चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आरशात पाहिल्यावर आपल्याच शरीराकडे पहावेसे वाटावे असे शरीर असावे, अन चारचौघात आपल्या शरीराचे प्रदर्शन करायची वेळ आल्यास- उदा. वॉटरपार्कात- स्वतःचीच लाज वाटू नये म्हणून >> नाही पटल! आपले शरीर कसेही असले तरी ते स्वीकारणे गरजेचे, लाज वाटता कामा नये. शरीर प्रदर्शन हा ह्या धाग्याला अगदी अवांतर विषय आहे.

व्यायाम- आहार का सांभाळायच? तर शरीर हे आपल्या जीवनाचा उद्देश साध्य करण्याचे साधन आहे. साध्यापर्यंत जायचं असेल तर साधन सांभाळले पाहिजे. (आता कुणाच्या जीवनाची इतिकर्तव्यता शरीरप्रदर्शनातच असेल तर त्यांनाही शरीर सांभाळणे आलेच.)

अल्पना, हो गल्ली चुकलीच.
*
सीमंतिनी,
त्या प्रतिसादाचा टोन अन त्यातली स्मायली पहा जरा, प्लीज Happy
नसेल आवडला तर काढून टाकतो.

शरीरप्रदर्शनाची इतिकर्तव्यता बद्दलः उदा. सिक्सपॅकवाला शारूक किंवा सर्वच नट्/नट्या. बॉडी इज द यूएस्पी. यांचा वर्कआऊट अन त्यापाठीचे डेडिकेशन व कष्ट पहा प्लीजच.
असो.

काढू नका अजिबात. तुम्ही तुमचे स्मायलीवाले मत मांडावे, त्याचा आदरच आहे.

बाकी कधी काय चालेल सिनेमात ते सांगता येत नाही - शारुख चालतो, पीसीताई फायटर चालते आणि १० किलो वाढवलेली विद्या बालन पण चालते, विनोद खन्नाला सोडून स्वेटरमध्ये पॉन्च लपवलेल्या रिशी कपूरला श्रीदेवी मिळते.

रॉबिन, अगदी खरं आहे.
Wink

वजनाच्या बाबतीत माझा 'लोका सांगे ब्रह्मज्ञान' प्रकार आहे.
माझ्याकडे वेट रिडक्शनसाठी लोक उपाय मागतात आणि मी स्वतःच ओवरवेट.

एप्रिलपासून सायकलिंग वॉकिंग चालू आहे पण कामाचे तास इतके विचित्र आहेत की झोप नीट होत नाही.
मग ते काँपेन्सेशन करायला खाणे. सगळं घरचंच खाते पण अवेळी . सॅलॅड वैगेरे क्वचित.
फळे मला सहन होत नाहीत.
डाएटिंग /व्यायाम न करण्याचे खूप बहाणे मिळतात.
त्यात पूर्णवेळ बैठं काम.
वेट रिडक्शनच्या सगळ्या थेअर्या एकीकडे आणि प्रत्यक्ष रिडक्शन एकिकडे.
आता डाएटिंग २८ जुलैपासून चालू केलं .पण कंटिन्यूईटीची ग्यारंटी नव्हती.म्हणून मग हा पियर ग्रूप ३१ ला बनताच जॉईन केलाय.
सध्या मी चूपचाप हे फॉलो करत्येय आणि अपडेट लिहित्येय ज्यामुळे खाण्यात खूपच फरक पडलाय.

मला पण घ्या ग्रुप मधे ६ ७ महिन्यांपासुन फळे सोडुन डाळी पालेभाजी खातेय ३० पौंड वजन कमी केलय.आणि ३० कराय्च आहे.

काल रात्री पोंगल खाल्ले Sad नाईलाज होता. त्यात तरी डाळ जास्त होती तांदळापेक्षा. पण अगदीच थोडे खाल्ले.
आज ड्ब्याला पण तेच आहे. सॅलड, फळं वगैरे नेहमी प्रमाणे आणली आहे. फक्त ताक जमले नाही आणायला. उद्या आणि परवाचीच काळजी वाटतेय. दोन बड्डे पार्टीज आणि रविवारचे कंप्लसरी इडली सांबर डोसा:(
पार्टीज ला मी कमीच खाइन पण रविवार कोलमडणार बहुतेक. पण शेवट पर्यंत प्रयत्न करेन.

पेरू ,
उद्या आणि परवाचीच काळजी वाटतेय. दोन बड्डे पार्टीज आणि रविवारचे कंप्लसरी इडली सांबर डोसा:(
>> पार्टीमधे सॅलेड अन सूपवर जास्त भर द्या . डेझर्ट टाळा . शक्य असल्यास सरळ सांगा मी डाएट करतोय .
इडली मधे तस फारस वाईट काही नाही . फक्त प्रमाणात ठेवा अन चटणी टाळा . प्रोटीन्सचा इनटेक मात्र वेगळा घ्या.

