निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रेवा... आपोआप आलेला दिसतोय. Happy
पण मी तर ढेमश्याच्या, कर्टुल्याच्या बिया टाकल्या होत्या पावसाळ्याच्या सुरवातीला.

कळ्या तर अगदी छोट्या छोट्या कटुरल्यासारख्या आहेत.

वॉव अर्या, पांढरे क्रुष्ण कमळ... लक्की आहेस तु? दिनेश दा याच्या फळाचा जुस करतात ना!

ऑफीस च्या बाजुला एका आवारात एक दरगा आहे खुप रिकामी जागा आहे, एका माणसाने तिथे काही दिवसापुर्वी
काहीतरी पेरले होते, आज आम्ही लंच मधे मुद्दामच जाऊन आलो... मस्त वाटले...

चवळी च्या शेंगा, वालाच्या शेंगा, भेंडी, कारली, लाल भोपळा, टमाटो अशी मस्त मंडळी बघायला मिळालीत...:)
Photo1296.jpgCH0.jpgch2.jpgbhendi.jpgwal.jpg

आर्या,
पॅसिफ्लोरा कूळातला वेल आहे. त्याला घाणीवेल असंही म्हणतात. (पानांचा वास घेऊन बघा) आमच्या घराजवळ रस्त्याकडेने बरेच वेल उगवलेले मी नेहेमी पहाते. त्याची फळे खाण्यायोग्य आहेत की नाही त्याची कल्पना नाही.

सागरगोट्याचे काटेरी झुडूप असते, त्याचा फोटो असेन बहुदा माझ्याकडे. शोधायला हवा.

सायली, ते कादाचित मुग पण असतिल.

आणि आर्या, ऋषिपंचमीच्या भाजीतला पहिला फोटोत शेंडवेल आहे का? Dioscorea pentaphylla. 'कास'ला पुष्कळ दिसते.

रीया, सागरगोट्याचा खेळ मुलींमधे खुप लोकप्रिय होता. देऊळ सिनेमात, नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी खेळतात ना तो.

नलिनीच्या घराजवळ ( श्रीरामपूरला ) भरपूर झाडे आहेत.

आर्या, ती भाजी मी फक्त ठाण्यालाच बघितली आहे. आणि याच दिवसात दिसते.
अजूनही मिळते ही भाजी हे बघून छान वाटले. त्यांची नावे आणि माहिती ( कशी करायची, कशाबरोबर खायची ) मायबोलीवर हवी.

नलिनी मुगच असतील कदाचीत..
सागरगोट्या / बीट्टया आम्ही पण खेळायचो लहान पणी Happy

सागरगोटे खेळतात. बाळगुटीमधे उगाळून देतात बाळाला. औषधीमधे वापर होतो. फोटो सापडला तर नक्की देते.

वैतागू नका
नयी है यह (म्हणजे मीच)>>>>> Rofl

अदीजो... असेच फुल येणारे दोन वेल असतात. त्यापैकी एक तूम्ही म्हणताय तसा. त्याची फळे खाण्याजोगी नसतात. पण ती आकाराने लहान म्हणजे ३ सेमी असतात. ५ सेमी आकाराची असतात त्याला पिवळ्या रंगाची पॅशनफ्रुट्स लागतात. इथे अंगोलात बहुतेक घरात हा वेल असतोच.

जे सागरगोटे खेळतात ते सागरगोटे सागराकाठचे गोटे म्हणजे समुद्राकाठच्या रेतीमधे सापडणारे दगड असतात असच मला माहीत होतं Happy
मी तेच सागरगोटे खेळलेय म्हणून झाडाला सागरगोटे ऐकुन आवाक झाले.
दगडं लागलेलं झाड वगैरे डोळ्यासमोर आलं Uhoh

<<आणि आर्या, ऋषिपंचमीच्या भाजीतला पहिला फोटोत शेंडवेल आहे का<<
नावे माहित नाही...अदिजो!
तेच तर..ही भाजी इतर वेळेस दिसत नाही. फक्त ऋषीपन्चमीलाच येते आणि टेस्टी असते. Happy

<<आर्या, ती भाजी मी फक्त ठाण्यालाच बघितली आहे. आणि याच दिवसात दिसते.
अजूनही मिळते ही भाजी हे बघून छान वाटले. त्यांची नावे आणि माहिती ( कशी करायची, कशाबरोबर खायची ) मायबोलीवर हवी.<< हो दिनेशदा. मागे जागुने दिली होती ना नावे? पण त्यात ही भाजी दिसली नव्हती मला.

आर्या, हे माझ्याकडचे शेंडवेलीचे फोटो. 'कास'ला घेतलेले:

kaas250911 293.jpgkaas250911 294.jpg

मेल-फीमेल फुले वेगवेगळी असतात. पैकी मेल फुलांची भाजी करतात. याच दिवसात फुलतात.

आर्या, या भाज्या पनवेललाही नाही दिसत.. जागू कडे नसणार त्या. आता कदाचित मोहट्या ( मोहाची फळे ) पण
येतील.. दिवाळीपर्यंत कणगं, करांदे येतील.
मस्त चवीची गावठी बोरे पण मिळतात तिथे.

जागु 21व्या भागा बद्दल मनापासुन अभिनंदन..
माझ्या शेतातील काही फोटो.(एक प्रयत्न)
1)प्र.ची
PicsArt_1409573725678.jpg
2)प्र.ची
PicsArt_1409573542411.jpg

सांगली भागात सागरगोट्याला गजगे म्हण्तात. फार मजा यायची एक पाय दुमडून एक पसरायचा . आणि सुरू....
एख्खई दुख्खई..... मात्र फरशी गुळ्गुळीत पाहिजे.

आर्याने टाकलेली पहिली भाजी मिळते डोंबिवलीला ऋषीपंचमीच्या वेळी. मला नाव नाही माहिती पण ऋषीची म्हणून जी जी भाजी विकायला असते त्यात ही पण असते.

सायली, महेशकुमार फोटो मस्त.

आम्हीपण लहानपणी सागरगोटे खेळायचो.

महेश, गहू लावलाय का ? मस्त हिरवंगार रान दिसतंय.

मानुषी, मला काही जमायचं नाही ते खेळायला. पण माझी बहीण फारच तेज होती. तिचा एक डाव पूर्ण व्हायचा तरी समोरचीला खेळायला मिळायचे नाही.
कितीतरी प्रकार असायचे. १, २, ३, ४, ५ चे गट मग हाताची विहीर करणे, पायांची विहीर करणे.... साधन काय तर ५ ते ९ सागरगोटे !

Pages