो.

मी इब्लिस च्या मताशी सहमत आहे. कमीत कमी ह्या फोरमवर तरी ठाम भुमिका घेणे आवश्यक आहे.
"माझा देव, सत्यनारायण ह्यावर विश्वास नाही पण ज्यांचा असेल त्याला मुर्ख म्हणणार नाही" असल्या गुळमुळीत भुमिकेला काही अर्थ नाही.

माझ्या मते दाभोळकर जरी अनिस चे काम करत होते तरी त्यांनी स्वता स्वताच्या अंधश्रद्धा दाखवुन दिल्या

अनिस सारखी संघटना लोकांचे ( स्पेसिफिकली भारतातल्या ) प्रबोधन करु शकेल आणि त्यांना अंधश्रद्धे पासुन दुर नेइल. ही मोठीच अंधश्रद्धा होती. ह्या समाजात ६० वर्ष काढली तो समाज काय आहे ते सुद्धा कळले नव्हते असे म्हणणे प्राप्त आहे. अनिसच्या गेल्या ३० वर्षात पुजा, बाबा, आश्रम पूर्वी पेक्षा वाढतच गेले.

आणि लेख लिहुन, पत्रक आणि मोर्चे काढुन, कायम गुळमुळीत भुमिका घेवुन लोकांच्या विचारात बदल होतो असे मानणे म्हणजे सत्यनारायणाची पूजा घालुन इप्सित मिळते असेच झाले.

@ प्रघा
हा सुनियोजित प्रचार असतो. मुस्लीम द्वेषावर हिंदुत्ववादी जनमत तयार करण्यासाठी सेन्सीबल लोकांना हास्यास्पद ठरवणे, संशयास्पद ठरवणे, मुस्लीम धार्जिणे, शेळपट ठरवून त्यांना बाद ठरवणे जेणे करून त्यांची मतं आपोआपच बाद ठरावीत. कारण त्यांच्या मताचा प्रतिवाद करण्यासाठी मुद्देच नसतात. मुद्दे असते तर असे डायव्हर्जन्स काढण्याची गरज काय ? असे मुद्दे मांडणारे सारेच भावनेच्या आहारी जाऊन रागात लिहीतात असे काही नाही. यातले काही बनेल असतात. आपण नेमकं काय करतो हे त्यांना नेमकं माहीत असतं. या प्रकारच्या प्रचाराचा आणखी एक फायदा असा की सुधारक मतं मांडणारा नवखा असेल तर अरेच्चा, आपण एकतर्फी हमला करतोय काय या विचाराने तो काही काळ सैरभैर होतो किंवा अपराधीपणा वाटून मुद्दे मांडण्याचं थांबवतो. जेणेकरून सुधारणांना विरोध असणा-यांचं फावतं. चंमतग म्हणजे हे प्रचारक वैयक्तिक आयुष्यात सुधारलेले, अतिप्रगत असू शकतात.

दुसरीकडे जे स्वधर्मियातल्या सुधारणांवर बोलतात आणि ज्यांच्यावर इतर धर्माबद्दल बोलत नसल्याचा आरोप होतो त्यांच्यासमोर इतर धर्मिय मनुष्य येऊन जेव्हां वाद सुरू करतो तेव्हां आपोआपच हे सुधारक लोक त्याच्या धर्मातल्या उणिवांवर बोट ठेवतात हे अनेकदा पाहीले आहे. जर समोरचा ऐकून घेणारा नसेल तर मोठे वाद झालेले आहेत किंवा त्या व्यक्तीला उत्तर न देण्याचे धोरण आखण्यात आल्याचे देखील पाहण्यात आलेले आहे.

इथे मुद्दा काय आहे तो लक्षात आला असावा अशी अपेक्षा करतो.

