वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे आक्रमक नास्तिकपणाबद्दल जोरदार पोस्ट्स लिहिणारा साती हा आयडी व इथे-
http://www.maayboli.com/node/44929
आपल्या मैत्रिणीने माबो गणेशोत्सवासाठी गणपती बनवावा म्हणून खूप encourage करणाऱ्या साती हे दोन वेगवेगळे आयडीज आहेत का?

वेदिका, किमान चार मराठी संस्थळावर 'साती' नावाचा आयडी गेली आठ वर्षे एकाच व्यक्तीचा म्हणजे माझाच आहे.
अजून तरी माझा ड्यू आय किंवा दुसर्या कुणाचा 'साती' हा आय डी माझ्या पहाण्यात नाही.
Happy
पण दुसर्या धाग्यावर माझ्याकडे दुर्लक्ष करणार म्हणताना या धाग्यावर मात्रं माझ्याविषयी एकदम आपुलकीने चौकशी करताय हे पाहून गंमत वाटली.

साती, तुमच्याकडे दुर्लक्ष का करावं त्याचं हे वर कारण दिलेलं आहे. एकीकडे जोरजोरात आक्रमक नास्तिकवादाच्या बाता करायच्या दुसरीकडे गणपतीबाप्पा मोरया करायचं तेही एकाच संकेतस्थळावर!

साती तरी पण मला उत्सुकता आहे, दोन्ही कसे काय?
नो ऑफेन्स प्लीज
तुमच्या मतांचा आदर ठेवून, मला केवळ उत्सुकता आहे आणि तुमचे म्हणणे समजेल असे वाटते म्हणून विचारले.

धाग्याशी संबंधित नसणारे प्रतिसाद, वेदिका २१ यांचं इग्नोर करण्याबाबतचं अनाकलनीय धोरण यामुळे विषय भरकटतो आहे.

मला असा प्रश्न पडतोय की जे अंधश्रद्दाळू नाहीत ते देव कशाप्रकारे मानतात? त्यांच्या दृष्टीने देव असतो की नाही?

घ्या, परत त्याच वळणावर आला धागा!! "देव मानता का ?" याचे उत्तर म्हणून (नास्तिकांनी) नेहमी "देव म्हणजे काय?" असा प्रतिप्रश्न करावा Happy नाहीतर चर्चा गंडली म्हणून समजा!

<<<<<<<<<श्याम मानव यांचे एक भाषण ऐकताना त्यांनी शिवलिंग हे समागमाचे प्रतिक आहे असे खरे परंतू बहुसंख्य श्रोत्यांना शॉकिंग वाटणारे विधान केले होते>>>>
समागमाचे प्रतिक शिवलिंग चि पुजा करने श्रद्धा कि अंधश्रद्धा .

नाही. तुम्ही म्हणता त्या अर्थाने नाही.
मानवापेक्षा "श्रेष्ठ" अनेक शक्ती आहेत. उदा कुत्र्याला जास्त वास येतो. वाघाने गमतीत पंजा मारला तरी जीव जाऊ शकतो. मलेरियाचा जंतूदेखिल जीव घेऊ शकतो. इत्यादि.

पण,
माणसासकट सगळ्या जगाची प्लॅण्ड "निर्मिती" करणारी कुणीतरी बेनेव्होलंट सुपरपॉवर या अर्थाने कोणतीही 'महान' वगैरे शक्ती / व्यक्ती अस्तित्वात नाही.

कर्नाटक मधे देविच्या नावाने हजारो मुलि देविदास बनवल्या जातात.त्या मुलिना वेश्याव्यवसायात ढकले जाते हि प्रथा श्रद्धा कि अंधश्रद्धा .

>>>माणसासकट सगळ्या जगाची प्लॅण्ड "निर्मिती" करणारी कुणीतरी बेनेव्होलंट सुपरपॉवर या अर्थाने कोणतीही 'महान' वगैरे शक्ती / व्यक्ती अस्तित्वात नाही.<<<

हे सिद्ध करा असे म्हंटले तर त्यावर जर 'तुम्ही तशी शक्ती आहे हे सिद्ध करा' असा युक्तिवाद असेल तर चर्चा वादांकडे जाईल.

अस्तिक व नास्तिक (ह्या टर्म्स अस्तित्त्वात असणे ह्यालाच हरकत आहे, हा भाग वेगळा) ह्या दोघांपैकी हा धागा कोणी काढला आहे? ज्याने हा धागा काढला आहे त्याच्यावर ती गोष्ट सिद्ध करण्याची जबाबदारी आहे असे मला वाटते.

