चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपुर्‍या झोपेने हार्टेचे प्रश्ण होतात खरे असावे, कारण आमचा डॉक (ज्याच्याकडे अमाप रोजचे पेशंट, रोज रात्री २ वाजेपर्यंत लाईन. होम विजिट्स मधूनच) असाच गेला. ते हि होम विजिट्स जाताना रस्त्यात.

योगा, जिम नेहमी. फक्त झोप नाही. आम्हाला शॉक. कारण डॉक हा हार्ट स्पेशालिस्ट. ह्याला कसे समजले नाही ह्याचे कोडेच आम्हाला पडले. त्यांची बायको म्ह्णाली, दोनला आले की तीन तास झोप असे... मग पाचला व्यायाम. मधूनच विजिटस....
बिचारा डॉक असाच गेला म्हटल्यावर पेशंटस गडबडले. असो.

झोप नीट घ्यावी.

पण जेवताना १ वाटी बासुंदी , संध्याकाळी वैनिला आइसक्रीम खाल्ल्यामुळे

>> हिला ग्रूप मधून निष्कासित करणे आवश्यक आहे.....::फिदी:

मलापण वजन कमी करायच आहे! तब्बल ६० किलो असेल आता. माझ्या उंचीप्रमाणे ते वजन ५० तरी हवं !!!

बाळंतपणामध्ये वाढलेलं वजन कमी कसं करावं कळत नाही.

मी रोज कमी जेवते, २० मिनिटे brisk walking करते, भरपूर पाणी पिते, फलाहार जास्त असतो.

थोडीशी व्यायामाची सुरुवात म्हणुन गाडी दहा पंधरा पाउले लांब लावते आजकाल Proud
नक्की नॉर्मल बिएमआय किती हवा. माझा २१.८ दाखवतोय, नॉर्मल बिएम आय

थोडीशी व्यायामाची सुरुवात म्हणुन गाडी दहा पंधरा पाउले लांब लावते आजकाल

याने काय होणारे??? वर लिहिलेय ४० मिनिटे सलग चालले पाहिजे म्हणुन Happy Happy

मीही स्टेशनवरुन ऑफिसात चालत गेले आज (ट्रॅफिक जॅम होता म्हणुन). फक्त ७ मिनिटे Happy

थोडीशी व्यायामाची सुरुवात म्हणुन गाडी दहा पंधरा पाउले लांब लावते आजकाल फिदीफिदी >>

पेरू Happy
जोक्स अपार्ट पाण्याची बाटली न बाळगता उठून जाऊन पाणी पिणे , लिफ्ट ऐवजी जिने चढणे , कॅरम ऐवजी टी टी खेळणे , जवळच्या अंतरावर चालत जाणे Everything helps . Happy
लगेच वजन कमी व्हायला नाही पण बॉडी अ‍ॅक्टीव्ह व्हायला .

काहीमहिन्यांपूर्वी माझा व्यायाम चांगला चालू होता. उशीर, वारा, पाउस, संधार कशाचीही पर्वा न करता जिमला जायचे पण अचानक पाठदुखी चालू झाली मग डॉने व्यायाम बंद करायला सांगितला आणि कार्ब्ज कमि करायला सांगितले. म्हणुन आता जेवणावर बर्‍यापैकी कंन्ट्रोल आहे.

ईब्लिस,
खूप छान माहीती, नक्की अमलात आणेल, तसा एवढे जिने चढल्यावर / फिरून आल्यावर पण थकवा नाही येत, उलट एक्दम छान आणी फ्रेश वाटते, तरी सुद्धा काळजी तर घ्यायलाच हवी

कालचे गुण ६/७

दीड तास जीम...

ब्रेकफास्ट : २ पोळी आणि चहा
११ वाजता : १ इडली
१:३० वाजता: दुधी भोपळा भाजी, २ फुलके, १ काकडी
४:०० वाजता :३ मारी बिस्कीटे, १ कॅडबरी Sad
७:०० वाजता :: घरी बनवलेली भेळ - मुरमुरे, कांदा टोमॅटो, शेव.... चहा
९:०० वाजता : १ उकडलेले अंडे आणि ४-५ कच्चे. पनीर क्यूब्स चाट मसाला लावून

छान माहिती मिळत्येय इथे आल्यापासून.. आणि जरा काही तोंडात टाकताना इथली आठवण येते.
६/६/१४ -
ब्रेकफास्ट - एक प्लेट उपमा, चहा नेहेमीच साखरेशिवाय घेते.
लंच - दोन फुलके, एक छोटी वाटी छोले पण खोबर्‍याशिवाय, एक छोटी वाटी दोडक्याचे भरीत दही घालून
चहा ऐवजी वाटीभर पातळ ताक
डिनर - दोन फुलके, अर्धी वाटी छोले आणि अर्धी वाटी तोंडल्याची भाजी.
सव्वा तास योगा आणि अर्धा तास घरीच सो कॉल्ड पॉवर वॉक (जेसिका स्मिथ सोबत Wink )
मला वाटते ६/७ घ्यावेत..

