चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे मार्कस ६/७ मी कडधान्ये एवढ्या प्रमाणात खाऊच शकत नाही त्यामुले १ मार्क जाणारच बाकी सकाली ४ किमी ब्रिस्क वाक व ४० मि. पोहणे नियमीत . गोड वर्ज्य व तलणही

७/८/१४
६.३० - १ कप चहा + ४ बिस्किटे
९.०० - १.५ पोळी + कोबी ची भजी
११.०० - १ कप चहा
३.३० २ पोळी + कोबी भाजी + १ वाटी मुग वरण+ ३-४ चमचे पनीर भुर्जी + काकडी कोशिंबीर
५.३० - १ कप चहा + २ टोस्ट
९.०० - २ मोठे बाउल टोमाटो सार
१/२ तास चालणे

रॉहू ,
माफ करा , पण मला तुमचा टोन फार निगेटीव्ह वाटला . सुरूवातीलाच परफेक्शनची अपेक्षा का करायची ?
हळूहळू स्ट्रीक्टनेसही येईल पण सुरूवात तर करायला हवी ना ? Happy

भात लोक का खातात कळत नाही. पाच पांढरी विषे :- तांदूळ, मीठ , मैदा,साखर, अन दूध (होय दूधच!) ही जोपर्यन्त आहारात आहेत तो पर्यन्त श्रमजीवी व्यक्ती सोडून इतरानी वजन कमी करण्याच्या बाता मारू नयेत असे माझे स्वानुभवाचे मत आहे....

>> मी स्वतः यातली एकही गोष्ट न सोडता २८ किलो वजन अगदी व्यवस्थित कमी केलय . उलट दूध तर रोज ३-३ कप पिऊन . तेव्हा प्रत्येकाची केस वेगळी असू शकते . ज्या मिनिमम गोष्टी करू शकतोय त्या तर करू .
या गोष्टी कमी केल्या पाहिजेत हे तर कोणीही मान्य करेल (तांदूळ आणि दूध विष थोडा ज्यादा हो गया Happy ) पण अशा टोन मधे लिहिल तर भीती बसायची शक्यताच जास्त आहे ना ?

माझा आजचा अपडेट
सकाळी ४ मनुका १ चकती अंजीर
२५ मिनिटं पॉवर वॉक्+एरिबिक्स - २५ मिनिटं (घरीच)
अर्धा कप चहा + २ बिस्किटं
ब्रेफाला मुळा दुधी मिक्स किसून पराठा.
लिंबू पाणी गरम.
११.३० खरबूज्+पपई एक डबा
लंचला सॅलड + दोन फुलके + मसूराची उसळ + ताक
यापुढचा अपडेट
दुपारी चहा + ४ बिस्किटं
७ वा. एक मोसंब + लिंबूपाणी
९ वा. सॅलड
रात्री डिनर ला सूप ( टोमॅटो, कांदा, दुधी, गाजर इ,) इथे नी चा शब्द उपयोगी पडेल
हे ते ढकल सूप. (उरलेल्या भाज्या सरकवते सूपात)

माझा अपडेट :
चालणे १ तास
प्रोटीन्स : २ अंड्याच पांढर , १ वाटी उसळ
फळे : १ सफरचंद, सेलेड
गोड , तळलेले : काही नाही .

गुण : ७/७

माझे आजपर्यतचे १८/२१ . व्यायाम न चुकता होत आहे. सुन ४ वरुन आता १२ पर्यत झाले आहेत. १०० दोरीच्या उड्या, ४५ मिनिटे चालणे, ५ मिनिटे धावणे ५ मिनिटे जॉगीग एवढी प्रगति झालि आहे. हळु हळु अजुन वाढ्वेन. खाणे पण control होत आहे. फक्त फळे खायला कंटाळा करत आहे. हा धागा वाचुन प्रोत्साहन मिळत आहे. thanks to all for that.

रॉहू, मलाही लिहिताना आणि नंतर वाचताना हे हास्यास्पदच वाटले होते पण गेल्या वेळेस लाडू केले तेव्हा त्यातले काही माझ्याही पोटात गेलेच होते.. ह्या वेळेस मोह आवरला इतकेच.. Happy
दक्षे तू आणि केदार घरीच चालण्याचा व्यायाम करता हे वाचले पण तुम्हीही घरी शूज घालता का ? का कोण जाणे मला फरशीवर चालताना किंवा जॉगिंग करताना शूज घालून थोडे अवघडल्यासारखे होते.. न घालता केल्यास थोडी पावले दुखल्यासारखी वाटतात.. काय करणे योग्य ??

