चला , वजन कमी करूया

Submitted by केदार जाधव on 31 July, 2014 - 02:38

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

लोकहो ,

आता आपण या गुणपद्धतीत बर्यापैकी सेट झालो आहोत . तर आता कंप्लिट सेट घेऊया Happy
खाली आणखी काही पॉईंट अ‍ॅड केले आहेत , जे तसे सोपे आहेत पण ते गरजेचेही आहेत
आता थोडे जास्त सिरियसही होऊया

आणि आजपासून परत एकदा गुण मोजायला सुरू करू. फक्त यावेळी एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Wink

31 August, 2014 - 12:59

१. केदार जाधव १८२/२२०
२ सामान्य वाचक १४९/२२०
३ अदिति १३८/१८०
४ अनिरूध्द १२२/१६०
५ साती १०३/१७०
६ सीमांतिनी ५४/७०
७ मनीशा ९४/१४०
८ स्वाती२ ७०/८०
९ वर्षू नील १२१/१५०
१० देवकी १६५/२२०
११ smitaklshripad ८६/१८०
१२ पाखरू १४३/२२०
१३ खारूताई १५३/१९०
१४ दक्षिणा १०/१०
१५ पौर्णिमा १०/१०
१६ चनस ९६/१५०

१४ . चिनूक्स
१५. भानूप्रिया
१६. जाई
१७. प्रितीभुषण
१८. रीया
१९. पौर्णिमा
२० . स्मितू
२१ आनंदी
२२ पेरू
२३ डेलिया
२४ आशूडी
२५ वैदेही
२६ मंजू
२७ साधना
२८ . गीतांजली
२९ मृणाल १
३० मी_आर्या
३१ मना
३२ इश्श
३३ दक्षिणा
३४ dreamgirl
३५ दीप्स
३६ नि़क्षिपा
३७ मउ
३८ नंदिनी
३९ अमित एम
४० बीएस
४१ राजू७६
४२ वेल

४४ संदिप एस
४५ राज्या
४६ snoo
४७ शैलु
४८ अखी
४९ सहेली
५० सोनचाफा
५१ आभा
५२ धनश्री
५३ हर्मायनी
५४ मुग्धानंद
५५ आशिका
५६ सायली
५७ mrudul
५८ रमा
५९ आयडू
६० मी_चिऊ
६१ नानबा
६२ मंजू
६३ चनस

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा व्यायाम काही सुरु होत नाहिये. खरतरं नक्की काय व्यायाम सुरु करावा तेच कळतं नाहिये. योगासने वगैरे येत नाहित. नेटवरची पण कोणती करावी ती कळतं नाहिये. ट्रेडमिलवर पळणं फक्त आता स्टार्ट करणारे.

आहारावर व्यवस्थित कंन्ट्रोल आहे. काल संध्याकाळी फक्त मुगाची उसळ आणि दिड फुलका खाल्ला आणि थोडे अननस.

आज सकाळी पण मुगाची उसळ आणि दिड फुलका खाल्ला. जेवणात सॅलड, अननस आणि भिजवलेले कच्चे मुग आणलेत. खुपच भूक लागली तर सिरियल्स घाईन. प्लस अ‍ॅपल आणि मोसंबी आहेच.

Roj ३० min spinning chalu aahe. Khane dalmalit. Protein jaast jaat nahiyet sharirat. Shijawaaycha kantala. अरेरे koni protein sathi soppe options suchwel ka? Eggs sodun.
>> मला स्वतःला तरी मोड फार आवडतात . सगळ्यात चांगला मार्गही आहे तो . थोडस लिंबू पिळल की छान लागतात Happy

योगासने म्हनजे व्यायाम नव्हे. तो ब्रीदिंग कपॅसिटी , विविध ग्लॅन्ड्स चे सिक्रिशन याच्याशी सम्बंधित भाग आहे. फॅट रिडक्शनला त्याचा काही उपयोग होत नाही....