कारण रोजची अपुरी झोप हे दिले होते. >> मला ही आज प्रचंड एक्सोस्टेड वाट्त होतं झोप पूर्ण झालीच नाही. Sad
आज सक्तीने झोपून राहीले. व्यायामाच्या इन्स्ट्रक्श्न्स एवढ्या स्ट्राँग झालेल्या मनाला की उठून व्यायाम कर असं वारंवार बजावलं जात होतं पण शरीर साथ देत नव्हतं. पण एखादे दिवशी अशी सक्तीची सुट्टी चालेल बहुदा. फ्रेश वाटतेय पण. घरी गेल्यावर संध्याकाळी अर्धा तास व्याया करेनच. पण आजचे गूण ३/७. (गुणांचं फारसं नाही, मनाचं समाधान की व्यायाम करतोय हे महत्वाचं)

तसंही ब्रिस्क वॉकींग होतंच मुलाला उचलून घेऊन शाळेपर्यंत १० मिनीटे. आम्ही रोज लेट लतीफ Proud

डाएट जेवण आणि व्यायाम बर्‍यापैकी जमतंय. के एफ सी चा बर्गर नवर्‍याने समोर बसून हादडला. मला चक्क काहीच वाटलं नाही. Happy ग्रेट!! आता फक्त फळे आणायची राहीलेत.

आज सकाळी ब्रेफा करता आला नाही. आवराआवरी पळापळी मध्ये उशीर झाला. सो एक कप चहा. दुपारी २ चपात्या आणि एक फळभाजी. संंध्याकाळी चहा आणि पराठा घेईन. रात्री चपाती भाजी डाळ भात. मध्ये सातेक वाजता कोबीचं सॅलड घेइन. यावेळी भूक अनावर होते. जेवण उरकेपर्यंत १०व/ १०.३० होतात.

रॉहू, एकदम पटलं म्हणून तर म्हातारी माणसे म्हणत जेवल्यावर शतपावली करावी. वाढत्या वयासोबत पचन शक्ती कमजोर होते. मला रोज जमत नाही जेवल्यावर पण आवराआवरी, मुलाच्या मागे पळापळ होते. Happy

इब्लीस रॉहू मस्त पोस्ट्स. साती छान ट्रॅकवर आहेस. एखादे दिवस खायचं पण दामदुपटीने व्यायामही करायचा मग. Happy नाऊमेद होऊ नकोस. केदार म्हणतो तसं ही टेस्ट मॅच आहे.... बी कंसीस्टंट!! आणि तू आहेसच!! Happy

झंपी, मी खाते अंडं पण बुधवारी किंवा शुक्रवारी. चिकन / मासे फक्त रविवारीच. श्रावण नाही!! मला सांगा रे नारळाचं दूध वापरलेली मच्छी करी चालेल का??

इथे कन्फेस केलं की झालं असं काही आहे का?

हाय टार्गेट असणार्‍यांना या पुढे माफ केले जाणार नाही असा नियम काढायला हवा.
(मला पण त्यात इन्क्लुड कर केदार, मी दिलेली शिक्षा भोगायला तयार आहे)

आजचा अपडेट
सकाळी ६ ला उठून ४ मनुका आणि एक चकती अंजीर, एक ग्लास गरम पाणी
मग ४५ मिनिटं व्यायाम.
अर्धा कप चहा दोन मारी बिस्किटं.
१० वाजता दिड पालक पराठा (नो तेल अ‍ॅट ऑल) + अर्धा लिंबू गरम पाण्यातून
११.३० ला एक डबाभर पपई + खरबूज
दुपारी लंच मध्ये सॅलड्+ताक्+दोन फुलके आणि गवारीची भाजी.
दुपारी चहा दोन बिस्किटं (सकाळप्रमाणे)
७ ला एक पेरू आणि गरम पाण्यातून लिंबू
९ ला सॅलद.
डिनर २ फुलके + भजी + एक वाटी वरण (विधाऊट फोडणी)

तसं नाही , पण बर्याचदा लोक म्हणतात मी इतकं डाएट करते, इतकं जपून खाते पण वज्ञ कमीच होत नाही.
इथे कन्फेशन दिल्यावर आणि मार्किंग सिस्टीम असल्यामुळे ट्रॅक रहातो आणि आपण कुठे कमी पडलो ते पहाता येते.

अर्थात चुकांना शिक्षा मिळणार असतील तर तो ही एक बोनसच.
Wink

मी रोज कमी जेवते, २० मिनिटे brisk walking करते, भरपूर पाणी पिते, फलाहार जास्त असतो.