रॉहू, इब्लिस सगळ्याच पोस्ट्स वाचनीय.

मला हेल्प हवेय लोक्स!! आहाराचं प्रमाण केदार ने दिल्यासारखं पाळण्याचा प्रयत्न करतेय. फक्त सकाळ संध्याकाळचा चहा बंद नाही केलाय. फळं अजून नाही Sad पण बाकी सगळं तसंच. नो तेलकट, नो बेकरी फूड आणि भरपूर कडधान्य, सलाड्स, सकाळी कपभर दूध, सकाळचा ब्रेफा रोज! भात पण खूप कमी केलाय.

मला गेले दोन दिवस फार गळून गेल्यासारखं वाटतेय. डॉ कडे फेरी होईलच या वीक मध्ये पण काही चुकतेय का व्यायाम आणि आहार? व्यायाम घरीच करते बैठे सायकलींग, पाय वर खाली, बटरफ्लाय, घरातल्या घरात सून थोडं जॉगींग, माहीत असलेली योगासने. धाप लागून घामेघूम होईपर्यंत करते निदान ४०-४५ मि.

झोप अपूरी असल्याने / शांत नसल्याने होत असेल का?

ड्रिमगर्ल, तू पिअरप्रेशरखाली आहार नियंत्रण/ वजन कमी करते आहेस का?
दिवसाला किती पाणी पिते आहेस? ते मोज एकदा. डीहायड्रेशन व्हायला नको.

रॉहू, इब्लिस सगळ्याच पोस्ट्स वाचनीय.

मला हेल्प हवेय लोक्स!! आहाराचं प्रमाण केदार ने दिल्यासारखं पाळण्याचा प्रयत्न करतेय. फक्त सकाळ संध्याकाळचा चहा बंद नाही केलाय. फळं अजून नाही Sad पण बाकी सगळं तसंच. नो तेलकट, नो बेकरी फूड आणि भरपूर कडधान्य, सलाड्स, सकाळी कपभर दूध, सकाळचा ब्रेफा रोज! भात पण खूप कमी केलाय.

मला गेले दोन दिवस फार गळून गेल्यासारखं वाटतेय. डॉ कडे फेरी होईलच या वीक मध्ये पण काही चुकतेय का व्यायाम आणि आहार? व्यायाम घरीच करते बैठे सायकलींग, पाय वर खाली, बटरफ्लाय, घरातल्या घरात सून थोडं जॉगींग, माहीत असलेली योगासने. धाप लागून घामेघूम होईपर्यंत करते निदान ४०-४५ मि.

झोप अपूरी असल्याने / शांत नसल्याने होत असेल का?

आजचे गूण ५/७

ड्रिमगर्ल - अगदी सुरुवातीलाच ४५ मिनिटे व्यायाम नका करु. रोज हळू हळू वेळ वाढवत न्या. त्यामुळे कदाचित थकवा जाणवत असेल. तसेच हिमोग्लोबिन चेक करुन घ्या.

मला गेले दोन दिवस फार गळून गेल्यासारखं वाटतेय. डॉ कडे फेरी होईलच या वीक मध्ये पण काही चुकतेय का व्यायाम आणि आहार? व्यायाम घरीच करते बैठे सायकलींग, पाय वर खाली, बटरफ्लाय, घरातल्या घरात सून थोडं जॉगींग, माहीत असलेली योगासने. धाप लागून घामेघूम होईपर्यंत करते निदान ४०-४५ मि. >>
डॉ ना नक्की दाखवा . व्यायाम हळूहळू वाढवत न्या . सवय नसेल तर अचानक भरपूर करू नका .

तसेच हिमोग्लोबिन चेक करुन घ्या.>> हेच असणार Sad तरी नाचणी, दूध, लाभो चालू आहे. गोळ्या/टॉनिक घ्यावं लाग णार बहुदा!!

रोज अर्धा तासच करत होते... दोन दिवस झाले वाढवला १५ मि.

