निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

आंबा, फणस, काजू, जांभूळ
आंबा, फणस, काजू, जांभूळ यांच्या बाबतीत ५०/६० वर्षे धरता येईल.. पण हे निसर्गातले वय. कलमांचे वय कमी असते. ते फारतर २५/३० वर्षे असणार.
seasonal plants म्हणजे मला
seasonal plants म्हणजे मला मौसमी फळझाडे देणारे वृक्ष वाटले नाहीत तर अमुक एका मोसमात येणारी झाडे/वेली/रोपे वाटली. म्हणजे हळद फक्त पावसाळ्यात, गाजरे हिवाळ्यात, टोमॅटो हिवाळ्यात, झेंडु, शेवंती, इ. इ. रोपे वाटली. ही सगळी रोपे वर्षातल्या एका हंगामातच येतात. हंगाम संपला की ती रोपे मरतात. मग पुढच्या हंगामात परत नविन बी पेरायचे.
अर्थात शाळेला काय अपेक्षित आहे ते शाळेने कळवले असेलच.
सुदुपार... हे आमच्या कुंडीतले
सुदुपार... हे आमच्या कुंडीतले पहिले वहिले फुल.... काल उमलले

आधी कळ्यांचा फोटो टाकला होता..
@साधना ... "How do plants
@साधना ... "How do plants detect seasonal changes? Find out some seasonal plants you
notice in your surroundings." असे लिहीले आहे .... म्हणून seasonal fruits वाली झाडे असे डोक्यात आले होते ...
कारण तेवढ्याच season मध्ये येणारी झाडे changes कशी detect करतील ...पण अशी कुठली fruit plnt आहेत जी फक्त जुलै ऑगस्ट मध्ये येतात ... ?
:घोर अज्ञानी बाहूली:
प्राची... पत्रकार निळू दामले
प्राची... पत्रकार निळू दामले यांचे माणूस आणि झाड हे पुस्तक अवश्य वाचा.. या सर्व बाबींची यात छान चर्चा आहे.
अगदी मुलालाही वाचायला द्यावे असे पुस्तक आहे हे.
ह्म्म्म पण आता साठी<<आंबा,
ह्म्म्म पण आता साठी<<आंबा, फणस, काजू, जांभूळ यांच्या बाबतीत ५०/६० वर्षे धरता येईल>> हे लिहीते ...
पण अशी कुठली fruit plnt आहेत जी फक्त जुलै ऑगस्ट मध्ये येतात ... ? हे माहित आहे का?
जुलै आणि ऑगस्ट हे महिने
जुलै आणि ऑगस्ट हे महिने आपल्याकडचे फळांचा बहर ओसरलेले महिने आहेत. याच काळात गुजराथ व मद्रास मधून काही आंबे आपल्याकडे येतात. चेंबूरला तर फणसही बारा महिने मिळतो.
दादर पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक आंब्याचे झाड आहे त्याला वर्षभर आंबे लागत असतात.
आता तपमानाचे चक्रही बिघडत चाललेय. यावर्षी जून कोरडा गेला. पावसाळ्याबरोबर उगवणारे टाकळा, आघाडा, वाघनखी यांची स्थिती काय आहे यावर्षी ?
त्यावरून झाडे कशी अॅडजस्ट करतात ते नक्कीच बघता येईल.
ह्म्म्म्म तेही आहेच
ह्म्म्म्म तेही आहेच म्हणा...अपवाद असतातच ...
टाकळा, आघाडा, वाघनखी >>> ह्यान्ची इन्ग्लिश नावे कुठे मिळतील ... site aahe kaa maahit ekhaadi?
याच नावाने गुगल सर्च करा.. पण
याच नावाने गुगल सर्च करा.. पण पहिल्या दोन औषधी रानभाज्या आहेत. वाघनखी पण औषधीच आहे ( कळलावी या नावाने सर्च करा. )
ओके दिनेश दा . बघते ....
ओके दिनेश दा . बघते .... धन्यवाद .... आणि अहो जाहो नकोच हो ...