>>
रमा , कमी जेवणे हा त्यावर उपाय नाही त्याने अशक्त पणा येईल.
"Eat breakfast like a king, lunch like a prince and dinner like a pauper!"
This common and simple quote is a great way to remember how to eat throughout the day. You should start the morning by eating a full, balanced and healthy diet with no real exemptions. As the day progresses, you should start to eat light and eat less carbs near the evening. This helps your metabolism progressively continue to work; as a result, towards the end of the day, you should sleep easily without feeling too full. Your body will continue to work throughout sleep and be ready in the morning for the cycle again. You should take in consideration if you're a morning person or night/evening as you may have to tweak this little saying a bit.
आंतरजालावरून....

इथे कन्फेस केलं की झालं असं काही आहे का?

>> अस काही नाही ग . Happy
तू अगदी सेट आहेस डाएट अन व्यायामात . त्या लेवल ला एक सेल्फ डिसिप्लिन तयार झालेले असते , एखाद दिवस चुकल तरी परत ट्रॅकवर येण सोप असत
पण इथे असेही लोक असतील के ज्यानी आताच सुरू केलय हे , त्याना पिअर प्रेशरने खूप फरक पडतो . इस्पेशिअली जेव्हा अनेक अडचणी येत असतात अन आता हे सोडाव अस वाटत असत तेव्हा इतरांच पाहून फरक पडतो . त्याचवेळी एखाद दुसरा दिवस चुकला तर आता काय जमत नाही , हे बंद कराव अस मनात येऊ शकत .
साधारण महिन्याभराने स्वतःवर कंट्रोल येतो , कारण रिझल्ट दिसत असतात अन याची सवयही झाली असते

म्हणून नवीन सुरू करणार्याना तरी अपडेट मस्ट Happy

इथे कन्फेस केलं की झालं असं काही आहे का?>> सर्वांचेच कान उपटण्यासाठी सर्वप्रथम खूप धन्स दक्षे. पण शरीर साथ देत नाही तेव्हा आराम करावासा वाटतो. पण तो फक्त एनर्जी सेवर असावा. मात्र खाण्याच्या बाबतीत सूट नाहीच ना. मनावर कंट्रोल आणि सेल्फ मोटीवेटेड असणं फार इंपॉर्टंट!!

तू अगदी सेट आहेस डाएट अन व्यायामात . त्या लेवल ला एक सेल्फ डिसिप्लिन तयार झालेले असते>> हे अगदी!! दक्षिणा, तुझ्यासारखी कंसीस्टन्सी कधी येईल या प्रयत्नात आहे Happy सध्या फक्त टाईम मॅनेज करायला प्रचंड प्रयत्न पडत आहेत.

आज संध्याकाळी ४५ मि. व्यायाम नक्की. केदार मला पकड शिक्षेमध्ये. मला चालेल. Happy

aaj 7/7

ड्रिमे मी पण व्यायामाच्या बाबतीत फार शिथिल आहे गं.
पण डाएट कम व्हॉट मे, पाळतेच. कुणीच मला मोहाला बळी पाडू शकत नाही.
पण मी स्वतः स्वतःला कन्सेशन देते त्या दिवशी खाते हवं ते, पण सवयीने ते जातच नाही. किंवा थोडं खाल्लं तरी अपराधीपणाचे ढग इतके दाटून येतात की पोट तुडूंब भरल्याची भावना होते. Proud

कुणीच मला मोहाला बळी पाडू शकत नाही.>> दॅट्स लाईक अ गूड गर्ल (लाईक मी!!! :फिदी:) मी पण ठरवलं की करतेच मग अगदी केक, आईसक्रीम समोर आलं तरी चक्क नाही सांगते. ही बेसिक स्टेप आधी जमायला हवीच. या जंक फूड चा खरं तर शरीराला काहीच फायदा नसतो. जीभेचे चोचले फक्त!! (सुबह का भूला :फिदी:)

अरे केदार पण सुरूवातीलाच जरा संयमाची दोरी घट्ट धरून ठेवायला हवी असं माझं मत. >> येस . त्यात तर काही वादच नाही .

जरा लोकांच बस्तान बसेपर्यंत थांबू , तेवढ्यात किती जण सिरियस आहेत तेही कळेल .
मग त्या कोअर ग्रुपच थोड जास्त स्ट्रीक्टली चालू करू . काय म्हणता ?

हो हो अगदी चालेल.
ए मला एक आयडिया सुचलिये. आपण आठवड्यातून एकदा, फक्त पुण्यातले जे कोणी या ग्रुपचे लोक आहेत त्यांनी भेटून एक तास व्यायाम आणि डाएट च्या टिप्स ची देवाण घेवाण करायची का?

Pages