>>>हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चुक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहे याची जाणीव आहे (हे लोकच चुक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा. <<<

ही मूळ धाग्यातील सर्व विधाने (माझ्यामते) हरकतपात्र आहेत.

१. हा धागा कोणाकरता आहे हे मायबोलीवर धागानिर्माता सांगू शकतो हे पटत नाही. धागाकर्त्याने आपले म्हणणे मांडावे, ज्याला त्यावर भाष्य करावेसे वाटेल तो करेल. हा धागा काही विशिष्ट विचारप्रणालीच्याच सदस्यांसाठी आहे हाच एक विस्मयजनक पवित्रा आहे.

२. भविष्य सांगणे समाजाकरता हानिकारक आहे हा दावा कृपया सिद्ध केला जावा.

३. 'हा धागा वादासाठी नाही, वादासाठी इतर जागा आहेत' असे प्रतिपादन येथे करता येते ही जाणीव सुखद वाटली.

४. भविष्य सांगणे हा अंधश्रद्धेचा एक प्रकार आहे असे म्हणावेसे वाटणे ही एक अंधश्रद्धा आहे असे म्हणावेसे वाटत आहे.

-'बेफिकीर'!

तेराव्या पानावर?

महिन्याभराच्या ऑडिटनंतर टीमने बनवलेला ऑडिट रिपोर्ट फायनल करायच्या दिवशी मला आधी रजिस्ट्रारबरोबरचे M o U तपासायचे आहे (जे हेड ऑफिसमध्येच असे, आम्ही ब्रँचवाले) असे सांगणारा एक सिनियर (नॉट अ पार्टनर = साइनिंग ऑथॉरिटी, त्याला फक्त इनिशियल करायचीच पात्रता होती) ऑडिट स्टाफ आठवला.

>>> भरत मयेकर | 24 September, 2014 - 20:38 नवीन

तेराव्या पानावर?<<<

सॉरी, तुम्हाला विचारायचे राहूनच गेले कोणत्या पानावर मी काय प्रतिसाद देऊ.

प्लीज अ‍ॅकोमोडेट!

भारताचे मंगळ यान मंगळा ग्रहाच्या कक्षेत आज स्थापित करण्यात इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना पहिल्याच प्रयत्नात यश आले हि आजचि बातमि
शनि,मंगळ हि ग्रहे तर अशुभ असतात ना?
आमच्या परिचयातिल एका भविष्य सागनारयाच्याच मुलिचा घटस्फोट झालेला बघितला आहे. .

इब्लिस जि लिखानातलि चुक सुधारल्या बद्द्ल धन्यवाद
टायपायचि सवयनसल्या मुळे चुका होतात.

ही मूळ धाग्यातील सर्व विधाने (माझ्यामते) हरकतपात्र आहेत.

१. हा धागा कोणाकरता आहे हे मायबोलीवर धागानिर्माता सांगू शकतो हे पटत नाही. धागाकर्त्याने आपले म्हणणे मांडावे, ज्याला त्यावर भाष्य करावेसे वाटेल तो करेल. हा धागा काही विशिष्ट विचारप्रणालीच्याच सदस्यांसाठी आहे हाच एक विस्मयजनक पवित्रा आहे.

२. भविष्य सांगणे समाजाकरता हानिकारक आहे हा दावा कृपया सिद्ध केला जावा.

३. 'हा धागा वादासाठी नाही, वादासाठी इतर जागा आहेत' असे प्रतिपादन येथे करता येते ही जाणीव सुखद वाटली.

४. भविष्य सांगणे हा अंधश्रद्धेचा एक प्रकार आहे असे म्हणावेसे वाटणे ही एक अंधश्रद्धा आहे असे म्हणावेसे वाटत आहे.

-'बेफिकीर'!
<<
बेफि,
हा प्रतिसाद माझ्या वतीने (कलम २ व ४ वगळून) बी यांच्या भगवद्गीतेच्या धाग्यावर डकवणार का, प्लीऽज?

तुमच्यावतीने काहीही करणे ह्याला मी अंधश्रद्धा मानतो इब्लिस!

तेव्हा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा कलंक माथी घेऊ नका.

मला असा प्रश्न पडतोय की जे अंधश्रद्दाळू नाहीत ते देव कशाप्रकारे मानतात? त्यांच्या दृष्टीने देव असतो की नाही?