कालचा अपडेट ५/७ की ६/७ ?
व्यायाम ब्रिस्क वॉक ४ मैल
ब्रे. फास्ट - दूध , अर्धे केळं, लंच - द्लिया खिचडी फ्लॉवर, फरसबी गाजर घालून, स्नॅक - दूध, एक केकचा तुकडा, रात्रीचे जेवण - पोळी आणि कांद्याच्या पातीचा झुणका.

काल व्यायाम चुकला Sad सलग एक तास वेळ हाताशी नव्हता. पण ह्यापुढे जर १५-२० मिनिटे हाताशी असतील तर पीटिचे हात नाहीतर इंटरव्हल ट्रेनिंग मध्ये पूर्वी केल्या होत्या त्या एक्झरसाईझ करेन. पण चुकवणार नाही.

प्रोटीन, फळे इ आहार अचूक सांभाळला. बेकरी आयटम नाही अस काहीतरी वाचल. मारी बिस्कीट चालतील का? दिवसभरात २-३ मारी बिस्किटे होतात, आठवड्यातून ४ दिवस. नाहीतर पर्याय सांगा. (डब्यातून काढून खाता येईल असा, करत बसायला नको. लाह्या आवडत नाहीत अजिबात, ते सांगू नका).

३/७

सिंमतिनी सलग व्यायाम केला तरच फायदा होतो असं अज्जिबात नाही. आपल्याकडे दिवसातून फक्त अर्धा तास एकूण असला व्यायामाला आणि तो ही सलग नसेल तरी हरकत नाही. १० मिनिटं एकावेळी इतकं पाळून दिवसातून ३ वेळा टोटल ३० मिनिटं व्यायाम केला तरी चालतो. फक्त आजिबात व्यायाम नाही, असं नको.

सिमंतिनी ब्रिटानिया मारी लाईट बिस्किटं मी रोज ६ खाते आणि पुर्ण आठवडा खाते. या बरोबर तु मोनॅको अल्टर करू शकतेस पण गुड्डे वगैरे नको.

तर ६-७ च्या दरम्यान जास्त (शक्यतो घरचे , अगदी सकाळची पोळी भाजीही चालेल ) खा>>>>>>> यावेळी मी ट्रेन/ घराच्या मार्गावर असते.त्यामुळे ते शक्य नाही. घरातील इतरांना उशीरा जेवायचे असते.३-४ दिवस मी लवकर
जेवतेय.

dreamgirl ,
थोडे दिवस घामाघूम होईपर्यंत व्यायाम टाळा.अर्ध्या तासापेक्षाजास्त व्यायाम करू नका.आठवडाभराने वेळ वाढवा.मी चालणं सुरु केलं त्यावेळी पहिल्या आठवड्यात मला खूप झोप यायची.नंतर नंतर सर्व ओ.के.बहुदा बॉडीला यूस्ड टू व्हायला वेळ लागत असावा
तसेच खूप पूर्वी डॉक्टरांनी सांगितले होते की 'तुला एकदम भरभर चालायला जमत नसेल तर तुझ्या वेगाने चाल,पण फिरायचा वेळ ३० मिनिटे असेल तर तो ४० मिनिटे ठेव.'खरच तो सल्ला फायदेशीर पडला.नंतर २ दिवस डॉ.बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' वाचून १ कि.मी ,१० मिनिटात आटपायचा प्रयत्न केला होता.पण 'भरभर चालले पाहिजे 'या विचाराने डोकंही दुखायला लागलं आणि पायही भरून आले होते.शिवाय फ्रेश वाटण्याऐवजी खूप दमायला झाल्यावर परत नेहमीच्या चालीने चालणे सुरु केले,तेव्हा बरं वाटलं.

माझे आजचे अपडेटः सकळी चहा, फोडणीची कणीक (जाड कणकेचा उपमा),
जेवणः ३ फुलके, वालाच्या शेंगा, भिजवलेले चने, २ वाटी ताक, भात.
चहा.
जेवण : २ दशम्या, चवळीची उसळ, भात, हिरवी चटणी, मसाले भात (अर्धी वाटी).
व्यायामः २०मि. चालणे. तेव्हद्यातच दम लागला. मला थोडा दम्याचा त्रास आहे. (allergy asthma) योगासने प्राणायाम आज झाले नाही.