धर्मा चे पालन करने श्रद्धा बाळगने स्वत:च्या मनःशांतीकरता पुजा करने ध्यान करने चुकिचे नाहि.
पन ते तुमच्या घराच्या आत आसावे त्याने कुणाला त्रास होउ नये.किवा ध्वनीप्रदूषण वाउप्रदूषण होउन पर्यावरणचा र्‍हास होउ नये. जेव्हा तुम्हि घराबाहेर पडता तेव्हा तुम्हि समाजाचे घटक आसता देशाचे नागरिक असता. हिंदु मुस्लिम पेक्ष एक भारतिय असता सगळ्यानि जर असा विचार केला तर
आपन प्रथम भारतिय नन्तर हिंदु मुस्लिम
जपान बद्दल वाचलेला एक लेख देत आहे
एक बार एक अमेरिकन प्रोफ़ेसर जापान में एक स्कूल में पहुँचा। उसने जापानी लड़कों से पूछा कि तुम्हारा धर्मगुरु कौन है? जापानी लड़कों ने जवाब दिया-गौतम बुद्ध। उसने पूछा कि तुम्हारा अभीष्ट देव कौन है? जापानी लड़के बोले-‘कनफ्यूशस’। उसने कहा- अच्छा! यदि जापान पर अमेरिका की फौज धावा बोल दे और अमेरिकन फौज के सेनापति गौतम बुद्ध हों तो तुम क्या करोगे? यह सुनते ही सब स्वदेश भक्त जापानी लड़के बोल उठे- हम गौतम बुद्ध का सिर गर्दन से उतार देंगे। अमेरिकन प्रोफेसर हैरान हो गया। उसने मन ही मन जापानी छात्रों के स्वाधीन्य स्नेह की सराहना की। इसी प्रकार जब जापानियों का रूस के साथ घोर युद्ध हो रहा था-बारूदख़ाने के अफ़सर ने खबर दी कि बन्दूक की गोलियों पर पीतल की कील लगाने के लिए पीतल नहीं रहा है। उस समय बुद्धिमान् जापानी जनता ने एक स्वर से कहा कि गौतम बुद्ध की पीतल की मूर्तियाँ जो घर-घर में रखी हुई हैं-पिघला कर बन्दूकों में पीतल की कीलें लगा दी जावें। जापानी लोग समझते थे कि यदि हमारी स्वाधीनता अक्षुण्ण रही तो हम फिर गौतम बुद्ध की हजारों मूर्तियाँ बना लेंगे, और यदि हम पराधीन हो गए तो इन पीतल के गौतम बुद्ध को रख कर क्या करेंगे। हमारी स्वाधीनता में जो बाधक होगा वह हमारा धर्मगुरु नहीं रह सकता। काश! यही सच्ची भावना हिन्दुओं की बन जावे-तो आज भारत में स्वराज्य हो जावे। हजारों देवी देवताओं के मन्दिर बने हैं; सैकड़ों तीर्थस्थान बने हैं और अनेकों धर्माचार्य महन्त बने हैं। यदि ये सब भारत की स्वाधीनता में साधक नहीं हैं तो इनको तुरन्त पञ्चम अन्यथासिद्ध की तरह पकड़ कर अरब सागर में डुबा देना चाहिए। तभी हम दावे के साथ कह सकेंगे कि-

आएँगे बौर रसालन में, फिर कोकिल बाग में बिहरेंगे।
एक दिना नहिं एक दिना-वे भारत के दिन फेर फिरेंगे॥
बोलो! भारत माता की जय!!!

थोरामोठ्यांची आपापल्या सोयीची कोटेशन्स ही नेहमी उधृत केली जातात व गैरसोयीची टाळली जातात. खरतर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या संदर्भात केलीली ती उधृते असतात.त्याचा भावार्थ व शब्दार्थ हा वेगळा असू शकतो. शब्दांचे लचके तोडुन ती दिलेली असतात. शिवाय त्यांच्या आयुष्यातील मते ही कालानुरुप परिस्थितीनुरुप बदलत असतात हा ही भाग विचारात घेतला पाहिजे. आयुष्याच्या सुरवातीस गॉड इज ट्रुथ म्हणणारे गांधी़जी आयुष्याच्या उत्तरार्धात ट्रूथ इज गॉड असे म्हणत होते.दी हयूमॅनिस्ट` या अमेरिकन मासिकाच्या सप्टेंबर १९७५ च्या अंकात 'ऑब्जेक्शन्स टू दी अस्ट्रॉलॉजी` अशा शीर्षकाचे एक निवेदन प्रसिद्ध झाले. त्या निवेदनावर युरोप अमेरिकेतल्या नामवंत १८६ शास्त्रज्ञांच्या सहया होत्या. ( सुरुवातीला ते १९२ होते नंतर त्यातील ६ गळाले ) यात काही नोबेल पारितोषिक विजेते सुध्दा होते. हे निवेदन डॉ. बार्ट जे बोक यांनी तयार केले होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ग्रहतारे हे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असल्याने त्यांचे गुरुत्वाकर्षणादि परिणाम ते पृथ्वीवर पोहोचे पर्यंत अगदी क्षीण होतात. अशा क्षीण प्रभावाने माणसाचे नशीब घडवले जाते असे मानणे बरोबर नाही.
या निवेदनावर विख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी सही देण्यास नकार दिला. झाले! ज्योतिषसमर्थकांना जणू कार्ल सेगनचा पाठिंबाच मिळाला. त्यांनी याचा डांगोरा पिटण्यास सुरवात केली. सामान्य माणसांचा संभ्रम त्यामुळे अजूनच वाढला.
कार्ल सेगनचा नकार का होता?
निवेदनात फलज्योतिषातील तत्वे व संकल्पना ही निरर्थक कशी आहेत? केवळ भौतिक परिणामाचा भाग न घेता त्यांचा योग्य तो समाचार त्यात घेवून त्यावर का विश्वास ठेवू नये अशी मांडणी त्यात नव्हती. केवळ वैज्ञानिक सांगतात म्हणून ते खरे असा काहीसा सूर त्या निवेदनात होता. केवळ याच कारणासाठी कार्ल सेगनचा नकार होता. हे त्याने स्पष्टही केले होते. पण समर्थकांनी आपल्याला हवा तसा अर्थ त्यातून काढला.

आसाम गोहाटि मधे कामाख्या मंदिर आहे.तिथे देवि कामाख्या चि योनि पुजा केलि जाते. महिन्यातिल पाच दिवस
देविला पिरियड्स येतात म्हनुन मंदिर बद असते तिथे कबुतराचा व बकरिचा बळि दिला जातो.मंदिर परिसरा मध्ये खुप घान आसते रक्त पडलेले असते.सगळे पुजारि पुरुष च आसतात.हि प्रथा श्रद्धा कि अंधश्रद्धा .

Pages