आपला मका पण आताच कोवळा असतो
आपला मका पण आताच कोवळा असतो ना बाजारात येतो तो
प्राची, लेकाच्या शाळेने तुला
प्राची, लेकाच्या शाळेने तुला चांगलेच कामाला लावलंय.
मक्याच्या अनेक जाती आहेत...
मक्याच्या अनेक जाती आहेत... मधुमका ( स्वीट कॉर्न ) तर वर्षभर दिसतो.
कधी कधी बाजारही ठरवतो पिकांचा मौसम कधी असावा ते. कलिंगडाचे पिक, रमझानचा महिना बघून घेतले जाते. कारण त्या काळात त्याची मागणी असते आणि चांद्रवर्ष ( पण नो अधिक मास ) पाळत असल्याने रमझान दरवर्षी १० दिवस मागे सरकतो.
अहो जाहो... ते दोघांना उद्देशून.. या शोधकार्यात बेटा पण सहभागी झाला पाहिजे ना
हो ग अन्जू.. बघ कि .... आणि
हो ग अन्जू.. बघ कि .... आणि खूप क्लियर नाही आहे ग प्रश्न ...त्यामुळे गोंधळ होतो आहे ....
बाकि दिनेश दा ही एक साइट मिळाली ..http://thisfoodthing.com/
पण त्यांनी रिजनवाएइज लिहीलेले नाही ....
मी seasonal plants in surroundings फणस, काजू, जांभूल (age 25-50 years) - fruit bearing in summer
आणि , आघाडा(age 3 months) , कॉर्न plant (५-६ months) ....
.. असे लिहाय्चे ठरवले आहे
ह्यात खूप चुकिचे काही नाही आहे ना? .... म्हणजे शक्यच नाही टाइप्स?
प्राची, दिनेश दा म्हणजे
प्राची, दिनेश दा म्हणजे एनसायक्लो.च आहेत
मका वर्षभर असतो. भारतातले
मका वर्षभर असतो.
भारतातले फळझाडं हवी आहेत का जुलै ऑगस्ट मधली? सफरचंद, जर्दाळू, अक्रोड, आलूबुखारा ही फळं प्रामुख्याने ह्या महिन्यात येतात. जून महिन्यात पाऊस पडला की जांभळं पिकायला लागतात. आता पेरूचा ही सिझन असणार. सिताफळं थंडीत असतात. बोरं डिसेंबर- जानेवारी, आंबा,काजू, बदाम हे एप्रिल, मे , जून दरम्यान.
आता सध्या केळीच्या बागा ही लगडलेल्या असणार.
हो ग सायली.... अग मी मध्ये
हो ग सायली.... अग मी मध्ये मध्ये येते माबो वर ... त्यामुळे माहित आहे ... योग्य ठिकाणी प्रश्न विचारता आला त्यामुळे
....
आता गेले वाटते दिनेश्दा .... अग तसा मुलगा लहान आहे ...२ ला ... पण चुकिची माहिती देउ नये असे वाटते ... म्हणून खात्री करून घेत आहे
धन्यवाद नलिनी ... पण seasonal
धन्यवाद नलिनी ... पण seasonal plant madhye मका काढ्न पेरु add करते ...
पेरु चे झाड माझ्या लहान्पणी पासुन आहे घरी ..... त्याचे average maximum age kay asate?
बरोबर नले, पाऊस आणि आलूबुखार,
बरोबर नले, पाऊस आणि आलूबुखार, सोबत ओल्या चेरीज आणि ओले जर्दाळू.
माझ्या डोक्यात दक्षिण गोलार्धातले सिझन आहेत ना !
सफरचंद आणि संत्री वर्षभर मिळतात. उत्तर गोलार्धातली नाहीतर दक्षिण गोलार्धातली. कुठे ना कुठे पिकत असतातच.
प्राची... आमच्या लहानपणी
प्राची... आमच्या लहानपणी मोसमी फळे आवर्जून खा असे शाळेतही सांगितले जात असे. आता काही ठराविक अपवाद सोडले, तर अनेक फळे वर्षभर मिळतात.