मी सकाळी ओट दुध.
११ ला १ ग्रेप फ्रुट , १ कप दुध
२ ला उसळ १ पोळी १ गाजर, १ काकडी, कांदा
४/४:३० ला जरा गडबड झाली. आईस क्रिम खाल्ले Sad
सन्ध्याकाळी फक्त उसळ, त्यावर कांदा, टोमॅटो, कोथींबीर, वर बारीक शेव १ छोटा चमचा

६/७ घ्यावेत का?

यू नीड युअर कन्सेप्ट्स एक्झामिन्ड, अँड सेट स्ट्रेट. फिदीफिदी>> अहो इब्लिस, त्यासाठीच तुम्हाला विचारलं होतं.

ठीक आहे, आर्याची विपू बघते.
पण इथेच लिहिलंत तर बाकिच्यांनाही सहज वाचता येईल.

धन्यवाद! आर्याची विपू वाचली. पूर्णपणे पटली नाही.
सुकामेवा (माझ्यासाठी काजू वगळून) प्रमाणात खायला काहीच हरकत नाही हे माझे मत ठाम राहिले. Happy

अरेरे koni protein sathi soppe options suchwel ka? Eggs sodun. << टोफु, डाळी, उसळी, दही, दुध, हमस, किन्वा

अजुन ह्या लिस्ट मधे भर टाका लोक हो

माझा व्यायाम काही सुरु होत नाहिये. खरतरं नक्की काय व्यायाम सुरु करावा तेच कळतं नाहिये. योगासने वगैरे येत नाहित. नेटवरची पण कोणती करावी ती कळतं नाहिये. ट्रेडमिलवर पळणं फक्त आता स्टार्ट करणारे. >>
भरभर चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे . मी ९०% वेळा फक्त तोच करतो . सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही गावी , ऑफिस ट्रीप कुठेही गेला तरी तो चुकत नाही . एखाद दिवशी अगदी काहीच जमत नसेल तर घरातल्या घरात तरसाप्रमाणे चकरा मारल्या तरी चालतात . Happy

जेवणानन्तर दोन तासाच्या आत झोपणे म्हणजे व्यायाम बियाम केलेले सर्व व्यर्थ घालवणे आहे ... अर्थात नुसते टीव्ही पहात बसने हे झोपण्याच्य तोडीचे आहे. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हनजे वयानुरुप ,व्यवसायानुरुप शारिरिक हालचाली कमी होणे मग त्या अगदी छोट्या छोट्या घरगुती हालचाली का असेनात. त्या प्रमानात आहार कमी होत नाही. किम्बहुना तो वाढतच जातो. स्वयम्पाक, कपडे धुणे, झाडलोट करणे, कपाटे आवरणे, टीव्हीचा चॅनेल बदलण्यासाठी उठणे , आता तर फॅन लावण्यासाठी उठणे याही हालचाली बंद झाल्या आहेत. (आपल्या वाट्याचा व्यायाम कामवाल्या स्त्रिया करतात असे दिसते....:))फूट्बॉल वगैरे सामन्यात एका गेममध्ये खेळाडू किती पळतो त्याचे मोजमाप झाले आहे त्याचे आकडे अविश्वसनीय आहेत तसे आपण घरातल्या घरात किती चालतो अथवा हालचाल करतो त्याचा जरा आठवून हिशेब केला तर तो ही आकडा अविशसनीय इतका कमी असेल.

अवान्तर....
On average, all outfield players are required to run between 9 and 13 kilometres. The goalkeeper runs the least around a maximum of 4-6 Km. Overall, professional midfielders run the most whilst strikers sprint the greatest distance. For example, a top centre-forward has been shown to sprint 900 m (> 21 km/h) and runs 1520m at high intensity (14-21 km/h).