>>

डिविनिता,

१) समजा आणखी पाच सहा हजार वर्षानंतर चालू युग संपून नवीन युग सुरु झाले आणि नवीन युगापर्यंत आजचे विज्ञान वगैरे काही उरलेच नाही तर पृथ्वी गोल आहे ह्यावर तेंव्हाचे लोक विश्वास ठेवणार नाही. त्यावेळी पृथ्वीची छायाचित्रे बघून त्यांचे समाधान होणार नाही.

खूप खूप वर्षापुर्वी रामायण महाभारत घडले. त्यावेळी देव दानव असे प्रकार होते. देवांकडे अद्भुत अशा शक्ती होत्या हे सगळे आज आपल्याला मिथ्या वाटते. कारण विज्ञान हे सिद्ध करु शकत नाही. आणि शास्त्राला प्रमाण मानणार्‍या लोकांचा मौखिक गोष्टींवर विश्वास नाही.

२) आज आपण शिवछत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानतो. तो एक अत्यंत थोर राजा होऊन गेला हे आपल्याला ठावूक आहे. पण आणखी हजार दोन हजार वर्षांनी तेव्हाची जनता शिवाजी राजे ही एक काल्पनिक व्यक्ती आहे असे म्हणतील.

हीच गोष्ट राम कृष्ण ह्यांच्याबद्दलही खरी आहे. त्यांना आपन पाहिले नाही. अनादिन काळ उलटून गेला मानवजात त्यांची पुजा करते. पण बुद्धीला प्रमाण मानणार्‍या लोकांना राम कृष्ण ह्या व्यक्ती काल्पनिक वाटतात.

३) देव आहे ह्याची प्रचिती यावी लागते. ती एक अनुभुती आहे. ज्यांना देव दिसतो किंवा देव आहे असे वाटायला लागते ती व्यक्ती जगासमोर तसा दावा कधी करत नाही. कारण आपण जसे आपले बॅ़क बॅलन्स कुणाला दाखवत नाही तसे अध्यात्मिक माणूस त्याला मिळालेल्या शक्तीचे प्रदर्शन करणार नाही. अन्यथा, ती शक्ती लुप्त होईल.

विज्ञानाला देव कधीच दिसणार नाही. सुखासीन जीवन जगताना ज्या व्यक्तीला कुठलीच गोष्ट मागावी लागत नाही, कुठल्याच गोष्टीची कमी नाही ती कुणापुढे झुकणार?, कुणाला ती शोधणार??. जेंव्हा आपले कठिण प्रश्न मिटता मिटत नाही तेंव्हा आपण ईश्वरापुढे लीन होतो. आपल्याला तेन्व्हा कळते की आता आपल्या यातना इतर कुणीच समजू शकणार नाही. त्यावेळी तसे लीन होऊन जे मानसिक बळ मिळते ते कुणाला दाखवता येणार नाही.

असो.

बी ह्यांच्या वरील पोस्टवरून मी बी ह्यांच्याशी सहमत आहे असा ग्रह करून कृपया पोस्ट्स लिहू नयेत अशी नम्र विनंती!

बी ह्यांचे काही मुद्दे मान्य आहेत व काही नाहीत.

<<२. भविष्य सांगणे समाजाकरता हानिकारक आहे हा दावा कृपया सिद्ध केला जावा. >>>>
भविष्य सांगन्याराला हि माहित असते कि हे थोताड आहे.पन ते त्याचे उपजिविकेचे साधन असते.
एका मुलाने आई च्या विचाराविरुध जाऊन मंगळ्या मुलिशि लग्न केले. भविष्यत मुलाच्या जिवाला धोका होइल
म्ह्नुन मुलाच्या आई ने तिला मारुन टाकले.जेल मध्ये आहे ति. लाइफ ओके वर बघिलेल.
हे समाजाकरता हानिकारक नाहि का?

आज मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरून तीन लाख सदतीस हजार एकशे चौसष्ट वाहने एकही अपघात न घडता इप्सित स्थळी पोचली.

अशी बातमी नसते.

एक अपघात झाला की बातमी होते.

बेफि,
थोडी अंधश्रद्धा करा हो गरीबासाठी. लिहाच तिथे.

ते बी महान आहेत. ते तिकडे म्हणतात,
" मी जे धागे उघडतो फक्त त्याच धाग्यावर मी लिहितो."

असेच बरेच काही ते तिथे म्हणतात. जसे की, त्यांच्या धाग्यावर कुणी काय लिहावे याबद्दलचे मार्गदर्शन इ.

तेव्हा बेफि, पुन्हा एकदा,

पीऽऽज नं? 5.gif

Pages