निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते व्यस्त म्हणजे व्यस्त प्रमाण / सम प्रमाण वाले >>>.

ho. vyasta mhaNaje ulate kinvaa eksaarakhe nasalele, malaa arth nemakaa sangta yet nahiye. paN aataa sagle dole jhaakun mi vyast aahe mhanun saangtaat.

स्निग्धा...वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!! Happy
जिप्सी....वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!! Happy

माझ्याकडे कर्टुल्याच्या वेल आलाय आपोआप. छोटे छोटे कर्टुले लागलेत. फोटो टाकेन लवकरच.

हो खरच मनुषी ताई बरेच दिवसात आल्याच नाहीत.. मला असे वाटते त्या हन्डस्म पोहण्यार्‍या आजोबांचा लेख लिहीला होता आणि कर्नाटकच्या देवळाचे प्र.ची त्यानंतर फिरकल्याच नाहित..

आशुतोष काय गोड फुलं आहेत? कुठली फुलं आहेत.

अता सिझन चमेलीचा... Happy
हे आज सकाळी मैत्रीणीनी माझ्यासाठी आणलेल्या कळ्या...
chameli.jpg

आणि आत्ता त्या उमलुन अशा दिसतायत... Happy
Photo1287.jpg

काही लोकांना नुसता सुगंध उधळायला आवडतो त्यातलीच ही एक .... Happy

जिप्स्या Happy

मला कुंभाची आठवण झाली त्याची पाने पाहुन. त्याचे शास्त्रिय नाव दिलेस का>? मला परत मागे जायचा कंटाळा आलाय

चमेली म्हणजेच जाई का?

प्राथमिक शाळेत असताना शाळेतून घरी येताना माझा प्रवास कारखान्याच्या चाळीतून असायचा. जवळजवळ बर्‍याच घरांजवळ जाईचे वेल कळ्यांनी भरलेले असत. मी घरी येताना कळ्या आणायचे आणि गणपतीला मस्त हार बनवायचे त्यांचा. काय सुगंध असायचा त्यांचा!

साधना, धन्यवाद! ह्यापुढे आता लक्षात ठेवणार.

ही चमेली....

chameli.JPG

आणि ही जाई...
jai.jpg

(फोटो अंतरजालाजुन सभार)

साधना छान माहिती..

लोकांना नुसता सुगंध उधळायला आवडतो त्यातलीच ही एक .... >>> सायली, उमललेल्या फुलांचा फोटो पाहून माझ्याही नकळत, मी जोराने श्वास घेतला.फार सुंदर फोटो.

स्निग्धा.,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्याकडे कर्टुल्याच्या वेल आलाय आपोआप. छोटे छोटे कर्टुले लागलेत. >>> मस्त.

सायली,
माझ्या माहितीप्रमाणे जाई आणि चमेली एकच आहेत. तुम्ही जाई म्हणून जो फोटो दिलाय ती जुई आहे. गणपतीच्या पत्रींमध्ये जी असते ती चमेली किंवा जाई. यावेळच्या साप्ताहिक सकाळ मधे पत्रींबद्दल आले आहे.:

http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20140823/4952863132525132955.htm

जाई -
झुडपाप्रमाणे वाढणारी ही मोठी वेल आहे. भारतात सर्वत्र बागेत लावलेली आढळते. वेल लांब फांद्यांनी जवळच्या आधारावर चढत जाते. जाईची फुले नाजूक, पांढरी व सुवासिक असतात. प्रियंवदा, मोतिया, चमेली या नावाने ही फुले ओळखली जातात. बऱ्याच सुवासिक द्रव्यात गुलाबाखालोखाल जाईच्या फुलांचा वापर करतात. सौंदर्यप्रसाधने, साबण, दंतमंजने यामध्ये जाईचे तेल वापरले जाते. जाईची फुले उगाळून नायट्यावर लावतात. तोंड आले असता जाईची पाने चघळल्यास विकार कमी होतो. जाई कृमिनाशक आणि मासिक पाळीच्या दोषांवर गुणकारी आहे.

साधना, आर्या, कामिनी, देवकी सगळ्यांनाच खुप खुप धन्यवाद. कालचा माझा दिवस तुमच्या सगळयांच्या शुभेच्छामुळे छान आनंदात गेला Happy

साधना, अदीजो, छान माहिती देता नेहमीच.

देवकी, हेमाताई धन्यवाद...

आदीजो माझ्या माहितीप्रमाणे जुईचे फुल हे जाई पेक्षा ठेंगणं आणि दाट असत जाईच फुलं थोड विरळ असतं.
जाई जुई म्हणजे अगदी जुळ्या बहीणी..:) आणि या दोघांचे फ्युजन म्हणजे सायलीचे फुल Happy ह्याचा सुगंध खुप सुरेख असतो आणि फुल दणकट आणि जाई जुई पेक्षा मोठे असते... जाई जुईची चुलत बहिण सायली... Happy

आणि चमेली तर अगदीच वेगळी असते.

वॉव आर्या, कर्टुल्याचा फोटो नक्की टाक... खुप चविष्ट आणि पौष्टीक असते ही भाजी..

जाई, जुई, सायली, नेवाळी, चमली हि सारी फुले मला सारखीच वाटतात. Sad

हा मायबोलीकर मामीच्या घरच्या जुईचा फोटो:

मला एक जाई समजते. बाकी सगळ्यात मी कन्फुज होते.>>>>अन्जूताई, मलातर ती सुद्धा ओळखता येत नाही. Happy

आज सकाळी सकाळी दादर फुलमार्केटमध्ये गेलो होतो. नेहमीप्रमाणेच प्रचंड गर्दी. गणोबाच्या आगमनाच्या तयारीसाठी झुंबड उडाली होती. मागे "अधिक" महिन्यामुळे/उशिरा गणपती आल्याने वाचलेल्या "कळलावी/अग्निशिखा"ची फुले झाडपालांच्या गराड्यात केविलवाणी दिसत होती. गुलाबी डबल जास्वंदीचे एक फूल दहा रूपये पण बिलकुल फ्रेश वाटत नव्हती आणि उद्यापर्यंत टिकलीही नसती. हल्ली नेहमीची जास्वंद मिळतच नाही. सगळ्या या डबल गुलाबीच. लाल/पिवळा झेंडु, ऑर्किड, गुलछडी, हिरवे/पिवळे तुरे आणि इतर भरपूर फुलांनी बाजार सजला होता. Happy पण गर्दी बेक्कार. Sad

अरे हो! कुंदा राहिलं!
शशांकजी, Flowersofindia वरही हे स्थानिक नावांचे घोळ आहेतच. वाद घालत बसण्यापेक्षा 'आमच्या भागात या फुलाला हे म्हणतात' असं म्हणावं आणि गप्प बसावं. Happy

Pages