रॉहू.
प्रचंड सहमत.
कामवाल्या बाया काही अनुवंशिक किंवा एंडोक्राईन आजार नसेल तर तरतरित आणि अ‍ॅक्टिव आणि नॉर्मल्/कमी वजनाच्या दिसतात.
हेच ज्यांच्याकडे काम करायला बाया/यंत्रे/गडी आहेत ते ओवरवेट असण्याचे चान्सेस जास्त.
आमच्या इथे एक कम्युनिटीत मुली जरा मोठ्या झाल्या किंवा सूना आल्या की बाई जागेवरून उठत नाही.
सगळ आरडाओरडा जागेवर बसून करून लेकी -सूनांकडून करून घेते.
त्या कम्युनिटीतल्या स्त्रीया अतिशय जाड्या असतात.

काल ७/७ मिळालेच असते पण रात्रीच्या जेवणात एक वाटी कांद्या खोबर्याच्या वाटपाची मटकी आमटी खाल्ली.
आणि संध्याकाळी एक चहाचा चमचा साय.
सो कालचे -६/७

आज संयम सुटत चाललाय.
मागच्या सोमवारपासून स्ट्रीक्ट व्यायाम आणि डाएट चालू आहे.
आता दहा दिवस होत आलेत तर बचाकभर भात मस्तं तिखट मिठ तेल टाकून खावासा वाटतोय.
ही माझ्यासाठी कंफर्ट डिश आहे.
मनात पाचसहावेळा तरी खाऊन झालीय.

लोगों, आज मेरा होसला बढाओ.
Wink

सुमारे एक-दीड वर्षापूर्वी मुंबईतल्या एका मोठ्या कॉलेजचे कार्डिऑलॉजी डिपार्टमेंटचे प्राध्यापक, हार्ट अ‍ॅटॅकने गेले. तेही असेच अती व्यायामाने, असे वाटावे अशी परिस्थिती होती. He had just come back from his gym, and climbed 13-14 stairs to his flat. And had an infarct.

मागे एस ए पी इंडियाचा हेड, जो फिटनेस फ्रिकही होता, तो ४० वर्षांचा तरुण असाच अचानक हार्टफेलने गेला. त्यानंतर त्या संदर्भात एकदोन मेल्स नंतर फिरत होत्या. त्या मेल्समध्ये असे व्हायचे कारण रोजची अपुरी झोप हे दिले होते. ही मंडळी इतके काम करतात की त्यांना झोपायलाही वेळ नसतो. दिवसाकाठी ४-५ तास झोप पुरेशी आहे असे मानुन ते कामात झोकुन देतात. झोपेत असताना आपले शरिर अंतर्गत रिपेअर करत असते, पण झोपल्यानंतर कुठले अंतर्गत काम कधी होणार याचा पण एक क्रम असतो. दररोजची झोप जर फक्त ४-५ तासच व्हायला लागली तर हे अंतर्गत रिपेअरचे काम बोंबलते, हृदयाची रोजच्या रोज होणारी देखभाल होत नाही आणि आणि मग ते असे अचानक बंद पडते असे काहीतरी वाचल्याचे आठवतेय.

मी वेगवेगळ्या सोर्सकडुन आलेल्या याच विषयावरच्या दोन्-तिन मेली तरी वाचलेल्या. या कितपत ख-या अहेत?

सातीजी, मला असे वाटते, जे खायचे आहे मनासारखे ते आठवड्यातून एक दिवस मनसोक्त खावे. त्यामुळे टेम्प्टेशनचे प्रमाण कमी होईल.आमचे एक नॅचरोपाथीचे सर कशालाच बन्दी घालत नाहीत फक्त तेवढ्या प्रमानात व्यायाम वाढवतात. समजा एक कप चहा जास्त घेतला तर एक किमी अधिक चालायचे, दोन कप घेतला तर दोन किमी अधिक चालायचे .... असे.थोडक्यात व्रत भंगाचे प्रायश्चित्त घ्यायचे....