अदिति,

इथे १ पाउन्ड कमी झालतरी आनंदाच्या उकळ्या फुटतात अरेरे >> त्यात काहीही चूकही नाही . प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते . प्रत्येकाचे वजन , आयडियल वेट पासून अंतर , किती दिवस करतोय हे सगळ वेगळ .
म्हणूनच करते जाओ , ज्यादा सोचो मत Happy

नवर्‍यानं संध्याकाळी जिमला जायचं ठरवलंय. सात ते आठ. आल्यावर साधारण किती वाजता जेवण करायला हवंय?

(जिम इन्स्ट्रक्टर ओन्ली तमिळ बोलतो. त्यामुळे डायेटींगचं काय सांगत होता ते याच्या डोक्यावरून गेलं. वीकेंडला मीच जिममध्ये जाऊन विचारून येणार आहे!)

माझे आजचे ६/७.
सुर्यफुलाच्या बिया खाल्या, थोड फरसाणही खाल्ल. Sad बाकी इतर गोष्टी बरोबर झाल्यात.

आज elliptical वर तासभर व्यायाम केला. (८५० कॅलरीज)
सकाळी ओट, दुध, बिन साखरेचा चहा पण २% फॅट वाल्या दुधामधे
दुपारी जेवणात उसळ, काकडी, टोमॅटो, कांदा. पोळी नाही
४ वाजता दुध, सन फ्लावर सीड्स, फरसाण, ग्रेप फ्रूट
संध्याकाळी उसळ, १ पोळी, सॅलड असणार आहे

केदार जाधव, मला पण यायचय ग्रुपमधे...गेल्या ८ महिन्यापासुन मी जिमला जातेय..६ किलो कमी झालय..अजुन ६ किलो कमी करायचय..खाण्यावर बर्यापैकि ताबा आहे. पण मुळात खादाड असल्यामुळे अजुन बरच जिन्कायचे आहे. बर झाल तु हा धागा काढ्लास ते..:)

काल व्यायाम केला घरीच. ३० मि च केला पण दम लागे पर्यंत. आणि घरातच फेर्या मारल्या. दिवसभर व्यवस्थित कंट्रोल होता खाण्यावर . मी ७/७ घेऊ शकते बहुदा.
एक विचारायच आहे. बी एम आय नेट वरुन सहज कळू शकतो, पण बॉडी फॅट कस मोजायच ?

अदिती वजन कमी व्हायला २ ते २.५ महिन्यांनी सुरवात झालेली. या बरोबर सकाळी २० मिनीटे kettle bell routine आणि संद्याकाळी ४५ मि. walk at home पण करत होते.

नवर्‍यानं संध्याकाळी जिमला जायचं ठरवलंय. सात ते आठ. आल्यावर साधारण किती वाजता जेवण करायला हवंय? >>
आयडीयली व्यायाम केल्यानंतर किमान एक तास जेवण करू नये (अस माझ्या डाएटीशिअन न सांगितल होत)
तुम्ही ९ च्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा. कारण जेवण आणि झोपेमधे सुद्धा साधारण २ तास अंतर हव.

७/८/२०१४
उठल्यावर आवळा रस + पाणी
ब्रेकफास्ट - अर्धी वाटी भात (उरला होता म्हणून ) + वरण आणि लेकाच्यातला उरलेला अर्धा रव्याचा घावन
लंच - वांगं, बटाट,, कांदा मिक्स भाजी, दोन छोटे फुलके, व मेथी घालून केलेली डाळीची आमटी.
अर्धा कप चहा.
डिनर - राजमा + टोमॅटो + कांदा + थोडं पनीर चे सॅलड, अर्धभाकरी=+सकाळची भाजी

काल लेकाला आवडतात ते रवा, नारळाचे लाडू केले पण वळून झाल्यावर हाताला राहिलेला रवाच फक्त चाटला.. चांगले झाले आहेत असं बाप-लेकाकडून कळले तरी खाण्याचा मोह आवरला Happy पण एक अर्धी चकली चहाबरोबर गेलीच..:( एक मार्क कापला...

व्यायाम - सव्व्वा तास योगा + अर्धा तास घरीच जॉगिंग.. ( घरी चालायचे असेल तरीही वॉकिंग शूज घालावेत ना ??)
गुण - आत्तापर्यंतचे ११/१४ + कालचे ६/७ = १७/२१

काल लेकाला आवडतात ते रवा, नारळाचे लाडू केले पण वळून झाल्यावर हाताला राहिलेला रवाच फक्त चाटला.. चांगले झाले आहेत असं बाप-लेकाकडून कळले तरी खाण्याचा मोह आवरला स्मित >>
हेच जमण महत्वाच आहे . Happy

जेवण आणि झोपेमधे सुद्धा साधारण २ तास अंतर हव.>>>. हे अंतर जेमतेम १ तास रहातेय.जेवण पण उशीरा होतेय.Can't help.

जेवण आणि झोपेमधे सुद्धा साधारण २ तास अंतर हव.>>>. हे अंतर जेमतेम १ तास रहातेय.जेवण पण उशीरा होतेय.Can't help. >>
देवकी , जेवण शक्यतो ९ नंतर करू नका .
जर शक्य नसेल तर ६-७ च्या दरम्यान जास्त (शक्यतो घरचे , अगदी सकाळची पोळी भाजीही चालेल ) खा आणि जेवण कमी करा .