सकाळ : २ बदाम,१/२ कप अगोड चहा,१ अगोड टोस्ट
ब्रे.फा. उडदाच्या डाळीचे(प्रोटीन) आप्पे-थोडीशी चटणी, पाऊण ग्लास गाईचे दूध,१/२ कप चहा
दुपार : २ फुलके, फळभाजी.
मधे ३ दा १/२ कप अगोड चहा.
संध्याकाळ : १ बिनक्रिमी केक,४ वेफर्स,२ छोटे टोस्ट, १/२ कप चहा.१ फळ
रात्र : १ फुलका, भाजी, आमटी, भात,सोलकढी,सॅलड,१/२ चमचा मुरांबा

२५ मिनिटे योगासने व २५ मिनिटे चालणे...................६/७

आज काही कारणाने जेवायच्या वेळेस ऑफीस मध्ये थांबावे लागले. ( मी २वा घरी येते परत). सगळ्यांच्या डब्यातून थोडे थोडे सेच खाल्ले. ऑफीस मधली ए. आर्टीकल फर्स्ट अटेम्प्ट सी ए झाली म्हणून आणलेल्या पैकी चॉकलेट्स चा एकच तुकडा आणि एक काजू कतली खाल्ली .. संध्याकाळी अगदी भूक भूक झाली म्हणून ए. लाडू. बाकी सगळ ओके. म्हणून मार्क्स ०
व्यायाम पण झाला.
टोटल ४/७.
बादवे, मला व्यायाम झाला की जाम भूक लागते. ईज ईट ओके ?

काल केलंच कंट्रोल.
६/७ (सपाट रस्त्यावरून चालल्याने व्यायामाचा एक मार्क कमी घेतलाय)

आज आजारी त्यामुळे वॉकिंग नाही. ३/७.

काल केलंच कंट्रोल. << मलाही लक्ष्यात आलय की रोज खाण्यामधे कारण नसतांना काहीतरी आईस क्रिम, फरसाण वैगरे येतय. इथे लिहायच म्हणुन निदान हात तरी आवरते पण नाहीच खाल्लतरी चालण्यासारख असत, आज कंट्रोल करणार आहे. बघु Happy

दक्षे, एक विचारू ? बेकरी आयटम्स नकोत म्हणताना रोज बिस्किटं न चुकता कशी खाऊन चालतील ? अडीनडीला, दुसरे काही नाहीच तर खाल्लं तर चालत असेल असं वाटलं मला ..
धनश्री, मलाही घरी जॉगिंग केलं की भूक लागते.. मला वाटतं जरा दहा मिनिट्स थांबून काहीतरी एनर्जी मिळेल असं खाल्लं तर चालतं.. ऋजुता च्या पुस्तकात पण तसं आहे लिहिलेलं. जाणकार सांगतिलच..

ब्रेकफास्टः अंड्याचे आम्लेट दोन कप चहा.
लंच : दोन आलू पराठे, दही.
संध्याकाळी एक कप चहा. खाकरा
रात्री: कढी भात. (भात थोडा, कढी जास्त सूपसारखी प्यायले)

व्यायासः सूर्यनमस्कार, आणि एरोबिक्स.

Sonchafa,
my dietitian has prescribed me to eat biscuits everyday. i think britania marie are backery products undoubtedly
but they seem to be less in fat %.

दक्षे, मग ठीक आहे. Happy
८/८/२१०१४
सकाळी- आवळा रस + पाणी. अर्ध्या तासाने अर्धा कप क्रीम काढलेले दूध
नाश्ता - अर्धी भाकरी + भाजी, चार घास फोडणीचे पोहे, चहा.
लंच - राजमा + कांदा + टोमॅटो + कोबी सॅलड + एक वाटी तूरडाळीची आमटी + दोन फुलके
संध्याकाळी व्यायामानंतर चहा अर्धा कप + दोन बिस्किटं.
जरा वेळाने - एक फुलका, घेवड्याची भाजी.
डिनर - सकाळचे सॅल ड + आमटी एक वाटी + वांग्याचं भरीत एक वाटी + दोन फुलके
(भात नाही हे हळुहळु जमतयं Happy )

व्यायाम - योगा सव्वा तास, संध्याकाळी अर्धा तास पॉवर वॉक अगदी घाम निघेपर्यंत.. इथे बेळगावातल्या थंडीत घाम गाळणे जमलं बुवा एकदाचं..
दक्षे, जेसिका स्मिथ ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !

कालचे गुण २+४=६, आत्तपर्यंतचे २३/२८

Pages