साती ,
संयम सोडू नका Happy
You are doing great Happy
ढोकळा , फक्त चिरमुर्यांची घरात केलेली भेळ ई नी चालतय का पहा . त्यातूनही इच्छा होत असेल तर थोडासा चव लागेपर्यंत( हे मह्त्वाचे Happy ) खा .
आपल्याला हे किमान काही महिने (होपफुली वर्षे) करायचेय Happy

आता दहा दिवस होत आलेत तर बचाकभर भात मस्तं तिखट मिठ तेल टाकून खावासा वाटतोय.
ही माझ्यासाठी कंफर्ट डिश आहे.>> चहा नाश्त्याच्या ऐवजी सकाळीच खाल्ली तर प्रमाणात तर नुकसान कमी होइल ना?

आज दुपारी लंच ऐवजी खाते.
सकाळचा चहा सोडलेलाच आहे.
साखरेशिवाय कॉफि /दूध.
केदारचा धागा जॉईन केल्यापासून दिवसभराचा दोन वेळचा चहाही बिनासाखरेचा केलाय.
आता जेवणात काय अ‍ॅडजस्ट होणार नाही.
दोन किमी एक्स्ट्रा चालेन म्हणते.
उद्या सांगते काय झालं ते. Wink
सगळ्यांना सहकार्याबद्दल धन्यवाद.

अपडेट्स प्लीज Happy
सकाळी पहिल्यांदा नेटवर आल्यावर अपडेट करायची सवय ठेवा . कालच (किंवा आधीच्या दिवसाच ) लक्षातही असत अन काल काही चुका झाल्या असतील तर आज प्रायश्चित्तही घेता येत Happy

काल व्यायाम केला पण जेवताना १ वाटी बासुंदी , संध्याकाळी वैनिला आइसक्रीम खाल्ल्यामुळे कालचे मार्क्स- ४/७

आज सकाळी अर्धा तास ब्रिस्क वॉक व नंतर सुर्यनमस्कार घातले. आजपासुन दररोज सुर्यनमस्कार घालण्याचे ठरवले आहे एक्स्ट्रा व्यायाम, चार पासुन सुरुवात केलिइ.

नाश्ता - कॉर्नफ्लेक्स
दुपारी १ वाजता - मोड आलेल्या मटकीची उसळ + ३ चपात्या
३ वाजता - १ ग्लास घरचे लो फैट दुधाचे ताक
६ वाजता - १ सफरचंद
मधेच एकदा पाव कप चहा
रात्री जेवणात - भाजी + २ चपात्या, वरण व भाताची लहानशी मूद
मला वाटते आजचे मार्क - ७/७

माझा व्यायाम सुरू झाला आजपासून. सकाळी सून (५) Sad आणि योगासने केली. जेवणही २.५ फुलके, भेंडीची भाजी, मटकी - काकडी सलाद, भात पाव वाटी, पण त्याआधी मटकीसोबत थोडा चिवडा खाल्ला. हे अजून ताब्यात येत नाहीये.

स्वारी...
काल.. रात्री- २ पोळ्या + कढी+ पातीची भाजी+कच्चा कांदा + ४चमचे भात( हो सुटविणे मुश्कील आहे)

आज सकाळी -१ कप चहा+२ व्हिट टोस्ट
१०.३०- डाएट चिवडा + २ चि़क्की तुकडे
आता १२.१५ ला काकडी

आधी ते सून सून वाचून लक्षातच येत न्हवते. ये सून सून क्या है झालं.

योगाने वजन पटकन कमी होत नाही पण पचन सुधारु शकते व खूप हळू हळू सुधारणा होते.

एकंदरीत भारतीय कार्ब्स खूप खातात का?

इथे कोणीच मासे, अंडी, चिकन (ज्यास्त प्रतिसादात)खाल्ले असे लिहिलेले दिसत नाही. शाहा ज्यास्त आहेत वाटतं.

Pages