गेल्या ६ महिन्यापासून वजन कमी करायला सुरुवात केली आहे. ६ महिन्यात ५ किलो वजन कमी झाले. कधी diet मोडायचे तर कधी चालणे जमत नव्हते.

काल सकाळी ७.३० ला १ कप चहा
अर्धा तास घराततल्या घरात चालले पाऊस पडत होता म्हणून.
चालल्यावर १ तासचे अन्तर न ठेवता अर्धी भाकरी आणि फ्लोवरची भाजी खाल्ली ९ वाजता.
१०.३० ला १ वाटी पपई च्या फोडी
१२ वाजता १ बटाटा वड्याचे तळलेले आवरण काधुन खाल्ले. म्हणून खण्यचा १ गुण कमी
जेवण १.३० ला १ भाकरी + आळूची पातळ भाजी + अर्धी वाटी वरण
३.०० ला १ कप चहा
५.०० ला १ पेर आणि १ वाटी bread उपमा office canteen मधे
९.०० ला रत्रिचे जेवण १ भाकरी + मुळ्यच्या पाल्याची भाजी + वालाची ऊसळ + ३ चमचे भात + २ चमचे दही
कालचे गुण ५/७ आता पर्यत्त १०/१४

केदार,

धाग्याबद्दल आभार आणि अभिनंदन. सर्व मण्डळींना शुभेच्छा.

माझा अनुभव :. गेली तीन वर्षे मी अगदी व्यवस्थित व्यायाम करतोय, अगदी व्यायाम शाळेत जाउन. पण आहारावर म्हणावे तसे नियंत्रण नाही. परिणाम, तब्येत उत्तम, Happy पण वजनात फरक नाही जे मला कमी करायचे होते/ आहे. Sad

गुण मोजायचे झाले तर ४ -४ असे प्रचंड जमा झाले असते. पण आहारावर नियंत्रण नसल्याने पुढ्चे ४ -४ मिळाले नुसते मिळाले नाहीत तर ते वजा करायला पाहीजेत. तसे केल्यावर एकूण तीन वर्षाची गोळाबेरीज वजन कमी करण्याच्या दृष्टीने शून्य, जी माझी आत्ताची परिस्थिती आहे.

तुम्हाला उणे मार्क द्यायचे आहेत का स्वतःला ते बघा.

नारळाचे लाडू केले पण वळून झाल्यावर हाताला राहिलेला रवाच फक्त चाटला
>>
लैच हसलो::फिदी:
भात लोक का खातात कळत नाही. पाच पांढरी विषे :- तांदूळ, मीठ , मैदा,साखर, अन दूध (होय दूधच!) ही जोपर्यन्त आहारात आहेत तो पर्यन्त श्रमजीवी व्यक्ती सोडून इतरानी वजन कमी करण्याच्या बाता मारू नयेत असे माझे स्वानुभवाचे मत आहे....
गहू आणि डाळी यामध्ये काही १०० टक्के प्रोटीन नसतात त्यातही मोठा पार्ट कार्बोहायड्रेट्सचा आहेच. त्यामुळे पुरेसे कार्ब्ज ज्वलनासाठी मिळतात..
चुरमुरे हा फसवा आहार आहे अहो तांदूळच तो. निसर्गोपचारात नुसते मीठ बंद केले की दोन दिवासाला एक किलो वजन कमी होते पण पहिले काही दिवसच.
णोर्मली एका आठवड्याला एक किलो वजन कमी व्हायला पाहिजे. होतेही. अ‍ॅडिपोज ची डेन्सिटी कमी म्हणजे व्हॉल्युम जास्त असल्याने नन्तर वजन स्लोली कमी होते पण इंचेस घटतात

पाणी १० ते १२ लिटर्स हवेच.

साधे गणित आहे दोन तोट्या असलेल्या हौदाचे . हल्ली ते दोन तोट्या असलेले गळके हौद, अनियमितपणे कामावर येणारे क्ष आणि य मजूर, आणि एकमेकांना आणि खांबांना ओलांडणार्‍या आगगाड्या अभ्यासक्रमात दिसत नाहीत खर्‍या. Happy
असो क्यालर्‍या ओतणारा वरचा इन्टेक नळ आणि क्यालर्‍या खर्चणारा खालचा औट गोइन्ग नळ यांचा एक्विलिब्रिअम गेला की गडबड होणारच. वरच्या बहुतांश डायटमध्ये इनकमिंग नळाचा व्यास मोठाच दिसतोय आणो चावीही सैल दिसतेय...त्यामुळे हौदाची लेवेल कमी होणे अवघडच Happy

१,२,३,४,५,६,७,८ आणि उलट. त्याले बाप्पू सर्वांगसुंदर व्यायाम म्हणत. त्याला नावे असावीत असे आठवत नाही.. पण पंखासारखे हात हलवून डोक्यावर नेऊन टाळ्या वाजवायच्या त्या प्रकारात हात लैच दुखायचे.... पण रप्पदिशी वर टाळ्याचा आवाज आल्यावर लै मज्जा वाटायची. ...

... बस बस पगले अब रुलायेगा क्या !

Pages