डाळिंब पण असते ऑगस्ट-
डाळिंब पण असते ऑगस्ट- सप्टेंबर मधे तसेच एप्रिल- मे महिन्यात डाळींबाचे वय सधारण ८ - १० वर्ष असते.. मग बागेतली झाडं खराब होऊ लागतात. केळीचे वय साधारण १८ ते २० महिने.
पेरूचे वय साधारण २५-३० वर्ष असायला हवे कारण ते वयाच्या ८ ते १० व्या वर्षी पुर्ण क्षमतेने फलोत्पादन द्यायला लागते.
खरतर पेरू हे वर्षभर फळ देणारं झाड पण पावसाळ्यात सर्वाधिक फलनाचा काळ.
अरे हो डाळिंब पण मिळततात नाही
अरे हो डाळिंब पण मिळततात नाही का .... धन्यवार्द नलिनी
मी, एक प्रकारच्या
मी, एक प्रकारच्या घायपातापासून एक गोड पदार्थ करतात असे लिहिले होते त्याचे नाव..Agave nectar
इथे माहिती आहे
http://en.wikipedia.org/wiki/Agave_nectar
प्राची तुझ्या लेका मुळे बघ
प्राची तुझ्या लेका मुळे बघ आम्हाला पण कीती उपयोगी माहिती मिळाली...
दिनेश दा घायपात सिरप सहीच..
टीपीकल वपू .... बासरी तयार
टीपीकल वपू ....
बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते , असं बासरी तयार करणारे सांगतात.
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो.
याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी.
एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,
आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो,
त्याच्या आजूबाजूला वावरतो,
पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.
तू तर एवढी साधी, ना रूप ना काही.
पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर?
बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.’
अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं.
बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे,
ना एखादी गाठ, ना एखाद वळण. मी पोकळ आहे.
त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.
माझ्या अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे
रिपू मी काढून टाकले आहेत.
मला स्वतःचा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.
तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.’
गोपी निरुत्तर झाल्या.
तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत.
म्हणूनच असेल कदाचित, पण आज आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही .......!
#वसंतपुरुषोत्तमकाळे #वपुर्झा
माझी लेक बासरी वाजवते... छानच वाजवते !
म्हणूनच असेल कदाचित, पण आज
म्हणूनच असेल कदाचित, पण आज आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही .......!
अस्सं काही नाहीय हा.. माझ्य भावाची मुलगी शिकतेय बासरी. परवा गेलेले तेव्हा तिने तिन बास-या दाखवल्या. मी तिन्ही फुंकुन पाहिल्या. नुसती हवा... अर्धा तास फुंकले तेव्हा कुठे एका विशिष्ट कोनात धरल्यास थोडासा आवाज... ज्याला सुर म्हणता येणार नाही पण निदान आवाज तरी उमटला. तो कोन बदलल्यास परत फक्त हवा...
मला फुंकतानाच एवढे हसायला येत होते की त्यामुळे इतरजण माझ्यापेक्षा जास्त हसत होते.. 
व्वा दिनेश दा. कीती छान
व्वा दिनेश दा. कीती छान माहिती दिलीत बासरी बद्द्ल.. क्रुष्णाच्या आवडत्या बासरीचे नाव सानिका होते ना?
म्हणून तर लिहिलेय ना टिपीकल
म्हणून तर लिहिलेय ना टिपीकल वपू..... माझी लेक वाजवते कि !
सायली खूप छान
सायली खूप छान क्रुष्णकमल.
दिनेशदा खूप छान उतारा. मोसमी फलेच खायली जायची कारण म्हणजे उपलब्धता! निसर्गानीच आपल्या गरजेनुसार उपलब्धही करुन दिली आहेत.
प्राची आई मुलाचा अभ्यास पाहून नाॅस्टलजिक झाले. सध्याच्या कालात अभ्यास करणे वा करवून घेणे सोप झालंयं का?
दिनेशदा खूप छान उतारा.
दिनेशदा खूप छान उतारा.
Pages